पाठ ७९ वा - प्रहेलिका: ।
अध्यापक: - अयि छात्रा:, संस्कृतभाषायां नैका: प्रहेलिका: वर्तन्ते ।
अनघा - किं नाम प्रहेलिका ?
अध्यापक: - प्रहेलिका नाम कूटप्रश्ना: ।
समीर: - आचार्य, कठिना: वर्तन्ते किमेता: प्रहेलिका: ?
अध्यापक: - न हि नहि । अतीव सुगमा: खलु ।
अद्य अहं युष्मभ्यं काश्चित् प्रहेलिका: कथयामि । यूयं उत्तरितुं प्रयतध्वम् । अपि अभिमता युष्माकं एषा कल्पना ?
छात्रा: - अथ किम् ? वयं सर्वे सज्जीभूता:
अध्यापक: - आकर्णयत ।
न तस्यादिर्नतस्यान्तो मध्ये यस्तस्य तिष्ठति ।
तवाप्यस्ति ममाप्यस्ति यदि जानासि तद्वद ॥१
माधव: - तव अपि अस्ति, मम अपि अस्ति । न: आदि:, मध्ये य:, अन्ते च न: । आचार्य, प्रहेलिकाया: उत्तरं नयनम्
अध्यापक: -* बाढम् । अधुना द्वितीयां प्रहेलिकां पठामि । आकर्णयत तावत् ।
अपदो दूरगामी च साक्षरो नैव पण्डित: ।
अमुख: स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डित: ॥२
अनघा - अपद: नाम यस्य पदानि न वर्तन्ते । दूरगामी नाम दूरं गच्छति । पदै: विना कथं गच्छति स: दूरम् ?
मिलिन्द: - साक्षर: नाम अक्षरै: सहित: वर्तते ।
समीर: - तथापि स: पण्डित: न वर्तते ।
माधव: - अमुख: स: तथापि स: स्फुटवक्ता अस्ति । स: स्पष्टं वदति । कथमेतद् ?
अध्यापक: - कथयत सत्वरम् ।
सर्वे छात्रा: - न अवगच्छाम: वयम् ।
गिरीश: -* आचार्य, अहं कथयामि । एतत् तु पत्रम् ।
अध्यापक: -* शोभनं शोभनम् ।
अनघा - आचार्य, कथय अन्यां प्रहेलिकाम् ।
अध्यापक: -* कथयामि आकर्णयत
आशुशब्दस्य अन्तेन कलाया: प्रथमेन च ।
विहगो यो भवेत्तस्य वर्णं शीघ्रं निवेदय ॥३
अनघे कथय एतस्या: प्रहेलिकाया: उत्तरम् ।
अनघा - आशुशब्दस्य अन्त: नाम आशु शब्दस्य अन्तिमं अक्षरम्, कलाया: प्रथमं नाम कलाशब्दस्य प्रथमं अक्षरम्, एष: शुक नाम खग: । तस्य वर्ण: हरित: ।
अध्यापक - शोभनं शोभनम् ।
गिरीश: - आचार्य, अहमपि एकां प्रहेलिकां पठामि ।
अध्यापक: - पठ तावत् ।
गिरीश: -
वृक्षाग्रे च फलं दृष्टं फलाग्रे वृक्षमेव च ।
अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डित: ॥४
अध्यापक: - एतस्या: प्रहेलिकाया: उत्तरं दातुं क: प्रयतेत ?
मिलिन्द: - आचार्य, वृक्षस्य अग्रे फलं, पुन: फलस्य अग्रे वृक्ष: । कथमेतत् शक्यम् ?
समीर: - मिलिन्द, अकारादि नाम अस्मिन् शब्दे अकार: प्रथमं अक्षरम्, सकारान्तं नाम शब्दस्य अन्तिमं अक्षरं स इत्यस्ति ।
माधव: - एष: तु अननस: ।
अध्यापक: - अधुनाहं अन्तिमां प्रहेलिकां कथयामि ।
वृक्षाग्रवासी न पक्षिजाति: तृणं च शय्या न च राजयोगी ।
सुवर्णकायो न च हेमधातु: पुंसश्च नाम्ना न च राजपुत्र: ॥५
एष: वृक्षाग्रवासी नाम वृक्षे वसति अपि तु न पक्षिजाति: नाम न एष: खग: । एतस्य तृणस्य शय्या अस्ति तथापि एष: राजयोगी अपि न । सुवर्णकाय: नाम अस्य वर्ण: सुवर्णमिव वर्तते तथापि न च हेमधातु: सुवर्णम् । पुंसश्च नाम्ना - एष: पुंलिंगवाचक: शब्द: तथापि एष: न राजपुत्र: । क: एतस्या: प्रहेलिकाया: उत्तरं कथयति ?
सर्वे छात्रा: - न बोधाम: वयम् । एषा प्रहेलिका कठिना एव ।
माधव: - आचार्य, अहं कथयामि एतस्या: उत्तरम् । एष: आम्र: । स: वृक्षस्य अग्रे अस्ति । तृणशय्यायां स: पक्व: भवति । यदा स: पक्व: भवति तदा तस्य वर्ण: सुवर्णमिव शोभते ।
अध्यापक: -* शोभनम्, शोभनम् ।
================
स्वाध्याय - या पाठातील क्रियापदांचे काळानुसार वर्गीकरण करा.
==============
भाषांतर
अध्यापक: - हे विद्यार्थ्यांनो, संस्कृतभाषेमधे अनेक प्रहेलिका आहेत.
