पाठ ८९ वा - साधु चन्दनदास साधु
साधु चन्दनदास भाग १
चाणक्य: - वत्स ! मणिकारश्रेष्ठिनं चन्दनदासमिदानीं द्रष्टुमिच्छामि ।
चाणक्य: - वत्स, यावेळी मी व्यापारी चंदनदास यांना भेटू इच्छितो.
शिष्य: - तथा
(इति निष्क्रम्य चन्दनदासेन सह प्रविश्य)
इत इत: श्रेष्ठिन्
शिष्य: - ठीक आहे.
(असे म्हणून, जाऊन व चंदनदासाबरोबर प्रवेश करून)
शेटजी, असे इकडून या.
चन्दनदास: - (स्वगतम्)
चाणक्येनाकरुणेन सहसा शब्दायितस्यापि जनस्य ।
निर्दोषस्यापि शङ्का किं पुनर्मम जातदोषस्य ॥१॥
तस्माद्भणिता मया धनसेनप्रमुखा निजनिवेशसंस्थिता: कदापि चाणक्यहतको गेहं मे विचिनोति । तस्मादवहिता निर्वहत भर्तुरमात्यराक्षस्य गृहजनम् । मम तावत् यद्भवति तद्भवत्विति ।
चन्दनदास: - (स्वगत)
दुष्ट चाणक्याने अचानक बोलावल्यावर एखाद्या निरपराध व्यक्तीच्या मनात सुद्धा शंका निर्माण होते. आणि मी तर पुन्हा दोषी आहे. (माझ्या मनात शंका निर्माण होणार नाही का ?)
म्हणून मी माझ्या घरातील धनसेन वगैरे प्रमुखांना सांगितलच आहे की कदाचित तो दुष्ट चाणक्य माझ्या घराची झडती घेईल तर ताबडतोप अमात्यराक्षसाच्या कुटुंबाला तेथून हलवा. माझं जे काही व्हाय़चं असेल ते होवो.
शिष्य: - भो: श्रेष्ठिन् ! इत इत: ।
शिष्य: - शेटजी, असे इकडून या.
चन्दनदास: - अयमागच्छामि (उभौ परिक्रामत:) ।
चन्दनदास: - हा मी येत आहे. (दोघे फिरतात).
शिष्य: - (उपसृत्य) उपाध्याय, अयं श्रेष्ठी चन्दनदास: ।
शिष्य: - उपाध्याय, हे शेटजी चंदनदास.
चन्दनदास: - जयत्वार्य: ।
चन्दनदास: - आर्यांचा विजय असो.
चाणक्य: - (नाट्येनावलोक्य) श्रेष्ठिन्, स्वागतमिदमासनमास्यताम् ।
चाणक्य: - (नाटकीपणे पाहून) शेटजी, आपले स्वागत आहे. हे आसन आहे, बसा.
चन्दनदास: - (प्रणम्य) किं न जानात्यार्य: यथानुचित उपचारो हृदयस्य परिभवादपि महद्दु:खमुत्पादयति । तस्मादिहैवोचितायां भूमावुपशामि ।
चन्दनदास: - (प्रणाम करून) अयोग्य सन्मान हृदयामधे तिरस्कारापेक्षा सुद्धा अधिक दु:ख उत्पन्न करतो हे आर्यांना माहीत नाही का ? तेव्हा येथे जमिनीवरच मला योग्य अशा आसनावर मी बसतो.
चाणक्य: - भो: श्रेष्ठिन् मा मैवम् । सम्भावितमेवेदमस्मद्विधै: भवत: । तदुपविश्यतामासन एव ।
चाणक्य: - शेटजी, असे म्हणू नका. आमच्यासारख्यांनी आपला सन्मान करणे उचितच आहे. तेव्हा आसनावरच बसा.
चन्दनदास: - (स्वगतम्) उपक्षिप्तमनेन दुष्टेन किमपि । (प्रकाशम्) यदार्य आज्ञापयति । (इत्युपविष्ट:)
चन्दनदास: - (स्वगत) या दुष्टाने काहीतरी कुरापत काढण्याचे ठरवलेले दिसते. (प्रगट) जशी आर्यांची आज्ञा
साधु चन्दनदास भाग २
चाणक्य: - भो: श्रेष्ठिन्, चन्दनदास, अपि प्रचीयन्ते संव्यवहाराणां वृद्धिलाभा: ?
