पाठ १०२ वा - दानवीर: (भासकृत कर्णभार)
१०२-१) दानवीर: (भासकृत कर्णभार)
(तत: प्रविशति ब्राह्मणरूपेण शक्र:)
(तेव्हा ब्राह्मणाचे रूप घेऊन इंद्र प्रवेश करतो)
शक्र: - भो: कर्ण, महत्तरां भिक्षां याचे ।
शक्र: - कर्णा, मी खूप मोठी भिक्षा इच्छितो.
कर्ण: - दृढं प्रीतोऽस्मि । कर्णोऽहं भवन्तमेष नमस्करोमि ।
कर्ण: - मी अतिशय आनंदित झालो आहे. मी कर्ण, आपल्याला नमस्कार करतो.
शक्र: - (आत्मगतम्) किन्नु खलु वक्तव्यं मया । यदि दीर्घायुर्भव इति वक्ष्ये, दीर्घायुर्भविष्यति । यदि न वक्ष्ये मूढ इति मां परिभवति । तस्मादुभयं परिहृत्य किन्नु खलु वक्ष्यामि ? भवति दृष्टम् । (प्रकाशम्) भो: कर्ण, सूर्य इव, चन्द्र इव हिमवानिव सागर इव तिष्ठतु ते यश: ।
शक्र: - (स्वगत) मी काय़ बर बोलावे ? जर दीर्घायुषी हो असे म्हणेन तर हा दीर्घायुषी होईल. जर काहीच बोललो नाही तर हा माझी मूर्ख म्हणून संभावना करेल. त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळून काय बर बोलू ? आलं लक्षात (प्रकट) कर्णा सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे व सागरप्रमाणे तुझी कीर्ती टिकून राहो.
कर्ण: - भगवन्, किन्न वक्तव्यं दीर्घायुरिति ? अथवा एतदेव शोभनम् ।
धर्मो हि यत्नै: पुरुषेण साध्यो
भुजङ्गजिह्वाचपला नृपश्रिय: ।
तस्मात्प्रजापालनमात्रबुद्ध्या
हतेषु देहेषु गुणा धरन्ते ।
भगवन् किमिच्छसि ? किमहं ददामि ?
कर्ण: - भगवन् आपण दीर्घायुषी हो असा का बरं आशीर्वाद दिला नाही ?
राज्यलक्ष्मी ही सापाच्या जिभेप्रमाणे चंचल आहे. म्हणून मनुष्याने प्रजेचे पालन करण्याच्या बुद्धीने प्रयत्नपूर्वक धर्माची प्राप्ती करून घ्यायला हवी. कारण देहाचा मृत्यु झाला तरी गुणच टिकून रहातात. (गुणच अक्षय रहातात. देह तर क्षणभंगुर आहे).
भगवन् काय इच्छा आहे. काय देऊ ?
शक्र: - महत्तरां भिक्षां याचे ।
शक्र: - मोठी भिक्षा हवी.
कर्ण: - महत्तरां भिक्षां भवते प्रदास्ये । गोसहस्रं ददामि ।
कर्ण: - मी आपल्याला मोठी भिक्षा देईन. हजार गायी देतो.
शक्र: - गोसहस्रमिति । मुहूर्तकं क्षीरं पिबामि । नेच्छामि कर्ण, नेच्छामि ।
शक्र: - हजार गायी ? मी क्षणभर दूध पिईन. कर्णा, नको याची मला इच्छा नाही
कर्ण: - किं नेच्छति भवान् ? इदमपि श्रूयताम् । वाजिनां सहस्रं ते ददामि ।
कर्ण: - काय ? आपल्याला हे नको ? मग आता ऐका. हजार घोडे तुम्हाला देतो.
शक्र: - अश्व इति ? मुहूर्तकमारोहामि । नेच्छामि कर्ण, नेच्छामि ।
शक्र: -घोडे ? काही काळ त्यावर मी आरोहण करीन. नको कर्णा, नको.
कर्ण: - किं नेच्छति भवान् ? अपर्याप्तं कनकं दास्यामि ।
कर्ण: - हे ही नको आपल्याला ? मग अपरिमित सोने देईन.
