पाठ ११९ वा - उत्तरस्य पलायनम्
भाग १
वैशम्पायन उवाच -
स राजधान्या निर्याय वैराटिरकुतोभय: ।
प्रयाहीत्यब्रवीत्सूतं यत्र ते कुरवो गता: ॥१॥
अर्थ - वैशंपायन म्हणाले की राजधानीतून बाहेर पडून विराटजाच्या पुत्र निर्भय होऊन आपल्या सारथीला म्हणाला, बृहन्नले, जेथेते कौरव गेले आहेत तिकडे चल.
समवेतान् कुरून्सर्वान् जिगीषूनवजित्य वै ।
गास्तेषां शीघ्रमादाय पुनरेष्याम्यहं पुरम् ॥२॥
अर्थ - विजयाच्या आशेने जमलेल्या सर्व कुरूंना जिंकून त्यांच्याकडून गायी घेऊन मी शीघ्र आपल्या नगरात परत येईन.”
नातिदूरमथो गत्वा मत्स्यपुत्रधनञ्जयौ ।
अवेक्षेताममित्रघ्नौ कुरूणां बलिनां बलम् ॥३॥
अर्थ - थोडेसे अंतर गेल्यावर शत्रूंना ठार मारणारे मत्स्यदेशाचा राजपुत्र (उत्तर) व धनंजयाने महाबलशाली कौरवांची सेना पाहिली.
तदनीकं महद् दृष्ट्वा गजाश्वरथसङ्कुलम् ।
हृष्टरोमा भयोद्विग्न: पार्थं वैराटिरब्रवीत् ॥४॥
अर्थ - ती हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त असलेली मोठी सेना पाहून विराटपुत्राच्या अंगावर (भीतीने) रोमांच उठले. भीतीने व्याकूळ झालेला तो पार्थाला (अर्जुनाला) म्हणाला -
उत्तर उवाच -
नोत्सहे कुरुभिर्योद्धुं रोमहर्षं हि पश्य मे ।
बहुप्रवीरमत्युग्रं देवैरपि दुरासदम् ।
प्रतियोद्धुं न शक्ष्यामि कुरुसैन्यमनन्तकम् ॥५॥
अर्थ - (हे बृहन्नले), कौरवांबरोबर युद्ध करण्याचे साहस मला नाही. हे पहा, (माझ्या अंगावर) (भीतीने) रोमांच आले आहेत. अनेक मोठे मोठे वीर असलेल्या ह्या सेनेचा पराजय करणे देवांच्यासाठी सुद्धा अवघड आहे. अंत नसणार्या या विशाल कौरवसैन्याबरोबर मी युद्ध करू शकनार नाही.
यत्र द्रोणश्च भीष्मश्च कृप: कर्णो विविंशति: ।
अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्तश्च बाह्लिक: ॥६॥
दुर्योधनस्तथा वीरो राजा च रथिनां वर: ।
द्युतिमन्तो महेष्वासा: सर्वे युद्धविशारदा: ॥७॥
अर्थ - या सेनेत द्रोण, भीष्म, कृप, कर्ण, विविंशती, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त, बाह्लिक तसेच रथींमधे श्रेष्ठ असणारा वीर राजा दुर्योधन आहे. हे सर्व तेजस्वी, मोठे धनुर्धर व युद्धकलेत प्रवीण आहेत.
दृष्ट्वैव हि कुरूनेतान् व्य़ूढानीकान् प्रहारिण: ।
हृषितानि च रोमाणि कश्मलं चागतं मम ॥८॥
अर्थ - सेनेची व्यूहरचना करून प्रहार करण्यास सज्ज असलेल्या या कौरवांना पाहून (अंगावर) रोमांच उठले आहेत. मला मूर्छा येत आहे.
त्रिगर्तान् मे पिता यात: शून्ये सम्प्रणीधाय माम् ।
सर्वां सेनामुपादाय न मे सन्तीह सैनिका: ॥९॥
अर्थ - मला येथे एकट्याला (नगराच्या रक्षणासाठी) सोडून माझे पिता त्रिगर्तांबरोबर युद्ध करण्यास सर्व सेना घेऊन गेले आहेत. इथे माझ्याकडे सैन्य नाही.
सोऽहमेको बहून् बाल: कृतास्त्रानकृतश्रम: ।
प्रतियोद्धुं न शक्ष्यामि निवर्तस्व बृहन्नले ॥१०॥
अर्थ - येथे मी एकता लहान असून मी अस्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी परिश्रमही घेतलेले नाहीत. मग त्या अस्त्रशस्त्रांचे जाणकार अशा असंख्य कौरवांबरोबर युद्ध करणे मला शक्य होणार नाही. तेव्हा हे बृहन्नले, परत फिर.
