Thursday, January 28, 2021

दुसऱ्या गणाचे उभयपदी धातू

दुसऱ्या गणाचे उभयपदी धातू


ब्रू ( .) = बोलणे


परस्मैपदी वर्तमानकाळ


ब्रवीमि ब्रूवब्रूमप्रपु

ब्रवीषि ब्रूथब्रूथ द्विपु.

ब्रवीति ब्रूतब्रुवन्ति तृपु.


किंवा


ब्रवीमि ब्रूवब्रूम:

आत्थ आहथु:  ब्रूथ

आह आहतु:  आहु:



परस्मैपदी प्रथमभूतकाळ


अब्रवम् अब्रूव अब्रूम

अब्रवीअब्रूतम् अब्रूत

अब्रवीत् अब्रूताम् अब्रुवन्



परस्मैपदी आज्ञार्थ


ब्रवाणि ब्रवाव ब्रवाम

ब्रूहि ब्रूतम् ब्रूत

ब्रवीतु ब्रूताम् ब्रुवन्तु



परस्मैपदी विध्यर्थ


ब्रूयाम् ब्रूयाव ब्रूयाम

ब्रूयाब्रूयातम् ब्रूयात

ब्रूयात् ब्रूयाताम् ब्रूयु:



आत्मनेपदी वर्तमानकाळ


ब्रुवे ब्रूवहे ब्रूमहे

ब्रूषे ब्रुवाथे ब्रूध्वे

ब्रूते ब्रुवाते ब्रुवते


आत्मनेपदी प्रथम भूतकाळ


अब्रुवि अब्रूवहि अब्रूमहि

अब्रूथाअब्रुवाथाम् अब्रूध्वम्

अब्रूत अब्रुवाताम् अब्रुवत


आत्मनेपदी आज्ञार्थ


ब्रवै ब्रवावहै ब्रवामहै

ब्रूष्व ब्रुवाथाम् ब्रूध्वम्

ब्रूताम् ब्रुवाताम् ब्रुवताम्


आत्मनेपदी विध्यर्थ


ब्रुवीय ब्रुवीवहि ब्रुवीमहि

ब्रुवीथाब्रुवीयाथाम् ब्रुवीध्वम्

ब्रुवीत ब्रुवीयाताम् ब्रुवीरन्


स्तु (२उ.). = स्तुती करणे


परस्मैपदी वर्तमानकाळ


स्तौमि  स्तुवस्तुम:  

स्तौषि स्तुथस्तुथ 

स्तौति स्तुतस्तुवन्ति


किंवा


स्तवीमि स्तुवीवस्तुवीम

स्तवीषि स्तुवीथस्तुवीथ

स्तवीति स्तुवीतस्तुवन्ति


परस्मैपदी प्रथम भूतकाळ


अस्तवम् अस्तुव  अस्तुम 

अस्तवीः अस्तुतम्अस्तुत 

अस्तौत् अस्तुताम् अस्तुवन्


किंवा


अस्तवम् अस्तुवीव अस्तुवीम

अस्तवीअस्तुवीतम् अस्तुवीत

अस्तवीत् अस्तुवीताम् अस्तुवन्


परस्मैपदी आज्ञार्थ


स्तवानि स्तवाव स्तवाम

स्तुहि स्तुतम् स्तुत स्तौतु स्तुताम् स्तुवन्तु


किंवा


स्तवानि स्तवाव स्तवाम

स्तुवीहि स्तुवीतम् स्तुवीत

स्तवीतु स्तुवीताम् स्तुवन्तु


परस्मैपदी विध्यर्थ 


स्तुयाम् स्तुयाव स्तुयाम

स्तुयास्तुयातम् स्तुयात

स्तुयात् स्तुयाताम् स्तुयु:


किंवा


स्तुवीयाम् स्तुवीयाव स्तुवीयाम

स्तुवीयास्तुवीयातम् स्तुवीयात

स्तुवीयात् स्तुवीयाताम् स्तुवीयु:


आत्मनेपदी वर्तमानकाळ


स्तुवे स्तुवहे स्तुमहे

स्तुषे स्तुवाथे स्तुध्वे

स्तुते स्तुवाते स्तुवते


किंवा


स्तुवे स्तुवीवहे स्तुवीमहे

स्तुवीषे स्तुवाथे स्तुवीध्वे

स्तुवीते स्तुवाते स्तुवते



आत्मनेपदी प्रथम भूतकाळ


अस्तुवि अस्तुवहि अस्तुमहि

अस्तुथाअस्तुवाथाम् अस्तुध्वम्

अस्तुत अस्तुवाताम् अस्तुवत


किंवा


अस्तुवि अस्तुवीवही अस्तुवीमहि

अस्तुवीथाअस्तुवाथाम् अस्तुवीध्वम्

अस्तुवीत अस्तुवाताम् अस्तुवत



आत्मनेपदी आज्ञार्थ


स्तवै स्त्ववावहै स्तवामहै

स्तुष्व स्तुवाथाम् स्तुध्वम्

स्तुताम् स्तुवाताम् स्तुवताम्


किंवा


स्तवै स्तवावहै स्तवामहै

स्तुवीष्व स्तुवाथाम् स्तुवीध्वम्

स्तुवीताम् स्तुवाताम् स्तुवताम्


आत्मनेपदी विध्यर्थ 


स्तुवीय स्तुवीवहि  स्तुवीमहि 

स्तुवीथास्तुवीयाथाम् स्तुवीध्वम्

स्तुवीत स्तुवीयाताम् सतुवीरन्


" पाठ १०४ वा - दुसऱ्या गणाचे उभयपदी धातू " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

पाठ १०३ वा - राष्ट्रध्वज

पाठ १०३ वा - राष्ट्रध्वज



मरुता प्रकम्पमानं

उच्चैर्विराजमानम्

रुचिरं त्रिवर्णकान्तं

 राष्ट्रध्वजं नमामि ॥ध्रु॥


शशिकिरणधवलवर्णो

 विमलं यशो वितनुते

रवितुरगहरितकान्ति:

 भुवि भाग्यदा विजयते

अरुणप्रभा प्रमोदं

 चित्ते कस्य कुरुते

चक्राङ्कितं सुचिह्नं

 राष्ट्रध्वजं नमामि ॥१॥


कवयस्तव स्तवार्थं

 प्रतिभां समर्पयन्ति

वीरास्तवादरार्थं प्राणानपि त्यजन्ति

तव मानरक्षणार्थं सर्वे सदा यतन्ते 

त्वां स्फूर्तिदं जनानां

 राष्ट्रध्वजं नमामि ॥२॥


अकुतोभयं मनो मे

 त्वयि नित्यमेव रमताम् 

सत्यं शिवं हृद्यं

 लब्धुं सदा प्रयतताम्

जगतीह बन्धुभावं

विजयं जयं लभताम्

मम राष्ट्रमानचिह्नं 

राष्ट्रध्वजं नमामि ॥३॥


पाठ १०२ वा - दानवीर: (भासकृत कर्णभार)

पाठ १०२ वा - दानवीर: (भासकृत कर्णभार)



१०२-) दानवीर: (भासकृत कर्णभार)


(तत: प्रविशति ब्राह्मणरूपेण शक्र:)


(तेव्हा ब्राह्मणाचे रूप घेऊन इंद्र प्रवेश करतो


शक्र: - भो: कर्ण, महत्तरां भिक्षां याचे

शक्र: - कर्णा, मी खूप मोठी भिक्षा इच्छितो.  


कर्ण: - दृढं प्रीतोऽस्मि कर्णोऽहं भवन्तमेष नमस्करोमि  

कर्ण: - मी अतिशय आनंदित झालो आहे. मी कर्ण, आपल्याला नमस्कार करतो.


शक्र: - (आत्मगतम्) किन्नु खलु वक्तव्यं मया यदि दीर्घायुर्भव इति वक्ष्ये, दीर्घायुर्भविष्यति यदि वक्ष्ये मूढ इति मां परिभवति तस्मादुभयं परिहृत्य किन्नु खलु वक्ष्यामि ? भवति दृष्टम् (प्रकाशम्) भो: कर्ण, सूर्य इव, चन्द्र इव हिमवानिव सागर इव तिष्ठतु ते यश:


शक्र: - (स्वगत) मी काय़ बर बोलावे ? जर दीर्घायुषी हो असे म्हणेन तर हा दीर्घायुषी होईल. जर काहीच बोललो नाही तर हा माझी मूर्ख म्हणून संभावना करेल. त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळून काय बर बोलू ? आलं लक्षात (प्रकट) कर्णा सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे सागरप्रमाणे तुझी कीर्ती टिकून राहो.