अनघा - प्रहेलिका म्हणजे काय ?
अध्यापक: - प्रहेलिका म्हणजे कूटप्रश्न.
७८
समीर: - आचार्य, प्रहेलिका कठीण असतात का ?
अध्यापक: - नाही नाही, त्या तर अतिशय सोप्या असतात. आज मी तुम्हाला काही प्रहेलिका सांगतो. तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ही कल्पना तुम्हाला मान्य आहे का ?
छात्रा: - हो तर ! आम्ही सर्व सज्ज आहोत.
अध्यापक: - ऐका तर.
न त्याच्या आधी न त्याच्या नंतर य त्याच्या मध्ये
तुलाही आहे व मलाही आहे. माहीत असेल तर सांग.
माधव: - तुलाही आहे, मलाही आहे. न आधी आहे, य मधे आहे, शेवटी न आहे. आचार्य कोड्याचे उत्तर नयन असे आहे.
अध्यापक: - वा वा, छान, आता दुसरी प्रहेलिका म्हणतो, ऐका तर -
पाय नाहीत पण दूरवर जातो, साक्षर आहे, पण पंडित नाही, मुख नाही पण स्पष्ट बोलतो. हे जो जाणतो तो पंडित आहे.
अनघा - अपद म्हणजे ज्याला पाय नाहीत तो. तरीसुद्धा दूरवर जातो. पायांशिवाय दूरवर कसं काय जातो ?
मिलिन्द: - साक्षर म्हणजे अक्षरांसहित आहे तो.
समीर: - तरीही तो पंडित नाही.
माधव: - मुख नाही तरी स्फुटवक्ता आहे म्हणजे तो स्पष्ट बोलणारा आहे. हे कसे शक्य आहे ?
अध्यापक: - सांगा लवकर.
सर्वे छात्रा: - आम्हाला हे कळत नाही.
गिरीश: - गुरुजी, मी सांगतो. हे तर पत्र आहे.
अध्यापक: - वा वा छान.
*अनघा - गुरुजी दुसरे कोडे सांगा.
अध्यापक: - सांगतो, ऐका तर.
आशु शब्दाच्या अंताने व कला शब्दाच्या प्रथमाने जो पक्षी बनतो त्याचा वर्ण लवकर सांगा.
अनघे या कोड्याचे उत्तर सांग.
अनघा - आशुशब्दाचा अंत म्हणजे आशु शब्दाचे अंतिम अक्षर, कला शब्दाचे प्रथम म्हणजे कला शब्दाचे प्रथम अक्षर. हा तर पोपट नावाचा पक्षी. त्याचा रंग हिरवा आहे.
अध्यापक - वा वा छान.
गिरीश: - गुरुजी, मी सुद्धा एक कोडे सांगतो.
अध्यापक: - सांग तर
गिरीश: -
झाडाच्या टोकावर फळ दिसते, फळावर झाड दिसते. अकारादी आहे व सकारान्त आहे. हे जो जाणतो तो पंडित आहे. ॥४
अध्यापक: - या कोड्याचे उत्तर देण्याचा कोण प्रयत्न करेल ?
मिलिन्द: - गुरुजी, झाडाच्या टोकावर फळ व पुन्हा फळाच्या टोकावर झाड. हे कसे शक्य आहे ?
समीर: - मिलिन्द, अकारादि म्हणजे या शब्दात अकार हे पहिले अक्षर आहे व सकारान्त म्हणजे स हे शेवटचे अक्षर आहे.
माधव: - हा तर अननस.
अध्यापक: - आता मी शेवटचे कोडे सांगतो.
वृक्षाच्या शेंड्यावर रहातो, पण पक्षी नाही, गवतावर झोपतो पण राजयोगी नाही, सोनेरी वर्ण आहे पण सोने हा धातू नाही, पुंलिंगी आहे पण राजपुत्र नाही. ॥५
हा वृक्षाग्रवासी आहे, म्हणजे झाडावर रहातो परंतु तो पक्षिजाती नाही म्हणजे हा पक्षी नाही. याचा बिछाना गवताचा असतो, पण हा राजयोगी नाही. सुवर्णकाय: म्हणजे याचा रंग सोन्यासारखा आहे पण तरीही ते सोने नाही. नावाने पुरुष आहे म्हणजे हा शब्द पुंलिंगी आहे, पण तरीही हा राजपुत्र नाही. या प्रहेलिकेचे उत्तर कोण सांगेल ?
सर्वे छात्रा: - आम्हाला कळत नाही. हे कोडे कठिण आहे.
माधव: - गुरुजी मी या कोड्याचे उत्तर सांगतो. हा आंबा आहे. तो झाडाच्या शेंड्याला लागतो, गवताच्या बिछान्यावर तो पिकतो. जेव्हा तो पिकतो तेव्हा त्याचा रंग सोन्यासारखा होतो.
अध्यापक: - वा, वा, छान.
=============
स्वाध्याय - या पाठातील क्रियापदांचे काळानुसार वर्गीकरण करा.
वर्तमानकाळ - वर्तन्ते, कथयामि, तिष्ठति, अस्ति, जानासि, गच्छति, वर्तते, अवगच्छाम:, पठामि, जानाति, वसति, बोधाम:, भवति, शोभते
आज्ञार्थ - प्रयतध्वम्, आकर्णयत, कथयत, कथय, निवेदय, पठ,
No comments:
Post a Comment