चाणक्य: - अहो शेटजी चन्दनदास, आपला व्यापार भरभराटीत आहे ना ?
चन्दनदास: - (स्वगतम्) अत्यादर: शङ्कनीय: । (प्रकाशम्) अथ किम् ? आर्यस्य प्रसादेन अखण्डिता मे वणिज्या ।
चन्दनदास: - (स्वगत) अत्यादर शंकास्पद आहे. (प्रगट) हो ना. आर्यांच्या कृपेमुळे माझा व्यापार अखंडित चालू आहे.
चाणक्य: - न खलु चन्द्रगुप्तदोषा अतिक्रान्तपार्थिवगुणानधुना स्मारयन्ति प्रकृती: ?
चाणक्य: - चंद्रगुप्ताच्या ठिकाणी असणारे दोष पूर्वी होऊन गेलेल्या राजाची प्रजेला आठवण तर करून देत नाहीत ना ?
चन्दनदास: - (कर्णौ पिधाय) शान्तं पापं शान्तं पापम् । शारदनिशासमुद्गतेनेव पूर्णिमाचन्द्रेण चन्द्रश्रियाधिकं नन्दन्ति प्रकृतय: ।
चन्दनदास: - (कान झाकून) (पाप शांत होऊ दे.) नाही, नाही. शरदऋतूतील पौर्णिमेला उगवलेल्या पूर्णचंद्राप्रमाणे असणार्या चंद्रगुप्ताच्या राज्यलक्ष्मीमुळे प्रजा जास्तच आनंदात आहे.
चाणक्य: - भो: श्रेष्ठिन्, यद्येवं प्रीताभ्य: प्रकृतिभ्य: प्रतिप्रियमिच्छन्ति राजान: ।
चाणक्य: - अहो शेटजी, असं जर आहे तर आनंदित असलेल्या प्रजेकडून राजाची सुद्धा काही परतफेडीची इच्छा असते.
चन्दनदास: -आज्ञापयतु आर्य: । किं कियदस्मज्जनादिष्यत इति ।
चन्दनदास: - आर्यांनी आज्ञा करावी. आमच्याकडून काय आणि किती पाहिजे ?
चाणक्य: - भो: श्रेष्ठिन्, चन्द्रगुप्तराज्यमिदं न नन्दराज्यम् । यतो नन्दस्यैवार्थरुचेरर्थसम्बन्ध: प्रीतिमुत्पादयति, चन्द्रगुप्तस्य तु भवतामपरिक्लेश एव ।
चाणक्य: - अहो शेटजी, हे चंद्रगुप्ताचे राज्य आहे, नंदाचे नाही ! धनलुब्ध असलेल्या नंदालाच धनाची प्राप्ती आनंद मिळवून देत असेल परंतु चंद्रगुप्ताला मात्र आपले सुखच आनंदित करते.
चन्दनदास: -(सहर्षम्) आर्य अनुगृहीतोऽस्मि ।
चन्दनदास: - (आनंदाने) आर्य, आपला अनुगृहीत आहे. (आपण कृपाच केली आहे.)
चाणक्य: - भो: श्रेष्ठिन्, स चापरिक्लेश: कथमाविर्भवतीति ननु भवता प्रष्टव्य: स्म: ।
चाणक्य: -अहो शेटजी, (राजाला) ते सुख कसे मिळेल ते आपण विचारायला हवे होते.
चन्दनदास: - आज्ञापयतु आर्य: ।
चन्दनदास: - आर्यांनी आज्ञा करावी.
चाणक्य: - संक्षेपतो राजनि अविरुद्धाभिर्वृत्तिभिर्वर्तितव्यम् ।
चाणक्य: - संक्षेपात सांगायचे झाले तर राजाला अविरोधी वागायला हवे.
चन्दनदास: - आर्य क: पुनरधन्यो राज्ञा विरुद्ध इति आर्येणावगम्यते ?
चन्दनदास: - आर्य, असा कोण अभागी आहे की जो राजाच्या विरुद्ध आचरण करत आहे असे आपल्याला कळले आहे ?