कर्ण: - भगवन्, किन्न वक्तव्यं दीर्घायुरिति ? अथवा एतदेव शोभनम्  

धर्मो हि यत्नै: पुरुषेण साध्यो 

भुजङ्गजिह्वाचपला नृपश्रिय:

तस्मात्प्रजापालनमात्रबुद्ध्या

हतेषु देहेषु गुणा धरन्ते

भगवन् किमिच्छसि ? किमहं ददामि ?

कर्ण: - भगवन् आपण दीर्घायुषी हो असा का बरं आशीर्वाद दिला नाही ?

राज्यलक्ष्मी ही सापाच्या जिभेप्रमाणे चंचल आहे. म्हणून मनुष्याने प्रजेचे पालन करण्याच्या बुद्धीने प्रयत्नपूर्वक धर्माची प्राप्ती करून घ्यायला हवी. कारण देहाचा मृत्यु झाला तरी गुणच टिकून रहातात. (गुणच अक्षय रहातात. देह तर क्षणभंगुर आहे).

भगवन् काय इच्छा आहे. काय देऊ ?


शक्र: - महत्तरां भिक्षां याचे

शक्र: - मोठी भिक्षा हवी.


कर्ण: - महत्तरां भिक्षां भवते प्रदास्ये गोसहस्रं ददामि

कर्ण: - मी आपल्याला मोठी भिक्षा देईन. हजार गायी देतो.


शक्र: - गोसहस्रमिति मुहूर्तकं क्षीरं पिबामि नेच्छामि कर्ण, नेच्छामि

शक्र: - हजार गायी ? मी क्षणभर दूध पिईन. कर्णा, नको याची मला इच्छा नाही


कर्ण: - किं नेच्छति भवान् ? इदमपि श्रूयताम् वाजिनां सहस्रं ते ददामि

कर्ण: - काय ? आपल्याला हे नको ? मग आता ऐका. हजार घोडे तुम्हाला देतो.


शक्र: - अश्व इति ? मुहूर्तकमारोहामि नेच्छामि कर्ण, नेच्छामि  

शक्र: -घोडे ? काही काळ त्यावर मी आरोहण करीन. नको कर्णा, नको.


कर्ण: - किं नेच्छति भवान् ? अपर्याप्तं कनकं दास्यामि

कर्ण: - हे ही नको आपल्याला ? मग अपरिमित सोने देईन.


शक्र: - गृहीत्वा गच्छामि (किञ्चिद् गत्वा) नेच्छामि कर्ण, नेच्छामि

शक्र: - घेऊन जातो (तर). (थोडेसे जाऊन) (पण) नको कर्णा नको.


कर्ण: -तेन हि जित्वा पृथिवीं ददामि

कर्ण: - मग ही पृथ्वी जिंकून तुम्हाला देतो.


शक्र: - पृथिव्या: किं करिष्यामि ?

शक्र: -पृथ्वीचे मी काय करणार ?


कर्ण: - तेन ह्यग्निष्टोमफलं ददामि

कर्ण: - तर मग अग्निष्टोम यज्ञाचे फळ मी तुम्हाला देतो.


शक्र: - अग्निष्टोमफलेन किं कार्यम् ?

शक्र: - अग्निष्टोम यज्ञाचे फळ घेऊन काय़ कराय़चं आहे ?


कर्ण: - तेन हि मच्छिरो ददामि

कर्ण: - तर मग मी माझं मस्तकच आपल्याला देतो.


शक्र: - अविहा ! अविहा

शक्र: - नको, नको.


