पाठ ८४ वा - आत्मनेपदी अनद्यतन भूतकाळ (प्रथम भूतकाळ)
मागच्या एका भागात आपण अनद्यतन परस्मैपदी भूतकाळ पाहिला होता. आज आत्मनेपदी प्रथम भूतकाळ पहावयाचा आहे.
आत्मनेपदी भूतकाळाचे प्रत्यय खालीलप्रमाणे आहेत.
इ वहि महि प्रथम पुरुष
था: इथाम् ध्वम् द्वितीय पुरुष
त इताम् अन्त तृतीय पुरुष
याही भूतकाळात धातूला आधी ‘अ’ असा आगम होतो. त्याला अडागम असे म्हणतात व नंतर विकरण मिसळून प्रत्यय लावले जातात.
वन्द् (१ आ.) = नमस्कार करणे
अवन्दे अवन्दावहि अवन्दामहि प्रथम पुरुष
अवन्दथा: अवन्देथाम् अवन्दध्वम् द्वितीय पुरुष
अवन्दत अवन्देताम् अवन्दन्त तृतीय पुरुष
युध् (४ आ. प.) युद्ध करणे
अयुध्ये अयुध्यावहि अयुध्यामहि प्रथम पुरुष
अयुध्यथा: अयुध्येथाम् अयुध्यध्वम् द्वितीय पुरुष
अयुध्यत अयुध्येताम् अयुध्यन्त तृतीय पुरुष
दिश् (६ उ. प.) = दाखवणे
अदिशे अदिशावहि अदिशामहि प्रथम पुरुष
अदिशथ: अदिशेथाम् अदिशध्वम् द्वितीय पुरुष
अदिशत अदिशेताम् अदिशन्त तृतीय पुरुष
पाल् (१० उ. प.) = सांभाळणे
अपालये अपालयावहि अपालयामहि प्रथम पुरुष
अपालयथा: अपालयेथाम् अपालयध्वम् द्वितीय पुरुष अपालयत अपालयेताम् अपालयन्त तृतीय पुरुष
धातू स्वराने सुरु होणारा असेल तर नियम मागीलप्रमाणेच आहेत.
अर्ज् (१० उ. प.)
आर्जये आर्जयावहि आर्जयामहि प्रथम पुरुष
आर्जयथा: आर्जयेथाम् आर्जयध्वम् द्वितीय पुरुष
आर्जयत आर्जयेताम् आर्जयन्त तृतीय पुरुष
खालील वाक्यांचे आत्मनेपदी धातू वापरून भाषांतर करा.
१) त्यांनी चित्रपट पाहिला.
२) वार्यामुळे पाने थरथरली.
३) वानरांनी उड्या मारल्या.
४) आम्ही नदीमधे स्नान केले
५) राहूने सूर्याला ग्रासले.
६) पक्षी उडाले.
७) सेनापती पराभूत झाला.
८) तू रक्षण केलेस.
९) तुम्ही दया केलीत.
१०) चांदण्या चमकल्या.
११) आईने भात शिजवला.
१२) साधूने दीक्षा दिली.
१३) सर्व शिक्षक म्हणाले.
१४) अशोकने चित्रकेतूच्या राज्यात पाय ठेवला.
१५) महाभारतीय युद्धात कौरव मृत्यू पावले.
१६) मी मुलांना गोष्टी सांगितल्या.
१७) दासीने कपडे धुतले.
१८) प्रधानाने घोषणा केली.
१९) साधू चिन्तन करू लागले.
२०) राजाने सिंहासन सुशोभित केले.
उत्तरे
१) त्यांनी चित्रपट पाहिला.
ते चित्रपटम् अवालोकयन् ।
२) वार्यामुळे पाने थरथरली.
पवनेन पर्णानि अकम्पन्त।
३) वानरांनी उड्या मारल्या.
वानरा: अकूर्दन्त ।
४) आम्ही दोघांनी नदीमधे स्नान केले
आवां नद्यां अवागाहावहि ।
५) राहूने सूर्याला ग्रासले.
राहु: सूर्यम् अग्रसत ।
६) पक्षी उडाले.
खगा: अडयन्त ।
७) सेनापती पराभूत झाला.
सेनापति: पराजयत ।
८) तू रक्षण केलेस.
त्वं अत्रायथा: ।
९) तुम्ही सर्वांनी दया केलीत.
यूयं अदयध्वम् ।
१०) चांदण्या चमकल्या.
तारका: अद्योतन्त ।
११) आईने भात शिजवला.
जननी ओदनं अपचत ।
१२) साधूने दीक्षा दिली.
साधु: अदीक्षत ।
१३) सर्व शिक्षक म्हणाले.
शिक्षका: अभाषन्त ।
१४) अशोकने चित्रकेतूच्या राज्यात पाय ठेवला.
अशोक: चित्रकेतो: राज्यम् अपद्यत ।
१५) महाभारतीय युद्धात कौरव मृत्यू पावले.
महाभारतीययुद्धे कौरवा: अम्रियन्त ।
१६) मी मुलांना गोष्टी सांगितल्या.
अहं बालकेभ्य: कथा: अकथये ।
१७) दासीने कपडे धुतले.
सेविका वस्त्राणि अक्षालयत ।
१८) प्रधानाने घोषणा केली.
प्रधान: अघोषयत ।
१९) साधू चिन्तन करू लागले.
साधव: अचिन्तयन्त ।
२०) राजाने सिंहासन सुशोभित केले.
" पाठ ८४ वा - आत्मनेपदी अनद्यतन भूतकाळ (प्रथम भूतकाळ) " या Audio साठी खाली क्लिक् करा :
नृप: सिंहासनम् अभूषयत ।
No comments:
Post a Comment