पाठ ८७ वा - कर्मणी प्रयोग
प्रयोगाची सर्वसामान्य माहिती -
वाक्यात क्रियापदाची योजना कशी केली आहे त्यावरून वाक्यात प्रयोग कोणता आहे ते कळते.
आपण इतके दिवस शिकलो की वाक्यात क्रियापदाची योजना कर्त्याप्रमाणे करायची असते. कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे कर्त्याचे पुरुष व वचन योजतात.
काही वेळा क्रियापद कर्माप्रमाणे सुद्धा योजले जाते. उदाहरणादाखल आपण मराठीतील काही वाक्ये पाहू.
१) तो आंबा खातो. ती आंबा खाते
ते आंबे खातात. त्या आंबा खातात.
२) त्याने आंबा खाल्ला. तिने आंबा खाल्ला.
त्याने सीताफळ खाल्ले, तिने सीताफळ खाल्ले.
यातील पहिल्या वाक्यात क्रियापद कर्त्याप्रमाणे आले आहे तर दुसर्या वाक्यात क्रियापद कर्माप्रमाणे आले आहे. कर्म बदलले की क्रियापद बदलावे लागते तेव्हा त्या वाक्यप्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
आता संस्कृतमधे कर्मणी प्रयोगाची वाक्यरचना कशी करायची ते पाहू.
कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया विभक्ती व क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनाप्रमाणे
कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीया विभक्ती, कर्म प्रथमा विभक्ती व क्रियापद कर्माच्या पुरुष व वचनाप्रमाणे.
कर्मणी क्रियापद बनवण्याची पद्धत -
मूळ धातू (कोणत्याही गणाचा) + कर्मणी ‘य’ प्रत्यय व पुढे नेहेमी आत्मनेपदी प्रत्यय. (कर्माच्या पुरुष वचनाप्रमाणे
कर्तरी वाक्य - अहं देवं नमामि ।
अहं देवान् नमामि ।
कर्मणी वाक्य - मया देव: नम्यते ।
मया देवा: नम्यन्ते ।
कर्मणी प्रयोग हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. एकतर ही वाक्यरचना करतांना धातूचा गणपद माहीत नसला तरी क्रियापद बनवता येते. कारण मूळ धातूला य प्रत्यय लावायचा व पुढे आत्मनेपदी प्रत्यय लावायचे.
अध्यात्माच्या भाषेत बोलायचे तर कोणी केले हे महत्वाचे नसून काय केले हे महत्वाचे आहे. ‘माझ्याकडून राजा बोलला गेला’ अशा प्रकारची वाक्यरचना आपण मराठीत करत नाही. पण ‘मया राजा अगद्यत’ अशा प्रकारची वाक्यरचना संस्कृतमधे नित्य केली जाते.
कर्मणीक्रियापदे सर्व काळ व अर्थांमधे केली जातात.
खाद् (१प. प.) = खाणे (कर्मणी रूपे)
खाद् + य + आत्मनेपदी प्रत्यय
कर्मणी वर्तमानकाळ
खाद्ये खाद्यावहे खाद्यामहे प्रथम पुरुष
खाद्यसे खाद्येथे खाद्यध्वे द्वितीय पुरुष
खाद्यते खाद्येते खाद्यन्ते तृतीय पुरुष
कर्मणी प्रथम भूतकाळ
अखाद्ये अखाद्यावहि अखाद्यामहि प्रथम पुरुष
अखाद्यथा: अखाद्येथाम् आखाद्यध्वम् द्वितीय पुरुष
अखाद्यत अखाद्येताम् अखाद्यन्त तृतीय पुरुष
कर्मणी आज्ञार्थ
खाद्यै खाद्यावहै खाद्यामहै प्रथम पुरुष
खाद्यस्व खाद्येथाम् खाद्यध्वम् द्वितीय पुरुष
खाद्यताम् खाद्येताम् खाद्यन्ताम तृतीय पुरुष
कर्मणी विद्यर्थ
खाद्येय खाद्येवहि खाद्येमहि प्रथम पुरुष
खाद्येथा: खाद्येयाथाम् खादयेध्वम् द्वितीय पुरुष
खाद्येत खाद्येयाताम् खाद्येरन् तृतीय पुरुष
स्वाध्याय -- खालील कर्तरी वाक्यांची कर्मणी वाक्ये करा.
१) अहं अवगुणान् त्यजामि ।
२) त्वं फलानि खादसि ।
३) स: लेखं लिखति ।
४) भक्ता: देवान् अर्चन्ति ।
५) दुर्जना: सजन्नान् निन्दन्ति ।
६) आवाम् जलं पिबाव: ।
७) नृप: धनं यच्छति ।
८) यूयं परमेशं चिन्तयथ ।
१०) दुर्जना: उपकारान् न स्मरन्ति ।
११) शिक्षका: ज्ञानं यच्छन्ति ।
१२) छात्रा: पुस्तकानि पठन्ति ।
१३) युवां दोषान् पश्यथ: ।
१४) सिंह: मांसं खादति ।
१५) गजा: मांसं न खादन्ति ।
कर्मणी प्रयोग उत्तरे
खालील कर्तरी वाक्यांची कर्मणी वाक्ये करा.
१) अहं अवगुणान् त्यजामि ।
मया अवगुणा: त्यज्यन्ते ।
२) त्वं फलानि खादसि ।
त्वया फलानि खाद्यन्ते ।
३) स: लेखं लिखति ।
तेन लेख: लिख्यते ।
४) भक्ता: देवान् अर्चन्ति ।
भक्तै: देवा: अर्च्यन्ते ।
५) दुर्जना: सजन्नान् निन्दन्ति ।
दुर्जनै: सज्जना: निद्यन्ते ।
६) आवाम् जलं पिबाव: ।
आवाभ्याम् जलं पीयते ।
७) नृप: धनं यच्छति ।
नृपेण धनं इष्यते ।
८) यूयं परमेशं चिन्तयथ ।
युष्माभि: परमेश: ध्यायते ।
१०) दुर्जना: उपकारान् न स्मरन्ति ।
दुर्जनै: उपकारा: न स्मर्यन्ते ।
११) शिक्षका: ज्ञानं यच्छन्ति ।
शिक्षकै: ज्ञानं दीयते ।
१२) छात्रा: पुस्तकानि पठन्ति ।
छात्रै: पुस्तकानि पठ्यन्ते ।
१३) युवां दोषान् पश्यथ: ।
युवाभ्यां दोषा: दृश्यन्ते ।
१४) सिंह: मांसं खादति ।
सिंहेन मांसं खाद्यते ।
१५) गजा: मांसं न खादन्ति ।
गजै: मांसं न खाद्यते ।
No comments:
Post a Comment