पाठ ११८ वा - छन्दोविज्ञानम् भाग ४ बारा अक्षरांनी युक्त वृत्ते
१२ अक्षरांनी युक्त असणारी जगती, वंशस्थ, इंद्रवंशा, जलोद्धतगती, भुजंगप्रयात, स्रग्विणी, वैश्वदेवी, प्रमिताक्षरा, द्रुतविलम्बित, मन्दाकिनी, कुसुमविचित्रा, तामरस, मालती, मणिमाला अशी अनेक वृत्ते आहेत. त्यातील काही प्रसिद्ध वृत्तांचा आपण परिचय करून घेऊ.
१) वंशस्थ -
लक्षण - वदन्ति वंशस्थमितं जतौ जरौ
वंशस्थ या वृत्ताला वंशस्थविल अथवा वंशस्तनित ही पण अन्य नावे आहेत. हे वृत्त १२ अक्षरांनी युक्त असते. त्यात ज, त, ज, र हे गण क्रमाने येतात.
भवन्ति नम्रास्तरव: फलोद्गमै-
र्नवाम्बुभिर्भूरिविलम्बिनो घना: ।
अनुद्धता: सत्पुरुषा: समृद्धिभि:
स्वभाव एवैष परोपकारिण: ॥ (नी.श.)
भवन्ति नम्रास्त रव:फ लोद्गमै
। ऽ । ऽ ऽ । ।ऽ। ऽ । ऽ
ज त ज र
अर्थ - वृक्ष फलांच्या भारांनी वाकतात, मेघ नवीन पाण्यांनी वाकतात सज्जन ऐश्वर्याने विनीत होतात. कारण दुसर्यावर उपकार करणार्यांचा असा स्वभावच असतो.
वंशस्थ व इंद्रवज्रा यांचे मिश्रण होऊनही उपजाति वृत्त बनते
२) इंद्रवंशा -
या वृत्तातही १२ अक्षरे येतात. यात त, त, ज, र असे गण असतात.
या वृत्तातही १२ अक्षरे असतात. बाकी सर्व रचना वंशस्थ वृत्ताप्रमाणे पण पहिले अक्षर जर गुरु असेल पहिला गण त गण होईल.
३) भुजंगप्रयात
भुजङ्गप्रयातं चतुर्भिर्यकारै: ।
भुजंगप्रयात वृत्तात सुद्धा १२ अक्षरे असतात व य (।ऽऽ) गण चार वेळा असतो. मराठीतील समर्थ रामदास रचित मनाचे श्लोक याच वृत्तात आहेत.
मनोबुद्ध्यहङ्कारचित्तानि नाहं
नच श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायु:
चिदानन्दरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ॥ निर्वाणषटक्॥
मनोबु द्ध्यहङ्का रचित्ता निनाहं
।ऽऽ ।ऽऽ ।ऽऽ ।ऽऽ
४) द्रुतविलम्बित
लक्षण - द्रुतविलम्बितमाह नभौ भरौ ।
या वृत्तात न (।।।), भ (ऽ।।), भ (ऽ।।), र (।ऽ।) हे चार गण क्रमाने येतात.
विपदिधैर्यमथाभ्युदये क्षमा
सदसि वाक्पटुता युधि विक्रम: ।
यशसि चाभिरतिर्व्यसनं श्रुतौ
प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम् ॥ (नी.श.)
विपदि धैर्यम थाभ्युद येक्षमा
।।। ऽ।। ऽ।। ऽ।ऽ
न भ भ र
No comments:
Post a Comment