चाणक्य: - भवानेव तावत्प्रथमम् ।
चाणक्य: - पहिले तर आपणच अहात.
साधु चन्दनदास भाग ३
चन्दनदास: - (कर्णौ पिधाय) शान्तं पापं शान्तं पापम् । कीदृशस्तृणानामग्निना सह विरोध: ?
चन्दनदास: - (कान झाकून) नाही नाही, गवताने अग्नीबरोबर विरोध तो काय करावा ?
चाणक्य: - अयमीदृशो विरोध: । यत् त्वमद्यापि राजापथ्यकारिणोऽमात्यराक्षसस्य गृहजनं स्वगृहे रक्षसि ।
चाणक्य: - विरोध हा अशाप्रकारचा आहे. की तुम्ही अजूनही चंद्रगुप्ताला विरोध करणार्या अमात्य राक्षसाच्या कुटुंबाला आपल्या घरात आश्रय दिला आहे.
चन्दनदास: - आर्य, अलीकमेतत्केनाप्यनभिज्ञेन आर्यस्य निवेदितम् ।
चन्दनदास: - आर्य, हे खोटे आहे. कोणा अनभिज्ञाने आपणास हे (खोटेच) सांगितले आहे.
चाणक्य: - भो: श्रेष्ठिन्, अलमाशङ्कया । भीता: पूर्वराजपुरुषा: पौराणामनिच्छतामपि गृहेषु गृहजनं निक्षिप्य देशान्तरं व्रजन्ति । ततस्तद्प्रच्छादनं दोषमुत्पादयति ।
चाणक्य: - अहो शेटजी, घाबरू नका. पूर्वीच्या राजाचे घाबरलेले अधिकारी प्रजेची इच्छा नसतांना सुद्धा त्यांच्या घरात आपले कुटुंब सोडून दुसर्या देशी जातात. पण ते लपवून ठेवणे हे दोषास्पद आहे.
चन्दनदास: -एवं न्विदम् । तस्मिन् समये आसीदस्मद्गृहेऽमात्यराक्षसस्य गृहजन इति ।
चन्दनदास: - अशी गोष्ट आहे खरी. त्यावेळी आमच्या घरी अमात्यराक्षसाचे कुटुंब होते खरे.
चाणक्य: - पूर्वमनृतमिदानीमासीदिति परस्परविरोधीवचने ।
चाणक्य: - पूर्वी (म्हणालात) हे खोटे आहे, आता (म्हणत अहात) (अमात्यराक्षसाचे) कुटुंब होते म्हणून. परस्पविरोधी बोलणे (आहे हे).
चन्दनदास: - एतावदेवास्ति मे वाक्छल: ।
चन्दनदास: - ही माझ्या बोलण्यात चूक झाली खरी.
चाणक्य: - भो: श्रेष्ठिन्, चन्द्रगुप्ते राजन्यपरिग्रहच्छलानाम् । तत्समर्पय राक्षसस्य गृहजनम् । अच्छलं भवतु भवत: ।
चाणक्य: - शेटजी, चंद्रगुप्त राजा असतांना (चंद्रगुप्ताच्या राज्यात) कपट खपवून घेतलं जाणार नाही. तेव्हा राक्षसाचे कुटुंब (आमच्या) ताब्यात द्या आणि कपटापासून आपली सुटका करून घ्या.
चन्दनदास: - आर्य, ननु विज्ञापयामि । आसीदस्मद्गृहे अमात्यराक्षसस्य गृहजन इति ।
चन्दनदास: - आर्य, मी आपल्याला सांगतोय की आमच्या घरी राक्षसाचे कुटुंब (त्यावेळी) होते.
चाणक्य: - अथेदानीं क्व गत: ?
चाणक्य: - मग आता कुठे गेले ?
चन्दनदास: - न जानामि ।
चन्दनदास: - नाही माहीत
चाणक्य: -(स्मितं कृत्वा) कथं न ज्ञायते नाम ? भो: श्रेष्ठिन् शिरसि भयमतिदूरे तत्प्रतिकार: ।
चाणक्य: - असं कसं माहीत नाही ? शेटजी, संकट डोक्यावर आहे आणि ते दूर करण्याचा उपाय खूप लांब आहे.
