पाठ १०९-१ - परिव्राजकाख्यायिका (परोक्ष भूतकाळ) भाग १
बृहत्कथा हा महाकवी गुणाढ्याचा पैशाची भाषेत लिहीलेलला ग्रंथ. सध्या तो मूळ ग्रंथ उपलब्ध नाही, पण त्याची बृहत्कथामञ्जरी व कथासरित्सागर अशी दोन संस्कृत संस्करणे उपलब्ध आहेत. त्यातील बृहत्कथामञ्जरी घेतलेला हा उतारा आहे.
पुरा विवेश भिक्षार्थं कस्यचिद्वणिजो गृहम् ।
परिव्राट् प्रयतो मौनी किञ्चिन्मीलितलोचन: ॥१॥
अर्थ - पूर्वी एकदा भिक्षेसाठी कोणी एका व्यापार्याच्या घरी एका इंद्रियनिग्रह केलेल्या मौन धारण केलेल्या, किंचित डोळे मिटलेला केलेल्या एका संन्याशाने प्रवेश केला.
भिक्षादानोद्यतकरां स ददर्श वणिक्सुताम् ।
कल्पितामिव कामेन मन:सारङ्गवागुराम् ॥२॥
अर्थ - त्याने भिक्षा देणायाकरता हात पुढे केलेल्या, जणूकाही कामदेवानेच निर्माण केलेली असावी अशा व मनरूपी हरिणाला जाळ्यात पकडणार्या अशा व्यापार्याच्या मुलीला पाहिले.
तां दृष्ट्वा मन्मथाविष्टस्त्यक्त्वा मौनमनन्यधी: ।
हा कष्ट कष्टमित्याह तच्छ्रुत्वा निर्ययौ वणिक् ॥३॥
अर्थ - तिला पाहून कामाने व्याकूळ झालेला तो संन्य़ासी मौन सोडून म्हणाला, ‘अरेरे अरेरे’ ते ऐकून व्यापारी बाहेर आला.
सोऽब्रवीत्कौतुकाविष्टो भगवन्सहसैव किम् ।
परित्यक्तं त्वया मौनमिति पृष्टोऽभ्यधाच्च स: ॥४॥
अर्थ - तो व्यापारी आश्चर्याने म्हणाला, ‘भगवन्, अचानक आपण मौन कसे त्यागले ? व्यापारी असे म्हणाल्यावर परिव्राजक म्हणाला -
दुर्भगा तव कन्येयं शरीरधनहारिणी ।
त्यजैनां निशि गङ्गायां मञ्जुषे सुपिधानके ॥५॥
अर्थ - “तुझी ही कन्या दुर्दैवी आहे. ती तुझ्या शरीराचे व धनाचे हरण करणारी आहे. चांगल्याप्रकारे बंद केलेल्या पेटीत (ठेऊन) हिचा रात्री गंगेमधे त्याग कर.
मूर्ध्नि प्रदीपं विन्यस्य ततस्त्वं मोक्ष्यसे भयात् ।
इत्युक्त्वा स्वाश्रमं प्रायात्परिव्राट् तदनन्तरम् ॥६॥
अर्थ - ‘(पेटीच्या) डोक्यावर एक दिवा ठेऊन (हिचा त्याग कर.) तेव्हा तुझी भीतीपासून सुटाका होईल. असे बोलून नंतर परिव्राजक स्वत:च्या आश्रमात परत आला.
१०९-२) परिव्राजकाख्यायिका (परोक्ष भूतकाळ) भाग २
दीपाङ्कितेऽथ मञ्जुषे तां त्यक्तां वणिजा भयात् ।
गङ्गाकूलस्थित: कोऽपि प्राप राजकुमारक: ॥७॥
अर्थ - नंतर (मुलीला पेटीत बंद करून) पेटी दिव्याने चिन्हित करून व्यापार्याने तिचा भीतीने (गंगेमधे त्याग केला). नंतर गंगाकिनार्यावर असणार्या एका राजकुमाराला ती पेटी मिळाली
तां प्राप्य राजतनयो धीमान्सन्ततकोपनम् ।
मञ्जुषे वानरं धृत्वा ययौ वेश्म तया सह ॥८॥
अर्थ - राजकुमाराने ती पेटी प्राप्त करून त्या पेटीत सतत कोपिष्ट असणार्या वानराला ठेऊन तो त्या मुली बरोबर घरी गेला.
अत्रान्तरे निजाञ्शिष्यान्परिव्राडब्रवील्लघु ।
गङ्गामन्विष्य मञ्जूषां तूर्णमानीयतामिति ॥९॥
अर्थ - नंतर तो परिव्राजक स्वत:च्या शिष्यांना हळू म्हणाला गंगेमधे पेटी शोधा आणि ताबडतोप ती पेटी घेऊन या.
तैराहृतां समादाय स कन्यारतिलम्पट: ।
तान्प्राहोत्कण्ठितो वाञ्छन् पातुं निर्मक्षिकं मधु ॥१०॥
अर्थ - त्यांनी आणलेली ती पेटी घेऊन तो कन्येमधे आसक्त झालेला तो लंपट संन्यासी एकांत मिळवण्याचे इच्छेने उत्कंठित झालेला तो (शिष्यांना) म्हणाला.
युष्माभिर्न प्रवेष्टव्यं श्रुत्वाऽपि वचनानि मे ।
इत्युक्त्वार्गलितद्वारां विवेशैको निजां कुटीम् ॥११॥
अर्थ - माझे बोलणे ऐकून सुद्धा तुम्ही (कुटीत) प्रवेश करू नका. असे बोलून कडी घालून त्याने एकट्याने कुटीत प्रवेश केला.
उद्घाटितेऽथ मञ्जुषे क्रुद्धो निर्गत्य वानर: ।
कर्णनासाविरहितं तं चकार स्मरातुरम् ॥१२॥
अर्थ - पेटी उघडल्यावर तो चिडलेला वानर तिच्यातून बाहेर आला. आणि त्या कामातुर संन्य़ाशाला त्याने कान-नाकविरहित केले.
कपिचीत्कारमिश्रेण तस्य हाहारवेण ते ।
नाश्रमं विविशु: शिष्यास्तज्ञाभङ्गभीरव: ॥१३॥
अर्थ - त्याचे (परिव्राजकाचे) वानराच्या चित्कारांनी मिश्रित असे ओरडणे ऐकूनही त्याच्या आज्ञेचा भंग होईल या भीतीने शिष्यांनी आश्रमामधे प्रवॆश केला नाही.
ततस्तच्चरितं ज्ञात्वा जहास सुचिरं जन: ।
इति दैवगतिश्चित्रा पुरुषस्य न लञ्घ्यते ॥१४॥
अर्थ - त्याचे ते चरित्र लक्षात घेऊन लोक दीर्घकाळ हसत होते. अशा प्रकारे दैवाची गती अगाध आहे. तिवे कोणीही उल्लंघन करू शकत नाही.
No comments:
Post a Comment