Sunday, April 11, 2021

उजळणी आत्मनेपदी अनद्यतन भूतकाळ (प्रथम भूतकाळ)

 उजळणी आत्मनेपदी  अनद्यतन भूतकाळ (प्रथम भूतकाळ) 

(प्रथम भूतकाळ) 


मागच्या एका भागात आपण अनद्यतन परस्मैपदी भूतकाळ पाहिला होता. आज आत्मनेपदी प्रथम भूतकाळ पहावयाचा आहे.


आत्मनेपदी भूतकाळाचे प्रत्यय खालीलप्रमाणे आहेत. 


  वहि   महि   प्रथम पुरुष

था:  इथाम्  ध्वम्     द्वितीय पुरुष

  इताम्  अन्त   तृतीय पुरुष


याही भूतकाळात धातूला आधीअसा आगम होतो. त्याला अडागम असे म्हणतात नंतर विकरण मिसळून प्रत्यय लावले जातात.


वन्द् ( .) = नमस्कार करणे


अवन्दे  अवन्दावहि  अवन्दामहि    प्रथम पुरुष

अवन्दथा: अवन्देथाम्  अवन्दध्वम्   द्वितीय पुरुष

अवन्दत अवन्देताम्  अवन्दत     तृतीय पुरुष



युध् ( . .) युद्ध करणे

अयुध्ये   अयुध्यावहि  अयुध्यामहि प्रथम पुरुष

अयुध्यथा:  अयुध्येथाम्  अयुध्यध्वम् द्वितीय पुरुष

अयुध्यत  अयुध्येताम्  अयुध्यन्त तृतीय पुरुष


दिश् ( . .) = दाखवणे

अदिशे  अदिशावहि अदिशामहि प्रथम पुरुष

अदिशथ: अदिशेथाम्  अदिशध्वम् द्वितीय पुरुष   

अदिशत  अदिशेताम्  अदिशन्त तृतीय पुरुष


पाल् (१० . .) = सांभाळणे

अपालये  अपालयावहि  अपालयामहि   प्रथम पुरुष

अपालयथा: अपालयेथाम् अपालयध्वम् द्वितीय पुरुष अपालयत अपालयेताम्  अपालयन्त     तृतीय पुरुष


धातू स्वराने सुरु होणारा असेल तर नियम मागीलप्रमाणेच आहेत.


अर्ज् (१० . .)

आर्जये  आर्जयावहि  आर्जयामहि   प्रथम पुरुष

आर्जयथा: आर्जयेथाम्  आर्जयध्वम् द्वितीय पुरुष

 आर्जयत  आर्जयेताम्  आर्जयन्त तृतीय पुरुष


खालील वाक्यांचे आत्मनेपदी धातू वापरून भाषांतर करा.


) त्यांनी चित्रपट पाहिला.


) वार्‍यामुळे पाने थरथरली.


) वानरांनी उड्या मारल्या.


) आम्ही नदीमधे स्नान केले


) राहूने सूर्याला ग्रासले.


) पक्षी उडाले.


) सेनापती पराभूत झाला.


) तू रक्षण केलेस.


) तुम्ही दया केलीत.


१०) चांदण्या चमकल्या.


११) आईने भात शिजवला.


१२) साधूने दीक्षा दिली.


१३) सर्व शिक्षक म्हणाले.


१४) अशोकने चित्रकेतूच्या राज्यात पाय ठेवला.


१५) महाभारतीय युद्धात कौरव मृत्यू पावले.


१६) मी मुलांना गोष्टी सांगितल्या.


१७) दासीने कपडे धुतले.


१८) प्रधानाने घोषणा केली.


१९) साधू चिन्तन करू लागले.


२०) राजाने सिंहासन सुशोभित केले.


No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...