चन्दनदास: - (स्वगतम्)
उपरि घनो घनरटितं दूरे दयिता किमेतदापतितम् ।
हिमवति दिव्यौषधय: शीर्षे सर्प: समाविष्ट: ॥
चन्दनदास: - (स्वगत)
डोक्यावर मेघ गर्जना करतो आहे आणि प्रिया तर लांब आहे. सर्प तर डोक्यावर आहे आणि दिव्यौषधी हिमालयावर आहे. हे कोणतं संकट येऊन ठेपलं ?
चाणक्य: - अन्यच्च नन्दमिव विष्णुगुप्त:
(इत्यर्धोक्ते लज्जां नाटयित्वा) चन्द्रगुप्तममात्यराक्षस: समुच्छेत्स्यतीति मामैवं मंस्था: ।
चाणक्य: - आणि दुसरं असं की विष्णुगुप्ताने ज्याप्रमाणे नंदाचा (नाश केला) (असं अर्धवट बोलून लाझ वाटल्याचा अभिनय करत)
अमात्यराक्षस चंद्रगुप्ताचा सर्वनाश करेल असं चुकून सुद्धा समजू नका.
चन्दनदास: - (स्वगतम्) फलेन संवादितमस्य विकत्थितम् ।
चन्दनदास: - (स्वगत) याची बढाई याच्या गर्वाला साजेशीच आहे.
साधु चन्दनदास भाग ४
(नेपथ्ये कलकल:)
चाणक्य: - शार्ङ्गरव, ज्ञायतां किमेतत् ।
(पडद्यामधून गोंगाट ऐकू येतो)
चाणक्य: - शार्ङ्गरव, (बाहेर कसला गोंगाट होतोय ते पहा) काय चाललय पहा.
शिष्य: - तथा (इति निष्क्रम्य पुन: प्रविश्य) उपाध्याय, एष राज्ञश्चन्द्रगुप्तस्याज्ञया राजापथ्यकारी क्षपणको जीवसिद्धि: सनिकारं नगरान्निर्वास्यते ।
शिष्य: - ठीक आहे (असे म्हणून जातो व पुन्हा प्रवेश करून)
उपाध्याय, चंद्रगुप्तराजाच्या आज्ञेवरून राजविरोधी वर्तन करणार्या जीवसिद्धी नावाच्या बओद्धभिक्षूला तिरस्कारपूर्वक राज्याच्या बाहेर घालवून दिले जात आहे.
चाणक्य: - क्षपणक अहह । अथवा अनुभव राजापथ्यकारित्वस्य फलम् । भो: श्रेष्ठिन् चन्दन्ददास, एवमयमपथ्यकारिषु तीक्ष्णदण्डो राजा । तत्क्रियतां पथ्यं सुहृद्वच: । समर्प्यतां राक्षसगृहजन: । अनुभूयतां चिरं विचित्रो राजप्रसाद: ।
चाणक्य: - अरेरे बौधभिक्षूला ! (हाकलले जात आहे!) अथवा राजविरोधीवर्तनाचे फळ अनुभव. शेटजी चन्दनदास, अशाप्रकारे राज्रद्रोह्यांना राजा कठोर शिक्षा करतो. तेव्हा हितकर असे मित्राचे बोलणे ऐका. राक्षसाचे कुटुंब (आमच्या) ताब्यात द्या. आणि चिरकाळापर्यंत राजकृपेचा अनुभव घ्या.
चन्दनदास: - नास्ति मे गेहे अमात्यगृहजन: ।
चन्दनदास: - माझ्या घरी अमात्याचे कुटुंब नाहीये.
(नेपथ्ये पुन: कलकल:)
(पडद्यामागून पुन्हा गोंधळ ऐकू येतो)
चाणक्य: - शार्ङ्गरव, ज्ञायतां किमेतत् ।
चाणक्य: - शार्ङ्गरव, (बाहेर) काय चाललय पहा.
शिष्य: - तथा (इति निष्क्रम्य पुन: प्रविश्य)
राजापथ्यकार्येव कायस्थ: शकटदास: शूलमारोपयितुं नीयते ।
शिष्य: - ठीक आहे (असे म्हणून जाऊन व परत येऊन)
राजद्रोही शकटदास कायस्थाला सुळावर चढवण्यासाठी नेले जात आहे.