कर्ण: - भेतव्यं भेतव्यं प्रसीदतु भवान् अन्यदपि श्रूयताम्

अङ्गै: सहैव जनितं मम देहरक्षा

देवासुरैरपि भेद्यमिदं महास्त्रै:

देयं तथापि कवचं सह कुण्डलाभ्यां

प्रीत्या मया भगवते रुचितं यदि स्यात्

कर्ण: - घाबरू नका घाबरू नका. आपण प्रसन्न व्हा. दुसरं ऐका -

देव असुर यांना सुद्धा जे अभेद्य आहे, असे जे माझ्या देहाबरोबरच (जन्मत:) माझे देहरक्षण करण्यास निर्माण झालेले आहे, ते आपल्याला जर आवडत असेल तर कुंडलांसहित कवच देण्याजोगे (माझ्याकडे आहे). (ते मी देतो.)


शक्र: - ददातु ददातु

शक्र: - द्या, द्या.


पाठ १०१ वा - कर्मणी विध्यर्थी धातुसाधित विशेषणे

पाठ १०१ वा - कर्मणी विध्यर्थी धातुसाधित विशेषणे


भाषेमधे उत्तुङ्ग, सुंदर, मनोहर, शीतल अशी अनेक विशेषणे असतात. तसेच धातूला प्रत्यय लावूनही नामे विशेषणे बनवली जातात. धातूला प्रत्यय लावून बनत असल्यामुळे अशा विशेषणांना धातुसाधित विशेषणे म्हणतात. आपण वर्तमानकाळवाचक, भूतकाळवाचक विध्यर्थी अशा तीन प्रकारची ही धातुसाधित विशेषणे अभ्यासणार आहोत. त्यातही वर्तमानकाळवाचक भूतकाळवाचक विशेषणे ही कर्तरी कर्मणी दोन प्रकारची असतात. तर विध्यर्थी विशेषणे फक्त कर्मणी असतात. 


आधी आपण कर्मणी विद्यर्थी विशेषणे पहाणार आहोत.


) कर्मणी विध्यर्थी विशेषणे - ही विशेषणे आपण मराठीत सुद्धा वापरतो. उदा. अनुकरणीय, कर्तव्य, कार्य, त्याज्य, दर्शनीय, पेय वगैरे शब्द आपल्या परिचयाचे आहेत, ही सर्व कर्मणी विध्यर्थी विशेषणे आहेत. 

एखाद्या गोष्टीची योग्यता, पात्रता, संभाव्यता, शक्यता इत्यादी अर्थांच्या विविध छटा दाखवण्यासाठी ही विशेषणे वापरली जातात.


प्रत्येक धातूला , तव्य किंवा अनीय प्रत्यय लावून ही विशेषणे बनवली जातात.

उदा. 

पा-पिब् = पेय, पातव्य, पानीय = पिण्याजोगे

नी-नय् = नेय, नेतव्य, नयनीय = नेण्य़ाजोगे

गम्-गच्छ् = गम्य, गन्तव्य, गमनीय = जाण्याजोगे


प्रेक्षणीयं स्थलम् - पहाण्यास योग्य असे स्थळ 

अनुकरणीयं कृत्यम् - अनुकरण करण्यास योग्य असे कृत्य

पूज्य: महापुरुष: - पूजा करण्यास योग्य असा महापुरुष

कथनीया कथा - सांगण्यास योग्य अशी कथा

  

ही तीन तीन प्रकारची विशेषणे बनत असली तरी त्यांचा अर्थ एकच आहे. कोणतही एक विशेषण वापरलं तरी चालतं. ही सर्व विशेषणे अकारान्त होत असल्यामुळे पुंलिंगामधे ती देव प्रमाणे, स्त्रीलिंगात ती माला प्रमाणे नपुंसकलिंगात ती वन प्रमाणे चालतात. स्त्रीलिंगात चालवतांना ती आकारान्त करून घ्याय़ची मालाप्रमाणे त्याची रूपे तयार करायची.


या विशेषणांचे एक वैशिष्ट्य असे आहे की ही विशेषणे क्रियापदासारखी सुद्धा वापरता येतात. अर्थातच ही कर्मणी विशेषणे असल्यामुळे ती कर्मणी प्रयोगात वापरावी लागतील.

उदा.

छात्रै: पाठ: पठितव्य:

- विद्यार्थ्यांनी पाठ अभ्यासावा.

