पाठ ११२ वा - छन्दोविज्ञानम् भाग ३ अक्षरगणवृत्त
अक्षरगणवृत्तांमधे अक्षरांची संख्या नियमित असते. चारही चरणातील अक्षरांची संख्या ठराविक असेल तर त्याला समवृत्त म्हणतात. दोन दोन चरणातील अक्षरे समान असतील तर त्याला अर्धसम म्हणतात व ही संख्या ठराविक नसेल तर त्याला वृत्ताला विषम म्हणतात.
अक्षरगण वृत्तात अक्षरे ठराविक आहेत पण त्यांचा लघुगुरु क्रम कसा असेल त्यावरून वृत्ताचे विविध प्रकार होतात. उदा, ११ अक्षरे असलेली इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, दोधक, भ्रमरविलसित, मालती, रथोद्धता, वातोर्मी, स्वागता असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक वृत्तातील लघुगुरु क्रम वेगळा आहे. आपण काही ११ अक्षरांनी युक्त अशा अक्षरगणवृत्तांचा परिचय करून घेऊ.
१) इंद्रवज्रा - (अक्षरे ११. गण - त, त, ज, ग ग, यति ५, ६)
लक्षण - स्यादिन्द्रवज्रा यदि तौ जगौ ग: ।
दुर्वारसंसारदवाग्नितप्तं
दोधूयमानं दुरदृष्टवातैः ।
भीतं प्रपन्नं परिपाहि मृत्योः
शरण्यमन्यद्यदहं न जाने ॥ ३८ ॥ (छंद - इंद्रवज्रा)
दुर्वार संसार दवाग्नि तप्तं
ऽऽ। ऽऽ। ।ऽ। ऽऽ
त त ज गग
२) उपेन्द्रवज्रा - (अक्षरे ११ गण ज, त, ज ग, ग यति ५, ६)
लक्षण - उपेन्द्रवज्रा जतजास्ततौ गौ
लक्षण - उपेंद्रवज्रा वृत्तातही ११ अक्षरे असतात. गण क्रमाणे ज, त, ज व शेवटची दोन अक्षरे गुरु असतात.
अजातशत्रोः प्रतियच्छ दायं
तितिक्षतो दुर्विषहं तवागः ।
सहानुजो यत्र वृकोदराहिः
श्वसन् रुषा यत्त्वमलं बिभेषि ॥ ३-११ ॥
अजात शत्रोःप्र तियच्छ दायं
।ऽ। ऽऽ। ।ऽ। गग
ज त ज
तितिक्ष तोदुर्वि षहन्त वागः ।
।ऽ। ऽऽ। ।ऽ। गग
ज त ज
सहानु जोयत्र वृकोद राहिः
।ऽ। ऽऽ। ।ऽ। गग
ज त ज
श्वसन्रु षायत्त्व मलंबि भेषि ॥ ११ ॥
।ऽ। ऽऽ। ।ऽ। गग
ज त ज
हा भागवतातील तिसर्या स्कंधातील पहिल्या अध्यायातील श्लोक आहे. विदूर धृतराष्ट्राला सांगत आहे की महाराज, आपण अजातशत्रू युधिष्ठिराला त्याचा राज्याचा हिस्सा देऊन टाका. सहन करता न येण्यासारखे आपण केलेले अपराधहि ते सहन करीत आहेत. ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता, तो बदला घेण्यासाठी आपल्या छोटया भावांसह मोठया क्रोधाने फूत्कार टाकीत आहे.
३) उपजाति - इंद्रवज्रा व उपेंद्रवज्रा या वृत्तांमधे फारच थोडा फरक आहे. त्यामुळे एकाच पद्यात या दोन वृत्तांची सरमिसळ होत असते. ती कोणत्याही प्रमाणात झाली, म्हणजे १/२ चरण इंद्रवज्रा व १/२ चरण उपेंद्रवज्रा असे मिश्रण असेल तर ते वृत्त उपजाति वृत्त होते.
कोलाहले काककुलस्य जाते
विराजते कोकिलकूजितं किम् ।
परस्परं संवदतां खलानां
मौनं वरं तत्र हि सज्जनानाम् ॥६-२१॥
कोलाह लेकाक कुलस्य जाते
ऽऽ। ऽऽ। ।ऽ। गग
त त ज
विराज तेकोकि लकूजि तंकिम् ।
।ऽ। ऽऽ। ।ऽ। गग
ज त ज
परस्प रंसंव दतांख लानां
।ऽ। ऽऽ। ।ऽ। गग
ज त ज
मौनंव रंतत्र हिसज्ज नानाम् ॥६-२१॥
ऽऽ। ऽऽ। ।ऽ। गग
त त ज
४) शालिनीवृत्त - (अक्षरे ११. म त त ग ग यति ४ व ७ व्या अक्षरावर)
आज्ञा कीर्ति: पालनं ब्राह्मणानां
दानं भोगो मित्रसंरक्षणं च ।
येषामेते षड्गुणा: न प्रवृत्ता:
कोऽर्थस्तेषां पार्थिवोपाश्रयेण ॥२७-५४॥ (नी.श.)
आज्ञाकी र्ति:पाल नंब्राह्म णानां
ऽऽऽ ऽऽ। ऽऽ। गग
म त त
दानंभो गोमित्र संरक्ष णंच ।
ऽऽऽ ऽऽ। ऽऽ। गग
म त त
येषामे तेषड्गु णा:नप्र वृत्ता:
ऽऽऽ ऽऽ। ऽऽ। गग
म त त
कोऽर्थस्ते षांपार्थि वोपाश्र येण ॥
ऽऽऽ ऽऽ। ऽऽ। गग
म त त
प्रश्न १) खालील पद्यातील वृत्ते ओळखा
१) अनेकशास्त्रं बहुवेदितव्य
मल्पश्च कालो बहवश्च विघ्ना: ।
यत्सारभूतं तदुपासितव्यं
हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ॥
२) दानाय लक्ष्मी: सुकृताय विद्या चिन्ता परेषां सुखवर्धनाय । परावबोधाय वचांसि यस्य धन्यस्त्रिलोकितिलक: स एव ॥४-१४॥
॥
३) कल्पद्रुम: कल्पितमेव सूते
सा कामधुक् कामितमेव दोग्धि ।
चिन्तामणिश्चिन्तितमेव दत्ते
सतां तु सङ्ग: सकल: प्रसूते ॥७-३॥
४) वाणी दरिद्रस्य शुभाहितापि
ह्यर्थेन शब्देन च सम्प्रयुक्ता ।
न शोभते वित्तवत: समीपे
भेरीनिनादोपहतेव वीणा ॥१०-५॥
५) गृह्णन्तु सर्वे यदि वा यथेष्टं
नास्ति क्षति: क्वापि कवीश्वराणाम् ।
रत्नेषु लुप्तेषु बहुष्वमर्त्यै-
रद्यापि रत्नाकर एव सिन्धु: ॥११-२५॥
No comments:
Post a Comment