भाग २
बृहन्नलोवाच -
भयेन दीनरूपोऽसि द्विषतां हर्षवर्धन: ।
न च तावत् कृतं कर्म परै: किञ्चिद् रणाजिरे ॥११॥
अर्थ - बृहन्नला म्हणाली, ‘(हे राजकुमार), तू भीतीमुळे दीन झाला आहेस व शत्रूंचा आनंद वाढवीत आहेस. अजून शत्रूंनी तर रणांगणात कोणतेही कृत्य केलेले नाही (पराक्रम केलेला नाही).
स्वयमेव च मामात्थ वह मां कौरवान् प्रति ।
सोऽहं त्वां तत्र नेष्यामि यत्रैते बहुला ध्वजा: ॥१२॥
अर्थ - तू स्वत:च माझ्याकडे येऊन म्हणाला होतास की मला कौरवांकडे घेऊन चल. आता मी तुला तेथेच घेऊन जाणार आहे जेथे हे पुष्कळ ध्वज फडकत आहेत.
तथा स्त्रीषु प्रतिश्रुत्य पौरुषं पुरुषेषु च ।
कत्थमानोऽभिनिर्याय किमर्थं न युयुत्ससे ?॥१३॥
अर्थ - तू स्त्रिया आणि पुरुष यांच्यामधे कौरवांना हरवून आपले गोधन परत आणीन अशी बढाई मारून निघाला होतास. तर आता तू युद्ध करू का इच्छित नाहीस ?
न चेद् विजित्य गास्तास्त्वं गृहान् वै प्रतियास्यसि ।
प्रहसिष्यन्ति वीरास्त्वां नरा नार्यश्च संगता: ॥१४॥
अर्थ - आता जर का तू गायींना न जिंकताच घरी परत फिरशील तर वीर पुरुष तुला हसतील आणि पुरुष व स्त्रिया एकत्रितपणे तुझा उपहास करतील.
अहमप्यत्र सैरन्ध्र्या ख्याता सारथ्यकर्मणि ।
न च शक्ष्याम्यनिर्जित्य गा: प्रयातुं पुरं प्रति ॥१५॥
अर्थ - सारथ्यकर्मामधे मी (कुशल) आहे असे सैरंध्रीकडून (द्रौपदीकडून) माझी प्रसिद्धी केली गेली आहे. तेव्हा आता गायी न जिंकताच मी नगरात जाऊ शकत नाही.
उत्तर उवाच -
कामं हरन्तु मत्स्यानां भूयांस: कुरवो धनम् ।
प्रहरन्तु च मां नार्यो नरा वापि बृहन्नले ॥१६॥
अर्थ - हे बृहन्नले, मोठ्या संख्येमधे आलेले हे कौरव मत्स्यदेशाचे धन खुशाल घेऊन जाऊ देत. स्त्रिया व पुरुष माझ्यावर प्रहार करू देत (माझा उपाहास करू देत).
सङ्ग्रामे न च कार्यं मे गावो गच्छन्तु चापि मे ।
शून्यं मे नगरं चापि पितुश्चैव बिभेम्यहम् ॥१७॥
अर्थ - माझ्या गायीही जाऊ देत, पण या युद्धात माझे काही काम नाही. माझे नगर सुनसान झाले आहे व मी वडिलांना घाबरत आहे.
वैशम्पायन उवाच -
इत्युक्त्वा प्राद्रवद् भीतो रथात्प्रस्कन्द्य कुण्डली ।
त्यक्त्वा मानं च दर्पं च विसृज्य सशरं धनु: ॥१८॥
अर्थ - (जनमेजया), असे म्हणून मान व अभिमान यांच्या त्याग करून, बाणासहित धनुष्यही टाकून देऊन घाबरलेला कुंडलधारी (राजकुमार उत्तर) रथातून उडी मारून पळून जाऊ लागला.
बृहन्नलोवाच -
नैष शूरै: स्मृतो धर्म: क्षत्रियस्य पलायनम् ।
श्रेयस्तु मरणं युद्धे न भीतस्य पलायनम् ॥१९॥
अर्थ - (राजकुमार), क्षत्रियाने युद्धातून पळून जाणे हा शूरांनी धर्म मानलेला नाही. युद्धात मरण आले तरी ते श्रेयस्कर आहे, परंतु घाबरून पळून जाणे कधीही श्रेयस्कर नाही.
