Thursday, April 8, 2021

पाठ ११६ वा - द्वंद्वसमास

पाठ ११६ वा - द्वंद्वसमास  


या उभयान्वयी अव्ययाने जोडल्या जाणार्‍या दोन किंवा अधिक पदांचा द्वंद्व समास होतो. द्वंद्व समासात सर्व घटक पदांना प्राधान्य असते. या समासाचे तीन प्रकार असतात. 


) इतरेतर द्वंद्वसमास - इतरेतर द्वंद्वसमासामधे जोडल्या जाणा‍र्‍या शब्दांचा वेगवेगळा (इतर + इतर) अर्थ केला जातो. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या अर्थातील वेगळेपणा जाणवतो. म्हणून या समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. या समासात दोन शब्द जोडलेले असतील तर सामासिक शब्दाचे द्विवचन वापरतात दोनपेक्षा जास्त शब्द जोडले असतील तर बहुवचन वापरतात.


उदा. रामलक्ष्मणौ वनं गच्छत:

रामलक्ष्मणभरतशत्रुघ्ना: दशरस्य पुत्रा:


या समासांचा विग्रह करण्याची (सोडवण्याची) पद्धत - 

रामलक्ष्मणौ = राम: लक्ष्मण: विग्रहामधे प्रत्येक शब्दाच्या पुढेहे अव्यय येते. (चकारबहुलो द्वंद्व:) 

आता काही वेळेला दोनच शब्द असूनही सामासिक शब्दाचे बहुवचन वापरलेले असते. तेव्हा ते दोन शब्द एकवचनी अभिप्रेत नसून बहुवचनी अभिप्रेत असतात.


देवमनुष्या: = देवा: मनुष्या:

 येथे दोनच शब्द जोडले असले तरी बहुवचन वापरले आहे. याचा अर्थ तेथे अनेक देव माणसे अभिप्रेत आहेत. 


चन्द्रतारका: = चन्द्र: तारका:

येथे चंद्र एक असून तारका अनेक आहेत. म्हणून बहुवचन आले आहे. 


समासाचे उत्तरपद ज्या लिंगात असेल ते समासाचे लिंग असते.

उदा. रामसीते, वृक्षलते. या शब्दात उत्तरपदी सीता, लता हे स्त्रीलिंगी शब्द आहेत. म्हणून समासाचे लिंग स्त्रीलिंग झाले सीते, लते अशी द्विवचनी रूपे उत्तरपदी आली.


खालील समासांचा विग्रह करा -

वृक्षलते, पुष्पफलच्छाया:, नरनारीबालिका:, उमाशङ्करौ, शुकसारिका:, सिंहशशकौ, शचीपुरन्दरौ, बालतरुणस्थविरा:, 



) समाहार द्वंद्वसमास =


या प्रकारच्या समासात समासात येणार्‍या दोन शब्दांपेक्षा त्यांच्या समूहाला प्राधान्य असते. त्यातील पदांचा वेगवेगळा विचार मनात येत नाही. समुदाय किंवा समूहाची कल्पना मनात येते. समाहार म्हणजे समूह. म्हणून या समासाचे नाव समाहार द्वंद्व असे आहे.


यातील पदे सुद्धा या अव्ययाने जोडली जातात.

यात समूह अभिप्रेत असल्यामुळे हा समास नेहेमी एकवचनीच असतो. या समासाचे लिंग नेहेमी नपुंसकलिंगच असते. शरीराचे अवयव, जन्मत: वैरी असलेले प्राणी, परस्परविरोधी पदार्थ, सेनेची अंगे, क्षुद्र कीटक अशा शब्दांचा समाहार द्वंद्व समास होतो. समासातील शब्दांची संख्या अर्थानुसार दोन असेल तर शब्द या अव्ययाने जोडून झाल्यावर एतयो: समाहार:  जास्त असेल तर एतेषाम् (एतासाम् वा) समाहार: असे शब्द योजावे लागतात.


उदा. 

अजव्याघ्रम् - अज: व्याघ्र: एतयो: समाहार:

हस्तपादम् = हस्तौ पादौ एतेषां समाहार:

यूकालिक्षम् = यूका: लिक्षा: एतासाम् समाहार:


या दोनसमासातील फरक -

समाहार द्वंद्व समासामधे सामासिक शब्द नेहेमी नपुंसकलिंगी एकवचनीच असतो तर इतरेतर द्वंद्व समास नेहेमी द्वि. वचनी किंवा बहुवचनी असतो.


खालील समासांचा विग्रह करा -

बदरामलकम्, गजतुरगम्, मुखनासिकम्, कुक्कुरबिडालम्, अहिनकुलम्, गन्धाक्षतपुष्पम्, पाणिपादम् 


) एकशेष द्वंद्व 


या समासामधे समासातील दोन पदांपैकी एका पदाचा लोप होतो. अतिशय निकटचा संबंध असणार्‍या स्त्रीवाचक पुरुषवाचक शब्दांचा एकशेष द्वंद्व समास होतो. यात नेहेमी स्त्रीवाचक शब्दचा लोप होतो. आणि हा समास नेहेमी द्विवचनीच असतो. 

उदा.

पितरौ - माता पिता

भ्रातरौ - स्वसा भ्राता

हंसौ = हंसी हंस:


हा प्रकार काही व्याकरणकारांना मान्य नाही. 


खालील समासांचा विग्रह करा -

श्वशुरौ, पुत्रौ

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...