आत्मनेपदी आज्ञार्थ
आत्मनेपदी आज्ञार्थाचे प्रत्यय
ऐ आवहै आमहै प्रथम पुरुष
स्व इथाम् ध्वम् द्वितीय पुरुष
ताम् इताम् अन्ताम् तृतीय पुरुष
वन्द् ( १ आ. प.) = नमस्कार करणे
वन्द् + अ (विकरण) = वन्द (धातूचे अंग) आता प्रत्यय लागून अशी रूपे होतील.
वन्दै वन्दावहै वन्दामहै प्रथम पुरुष
वन्दस्व वन्देथाम् वन्दध्वम् द्वितीय पुरुष
वन्दताम् वन्देताम् वन्दन्ताम् तृतीय पुरुष
अहं वन्दै । आवां वन्दावहै । वयं वन्दामहै ।
त्वं वन्दस्व । युवां वन्देथाम् । यूयम् वन्दध्वम् ।
स:/सा वन्दताम् । तौ/ते वन्देताम् । ते/ता: वन्दन्ताम् ।
मन् (४ आ. प.) = मानणे
मन् + य (विकरण) = मन्य (धातूचे अंग)
आता प्रत्यय लागून अशी रूपे होतील.
मन्यै मन्यावहै मन्यामहै प्रथम पुरुष
मन्यस्व मन्येथाम् मन्यध्वम् द्वितीय पुरुष
मन्यताम् मन्येताम् मन्यन्ताम् तृतीय पुरुष
विद्-विन्द् (६ उ. प.) - मिळवणे.
विन्द् + अ (विकरण) = विन्द (धातूचे अंग) आता प्रत्यय लागून अशी रूपे होतील.
विन्दै विन्दावहै विन्दामहै प्रथम पुरुष
विन्दस्व विन्देथाम् विन्दध्वम् द्वितीय पुरुष
विन्दताम् विन्देताम् विन्दन्ताम् तृतीय पुरुष
चिन्त् (१० उ. प.) - विचार करणे
चिन्त् + अय (विकरण) = चिन्तय (धातूचे अंग). आता प्रत्यय लागून अशी रूपे होतील
चिन्तयै चिन्तयावहै चिन्तयामहै प्रथम पुरुष
चिन्तयस्व चिन्तयेथाम् चिन्तयध्वम् द्वितीय पुरुष
चिन्तयताम् चिन्तयेताम् चिन्तयन्ताम् तृतीय पुरुष
स्वाध्याय -
प्रश्न १) खालील धातू आत्मनेपदी आज्ञार्थात चालवा.
१) ईक्ष् (१ आ. प.) = पहाणे, डी-डय् (१ आ. प.) = उडणे
२) पद् (४ आ. प.) पाऊल ठेवणे, प्रवेश करणे. मन् (४ आ. प.) = मानणे
३) क्षिप् (६ उ. प.) = फेकणे, धृ-ध्रिय् (६ आ. प.) = जिवंत असणे
१०) चूर्ण् (१० उ. प.) = पीठ करणे, मन्त्र् (१० आ. प.) = मंत्रणा करणे
प्रश्न २) खाली वाक्यांचे भाषांतर करा. क्रियापदे आत्मनेपदी आज्ञार्थ वापरा.
१) मी पण पहावे का ?
२) तू अपेक्षा ठेऊ नकोस.
३) दु:खाची उपेक्षा करावी.
४) मी वाखाणणी करावी का ?
५) तुम्ही निंदा करू नये.
६) सूर्याने व चंद्राने प्रकाशावे.
७) वानरांनी उड्या माराव्यात.
८) मुलांनी तलावात अवगाहन करावे.
९) हे राहो, तू मला का ग्रासावे ?
१०) मुलींनी प्रयत्न करावा.
११) तू लाजू नकोस.
१२) आईने भोजन शिजवावे.
१३) बेडकांनी उड्या माराव्यात.
१४) तुम्ही ईश्वराला भजावे.
१५) पुरोहिताने यज्ञ करावा.
१६) विद्यार्थ्यांनी चित्रकलेत प्राविण्य मिळवावे.
१७) तू लोंबकाळू नकोस.
१८) तुमची कीर्ती वाढावी.
१९) तू दु:खी होऊ नकोस.
२०) तुम्ही दोघे गर्व करू नका.
२१) मनुष्याने संकटे सहन करावीत.
२२) तू चव घेऊन पहा.
२३) वनातील प्राण्यांना पीडा देऊ नका.
२४) पक्षांनी उडावे.
२५) दिव्यांनी प्रकाशावे.
आत्मनेपदी आज्ञार्तासाठी संस्कृतमधे भाश्षांतर - उत्तरे संस्कृतमधे भाषांतर
प्रश्न २) खाली वाक्यांचे भाषांतर करा. आत्मनेपदी आज्ञार्थी क्रियापदे वापरा.
१) मी पण पहावे का ?
अपि अहं ईक्षै ?
२) तू अपेक्षा ठेऊ नकोस.
त्वं मा अपेक्षस्व ।
३) दु:खाची उपेक्षा करावी.
दु:खम् उपेक्षेत ।
४) मी वाखाणणी करावी का ?
अपि अहं कत्थै ?
*५) तुम्ही निंदा करू नये. *
यूयम् मा विकत्थध्वम् ।
६) सूर्याने व चंद्राने प्रकाशावे.
सूर्य: चन्द्र: च प्रकाशेताम् ।
७) वानरांनी उड्या माराव्यात.
वानरा: कूर्दन्ताम् ।
८) मुलांनी तलावात अवगाहन करावे.
वालका: सरोवरे अवगाहन्ताम् ।
९) हे राहो, तू मला का ग्रासावे ?
हे राहो, त्वं मां किमर्थं ग्रसस्व ?
१०) मुलींनी प्रयत्न करावा.
बालिका: प्रयतन्ताम् ।
११) तू लाजू नकोस.
त्वं मा लज्जस्व ।
१२) आईने भोजन शिजवावे.
माता भोजनं पचताम् ।
१३) बेडकांनी उड्या माराव्यात.
मण्डूका: प्लवन्ताम् ।
१४) तुम्ही ईश्वराला भजावे.
यूयं ईश्वरं भजध्वम् ।
१५) पुरोहिताने यज्ञ करावा.
पुरोहित: यजेत ।
१६) विद्यार्थ्यांनी चित्रकलेत प्राविण्य मिळवावे.
विद्यार्थिन: चित्रकलायां प्राविण्यं विन्दन्ताम् ।
१७) तू लोंबकाळू नकोस.
त्वं मा अवलम्बस्व ।
१८) तुमची कीर्ती वाढावी.
युष्माकं कीर्ति: वर्धताम् ।
१९) तू दु:खी होऊ नकोस.
त्वं मा व्यथस्व ।
२०) तुम्ही दोघे गर्व करू नका.
युवां मा दृप्तेथाम् ।
२१) मनुष्याने संकटे सहन करावीत.
मानव: संकटानि सहताम् ।
२२) तू चव घेऊन पहा.
त्वं स्वदस्व ।
२३) वनातील प्राण्यांना पीडा देऊ नका.
वन्यप्राणिनं मा पीडयध्वम् ।
२४) पक्षांनी उडावे.
खगा: उड्डयन्ताम् ।
२५) दिव्यांनी प्रकाशावे.
दीपा: प्रकाशन्ताम् ।
No comments:
Post a Comment