Saturday, January 16, 2021

पाठ ९२ वा - आत्मनेपदी विद्यर्थ

पाठ ९२ वा - आत्मनेपदी विद्यर्थ 


आत्मनेपदी विध्यर्थाचे प्रत्यय


ईय  ईवहि  ईमहि प्रथम पुरुष

ईथा: ईयाथाम्  ईध्वम् द्वितीय पुरुष

ईत  ईयाताम्  ईरन् तृतीय पुरुष


ईक्ष् ( . .) = पहाणे


ईक्षेय  ईक्षहि  ईक्षेमहि  प्रथम पुरुष

ईक्षेथा: ईक्षेयाथाम्  ईक्षेध्वम् द्वितीय पुरुष

ईक्षेत  ईक्षेयाताम्  ईक्षेरन् तृतीय पुरुष



जन्-जा ( . .) = उत्पन्न होणे


जायेय  जायेवहि  जायेमहि    प्रथम पुरुष

जायेथा: जायेयाथाम्  जायेध्वम्  द्वितीय पुरुष

जायेत जायेयाताम्  जायेरन्     तृतीय पुरुष



*लस्ज्-लज्ज् ( . .) = लाजणे

*

लज्जेय   लज्जेवहि  लज्जेमहि प्रथम पुरुष

लज्जेथा:  लज्जेयाथाम्  लज्जेध्वम् द्वितीय पुरुष

लज्जेत  लज्जेयाताम्  लज्जेरन्     तृतीय पुरुष


रच् (१० . .) = रचना करणे


रचयेय  रचयेवहि  रचयेमहि  प्रथम पुरुष

रचयेथा:  रचयेयाथाम्  रचयेध्वम् द्वितीय पुरुष

रचयेत  रचयेयाताम्   रचयेरन्  तृतीय पुरुष



प्रश्न ) खाली वाक्यांचे संस्कृतमधे विध्यर्थात भाषांतर करा.


) मी कल्याण पहावे. (ईक्ष्)

) सर्वांनी मांगल्याची इच्छा करावी. (ईह्)

) सूर्य चंद्र प्रकाशावेत. (प्र + काश्)

) वानरांनी उड्या माराव्यात (कूर्द्)

) तुम्ही सर्वांनू मला क्षमा करावी.

) सर्वांनी प्रयत्न करावा. (प्र + यत्, चेष्ट्)

) राजाने शत्रूवर विजय मिळवावा.

) ईश्वराने रक्षण करावे (त्रै-त्राय्)

) तुम्ही दोघांनी त्वरा करावी. (त्वर्)

१०) सज्जनांनी दया करावी (दय्)

११) तारकांनी चमकावे. (द्युत्-द्योत्)

१२) आईने अन्न शिजवावे (पच्)

१३) सदस्यांनी पुस्तके व्यावीत. (नी-नय्)

१४) असुरांनी बाधा करू नये. (बाध्)

१५) कोणीही भिक्षा मागू नये.

१६) तपस्व्याने यज्ञ करावा. (यज्)

१७) चांगल्या कार्याला लवकर सुरवात करावी. (रभ्)

१८) दुर्बळांनी सबळांचा आश्रय घ्यावा्. ( + श्रि-श्रय्)

१९) विद्यार्थ्यांनी विद्या मिळवावी. 

२०) मुलांनी आईवडीलांची सेवा करावी (सेव्)



आत्मनेपदी विद्यर्थ उत्तरे 


प्रश्न ) खाली वाक्यांचे संस्कृतमधे विध्यर्थात भाषांतर करा.


) मी कल्याण पहावे. (ईक्ष्)

उत्तर - अहं कल्याणम् ईक्षेय


) सर्वांनी मांगल्याची इच्छा करावी. (ईह्)

उत्तर - सर्वे माङ्गल्यम् ईहेरन्


) सूर्य चंद्र प्रकाशावेत. (प्र + काश्)

उत्तर - सूर्य: चन्द्र: प्रकाशेयाताम्


) वानरांनी उड्या माराव्यात (कूर्द्)

उत्तर - वानरा: कूर्देरन्


) तुम्ही सर्वांनी मला क्षमा करावी. (क्षम्)

उत्तर - यूयं मां क्षमेध्वम्


) सर्वांनी प्रयत्न करावा. (प्र + यत्, चेष्ट्)

उत्तर - सर्वे प्रयतेरन्


) राजाने शत्रूवर विजय मिळवावा.

उत्तर - नृप: शत्रुम् विजयेत


) ईश्वराने रक्षण करावे (त्रै-त्राय्)

उत्तर - ईश्वर: त्रायेत


) तुम्ही दोघांनी त्वरा करावी. (त्वर्)

उत्तर - युवां त्वरेयाथाम्


१०) सज्जनांनी दया करावी (दय्)

उत्तर - सज्जना: दयेरन्


११) तारकांनी चमकावे. (द्युत्-द्योत्)

उत्तर - तारका: द्योतेरन्


१२) आईने अन्न शिजवावे (पच्)

उत्तर - माता अन्नं पचेत


१३) सदस्यांनी पुस्तके न्यावीत. (नी-नय्)

उत्तर - सदस्या: पुस्तकानि नयेरन्


१४) असुरांनी बाधा करू नये. (बाध्)

उत्तर - असुरा: बाधेरन्


१५) कोणीही भिक्षा मागू नये.

उत्तर - : अपि भिक्षेत


१६) तपस्व्याने यज्ञ करावा. (यज्)

उत्तर - तपस्वी यजेत


१७) चांगल्या कार्याला लवकर सुरवात करावी. (रभ्)

उत्तर - शुभं कार्यं शीघ्रं रभेत (या वाक्यात कर्ता दिलेला नाही तृतीय पुरुषी एकवचनी धरून भाषांतर केले आहे.)


१८) दुर्बळांनी सबळांचा आश्रय घ्यावा्. ( + श्रि-श्रय्)

उत्तर - दुर्बला: सबलं आश्रयेरन्


१९) विद्यार्थ्यांनी विद्या मिळवावी. (लभ्)

उत्तर - विद्यार्थिन: विद्यां लभेरन्


२०) मुलांनी आईवडीलांची सेवा करावी (सेव्)

उत्तर - पुत्रा: मातरं पितरं सेवेरन्





" पाठ ९२ वा - आत्मनेपदी विद्यर्थ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...