पाठ ८० वा - व्यंजनसंधी भाग २
नियम ४) अनुनासिकाखेरीज कोणतेही वर्गीय व्यंजन पदांती आले व त्यापुढे अनुनासिक असेल तर पूर्वीच्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील तिसरे व्यंजन किंवा विकल्पाने अनुनासिक येते.
उदा.
सम्यक् + नास्ति
= सम्यग्नास्ति / सम्यङ्नास्ति
शरद् + मनोहरा
= शरद्मनोहरा / शरन्मनोहरा
खलील संधी करा.
१) षट् + मासा:
२) चिरात् + निर्मितम्
३) ककुभ् + मनोहारिता
उत्तरे
१) षट् + मासा: = षड्मासा: / षण्मासा:
२) चिरात् + निर्मितम् = चिराद्निर्मितम् / चिरान्निर्मितम्
३) ककुभ् + मनोहारिता = ककुब्मनोहारिता / ककुम्मनोहारिता
वैकल्पिक जश्त्व किंवा चर्त्व संधी
नियम ५) अनुनासिकाखेरीज कोणतेही वर्गीय व्यंजन पदाच्या शेवटी असेल आणि त्यापुढे कोणताही वर्ण नसेल तर पूर्वीच्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील पहिले किंवा तिसरे व्यंजन येते.
उदा.
मरुत् - मरुत्/ मरुद्
शरद् - शरत् / शरद्
समिध् - समित् / समिद्
ककुभ् - ककुप् / ककुब्
६) श्चुत्व संधी. श्चु म्हणजे श् आणि चवर्गातील च्, छ्, ज्, झ्, ञ् ही व्यंजने.
नियम ६ - स् किंवा त वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे श् आणि चवर्गातील कोणत्याही व्यंजनांशी योग आला असता स् किंवा तवर्गातील व्यंजनांच्या ऐवजी श् किंवा चवर्गातील त्याच क्रमांकाचे व्यंजन येते.
उदा.
१) अकथयत् + च
= अकथयच् + च
= अकथयच्च
२) सुहृद् + जयति
= सुहृज् + जयति
= सुहृज्जयति
==================
स्वाध्याय
खालील संधी करा.
१) अकथयत् + जनान्
२) सत् + चरितम्त्
३) विद्वत् + जड:
४) सुहृद् + जयति
५) अरीन् + जयति
उत्तरे
खालील संधी करा.
१) अकथयत् + जनान् = अकथयज्ज्नान्
२) सत् + चरितम् = सच्च्रितम्
३) विद्वत् + जड: = विद्वज्जड:
४) सुहृद् + जयति = सुहृज्जयति
५) अरीन् + जयति = अरीञ्जयति
" पाठ ८० वा - व्यंजनसंधी भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा :
x
No comments:
Post a Comment