पाठ ८८ वा - स्वयं अध्यनार्थ पाठ महाकविर्गुणाढ्य:
सातवाहन: - अहो प्रशान्तेयं विन्धारण्यभूमि: ! सर्वे पशुपक्षिणोऽपि संमिल्य महाकवेर्गुणाढ्यस्य अमृतनिष्यन्दिकाव्यं कर्णपुटेन प्रकामं पिबन्ति । (गुणाढ्यमुपसृत्य) हे महाकवे, अभिवादये । सातवाहनोऽहम् । ममापराधं क्षन्तुमर्हति महाराज: ।
गुणाढ्य: - चिरं जीवतु महाराज: । अलङ्क्रियतामिदमासनम् । अपि कुशली भवान् ? किमागमनप्रयोजनम् ? किमर्थं चेयं क्षमायाचना ?
सातवाहन: - भो; कविराज, आत्मानं रसिकवरं मन्यमानेव मया पैशाचीभाषायां रचितं ‘बृहत्कथा’ नाम भवत: काव्य पूर्वं तिरस्कृतम् । अत: क्षन्तव्य: ममापराध: उदारचेतसा भवता ।
गुणाढ्य: - महाराज, नात्र भवत: कोऽप्यपराध: । ममैवे दुर्दैवस्य परिपाक: स इत्यहं मन्ये । रसिकवरे त्वयि पराङ्मुखे जाते मयैष: काव्ययज्ञ: समारब्ध: । षड्श्लोकयुतानि काव्यपत्राणि वह्नौ हुतानि । केवलं लक्षश्लोकात्मक एव काव्यसङ्ग्रह: सम्प्रत्यवशिष्ट: । सर्वमेतमग्नये समर्प्य आत्मानं कृतार्थं कर्तुमिच्छामि ।
सातवाहन: - मा मा तावद् भो: कविराज: । ममापराधाद् वञ्जितोऽयं लोकस्तव दिव्यस्य काव्यस्य रसास्वादात् । अत एतस्य काव्यशेषस्य प्रदानेन मामनुग्रहितुमर्हति भवान् ।
गुणाढ्य: - महाराज, षण्णां विद्याधराणां चरितानि इदानीमग्निसाद्भूतानि । तत्किमधुना एकेनैवावशिष्टेन विद्याधरचरितेन ?
सातवाहन: - यस्य रसास्वादनार्थं तिर्यञ्चोऽपि सम्मिलन्ति तदपूर्वं काव्यं निखिलस्य जगतो ललामभूतं स्यात् । अतो न केवलं मामेव अपि तु सकलमपि जीवलोकमुपकर्तुं काव्यमिदं मह्यं दातव्यमिति मे प्रार्थना । (इति पादयो: पतति)
गुणाढ्य: - महाराज, केवलं भवत: शासनमित्येव प्रारब्धं काव्ययज्ञमसमाप्यैव अवशिष्टमेतां कथां तुभ्यं दास्यामि । गृह्यतामियम् ।
सातवाहन: - अनुगृहीतोऽस्मि । उपकृतश्चायं जीवलोको महाकविना गुणाढ्येन । विजयतां महाकविर्गुणाढ्य: ।
स्वयं अध्यनार्थ पाठ महाकविर्गुणाढ्य:
सातवाहन: - अहो प्रशान्तेयं विन्धारण्यभूमि: ! सर्वे पशुपक्षिणोऽपि संमिल्य महाकवेर्गुणाढ्यस्य अमृतनिष्यन्दिकाव्यं कर्णपुटेन प्रकामं पिबन्ति । (गुणाढ्यमुपसृत्य) हे महाकवे, अभिवादये । सातवाहनोऽहम् । ममापराधं क्षन्तुमर्हति महाराज: ।
सातवाहन - ही विन्ध्यारण्यभूमी किती शांत आहे ! सर्व पशुपक्षी एकत्र येऊन महाकवी गुणाढ्याचे अमृताप्रमाणे रसदार काव्य कानांनी यथेच्छ ऐकत आहेत. (गुणाढ्याजवळ जाऊन) हे महाकवे, मी सातवाहन आपल्याला नमस्कार करतो. माझा अपराध आपण क्षमा करावा.
गुणाढ्य: - चिरं जीवतु महाराज: । अलङ्क्रियतामिदमासनम् । अपि कुशली भवान् ? किमागमनप्रयोजनम् ? किमर्थं चेयं क्षमायाचना ?
गुणाढ्य - महाराज, दीर्घायुषी व्हा. हे आसन सुशोभित करा. (या आसनावर बसा). आपले कुशल आहे ना ? (इकडे) येण्याचे कारण काय ? आणि ही क्षमायाचना कशासाठी ?
सातवाहन: - भो: कविराज, आत्मानं रसिकवरं मन्यमानेन मया पैशाचीभाषायां रचितं ‘बृहत्कथा’ नाम भवत: काव्यं पूर्वं तिरस्कृतम् । अत: क्षन्तव्य: ममापराध: उदारचेतसा भवता ।
सातवाहन - अहो कविराज, स्वत:ला रसिकश्रेष्ठ समजणार्या मी आपण पैशाची भाषेत रचलेले ‘बृहत्कथा’ नावाचे आपले काव्य तिरस्कृत केले. म्हणून उदार अंत:करण असलेल्या तुम्ही हा माझा अपराध क्षमा करावा.
