पाठ ८३ वा - व्यंजनसंधी भाग ४
व्यंजनसंधी भाग ४
नियम १०) पदान्ती न् चा अनुस्वार व विसर्ग
पदाच्या अंती न् आणि त्याच्या पुढे च्-छ्, ट्-ठ्, त्-थ् हे वर्ण आले तर त्या न् चे अनुस्वार व विसर्ग दोन्ही होतात. नंतर त्या विसर्गापुढे च-छ् असल्यास विसर्गाचा श्, ट्-ठ् असल्याश विसर्गाचा ष् आणि त-थ् असल्यास विसर्गाचा स् होतो.
उदा.
१) तान् + चोरान्
= तां: + चोरान्
= तांश् + चोरान्
= तांश्चोरान्
२) चतुरान् + टीकाकारान्
= चतुरां: + टीकाकारान्
= चतुरांष् + टीकाकारान्
= चतुरांष्टीकाकारान्
३) बहून् + तरून्
= बहूं: + तरून्
= बहूंस् + तरून्
= बहूंस्तरून्
पदाच्या येणार्या न् चा अनुस्वार विकल्पाने होतो. जेव्हा अनुस्वार करणार नाही तेव्हा न् चा फक्त विसर्ग होतो. व पूर्वीचा स्वर अनुनासिक बनतो.. त्याबद्दल त्या स्वरावर ँ असा चंद्रबिंदू येतो.
उदा.
१) तान् + चोरान्
= ताँ: + चोरान्
= ताँश् + चोरान्
= ताँश्चोरान् / तांश्चोरान्
२) चतुरान् + टीकाकारान्
= चतुराँ: + टीकाकारान्
= चतुराँष् + टीकाकारान्
= चरुराँष्टीकाकारान् / चतुरांष्टीकाकारान्
३) बहून् + तरून्
= बहूँ: + तरून्
= बहूँस् + तरून्
= बहूँस्तरून् / बहूंस्तरून्
११) पदान्ती असणार्या श् चा विकल्पाने छ् होणे
नियम ११ - अनुनासिकाखेरीज पदान्ती असलेल्या वर्गीय व्यंजनापुढे श् हा वर्ण आला आणि त्या श् पुढे स्वर, अर्धस्वर, अनुनासिक किंवा ह् वर्ण असेल तर श् चा विकल्पाने छ् होतो.
उदा.
पृथक् + शिखराणि
= पृथक्छिखराणि / पृथक्शिखराणि
तत् + श्रुत्वा
येथे आधी श्चुत्व संधीप्रमाणे चवर्गातील व्यंजन येते.
= तच् + श्रुत्वा
= तच्छ्रुत्वा / तच्श्रुत्वा
सुहृद् + शोभन:
= सुहृच् + शोभन:
= सुहृच्छोभन: / सुहृच्शोभन:
१२) पुढे येणार्या ह् वर्णाचा विकल्पाने चतुर्थवर्ण येणे
नियम १२) अनुनासिकाखेरीज पदांती येणार्या कोणत्याही वर्गीय व्यंजनापुढे ह् हा वर्ण आल्यास त्याच्या जागी पूर्वीच्या वर्णाच्या वर्गातील चौथे व्यंजन विकल्पाने येते. चौथे व्यंजन मृदु असल्यामुळे त्याच्या पूर्वीच्या वर्णाच्या जागी त्याच्या वर्गातील तिसरा वर्ण येतो.
वाक् + हंसस्य.
आता येथे मागे क् गे वर्गीय व्यंजन आहे म्हणून पुढील ह् वर्णाच्या जागी कवर्गातील चौथे व्यंजन येईल.
= वाक् + घंसस्य
आता जश्त्व संधीच्या नियमाप्रमाणे पुढे कोमल व्यंजन आले असल्यामुळे मागील क् या वर्णाच्या जागी विकल्पाने तिसरे व्यंजन येते.
वाक् + घंसस्य
= वाग् + घंसस्य
= वाग्घंसस्य / वाग्हंसस्य
सम्राट् + हरति
= सम्राट् + ढरति
= सम्राड् + ढरति
= सम्राड्ढरति / सम्राड्हरति
१३) चागम संधी
नियम अ) पदांती येणार्या ह्रस्व स्वरापुढे छ् हे व्यंजन आले तर त्या छ ला च् हा आगम होतो.
उदा.
परि + छेद:
= परि + च + छेद:
= परिच्छेद:
नियम आ) पदान्ती येणार्या दीर्घ स्वरापुढे छ् आल्यास दीर्घस्वरापुढे च् विकल्पाने येतो.
उदा.
शीतला + छाया
= शीतला + च + छाया
= शीतलाच्छाया / शीतला छाया
नियम १४ र् वर्णापूर्वीचा स्वर दीर्घ होणे
नियम र् या व्यंजनापुढे र् हे व्यंजन आले असता पूर्वीच्या र् व्यंजनाचा लोप होतो व त्या पूर्वी असलेले ह्रस्व अ, इ व उ हे स्वर दीर्घ होतात.
उदा,
कवि: + रमते
= कवि + र् + रमते
= कवि + रमते
= कवी रमते
=======================
खालील संधी सोडवा -
१) एकस्मिन्नेव =
२) एतच्छक्यम् =
३) यावदावश्यकम् =
४) ईषदपि =
५) कालादारभ्य =
६) स्थाणुवदासीन: =
७) मन्थनादुद्भूत =
८) तस्माच्छिष्य: =
९) एकस्मिन्नुटजे =
१०) त्यजेन्मायाविनम् =
११) उद्योगादनिवृत्तस्य =
१२) यावज्जीवम् =
१३) तल्लिख्यताम् =
१४) तच्छिल्पम् =
१५) तच्छतेन =
१६) यत्स्वल्पाद्भूरिरक्षणम् =
१७) एतस्मिन्नन्तरे =
१८) प्रागेव =
१९) स्फुरेच्च =
२०) यच्छ्रुतम् =
No comments:
Post a Comment