शक्र: - गृहीत्वा गच्छामि । (किञ्चिद् गत्वा) नेच्छामि कर्ण, नेच्छामि ।
शक्र: - घेऊन जातो (तर). (थोडेसे जाऊन) (पण) नको कर्णा नको.
कर्ण: -तेन हि जित्वा पृथिवीं ददामि ।
कर्ण: - मग ही पृथ्वी जिंकून तुम्हाला देतो.
शक्र: - पृथिव्या: किं करिष्यामि ?
शक्र: -पृथ्वीचे मी काय करणार ?
कर्ण: - तेन ह्यग्निष्टोमफलं ददामि ।
कर्ण: - तर मग अग्निष्टोम यज्ञाचे फळ मी तुम्हाला देतो.
शक्र: - अग्निष्टोमफलेन किं कार्यम् ?
शक्र: - अग्निष्टोम यज्ञाचे फळ घेऊन काय़ कराय़चं आहे ?
कर्ण: - तेन हि मच्छिरो ददामि ।
कर्ण: - तर मग मी माझं मस्तकच आपल्याला देतो.
शक्र: - अविहा ! अविहा
शक्र: - नको, नको.
कर्ण: - न भेतव्यं न भेतव्यं । प्रसीदतु भवान् । अन्यदपि श्रूयताम् ।
अङ्गै: सहैव जनितं मम देहरक्षा
देवासुरैरपि न भेद्यमिदं महास्त्रै: ।
देयं तथापि कवचं सह कुण्डलाभ्यां
प्रीत्या मया भगवते रुचितं यदि स्यात् ॥
कर्ण: - घाबरू नका घाबरू नका. आपण प्रसन्न व्हा. दुसरं ऐका -
देव असुर यांना सुद्धा जे अभेद्य आहे, असे जे माझ्या देहाबरोबरच (जन्मत:च) माझे देहरक्षण करण्यास निर्माण झालेले आहे, ते आपल्याला जर आवडत असेल तर कुंडलांसहित कवच देण्याजोगे (माझ्याकडे आहे). (ते मी देतो.)
शक्र: - ददातु ददातु ।
शक्र: - द्या, द्या.
स्वाध्याय
प्रयोग बदला -
१) भो: कर्ण, महत्तरां भिक्षां याचे ।
२) किन्नु खलु वक्तव्यं मया
३) धर्मो हि यत्नै: पुरुषेण साध्य: ।
४) महत्तरां भिक्षां भवते यच्छामि ।
५) गोसहस्रं यच्छामि ।
६) अग्निष्टोमफलं यच्छामि
७) देवासुरैरपि न भेद्यमिदं महास्त्रै: ।
८) मया कवचं देयं ।
९) मुहूर्तकं क्षीरं पिबामि ।
१०) अपर्याप्तं कनकं यच्छामि ।
प्रश्न २) पूर्वकालवाचक काढा.
१) तस्मादुभयं परिहृत्य किन्नु खलु वक्ष्यामि ?
२) तेन हि जित्वा पृथिवीं ददामि
दानवीर: (भासकृत कर्णभार) उत्तरे
प्रयोग बदला
१) भो: कर्ण, महत्तरां भिक्षां याचे ।
उत्तर - भो: कर्ण, (मया) महत्तरा भिक्षा याच्यते ।
२) किन्नु खलु वक्तव्यं मया ।
उत्तर - किन्नु खलु अहं वच्मि ।
३) धर्मो हि यत्नै: पुरुषेण साध्य: ।
उत्तर - धर्मं हि यत्नै: पुरुष: साध्नुयात् ।
४) महत्तरां भिक्षां भवते यच्छामि ।
उत्तर - (मया) महत्तरा भिक्षा भवते दीयते ।
५) गोसहस्रं यच्छामि ।
उत्तर - (मया) गोसहस्रं दीयते ।
६) अग्निष्टोमफलं यच्छामि ।
उत्तर - (मया) अग्निष्टोमफलं दीयते ।
७) देवासुरैरपि न भेद्यमिदं महास्त्रै: ।
उत्तर - देवासुरा: अपि न भिन्द्यु: इदं महास्त्रै: ।
८) मया कवचं देयं ।
उत्तर - अहं कवचं दद्याम् ।
९) मुहूर्तकं क्षीरं पिबामि ।
उत्तर - (मया) मुहूर्तकं क्षीरं पीयते ।
१०) अपर्याप्तं कनकं यच्छामि ।
उत्तर - (मया) अपर्याप्तं कनकं दीयते ।
प्रश्न २) पूर्वकालवाचक काढा.
