पाठ ८६ वा - संवादात्मक सुभाषिते
१) कस्त्वं भो: कथयामि दैवहतकं
मां विद्धि शाखोटकं
वैराग्यादिव वक्षि साधु विदितं
कस्मादिदं कथ्यते ।
दूरेणाम्रतरु: तमध्वगजन:
सर्वात्मना सेवते
न च्छाय़ापि परोपकारकृतये
मार्गस्थितस्यापि मे ॥५०-२॥
संधिविग्रह - क: त्वं भो: कथयामि दैवहतकं मां विद्धि शाखोटकं वैराग्याद्त् इव वक्षि साधु विदितं कस्मात् इदं कथ्यते ।
दूरेण आम्रतरु: तम् अध्वगजन: सर्वात्मना सेवते न छाय़ा अपि परोपकारकृतये मार्गस्थितस्य अपि मे ॥५०-२॥
अर्थ -
वाटसरु - कस्त्वं भो: ?
वाटसरु - तू कोण आहेस ?
वृक्ष - कथयामि । दैवहतकं मां शाखोटकं विद्धि
वृक्ष - सांगतो. दुर्दैवी अशा मला सागवान आहे असे समज.
वाटसरु - वैराग्यादिव वक्षि ।
वाटसरु - जणू वैराग्याने बोलतोस ?
वृक्ष - साधु विदितं ।
वृक्ष - बरोबर ओळखलेस.
वाटसरु - कस्मात् इदं कथ्यते ?
वाटसरु - असं का म्हणतोस ?
वृक्ष - आम्रतरु: दूरेण । अध्वगजन: तम् सर्वात्मना सेवते । मार्गस्थितस्य मे छाय़ा अपि परोपकारकृतये अपि न ।
वृक्ष - ते आंब्याचे झाड लांब आहे. पण वाटसरु लोक सर्व प्रकारे तिचा उपभोग घेतात. पण वाटेत असलेल्या माझी परोपकारासाठी सावली सुद्धा उपयोगी पडत नाही.
२) पद्मे मूढजने ददासि विभवं
विद्वत्सु किं मत्सर:
नाहं मत्सरिणी न चापि चपला
नैवास्ति मूर्खे रति: ।
मूर्खेभ्यो द्रविणं ददासि नितरां
तत्कारणं श्रूयतां
विद्वान्सर्वजनेषु पूजिततम:
मूर्खस्य नान्या गति: ॥५०-३॥
अर्थ -
विद्वान - पद्मे, मूढजने विभवं ददासि विद्वत्सु किं मत्सर: ?
विद्वान - हे लक्ष्मी, तू मूर्खलोकांना वैभव देतेस.
विद्वानांच्याबद्दल तुला मत्सर वाटतो का ग ?
लक्ष्मी - न अहं मत्सरिणी न च अपि चपला न एव अस्ति मूर्खे रति: ।
लक्ष्मी - अरे, मी मत्सर करणारी नाही किंवा चंचलही नाही. किंवा मूर्खांवर माझे प्रेमही नाही.
विद्वान - मूर्खेभ्य: द्रविणं ददासि नितरां ?
विद्वान - मग मूर्खांना तर नेहेमी धन देतेस ते ?
लक्ष्मी - तत्कारणं श्रूयताम् । विद्वान सर्वजनेषु पूजिततम: मूर्खस्य न अन्या गति: ।
लक्ष्मी - त्याचे कारण ऐक. विद्वान सर्वलोकांमधे पूजिला जातो. पण मूर्खाला मात्र दुसरी गती नाही.