गुणाढ्य: - महाराज, नात्र भवत: कोऽप्यपराध: । ममैवे दुर्दैवस्य परिपाक: स इत्यहं मन्ये । रसिकवरे त्वयि पराङ्मुखे जाते मयैष: काव्ययज्ञ: समारब्ध: । षड्लक्षश्लोकयुतानि काव्यपत्राणि वह्नौ हुतानि । केवलं लक्षश्लोकात्मक एव काव्यसङ्ग्रह: सम्प्रत्यवशिष्ट: । सर्वमेतमग्नये समर्प्य आत्मानं कृतार्थं कर्तुमिच्छामि ।
गुणाढ्य: - महाराज, यामधे आपला काही अपराध नाही. हा माझ्या दुर्दैवाचाच परिपाक आहे असे मी समजतो. रसिवर असे तुम्ही पराङ्मुख झाल्यावर (माझ्या काव्याचा तुम्ही तिरस्कार केल्यावर) मी काव्ययज्ञ आरंभला आहे. सहा लाख श्लोक असलेली काव्याची पाने अग्नीला समर्पित केली आहेत. केवळ एक लाख श्लोकांनी युक्त असा हा काव्यसंग्रह सध्या शिल्लक राहिलेला आहे. हा सर्व अग्नीला समर्पित करून मी स्वत:ला कृतार्थ करू इच्छितो.
सातवाहन: - मा मा तावद् भो: कविराज: । ममापराधाद् वञ्जितोऽयं लोकस्तव दिव्यस्य काव्यस्य रसास्वादात् । अत एतस्य काव्यशेषस्य प्रदानेन मामनुग्रहितुमर्हति भवान् ।
सातवाहन - अहो कविराज, नको नको. माझ्या अपराधामुळे सर्व लोक आपल्या दिव्य काव्याच्या रसास्वादाला मुकले आहेत. तेव्हा हे उरलेले काव्य (मला) देऊन आपण माझ्यावर अनुग्रह करावा.
गुणाढ्य: - महाराज, षण्णां विद्याधराणां चरितानि इदानीमग्निसाद्भूतानि । तत्किमधुना एकेनैवावशिष्टेन विद्याधरचरितेन ?*
गुणाढ्य - महाराज आतापर्यंत सहा विद्याधरांची चरित्रे (या काव्ययज्ञात) भस्मसात झाली आहेत. तेव्हा आता उरलेल्या एका विद्याधरचरित्राचा काय उपयोग आहे ?
सातवाहन: - यस्य रसास्वादनार्थं तिर्यञ्चोऽपि सम्मिलन्ति तदपूर्वं काव्यं निखिलस्य जगतो ललामभूतं स्यात् । अतो न केवलं मामेव अपि तु सकलमपि जीवलोकमुपकर्तुं काव्यमिदं मह्यं दातव्यमिति मे प्रार्थना । (इति पादयो: पतति)*
सातवाहन - ज्या (काव्याचा) रसास्वाद घेण्यासाठी तिर्यक् योनीतील जीव (पशु-पक्षी) सुद्धा एकत्र येतात, तर ते अपूर्व काव्य संपूर्ण जगाला ललामभूत होईल. म्हणून केवळ मलाच नव्हे तर सर्व जीवलोकावर उपकार करण्यासाठी हे काव्य आपण मला द्या अशी माझी तुम्हाला प्रार्थना (विनंती) आहे. (असे म्हणूण गुणाढ्याच्या पाया पडतो.
गुणाढ्य: - महाराज, केवलं भवत: शासनमित्येव प्रारब्धं काव्ययज्ञमसमाप्यैव अवशिष्टामेतां कथां तुभ्यं दास्यामि । गृह्यतामियम् ।*
गुणाढ्य - महाराज,
केवळ आपली आज्ञा म्हणून हा सुरु केलेला काव्ययज्ञ समाप्त न करताच शिल्लक राहिलेली कथा मी तुम्हाला देतो. ही घ्या.
सातवाहन: - अनुगृहीतोऽस्मि । उपकृतश्चायं जीवलोको महाकविना गुणाढ्येन । विजयतां महाकविर्गुणाढ्य: ।*
सातवाहन -मी उपकृत झालो. तसेच महाकवी गुणाढ्याने सर्व जीवलोकावर सुद्धा उपकार केलेला आहे. महाकवी गुणाढ्याचा विजय असो.
हा संवादात्मक पाठ आपल्या भाषेत कथास्वरूपात लिहा. (indirect speech)
"स्वयं अध्यनार्थ पाठ महाकविर्गुणाढ्य:" या Audio साठी खाली क्लिक् करा :
" पाठ ८८ वा - स्वयं अध्यनार्थ पाठ महाकविर्गुणाढ्य: " या Audio साठी खाली क्लिक् करा :
No comments:
Post a Comment