पाठ १०४ वा - कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे
मागच्या एका पाठात आपण विध्यर्थी धातूसाधित विशेषणे पाहिली. विध्यर्थी धातुसाधित विशेषणांचा कर्मणी धातुसाधित विशेषणेहा एकच प्रकार आहे. आज आता आपण भूतकाळवाचक विशेषणे पहाणार आहोत.
भूतकाळवाचक विशेषणे कर्मणी व कर्तरी अशी दोन प्रकारची असतात. आपण ही विशेषणे मराठीत सुद्धा वापरतो. उदा. संचित धन, वर्धित वृक्ष वगैरे. ही विशेषणे भूतकाळात घडलेल्या घटनांची माहिती देतात. म्हणून त्यांना भूतकाळवाचक विशेषणे असे म्हणतात.
कर्मणी भूतकाळावाचक धातुसाधित विशेषणे -
मराठीत आपण क्रियापदांना खाल्लेले, प्यायलेले, घेतलेले असे ‘लेले’ प्रत्यय लावून जे शब्द वापरतो ती धातुसाधित विशेषणे आहेत. त्य़ासाठी संस्कृतमधे मूळ धातूला ‘त’ किंवा ‘इत’ प्रत्यय लागतो.
पा-पिब = पीत
दा-यच्छ् = दत्त
भ्रम् = भ्रान्त
हृ = हृत
ही ‘त’ हा प्रत्यय लागून तयार झालेली विशेषणे आहेत. तर
शंस् = शंसित
खाद् = खादित
वञ्च् - वञ्चित
गण् = गणित
ही ‘इत’ असा प्रत्यय लावून झालेली विशेषणे आहेत.
ही विशेषणे अकारान्त होत असल्यामुळे पुंलिंगात ती देव प्रमाणे चालतात, स्त्रीलिंगात ती आकारान्त करून घेऊन माला प्रमाणे चालवायची असतात तर नपुंसकलिंगात ती वन प्रमाणे चालतात.
काही धातूंच्या बाबतीत त प्रत्ययाचे क, ट, ढ, ण, ध, न, म, व असे रूपांतर झालेले दिसते.
उदा.
शुष् - शुष्क
तुष् - तुष्ट
दृश् = दृष्ट
सह् = सोढ
मुह् = मूढ
कॄ-किर् = कीर्ण
क्रुद्ध् - क्रुद्ध
ली = लीन
क्षै = क्षाम
पच् = पक्व
ही त्याची काही उदाहरणे आहेत.
काही अनियमित रूपे होतात; उदा.
दा = दत्त
धा = हित
पा = पीत
स्था = स्थित
मा - मित
कर्मणीभूतकाळवाचक विशेषणे ही विशेषणे म्हणून वापरली जातातच पण क्रियापदासारखी सुद्धा वापरली जातात.
विशेषणे म्हणून वापरलेली उदाहरणे
पीतं जलं मधुरम् अस्ति । प्यायलेले पाणी गोड आहे.
दत्तं धनं स: न प्रतिगृह्णाति । दिलेले धन तो परत घेत नाही.
येथे पीतं हे जलं चे विशेषण आहे तर दत्तं हे धनं चे विशेषण म्हणून आले आहे.
ही क्रियापदासारखी वापरायची असतील तर ती कर्मणीविशेषणे असल्यामुळे कर्मणीप्रयोगातच वापरावी लागतील.
उदा.
तेन अन्नं भक्षितम् ।
त्याने अन्न खाल्ले.
मया पाठ: पठित: ।
मी धडा वाचला.
छात्रै: कविता: पठिता: ।
विद्यार्थ्यांनी कविता वाचल्या.
खादितं अन्नम्, पीतं जलम्,
स्वाध्याय -
खालील वाक्यात कर्मणी भूतकाळवाचक विशेषणांची योजना करा.
(या वाक्यात कर्मणी भूतकालवाचक विशेषणे क्रियापदासारखी वापरलेली आहेत)
१) त्वया माला --- । (कृ)
२) युष्माभि: कविता: --- । (पठ्)
३) मया लेख: --- । (लिख्)
४) तेन धनं --- । (दा)
५) अस्माभि: चित्रपट: --- । (दृश्)
६) त्वया सेतु: --- । (रच्)
७) रामेण रावण: --- । (हन्)
८) अर्जुनेन युद्धं --- । (कृ)
९) शिवरायेण रायदुर्ग: --- । (जि-जय्)
१०) कालिदासेन मेघदूतं --- । (रच्)
११) दुर्वाससा दिव्यहार: --- । (प्र + दा)
१२) गजेन काष्ठं दूरं --- । (प्र + क्षिप्)
१३) काकेन दधिपात्रात् दधि वारंवारं --- । (खाद्)
१४) गोपालेन हंसकाकौ --- । (दृश्)
१५) नृपेण सेवक: --- । (आ + दिश्)
स्वाध्याय उत्तर -
खालील वाक्यात कर्मणी भूतकाळवाचक विशेषणांची योजना करा.
(या वाक्यात कर्मणी भूतकालवाचक विशेषणे क्रियापदासारखी वापरलेली आहेत)
१) त्वया माला --- । (कृ)
उत्तर - त्वया माला कृता ।
२) युष्माभि: कविता: --- । (पठ्)
उत्तर - युष्माभि: कविता: पठिता: ।
३) मया लेख: --- । (लिख्)
उत्तर - मया लेख: लिखीत: । (लिख्)
४) तेन धनं --- । (दा)
उत्तर - तेन धनं दत्तम् ।
५) अस्माभि: चित्रपट: --- । (दृश्)
उत्तर - अस्माभि: चित्रपट: दृष्ट: ।
६) त्वया सेतु: --- । (रच्)
उत्तर - त्वया सेतु: रचित: ।
७) रामेण रावण: --- । (हन्)
उत्तर - रामेण रावण: हत: ।
८) अर्जुनेन युद्धं --- । (कृ)
उत्तर - अर्जुनेन युद्धं कृतम् ।
९) शिवरायेण रायदुर्ग: --- । (जि-जय्)
उत्तर - शिवरायेण रायदुर्ग: जित: ।
१०) कालिदासेन मेघदूतं --- । (रच्)
उत्तर - कालिदासेन मेघदूतं रचितम् ।
११) दुर्वाससा दिव्यहार: --- । (प्र + दा)
उत्तर - दुर्वाससा दिव्यहार: प्रदत्त: ।
१२) गजेन काष्ठं दूरं --- । (प्र + क्षिप्)
उत्तर - गजेन काष्ठं दूरं प्रक्षिप्तम् ।
१३) काकेन दधिपात्रात् दधि वारंवारं --- । (खाद्)
उत्तर - काकेन दधिपात्रात् दधि वारंवारं खादितम् ।
१४) गोपालेन हंसकाकौ --- । (दृश्)
उत्तर - गोपालेन हंसकाकौ दृष्टौ ।
१५) नृपेण सेवक: --- । (आ + दिश्)
उत्तर - नृपेण सेवक: आदिष्ट: ।
No comments:
Post a Comment