पाठ ११४ वा - कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे
आपण मागच्या पाठात कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे अभ्यासली होती. भूतकाळवाचक विशेषणांमधे कर्मणी व कर्तरी अशी दोन प्रकारची धातुसाधित विशेषणे आहेत. ही विशेषणे पूर्वी घडलेल्या घटनांची माहिती देतात. म्हणून त्यांना भूतकालवाचक विशेषणे म्हणतात. उदा. कथिता कथा = सांगितलेली कथा. येथे कथिता = सांगितलेली हे विशेषण पूर्वी घडलेली घटना सांगत आहे.
कर्तरी भूतकालवाचक विशेषणे प्रकार १)
आपण पाहिले की कर्मणी भूतकालवाचक विशेषणे मूळ धातूला त किंवा इत प्रत्यय लावून तयार होतात. कथ् = कथित, दृश् = दृष्ट. धातू जर सकर्मक असेल तर अशी त प्रत्यय लावून झालेली विशेषणे ही कर्मणी भूतकाळवाचक असतात. पण धातू जर अकर्मक असेल तर अशाप्रकारची त प्रत्ययान्त विशेषणे ही कर्तरी भूतकाळवाचक असतात.
उदा. शृगाल: समायातं व्याघ्रं वदति ।
= कोल्हा आलेल्या वाघाला म्हणतो.
या वाक्यात समायात हे सम् + आ + या ह्या धातूचे कर्तरी भूतकालवाचक विशेषण आहे. इथे ते वाघाचे विशेषण म्हणून आलेले आहे. वाक्यात व्याघ्र हे कर्म द्वितीया विभक्तीत आहे. म्हणून त्या विशेषणाची द्वितीया विभक्ती आहे.
कुपितेन सिंहेन गर्जना कृता ।
या वाक्यात कुपितेन हे विशेषण सिंह या कर्त्याप्रमाणे आले आहे.
ही विशेषणे वाक्यात क्रियापदासारखीही वापरली जातात. पण ती कर्तरी प्रयोगातच वापरली जातील.
उदा.
स: गत: । = तो गेला
व्याघ्र: आयात: । = वाघ आला.
कर्तरी भूतकालवाचक विशेषणे प्रकार २)
जे धातू सकर्मक आहेत त्यांना ‘तवत्’ प्रत्यय लावून ही विशेषणे तयार केली जातात. त्या त्या धातूने व्यक्त होणारी क्रिया पूर्वी ज्याने केली आहे अशा अर्थी ही विशेषणे वापरली जातात.
रच् + तवत् = रचितवत्
थोडक्यात जे ‘त’ प्रत्यय लागून कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण तयार झालेले असते, त्याच्याच पुढे ‘वत्’ प्रत्यय लागला की ही विशेषणे तयार होतात. ही विशेषणे पुंलिंगात ‘भगवत्’ शब्दाप्रमाणे, नपुंसकलिंगात ‘जगत्’ शब्दाप्रमाणे चालतात. स्त्रीलिंगात चालवतांना ती ‘कथितवती’ अशी दीर्घ ईकारान्त करून नदीप्रमाणे चालवतात.
ही विशेषणे सुद्धा केवळ विशेषणे म्हणूनही वापरली जातात किंवा क्रियापदासारखीही वापरली जातात.
उदा. रमेश: अन्नं भक्षितवन्तं काकं अपश्यत् ।
रमेशने अन्न खाणारा कावळा पाहिला.
या वाक्यात भक्षितवन्तं हे अन्न शब्दाचे विशेषण म्हणून आलेले आहे.
यक्ष: मेघं दृष्टवान् ।
येथे दृष्टवान् हे विशेषण क्रियापदासारखे वापरले आहे.
ही विशेषणे क्रियापदासारखी कर्तरी प्रयोगातच कर्त्याप्रमाणे येतील.
कर्ता स्त्रीलिंगी असेल तर
कविता मेघं दृष्टवती असे वाक्य तयार होईल.
मया पाठ: पठित: ।
छात्रै: कविता: पठिता: ।
ही कर्मणी वाक्ये आहेत. या वाक्यात पठित हे विशेषण कर्माप्रमाणे आले आहे. आता याच वाक्यांचा प्रयोग बदलायचा असेल तर अहं पाठं पठितवान् (अपठम्) किंवा छात्रा: कविता: पठितवन्त: (अपठन्) असे वाक्य तयार होईल. कर्ता स्त्रीलिंगी असेल तर बालिका: कविता: पठितवत्य: असे वाक्य तयार होईल.
स्वाध्याय
खालील वाक्यातील प्रयोग बदला.
*१) त्वया माला कृता ।
*२) युष्माभि: कविता: पठिता: ।
*३) सुरेखया लेख: लिखीत: । (लिख्)
*४) महेशेन धनं दत्तम् ।
*५) जनै: चित्रपट: दृष्ट: ।
*६) नलेन सेतु: रचित: ।
*७) रामेण रावण: हत: ।
*८) अर्जुनेन युद्धं कृतम् ।
*९) शिवरायेण रायदुर्ग: जित: ।
*१०) कालिदासेन मेघदूतं रचितम् ।
*११) अप्सरसा दिव्यहार: प्रदत्त: ।
*१२) गजेन काष्ठं दूरं प्रक्षिप्तम् ।
*१३) काकेन दधिपात्रात् दधि वारंवारं खादितम् ।
*१४) बालिकया हंसकाकौ दृष्टौ ।
*१५) मेधया सेवक: आदिष्ट: ।
कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे उत्तरे
खालील वाक्यातील प्रयोग बदला.
१) त्वया माला कृता ।
उत्तर - त्वं मालां कृतवान् (कृतवती) ।
२) युष्माभि: कविता: पठिता: ।
उत्तर - यूयं कविता: पठितवन्त: (पठितवत्य:)
*३) सुरेखया लेख: लिखित: ।
उत्तर - सुरेखा लेखं लिखितवती ।
४) महेशेन धनं दत्तम् ।
उत्तर - महेश: धनं दत्तवान् ।
५) जनै: चित्रपट: दृष्ट: ।
उत्तर - जना: चित्रपट: दृष्टवन्त: ।
६) नलेन सेतु: रचित: ।
उत्तर - नल: सेतुं रचितवान् ।
७) रामेण रावण: हत: ।
उत्तर - राम: रावणं हतवान् ।
८) अर्जुनेन युद्धं कृतम् ।
उत्तर - अर्जुन: युद्धं कृतवान् ।
९) शिवरायेण रायदुर्ग: जित: ।
उत्तर - शिवराय: दुर्ग: जितवान् ।
१०) कालिदासेन मेघदूतकाव्यं रचितम् ।
उत्तर - कालिदास: मेघदूतकाव्यं रचितवान् ।
११) अप्सरसा दिव्यहार: प्रदत्त: ।
उत्तर - अप्सरा: दिव्यहारं प्रदत्तवती ।
१२) गजेन काष्ठं दूरं प्रक्षिप्तम् ।
उत्तर - गज: काष्ठं दूरं प्रक्षिप्तवान् ।
१३) काकेन दधिपात्रात् दधि वारंवारं खादितम् ।
उत्तर - काक: दधिपात्रात् दधि वारवारं खादितवान् ।
१४) बालिकया हंसकाकौ दृष्टौ ।
उत्तर -बालिका हंसकाकौ दृष्टवती ।
१५) मेधया सेवक: आदिष्ट: ।
उत्तर - मेधा सेवकं आदिष्टवती ।
No comments:
Post a Comment