 

या वाक्यात छात्र हा कर्ता आहे. त्याची तृतीया विभक्ती योजिली आहे. पाठ: हे कर्म आहे ते प्रथमा विभक्तीत आहे. आता कर्मणी विध्यर्थी विशेषण वाक्यात आपल्याला कर्माप्रमाणे योजावयाचे आहे. अशावेळी इथे कर्माचा पुरुष वा वचन बघता त्याचे लिंग वचन पहावे लागेल. कारण पठितव्य हे विशेषण आपण योजणार आहोत. पाठ: यात पुं प्र. . . आहे. म्हणूण पठितव्य शब्दाचे सुद्धा पुंलिंगी प्र. . . योजलेले आहे.


आता या कर्मणी वाक्याचे कर्तरी वाक्य करायचे झाल्यास आपल्याला विध्यर्थी क्रियापदच वापरावे लागेल. कारण कर्तरी विध्यर्थी विशेषणे नाहीत.

छात्रै: पाठ: पठितव्य:

छात्रा: पाठं पठेयु:

असा प्रयोग बदलावा लागेल.


नवनीतच्या धातूरूपावलीमधे या धातुसाधित विशेषणांची यादी दिली आहे. त्यावरून हे प्रत्यय लागतांना धातूत काय फेरफार होतात ते कळेल.



" पाठ १०१ वा - कर्मणी विध्यर्थी धातुसाधित विशेषणे " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

पाठ १०० वा - दुसर्‍या गणाचे आत्मनेपदी धातू

पाठ १०० वा - दुसर्‍या गणाचे आत्मनेपदी धातू


सू ( . .) जन्म देणे

आत्मनेपदी वर्तमानकाळ


सुवे सूवहे सूय़्महे

सूषे सुवाथे सूध्वे

सूते सुवाते सुवते


आत्मनेपदी प्रथम भूतकाळ


असुवि असूवहि असूमहि

असूथा: असुवाथाम् असूध्वम्

असूत असुवाताम् असुवत


आत्मनेपदी आज्ञार्थ


सुवै सुवावहै सुवामहै

सूष्व सुवाथाम् सूध्वम्

सूताम् सुवाताम् सुवताम्


आत्मनेपदी विध्यर्थ


सुवीय सुवीवहि सुवीमहि

सुवीथा: सुवीयाठाम् सुवीध्वम्

सुवीत सुवीयाताम् सुवीरन्


अधि + ( . .) शिकणे

 (अधि उपसर्ग लागला कीहा परस्मैपदी धातू आत्मनेपदी होतो.

 

आत्मनेपदी वर्तमानकाळ


अधीये अधीवहे अधीमहे

अधीषे अधीयाथे अधीध्वे

अधीते अधीयाते अधीयते


आत्मनेपदी प्रथम भूतकाळ


अध्यैयि अध्यैवहि अध्यैमहि

अध्यैथा: अध्यैयाथाम् अध्यध्वम्

अध्यैत अध्यैयाताम् अध्यैयत


आत्मनेपदी आज्ञार्थ


अध्ययै अध्ययावहै अध्ययामहै

अधीष्व अधीयाथाम् अधीध्वम्

अधीताम् अधीयाताम् अधीयताम्


आत्मनेपदी विध्यर्थ


अधीयीय अधीयीवहि अधीयीमहि

अधीयीथा: अधियीयाथाम् अधीयीध्वम्

अधीयीत अधीयीयाताम् अधीयीरन्


ईश् ( . .) अधिकार चालवणे

आत्मनेपदी वर्तमानकाळ


ईशे ईश्वहे ईश्महे

ईशिषे ईशाथे ईशिध्वे

ईष्टे ईशाते ईशते


आत्मनेपदी प्रथम भूतकाळ


ऐशि ऐश्वहि ऐश्महि

ऐष्ठा: ऐशाथाम् ऐड्ढ्वम्

ऐष्ट ऐशाताम् ऐशत


आत्मनेपदी आज्ञार्थ


ईशै ईशावहै ईशामहै

ईशिष्व ईशाताम् ईशिध्वम्

ईष्टाम् ईशाताम् ईशताम्


आत्मनेपदी विध्यर्थ

 

ईशीय ईशीवहि ईशीमहि

ईशीथा: ईशीयाथाम् ईशीध्वम्

ईशीत ईशीयाताम् ईशीरन्





पाठ ९९ वा - स्वयं अध्ययनासाठी जन्तुशाला (प्राणिसङ्ग्रहालय:)

पाठ ९९ वा - स्वयं अध्ययनासाठी जन्तुशाला (प्राणिसङ्ग्रहालय:)  



अभिनव: - कविते, अमोघ, युवां कुत्र गच्छथ: स्म ?


