Wednesday, April 7, 2021

पाठ १०८ वा - परोक्ष भूतकाळ (द्वितीय भूतकाळ)

पाठ १०८ वा - परोक्ष भूतकाळ (द्वितीय भूतकाळ)


संस्कृतमधे वर्तमानकाळ एकच आहे. भूतकाळ तीन आहेत. एक नुकत्याच घडलेल्या गोष्टी, ज्या आपल्या डोळ्यादेखत घडल्या आहेत पण भूतकाळात जमा झाल्या आहेत, त्याकरता प्रथम भूतकाळ म्हणजेच अनद्यतन भूतकाळ वापरतात. ज्या घटना आपल्या अप्रत्यक्ष घडलेल्या असतात, ज्या घटनांना आपण साक्षी नसतो, वक्त्याच्या दृष्टिआड घडलेली क्रिया दाखवण्यासाठी परोक्ष भूतकाळ वापरतात. परोक्ष म्हणजेअक्ष्णो: परम्म्हणजे दृष्टीच्या आड. मराठीत परोक्ष अपरोक्ष हे शब्द बरोबर विरुद्ध अर्थाने रूढ झालेले आहेत. यालाच द्वितीय भूतकाळ असेही म्हणतात. उदा. राम सीतेला म्हणाला. येथे रामाचे संभाषण वक्त्याच्या डोळ्यादेखत घडलेले नाही. त्यामुळे पौराणिक अथवा ऐतिहासिक घटना वर्णन करतांना साधारणपणे परोक्ष भूतकाळाचा वापर केलेला असतो. त्यामुळे या काळात साहित्यामधे प्रथम अथवा द्वितीय पुरुषाची रूपे फारशी दिसून येत नाहीत. स्वप्नातील घटना सांगतांना, किंवा कर्त्याने जाणीव नसतांना वा बेहोशीत एखादी गोष्ट केली असेल तर त्या घटनेची माहिती देतांना परोक्ष भूतकाळात प्रथम पुरुषाची रूपे वापरलेली आढळतात. एखादी गोष्ट सर्वस्वी नाकारायची असेल तरीही परोक्ष भूतकाळात प्रथम पुरुषाच्या रूपांचा वापर झालेला दिसून येतो. पण अशी प्रथम पुरुषी वा द्वितीय पुरुषी रूपे अपवादात्मकच आढळतात. त्यामुळे या पाठात आपण फक्त तृतीय पुरुषी रूपांचीच ओळख करून घेणार आहोत. 


या भूतकाळाचे दोन प्रकार आहेत. ) अभ्यस्त परोक्ष भूतकाळ ) आमन्त परोक्ष भूतकाळ


) अभ्यस्त परोक्ष भूतकाळ -

ते गणातील एकच स्वर असणार्‍या धातूंना परोक्ष भूतकाळाचे प्रत्यय लागतांना तृतीय गणातील धातूप्रमाणे द्वित्व होते. भू, दृश्, गम् वगैरे धातूंमधे एकच स्वर आहे. जागृ, चकास् वगैरे धातूंमधे दोन स्वर दिसतात. द्वित्व झालेल्या पहिल्या भागाला अभ्यास असे म्हणतात. अभ्यासाचे सर्व नियम लक्षात घेऊन धातूचे अंग तयार केले जाते मग परोक्ष भूतकाळाचे प्रत्यय लावून रूपे केली जातात. अभ्यास होऊन मग रूप तयार होते म्हणून या परोक्ष भूतकाळाला अभ्यस्त परोक्ष भूतकाळ असे म्हणतात. 


परस्मैपदी परोक्ष भूतकाळाचे प्रत्यय -


  अतुस्  उस् तृतीय पुरुष

शेवटच्यास्या व्यंजनाचा प्रत्यक्षात विसर्ग होतो.


कृ ( . .) = करणे

चकार चक्रतु: चक्रु:


आत्मनेपदी प्रत्यय -

  आते  इरे  तृतीय पुरुष

चक्रे चक्राते चक्रिरे



येथेही विकारक प्रत्यय आल्यावर धातूत कसे कसे बदल होतात तो भाग आहेच. त्याबातीतही खूप नियम आहेत. पण आपण सामान्यपणे परोक्ष भूतकाळाची ओळख करून घ्याय़ची आहे. म्हणून हा सर्व भाग येथे दिलेला नाही


आमन्त परोक्ष भूतकाळ 


ते गणातील एक स्वर ज्यात आहे अशा धातूंचा धातूच्या आद्याक्षराचे द्वित्व होऊन अभ्यस्त परोक्ष भूतकाळ होतो. 



ते गणातील प्रारंभी किंवा सोडून कोणताही गुरु स्वर प्रारंभी असलेले धातू, जागृ, चकास् वगैरे एकापेक्षा जास्त स्वर असलेले धातू, दहाव्या गणातील सर्व धातू प्रयोजक इच्छार्थक यासारखे साधित धातू यांचा आमन्त परोक्ष भूतकाळ होतो. अशा वेळी ते गणातील धातूंना त्याचे विकरण लागता आम् असा प्रत्यय लागतो त्यापुढे अस्, भू किंवा कृ या धातूची परोक्ष भूतकाळाची रूपे जोडली जातात.

उदा. 

ईक्ष् हा दीर्घ स्वराने सुरू होणारा पहिल्या गणातील आत्मनेपदी धातू आहे. 


ईक्ष् + आम् = ईक्षाम् असे धातूचे अंग होईल. नंतर पुढे अस्, भू किंवा कृ धातूची परोक्ष भूतकाळाची रूपे लावून


ईक्षाञ्चक्रे, ईक्षाम्बभूव, ईक्षामास अशी रूपे होतील. 


दहाव्या गणाच्या धातूंचा परोक्ष भूतकाळ रूपे करतांना आम् प्रत्यय लावायच्या आधी विकरण जोडतात. मग आम् प्रत्यय लागतो.


कथ् + अय + आम् = कथयाम्


कथयांबभूव,  कथयामास,  कथयाञ्चकार, कथयाञ्चक्रे

अशी रूपे तयार होतील.


No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...