१) तस्मादुभयं परिहृत्य किन्नु खलु वक्ष्यामि ?
उत्तर - तस्मादुभयं परिहरिष्यामि किन्नु च खलु वक्ष्यामि ?
२) तेन हि जित्वा पृथिवीं ददामि ।
उत्तर - तेन हि जयामि पृथ्वीं च ददामि ॥
१०२-२) दानवीर (भासकृत कर्णभार)
कर्ण: - (आत्मगतम्) एष एवास्य काम: । किं नु खल्वनेककपटबुद्धे: कृष्णस्योपाय: । सोऽपि भवतु । धिग् अयुक्तं अनुशोचितुम् । नास्ति संशय: । (प्रकाशम्) गृह्यताम् ।
कर्ण: - (स्वगत) हीच ह्याची इच्छा होती तर. अनेक कपटांनी युक्त बुद्धी असलेल्या कृष्णाचे तर हे कारस्थान नसावे ना ? असेल तर असू दे. आता मागून पश्चात्ताप करणे योग्य नाही. यात काही संशयच नाही. (प्रकट) हे घ्या.
शल्य: - अङ्गराज ! न दातव्यम् न दातव्यम् ।
शल्य: - अंगराज, देऊ नका, देऊ नका.
कर्ण: - शल्यराज ! अलमलं वारयितुम् । पश्य
शिक्षा क्षयं गच्छति कालपर्ययात्
सुबद्धमूला निपतन्ति पादपा: ।
जलं जलस्थानगतं च शुष्यति
हुतं व दत्तं च तथैव तिष्ठति ।
तस्मात् गृह्यताम् (निकृत्य ददाति ।
कर्ण: - शल्यराज, (मला) अडवू नका. पहा बरं -
कालाच्या ओघात शिक्षण लयाला जातं. दृढमूल असलेले वृक्ष सुद्धा उन्मळून पडतात. जलस्थानी असलेल पाणी सुद्धा वाळून जातं. पणा दिलेली आहुती व दान मात्र टिकून रहातं.
तेव्हा (कवचकुंडल) घ्या.
शक्र: - (गृहीत्वा आत्मगतम्) हन्त गृहीते एते । पूर्वमेवार्जुनविजयार्थं सर्वदेवैर्यत् समर्थितं तदिदानीं मयानुष्ठितम् । तस्मादहमप्यैरावतमारुह्य अर्जुनकर्णयोर्द्वन्द्वयुद्धं पश्यामि ।
(निष्क्रान्त:)
शक्र: - (घेऊन स्वत:शी) वा ही मिळाली. पूर्वीच अर्जुनाच्या विजयासाठी सर्व देवांनी जे ठरवलं होतं तेच मी आता केलं. (तेच काम मी पार पाडलं). तेव्हा आता मी सुद्धा ऐरावतावर बसून अर्जुन व कर्णाचे द्वंद्वयुद्ध पाहीन.
(निघून जातो).
शल्य: - भो अङ्गराज ! वञ्चित: खलु भवान् ।
शल्य: - आपण फसवले गेलात.
कर्ण: - केन
कर्ण: - कोणी ?
