पाठ ८१ वा - बहुदोषकरं वनम् (वनातील कष्ट)
राम सीतेला वनातील कष्टांचे वर्णन करून सांगत आहे.
(अयोध्याकांड सर्व २८ वा)
१) सीते महाकुलीनासि धर्मे च निरता सदा ।
इहाचरस्व धर्मं त्वं यथा मे मनसः सुखम् ॥ ३ ॥
संधिविग्रह - सीते महाकुलीना असि धर्मे च निरता सदा ।
इह आचरस्व धर्मं त्वं यथा मे मनसः सुखम् ॥ ३ ॥
अन्वय - सीते, (त्वं) महाकुलीना, सदा धर्मे च निरता असि । इह त्वं यथा मे मनसः सुखम् आचरस्व धर्मं ॥ ३ ॥
अर्थ - 'सीते ! तू अत्यंत उत्तम कुळात उत्पन्न झाली आहेस आणि सदा धर्माच्या आचरणात तत्पर रहात असतेस, म्हणून येथेच राहून धर्माचे पालन कर म्हणजे माझ्या मनाला संतोष होईल. ॥३॥
२) सीते यथा त्वां वक्ष्यामि तथा कार्यं त्वयाबले ।
वने दोषा हि बहवो वदतस्तान् निबोध मे ॥ ४ ॥
संधिविग्रह - सीते यथा त्वां वक्ष्यामि तथा कार्यं त्वया अबले ।
वने दोषा: हि बहवो वदत: तान् निबोध मे ॥ ४ ॥
अन्वय - अबले सीते, यथा त्वां वक्ष्यामि तथा त्वया कार्यं ।
वने दोषा: हि बहवो वदत: तान् निबोध मे ॥ ४ ॥
अर्थ -
'हे अबले सीते ! मी तुला जसे सांगेन तसेच करणे हे तुझे कर्तव्य आहे. वनात रहाणे खूप त्रासाचे असते. ते मी सांगतो, माझ्या कडून ऐकून घे. ॥४॥
३) सीते विमुच्यतामेषा वनवासकृता मतिः ।
बहुदोषं हि कान्तारं वनमित्यभिधीयते ॥ ५ ॥
संधिविग्रह - सीते विमुच्यताम् एषा वनवासकृता मतिः ।
बहुदोषं हि कान्तारं वन, इति अभिधीयते ।
अन्वय - सीते, एषा वनवासकृता मतिः विमुच्यताम् ।
वनम् बहुदोषं हि कान्तारं इति अभिधीयते ।
अर्थ - 'सीते ! वनवासासाठी येण्याचा विचार सोडून दे. वनाला अनेक प्रकारच्या दोषांनी (युक्त) व्याप्त आणि दुर्गम म्हटले गेले आहे. ॥५॥
४) उपवासश्च कर्तव्यो यथाप्राणेन मैथिलि ।
जटाभारश्च कर्तव्यो वल्कलाम्बरधारणम् ॥ १३ ॥
संधिविग्रह - उपवास: च कर्तव्य: यथाप्राणेन मैथिलि ।
जटाभार: च कर्तव्य: वल्कलाम्बरधारणम्
अन्वय - मैथिलि यथाप्राणेन (वने) उपवास: च कर्तव्य: ।
जटाभार: च कर्तव्य: वल्कलाम्बरधारणम् (कर्तव्यम्)
अर्थ - 'मैथिली ! आपल्या शक्तिला अनुसरून उपवास करणे, मस्तकावर जटेचा भार वहाणे आणि वत्कल वस्त्र धारण करणे-हीच येथील जीवनशैली आहे. ॥१३॥
५) पतङ्गा वृश्चिकाः कीटा दंशाश्च मशकैः सह ।
बाधन्ते नित्यमबले सर्वं दुःखमतो वनम् ॥ २१ ॥
संधिविग्रह - पतङ्गा: वृश्चिकाः कीटा: दंशा: च मशकैः सह ।
बाधन्ते नित्यम् अबले सर्वं दुःखम् अत: वनम् ॥ २१ ॥
अन्वय - अबले, पतङ्गा: वृश्चिकाः कीटा: मशकैः सह
दंशा: च नित्यम् बाधन्ते । अत: सर्वं दुःखम् वनम् ॥ २१ ॥
अर्थ - 'अबले ! पतंग, विंचू, कीडे, डास आणि मच्छरे तेथे सदा बाधा करीत राहातात म्हणजे सर्व वन दुःखरूपच आहे. ॥२१॥
६) कायक्लेशाश्च बहवो भयानि विविधानि च ।
अरण्यवासे वसतो दुःखमेव सदा वनम् ॥ २३ ॥
संधिविग्रह - कायक्लेशा: च बहव: भयानि विविधानि च ।
अरण्यवासे वसत: दुःखम् एव सदा वनम् ॥ २३ ॥
अन्वय - अरण्यवासे वसत: बहव: कायक्लेशा: च भयानि विविधानि च (बाधन्ते) । वनम् दुःखम् एव सदा ॥ २३ ॥
अर्थ - 'वनात राहाणार्या माणसांना बरेचसे शारिरीक क्लेशांचा आणि नाना प्रकारच्या भयांचा सामना करावा लागतो म्हणून वन सदा दुःखरूपच असते. ॥२३॥
*७) तदलं ते वनं गत्वा क्षेमं नहि वनं तव ।
विमृशन्निव पश्यामि बहुदोषकरं वनम् ॥ २५ ॥*
संधिविग्रह - तद् अलं ते वनं गत्वा क्षेमं नहि वनं तव ।
विमृशन् इव पश्यामि बहुदोषकरं वनम् ॥ २५ ॥
अन्वय - तद् ते वनं गत्वा अलं । वनं तव क्षेमं नहि ।
विमृशन् इव पश्यामि बहुदोषकरं वनम् ॥ २५ ॥
अर्थ - म्हणून तुझे वनात येणे उचित नाही. तेथे जाऊन तू सकुशल राहू शकत नाहीस. मी खूप विचार करून पाहतो आहे आणि समजत आहे- की वनात राहाणे अनेक दोषांचे उत्पादक आणि फारच कष्टदायक आहे. ॥२५॥
x
" पाठ ८१ वा - बहुदोषकरं वनम् (वनातील कष्ट) " या Audio साठी खाली क्लिक् करा :
No comments:
Post a Comment