चाणक्य: - स्वकर्मफलमनुभवतु । भो: श्रेष्ठिन् एवमयं राजापथ्यकारिषु तीक्ष्णदण्डो राजा न मर्षयिष्यति राक्षसकलत्रप्रच्छादनं भवत: । तद्रक्ष परकलत्रेणात्मन: कलत्रं जीवितं च ।
चाणक्य: -केलेल्या कर्माची फळे भोगू दे. शेटजी, राजद्रोह्याच्या बाबतीत कडक शासन करणारा राजा आपण जो राक्षसाच्या कुटुंबाला लपवून ठेवले आहे ते सहन करणार नाही. तेव्हा दुसर्याचे कुटुंब (अमच्या ताब्यात देऊन) आपले कुटुंब व जीविताचे रक्षण करा.
चन्दनदास: - आर्य, किं मे भयं दर्शयसि ? सन्तमपि गेहे अमात्यराक्षसस्य गृहजनं न समर्पयामि किं पुनरसन्तम् ?
चन्दनदास: - आर्य, मला काय भीती दाखवता अहात ? ामात्य राक्षसाचे कुटुंब असते तरी दिले नसते. मग आता नाहीच तर कुठून देऊ ?
चाणक्य: - चन्दनदास, एष ते निश्चय: ?
चाणक्य: - चन्दनदास, हा तुझा निश्चय आहे ?
चन्दनदास: - बाढम्, एष मे निश्चय: ।
चन्दनदास: - होय, हा माझा निश्चय आहे.
चाणक्य: - (स्वगत) साधु चन्दनदास, साधु
सुलभेष्वर्थलाभेषु परसंवेदने जन: ।
क: इदं दुष्करं कुर्यादिदानीं शिबिना विना ॥
(प्रकाशम्) चन्दनदास, एष ते निश्चय: ?
चाणक्य: - (स्वगत) वा चन्दनदासा वा.
दुसर्याची वस्तू देऊन अर्थलाभ सहज शक्य असतांना अशा वेळी हे कठीण काम शिबिराजाशिवाय दुसरा कोण करू शकेल ?
(प्रगट) चन्दनदासा, हा तुझा निश्चय आहे ?
चन्दनदास: - बाढम्
चन्दनदास: - होय
चाणक्य: - (सक्रोधम्) दुरात्मन्, दुष्टवणिक्, अनुभूयतां तर्हि नरपतिक्रोध: ।
चाणक्य: - (रागाने) दुष्टा, दुष्ट व्यापार्या, मग राजक्रोधाचा अनुभव घे.
चन्दनदास: - सज्जोऽस्मि । अनुतिष्ठत्वार्य आत्मनोऽधिकारसदृशम् ।
चन्दनदास: - हा मी सज्ज आहे. आर्यांनी आपल्या अधिकारात असेल ते करावे.
चाणक्य: - शार्ङ्गर्व, उच्यतामस्मद्वचनात्कालपाशिको दण्डपाशिकश्च । शीघ्रमयं दुष्टवणिक् निगृह्यताम् ।
चाणक्य: - शार्ङ्गरव, कालपाशीक व दण्डपाशिक यांना आमची आज्ञा सांगा की की या दुष्ट्य व्यापार्याला पकडा. (ताब्यात घ्या).
शिष्य: - यदाज्ञापयत्युपाध्याय: । श्रेष्ठिन् इत: इत: ।
शिष्य: - जशी उपाध्यायांची आज्ञा. शेटजी असे इकडून इकडून
चन्दनदास: - आर्य, अयमागच्छामि । (स्वगतम्) दिष्ट्या मित्रकार्येण मे विनाश:, न पुरुषदोषेण ।
चन्दनदास: - आर्य येतो तर. (स्वगत) सुदैवाने माझा विनाश मित्रकार्यासाठी होत आहे, एखाद्या गुन्ह्यासाठी नाही.
(परिक्रम्य शिष्येण सह निष्क्रान्त:)
" पाठ ८९ वा - साधु चन्दनदास भाग १ " या Audio साठी खाली क्लिक् करा :
No comments:
Post a Comment