कविता - अभिनव, आवां जन्तुशालां गच्छाव: स्म


अभिनव: - तत्र किं किं अस्ति ?


अमोघ: - तर अनेके पशव: सन्ति


कविता - तत्र सिंहा, भल्लूका:, गण्डका:, मकरा:, व्याघ्रा: अपि सन्ति आवां तत्र शशकान् अपि पश्याव: स्म


अमोघ: - तत्र नानाविधवर्णै: युक्ता खगा: अपि सन्ति आवां तत्र शुकान्, सारिका:, हंसान्, बकान्, मयूरान् पश्याव: स्म  


*अभिनव: - अमोघ, किं जन्तुशालायां सर्पा: अपि सन्ति ?


अमोघ: - आम् तत्र नागा:, अजगरा:, कृष्णसर्पा:, अन्ये विविधा: सर्पा: अपि सन्ति


कविता - अभिनव, त्वं जन्तुशालां कदा गच्छसि ? तत्र अल्पोपहारगृहमपि अस्ति तत्र नानाविधानि व्यञ्जनानि, शीतपेयानि अपि सन्ति  


अमोघ: - अभिनव, तत्र त्वं अवश्यं गच्छ हंसमयूरादि खगा: मनोहरा: शोभना अस्ति जन्तुशाला  


कठीण शब्दांचे अर्थ -


भल्लूक - अस्वल

गण्डक - गेंडा

शशक - ससा


पाठ ९८ वा - धातूंचा दुसरा गट

पाठ ९८ वा -  धातूंचा दुसरा गट


दुसर्‍या गणाचे धातू (परस्मैपदी)

 

, , , १० या धातूंचा एक गट आहे उरलेल्या गणातील धातूंचा एक गट आहे. एक, चार, सहा दहा या धातूंची विकरणे अकारान्त आहेत. त्यामुळे सर्वसाधारणपणे हे सर्व धातू सारखेच चालतात. उरलेल्या दुसर्‍या गटातील धातूंची विकरणे ही अकारान्त नाहीत. त्यामुळे त्यातील प्रत्येक धातूची रूपे वेगवेगळी होतात. आज पासून आपण त्या धातूंचा परिचय करून घेणार आहोत. 



या धातूंना लागणार्‍या प्रत्ययांमधे सुद्धा थोडा फरक आहे. 


परस्मैपदी वर्तमानकाळ भूतकाळ यामधे प्रत्ययांमधे फरक नाही. परस्मैपदी आज्ञार्थात द्वितीय पुरुष एकवचनाचाहिअसा प्रत्यय आहे विध्यर्थाचे प्रत्यय पूर्णपणे वेगळे आहेत.


परस्मैपदी वर्तमानकाळाचे प्रत्यय


मि   :   :

सि   :  

ति   :   अन्ति


परस्मैपदी भूतकाळाचे प्रत्यय

 

अम्       

स् (:)   तम्  

त्      ताम्   अन्

  

परस्मैपदी आज्ञार्थी प्रत्यय

 

आनि   आव   आम

हि       तम्    

तु      ताम्    अन्तु


परस्मैपदी विध्यर्थ 


याम्    याव    याम्

या:    यातम्   यात 

यात्   याताम्   यु:


असे परस्मैपदी विध्यर्थाचे प्रत्यय आहेत.


खाली दुसर्‍या गणातील काही धातू चालवून दाखवले आहेत. 


दुसर्‍या गणाचे धातू

दुसर्‍या गणाला विकरण नाही. मूळ धातूलाच प्रत्यय लागून रूपे तयार होतात.