शल्य: - शक्रेण
शल्य: - इंद्राने
कर्ण: - न खलु । शक्र: खलु मया वञ्चित: । कुत:
अनेकयज्ञाहुतितर्पितो द्विजै:
किरीटिमान् दानवसङ्घमर्दन: ।
सुरद्विपास्फालनकर्कशाङ्गुलि
र्मया कृतार्थ: खलु पाकशसन: ॥
कर्ण: - नाही नाही, शक्रालाच मी फसवले आहे. कशावरून
(ब्राह्मणांकडून) ज्याला यज्ञामधे अनेक आहुती ज्याला दिल्या जातात, किरीट धारण करणार्या ज्या इंद्राने अनेक दानवांची कुळे नष्ट केली, ऐरावताच्या अंगावरून सतत हात फिरवल्यामुळे ज्याची बोटे कठिण झाली आहेत, अशा इंद्राला मी (दान देऊन) कृतार्थ केले आहे. (तेव्हा मला नाही इंद्राने फसवले तर मीच इंद्राला फसवले आहे).
(प्रविश्य ब्राह्मणरूपेण)
देवदूत: - भो: कर्ण ! कवचकुण्डलग्रहणाज्जनितपश्चात्तापेन पुरन्दरेणानुगृहीतोऽसि । पाण्डवेष्वेकपुरुषवधार्थममोघमस्त्रं विमला नाम शक्तिरियं प्रतिगृह्यताम्
देवदूत: - कर्ण, कवच व कुंडले घेतल्यामुळे पश्चात्ताप पावलेल्या इंद्राने आपल्यावर कृपा केली आहे. पांडवांपैकी एका पुरुषाच्या वधासाठी अमोघ अस्त्र अशी ही विमला नावाची शक्ती आपण घ्यावी.
कर्ण: - धिग्, दत्तस्य न प्रतिगृह्णामि ।
कर्ण: - धिक्कार असो. एकदा दिल्यानंतर (त्या बदल्यात) मी काही घेत नाही.
देवदूत: - ननु ब्राह्मणवचनाद् गृह्यताम् ।
देवदूत: - आपण ब्राह्मणाच्या सांगण्यावरून घ्यावे.
कर्ण: - ब्राह्मणवचनमिति । न मयातिक्रान्तपूर्वम् । कदा लभेय ।
कर्ण: - ब्राह्मणाच्या सांगण्यावरून ? मी ब्राह्मणांच्या वचनाचे यापूर्वी कधी उल्लंघन केले नाही. (ती शक्ती) मला केव्हा मिळेल ?
देवदूत: - यदा स्मरसि तदा लभस्व ।
देवदूत: - जेव्हा स्मरण कराल तेव्हा मिळेल.
कर्ण: - बाढम् । अनुगृहीतोऽस्मि । प्रतिनिवर्ततां भवान् ।
कर्ण: - ठीक आहे. मी आपला कृपांकित आहे. आता आपण परत फिरावे.
देवदूत: - बाढम् (निष्क्रान्त:)
देवदूत: - ठीक आहे (असे म्हणून जातो).
स्वाध्याय
प्रयोग बदला -
१) अङ्गराज ! न दातव्यम्
२) निपतन्ति पादपा: ।
३) अहं युद्धं पश्यामि ।
४) भवान् वञ्च्यते ।
५) शक्र: खलु मया अवञ्च्यत ।
६) ब्राह्मणवचनं न मया अतिक्राम्यते ।
७) अहं शक्तिं कदा लभेय ?
१०२-२) दानवीर: (भासकृत कर्णभार) उत्तरे
प्रयोग बदला -
१) अङ्गराज ! न दातव्यम् ।
- अङ्गराज न दीयताम् ।
२) निपतन्ति पादपा: ।
- निपत्यते पादपै: ।
३) अहं युद्धं पश्यामि ।
- मया युद्धं दृश्यते ।
४) भवान् वञ्च्यते ।
- (स:) भवन्तं वञ्चयति ।
५) शक्र: खलु मया अवञ्च्यत ।
- शक्रं खलु अहं अवञ्चयम् ।
६) ब्राह्मणवचनं न मया अतिक्राम्यते ।
- ब्राह्मणवचनं न अहं अतिक्राम्यामि ।
७) अहं शक्तिं कदा लभेय ?
- मया शाक्ति: कदा लभ्येत ?
No comments:
Post a Comment