भाग ३
वैशम्पायन उवाच -
एवमुक्त्वा तु कौन्तेय: सोऽवप्लुत्य रथोत्तमात् ।
तमन्वधावद् धावन्तं राजपुत्रं धनञ्जय: ॥२०॥
दीर्घां वेणीं विधुन्वान: साधु रक्ते च वाससी ।
अर्थ - असे म्हणून (स्त्रीवेषधारी) अर्जुनाने त्या उत्तम रथातून उडी मारली व तो धनंजय पळून जाणार्या राजपुत्राच्या मागे (त्याला पकडण्यासाठी) आपली लांब वेणी हलवत, लाल रंगाची दोन वस्त्रे (उत्तरीय व अधरीय) फडकावत पाठलाग करू लागला.
विधूय वेणीं धावन्तमजानन्तोऽर्जुनं तदा ॥२१॥
सैनिका: प्राहसन्केचित्तथारूपमवेक्ष्य तम् ।
तं शीघ्रमभिधावन्तं सम्प्रेक्ष्य कुरवोऽब्रुवन् ॥२२॥
अर्थ - त्यावेळी वेणी हलवत धावणारा अर्जुन आहे हे न जाणाणारे काही सैनिक त्याला तशा अन्य रूपात पाहून हसू लागले. वेगाने पळाणार्या त्याला पाहून कौरव (आपापसात) म्हणू लागले -
क एष वेषसंच्छन्नो भस्मन्येव हुताशन: ।
किञ्चिदस्य यथा पुंस: किञ्चिदस्य यथा स्त्रिय: ॥२३॥
अर्थ - राखेमधे अग्नी लपलेला असवा त्याप्रमाणे (स्त्रीवेषात) लपलेला हा कोण आहे ? याच्या काही गोष्टी पुरुषासारख्या आहेत तर काही स्त्रियांसारख्या आहेत.
अमरेष्विव देवेन्द्रो मानुषेषु धनञ्जय: ।
एक: कोऽस्मानुपायायादन्यो लोके धनञयात् ॥२४॥
अर्थ - देवांमधील इंद्राप्रमाणे मनुष्यांमधे धनंजय आहे. (मानुष्यांच्या मधे धनंजयाचे तेच स्थान आहे जे देवांमधे इंद्राचे आहे). या जगामधे अर्जुनाव्यतिरिक्त असा कोण वीर आहे की जो आमच्याशी एकटा सामना करण्यास येईल ?
उत्तरं तु प्रधावन्तमभिद्रुत्य धनञ्जय: ।
गत्वा पदशतं तूर्णं केशपक्षे परामृशत् ॥२५॥
अर्थ - वेगाने पळाणार्या उत्तराचा पाठलाग करून अर्जुनाने शंभर पावलातच गाठून त्याचे केस पकडले.
सोऽर्जुनेन परामृष्ट: पर्यदेवयदार्तवत् ।
बहुलं कृपणं चैव विराटस्य सुतस्तदा ॥२६॥
अर्थ - अर्जुनाने पकडल्यावर विराटाचा पुत्र उत्तर तेव्हा आर्तपणे दीनवाणा शोक करू लागला.
उत्तर उवाच -
श्रुणुयास्त्वं हि कल्याणि बृहन्नले सुमध्यमे ।
निवर्तय रथं क्षिप्रं जीवन् भद्राणि पश्यति ॥२७॥
अर्थ - हे सुंदर बांध्या असणारी कल्याणी बृहन्नले, तू ऐक. जिवंत राहून तुला जर मंगलकारक गोष्टी पहाण्याची इच्छा असेल तर ताबडतोप रथ परत फिरव.
शातकुम्भस्य शुद्धस्य शतं निष्कान् ददामि ते ।
मणीनष्टौ च वैडूर्यान्हेमबद्धान् महाप्रभान् ॥२८॥
शातकुम्भ = सोने
अर्थ - मी तुला शुद्ध सोन्याच्या शंभर मोहरा, अत्यंत तेजस्वी व सुवर्णजडित असे आठ वैडूर्य मणी देतो.
हेमदण्डप्रतिछन्नं रथं युक्तं च वाजिभि: ।
मत्तांश्च दश मातङ्गान् मुञ्च मां त्वं बृहन्नले ॥२९॥
अर्थ - सुवर्णमय दंड असलेला व घोडे जोडलेला रथ देतो. मदोन्मत्त असे दहा हत्तीही देतो. पण हे बृहन्नले, मला सोड.
No comments:
Post a Comment