या ( .) जाणे

परस्मैपदी वर्तमानकाळ


यामि    याव:   याम:

यासि    याथ:   याथ

याति   यात:    यान्ति


परस्मैपदी प्रथम भूतकाळ


अयाम्   अयाव    अयाम

अया:   अयातम् अयात

अयात्  अयाताम् अयान्/अयु:


परस्मैपदी आज्ञार्थ


यानि   याव   याम

याहि यातम्   यात

यातु याताम्  यान्तु


परस्मैपदी विध्यर्थ 


यायाम् यायाव यायाम्

याया: यायातम् यायात

यायात् यायाताम् यायु:


अस् (२प) = असणे

परस्मैपदी वर्तमानकाळ


अस्मि  स्व: स्म:

असि स्थ: स्थ

अस्ति  स्त: सन्ति


परस्मैपदी प्रथम भूतकाळ


आसम् आस्व आस्म

आसी: आस्तम् आस्त

आसीत् आस्ताम् आसन्


परस्मैपदी आज्ञार्थ


असानि  असाव  असाम

एधि   स्तम् स्त

अस्तु स्ताम्    सन्तु


*परस्मैपदी विध्यर्थ *


स्याम् स्याव  स्याम

स्या: स्यातम्  स्यात

स्यात् स्याताम्  स्यु:


हन् (२प.) ठार मारणे

परस्मैपदी वर्तमानकाळ

हन्मि हन्व: हन्म:

हंसि हथ: हथ

हन्ति हत: घ्नन्ति


परस्मैपदी प्रथमभूतकाळ

अहनम् अहन्व अहन्म

अहन् अहतम् अहत

अहन् अहताम् अघ्नन् 


परस्मैपदी आज्ञार्थ

हनानि हनाव हनाम

जहि हतम् हत 

हन्तु हताम् घ्नन्तु


परस्मैपदी विध्यर्थ 

हन्याम् हन्याव हन्याम

हन्या: हन्यातम् हन्यात

हन्यात् हन्याताम् हन्यु:


रुद् (२प) = रडणे

परस्मैपदी वर्तमानकाळ


रोदिमि रुदिव: रुदिम:

रोदिषि रुदिथ: रुदिथ

रोदिति रुदित: रुदन्ति


परस्मैपदी प्रथम भूतकाळ


अरोदम् अरुदिव अरुदिम

अरोदी: / अरोद: अरुदितम् अरुदित

अरोदित् / अरोदत् अरुदिताम् अरुदन्


परस्मैपदी आज्ञार्थ


रोदानि रोदाव रोदाम

रुदिहि रुदितम् रुदित

रोदितु रुदिताम् रुदन्तु


परस्मैपदी विध्यर्थ 


रुद्याम् रुद्याव रुद्याम

रुद्या: रुद्यातम् रुद्यात

रुद्यात् रुद्याताम् रुद्यु:


विद् (२प.) = जाणणे

परस्मैपदी वर्तमानकाळ


वेद्मि विद्व: विद्म:

वेत्सि वित्थ: वित्थ

वेत्ति वित्त: विदन्ति

किंवा

वेद विद्व विद्म

वेत्थ विदथु: विद

वेद विदतु: विदु:


परस्मैपदी प्रथमभूतकाळ

अवेदम् अविद्व अविद्म

अवे:/अवेत्/अवेद् अवित्तम् अवित्त

अवेत्/अवेद् अवित्ताम् अविदु:


परस्मैपदी आज्ञार्थ

वेदानि वेदाव वेदाम

विद्धि वित्तम् वित्त

वेत्तु वित्ताम् विदन्तु


परस्मैपदी विध्यर्थ 

विद्याम् विद्याव विद्याम

विद्या: विद्यातम् विद्यात

विद्यात् विद्याताम् विद्यु:


शी ( . .) = झोपणे

आत्मनेपदी वर्तमानकाळ

शये शेवहे शेमहे

शेषे शयाथे शेध्वे

शेते शयाते शेरते


परस्मैपदी प्रथमभूतकाळ

अशयि अशेवहि अशेमहि

अशेथा: अशयाथाम् अशेध्वम्

अशेत अशयाताम् अशेरत


परस्मैपदी आज्ञार्थ

शयै शयावै शयामहै

शेष्व शयाथाम् शेध्वम्

शेताम् शयाताम् शेरताम्


परस्मैपदी विध्यर्थ 

शयीय    शयीवहि शयीमहि

शयीथा:   शयीयाथाम् शयीध्वम्

शयीत    शयीयाताम् शयीरन्



पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...