Sunday, April 11, 2021

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते


) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव नैव  

अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातक: ॥७४-१५॥


) सर्वे यत्र विनेतार: सर्वे पण्डितमानिन:  

सर्वे महत्वमिच्छन्ति राष्ट्रं तदवसीदति ॥७४-१७॥


) फणिन: सन्ति बहव: भेकभक्षणतत्परा:  

एक एव हि शेषोऽयं धरणीधारणक्षम: ॥७४-२१॥


) कुसुमं वर्णसम्पन्नं गन्धहीनं शोभते  

शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा ॥७४-३६॥


) सा सभा यत्र सन्ति वृद्धा 

वृद्धा ते ये वदन्ति धर्मम्  

धर्मो वै यत्र चास्ति सत्यं 

सत्यं तद् यच्छलानुविद्धम् ॥७४-४०॥



) सुहृदां हितकामानां : शृणोति भाषितम्  

विपत्सन्निहिता तस्य नर: शत्रुनन्दन: ॥७४-४९॥



सुभाषिते उत्तरे


) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव नैव  

अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातक: ॥७४-१५॥


अर्थ - घोडा, हत्ती, वाघ यांचा काही (यज्ञात) बळी दिला झात नाही. तर बोकडाचा बळी दिला जातो. (यावरून असे वाटते की) देव हा दुर्बळांचा घातक आहे.


) सर्वे यत्र विनेतार: सर्वे पण्डितमानिन:  

सर्वे महत्वमिच्छन्ति राष्ट्रं तदवसीदति ॥७४-१७॥


अर्थ - जेथे सर्वच नेते असतात, जेथे सर्वच स्वत:ला पंडित मानतात, जेथे सर्वच महत्व मिळवण्याची इच्छा करतात ते राष्ट्र नाश पावते. 


) फणिन: सन्ति बहव: भेकभक्षणतत्परा:  

एक एव हि शेषोऽयं धरणीधारणक्षम: ॥७४-२१॥


अर्थ - बेडूक खाण्यात तत्पर असलेले नाग पुष्कळ आहेत. एक शेषनागच असा आहे की जो पृथ्वी धारण करू शकतो. 


) कुसुमं वर्णसम्पन्नं गन्धहीनं शोभते  

शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा ॥७४-३६॥


अर्थ -  रंगाने आकर्षक असलेले पण गंधहीन फूल शोभून दिसत नाही. त्याप्रमाणेच कृतीची जोड नसलेले गोड बोलणे शोभून दिसत नाही. 


) सा सभा यत्र सन्ति वृद्धा 

वृद्धा ते ये वदन्ति धर्मम्  

धर्मो वै यत्र चास्ति सत्यं 

सत्यं तद् यच्छलानुविद्धम् ॥७४-४०॥


अर्थ - जेथे वृद्ध लोक नाहीत ती सभाच नाही. जे धर्माचा उपदेश करत नाहीत ते वृद्धच नव्हेत. ज्यामधे सत्य नाही तो धर्मच नव्हे जे कपटाने युक्त असते ते सत्यच नाही.


) सुहृदां हितकामानां : शृणोति भाषितम्  

विपत्सन्निहिता तस्य नर: शत्रुनन्दन: ॥७४-४९॥


अर्थ - हित इच्छिणार्‍या मित्रांचे जो बोलणे ऐकून घेत नाही, त्याच्या जवळ संकते येतात. तो मनुष्य जणु शत्रूंनाच आनंद देणारा आहे.



No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...