३) भिक्षु: क्वास्ति बलेर्मखे पशुपति:
किं नास्त्यसौ गोकुले
मुग्धे पन्नगभूषण: सखि सदा
शेते च तस्योपरि ।
आर्ये मुञ्च विषादमाशु कमले
नाहं प्रकृत्या चला
चेत्थं वै गिरिजासमुद्रसुतयो:
सम्भाषणं पातु व: ॥५०-७॥
संधिविग्रह - भिक्षु: क्व अस्ति बले: मखे पशुपति: किं न अस्ति असौ गोकुले मुग्धे पन्नगभूषण: सखि सदा शेते च तस्य उपरि । आर्ये मुञ्च विषादम् आशु कमले न अहं प्रकृत्या चला च इत्थं वै गिरिजासमुद्रसुतयो: सम्भाषणं पातु व: ॥५०-७॥
अर्थ -
लक्ष्मी - भिक्षु: क्व अस्ति ?
लक्ष्मी - (पार्वतीला शंकराला उद्देशून विचारते)- “भिक्षू कोठे आहे ?”
पार्वती - बले: मखे ।
पार्वती - (लक्ष्मीला ते विशेषण विष्णूचे समजून उत्तर देते) - बळीराजाच्या यज्ञात
लक्ष्मी - पशुपति: ।
लक्ष्मी - अगं पशुपती कोठे आहे ?
पार्वती - किं न अस्ति असौ गोकुले
पार्वती - अगं तो गोकुळात आहे.
लक्ष्मी - मुग्धे, पन्नगभूषण:
लक्ष्मी - अगं अजाण स्त्रिये तो पन्नगभूषण म्हणजे साप हेच ज्याचे भूषण आहे तो कोठे आहे ?
पार्वती - सखि, सदा शेते च तस्य उपरि ।
पार्वती - अगं तो तर त्याच्यावर नेहेमी झोपतो.
लक्ष्मी - आर्ये, मुञ्च विषादम् आशु
लक्ष्मी - अगं त्या विषभक्षण करणार्या शंकराला सोडून दे. (तू दु:ख करू नकोस)
पार्वती - कमले, न अहं प्रकृत्या चला ।
पार्वती - अगं मी काही (तुझ्यासारखी) स्वभावाने चंचल नाही.
कवी - च इत्थं वै गिरिजासमुद्रसुतयो: सम्भाषणं पातु व: ॥५०-७॥
कवी - अशाप्रकारचा पार्वती व लक्ष्मी यांचा संवाद तुमचे रक्षण करो.
४) अम्बा कुप्यति तात मूर्ध्नि विधृता
*गङ्गेयमुत्सृज्यतां
विद्वन्षण्मुख का गतिर्मम चिरं
मूर्ध्नि स्थिताया वद ।
कोपाटोपवशादशेषवदनै:
प्रत्युत्तरं दत्तवा-
न्नम्बोधिर्जलधिर्पयोधिरुदधि-
वारां निधिर्वारिधि: ॥
संधिविग्रह - अम्बा कुप्यति तात मूर्ध्नि विधृता गङ्गा इयम् उत्सृज्यतां विद्वन् षण्मुख का गति: मम चिरं मूर्ध्नि स्थिताया: वद ।
कोपाटोपवशात् अशेषवदनै: प्रत्युत्तरं दत्तवान् अम्बोधि: जलधि: पयोधि: उदधि: वारां निधि: वारिधि: ॥३६-२४॥
अर्थ -
कार्तिकेय - तात, अम्बा कुप्यति, मूर्ध्नि विधृता इयम् गङ्गा उत्सृज्यतां ।
कार्तिकेय - बाबा, आई रागावली आहे, डोक्यावर धारण केलेल्या या गंगेला सोडून द्या.
शंकर - विद्वन् षण्मुख, मम मूर्ध्नि चिरं स्थिताया: (गङ्गाया:) का गति: वद ।
शंकर - हे विद्वान षण्मुखा, माझ्या डोक्यावर दीर्घकाळ राहिलेल्या हिची (गंगेची) गती काय होईल बरे ?
कवि: - कोपाटोपवशात् अशेषवदनै: प्रत्युत्तरं दत्तवान् । अम्बोधि: जलधि: पयोधि: उदधि: वारां निधि: वारिधि: ॥३६-२४॥
कवि: - रागाने व आवेशाने कार्तिकेयाने आपल्या साही तोंडांनी प्रत्युत्तर दिले, अंबोधी, जलधी, पयोधी, उदधी, वारांनिधी, वारिधी. (समुद्राकडे जाईल.)
५) धन्या केयं स्थिता ते शिरसि शशिकला किं नु नामैतदस्या
नामैवास्यास्तदेतत्परिचितमपि ते विस्मृतं कस्य हेतो: ।
नारीं पृच्छामि नेन्दुं कथयतु विजया न प्रमाणं यदीन्दु-
र्देव्या निह्नोतुमिच्छोरिति सुरसरितं शाठयमव्याद्विभो: ॥
संधिविग्रह - धन्या का इयं स्थिता ते शिरसि शशिकला किं नु नाम एतद् अस्या:
नाम एव अस्या: तद् एतत् परिचितम् अपि ते विस्मृतं कस्य हेतो: ।
नारीं पृच्छामि न इन्दुं कथयतु विजया न प्रमाणं यदि इन्दु:
देव्या: निह्नोतुम् इच्छो: इति सुरसरितं शाठयम् अव्यात् विभो: ॥
अर्थ -
पार्वती - ते शिरसि स्थिता इयं धन्या का ?
पार्वती - आपल्या मस्तकावर असलेली ही कोण भाग्यवती आहे ?
शंकर - शशिकला
शंकर - शशिकला (चंद्राची कोर).
पार्वती - किं नु एतद् अस्या: नाम ?
पार्वती - हे हिचे नाव आहे का ?
शंकर - नाम एव अस्या: । तद् एतत् परिचितम् अपि ते । कस्य हेतो: विस्मृतं ?
शंकर - (होय). हे हिचे नावच आहे. आणि हे तुझ्या परिचयाचे असून सुद्धा तू कशी काय विसरलीस ?
पार्वती - नारीं पृच्छामि न इन्दुं
पार्वती - मी स्त्रीविषयी विचारत आहे, चंद्राविषयी नाही.
शंकर - यदि इन्दु: प्रमाणं न कथयतु विजया ।
शंकर - जर चंद्र आहे हे तू प्रमाण माणत नसलीस तर मग (पार्वतीची सखी) विजयाच सांगू दे.
कवि: - सुरसरितं देव्या: निह्नोतुम् इच्छो: विभो: शाठयम् अव्यात् इति ॥
कवी - अशाप्रकारे देवी पार्वतीपासून गंगेला लपवून ठेऊ इच्छिणार्या शंकराचे शाठ्य तुमचे रक्षण करो.
वरील सुभाषिते वाचून कोणाचा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे की ही आपल्या देवांची चेष्टा केली आहे का ? मागे अशा गोष्टी मी ऐकल्या होत्या. या सुभाषितांमधून शेवटी 'त्यांचा संवाद किंवा शंकराचे शाठ्य आपले रक्षण करो' असे म्हटले आहे. तेव्हा त्यांचे देवत्व कवींनी मान्यच केले आहे. पुराणांतून सुद्धा देवांच्या वादविवादाच्या कथा रंगवलेल्या आहेत.
यातील शेवटचे सुभाषित हे मुद्राराक्षस नाटकातलं आहे. त्या नाटकाचा चाणक्याची कुटील राजनीती असा विषय त्या नांदीच्यख सुभाषितातून सूचित केला आहे. आणि शंकराचे शाठ्य जसे जनकल्याणासाठी आहे तशी ही कुटील राजनीती जनकल्याणासाठीच आहे.
असेच बाकीचे श्लोक कोणत्यातरी संदर्भात कवीनी रचलेले असतील. तेव्हा अभ्यासकांनी त्याबद्दल शंका कुशंका न काढता त्यातील सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती आहे.
No comments:
Post a Comment