परवाच्या तासाला आपण विशेषणे कशी वापरावयाची ते शिकलो. विशेषणे पण ज्या नामाकरता वापरावयाची असतात त्या नामाच्या लिंग, विभक्ती व वचनाप्रमाणे ठेवायची असतात.
मी तुम्हाला सांगितले होते की संस्कृतमधे शब्दांचा ठराविक क्रम वाक्यामधे अपेक्षित नाही. कर्ता, कर्म क्रियापद वाक्यात कोणत्याही क्रमाने ठेवले तरी चालते. किंवा विशेषणे सुद्धा आपण मराठीत त्या त्या नामा जोडून ठेवतो. संस्कृत मधे विभक्ती प्रत्यय लावून विशेषणे ठेवलेली असल्यामुळे ती नामाला लागूनच वाक्यात वापरली पाहिजेत असे नाही.
उदाहरणार्थ मराठी वाक्य पाहू.
१) सुंदर मुलगा वनात जातो.
२) मुलगा सुंदर वनात जातो.
या दोन वाक्यात सुंदर या शब्दाचे स्थान बदलल्यावर ते वेगवेगळ्या शब्दांचे विशेषण झाले. पहिल्या वाक्यात सुंदर हे मुलाचे विशेषण ठरते तर दुसर्या वाक्यात ते वनाचे विशेषण ठरते.
आता हीच वाक्ये संस्कृतमधे कशी होतील ?
१) सुन्दर: बालक: वनम् गच्छति ।
इथे सुन्दर शब्द बालक या शब्दाचे विशेषण आहे. ते वाक्यात कोठेही ठेवले तरी ते विशेषण बालक या शब्दाचेच असेल.
बालक: सुन्दर: वनं गच्छति । इथे जरी मी सुन्दर हे विशेषण वन शब्दाला जोडून लिहिले असले तरी त्याचे लिंग, विभक्ती व वचन हे वन शब्दाप्रमाणे नसून बालक शब्दाप्रमाणे आहे. त्यामुळे ते वाक्यात वन शब्दाला जोडून लिहिले असले तरी ते विशेषण बालक या शब्दाचेच असेल वन शब्दाचे असणार नाही.
२) बालक: सुन्दरं वनं गच्छति । या वाक्यात सुन्दरं हे विशेषण वन शब्दाचे आहे. कारण सुन्दर या विशेषणाचे रूप वन या शब्दाप्रमाणे नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे ते विशेषण मी बालक शब्दाला जोडून लिहिले ‘सुन्दरं बालक: वनं गच्छति’ असे तरी ते बालक या शब्दाचे विशेषण ठरणार नाही. सुन्दरं शब्द नपुंसकलिंगी वापरल्यामुळे तो शब्द वन या शब्दाचेच विशेषण ठरेल. त्यामुळे संस्कृत वाक्यात विशेषणे त्या त्या नामांना जोडूनच ठेवली पाहिजेत असा नियम नाही. कारण ती नामाप्रमाणे योग्य ते विभक्ती प्रत्यय लावून ठेवलेली असतात.
परिचय: ।
एष: कृषीवल: ।
गोपाल: इति तस्य नामधेयम् ।
गोपाल: प्रभाते क्षेत्रं गच्छति ।
वृषभानां साहाय्येन एष: भूमिं कृषति
बीजानि च वपति ।
अत: सस्यानि विन्दति ।
अतीव श्रमपूर्णं तस्य जीवनम् ।
तस्य अपरिमितै: श्रमै: राष्ट्रस्य पोषणं भवति ।
स्वाध्य़ाय २३
संस्कृतमधे प्रश्नांची उत्तरे द्या -
१) क: एष: ?
२) कृषीवलस्य किं नामधेयम् ?
३) गोपाल: कुत्र गच्छति ?
४) गोपाल: क्षेत्रे कदा गच्छति ?
५) स: क्षेत्रे किं करोति ?
६) गोपाल: किं विन्दति ?
७) कस्य जीवनं श्रमपूर्णम् ?
८) क: राष्ट्रस्य पोषणं करोति ?
उत्तरे पाठ २३
परिचय: (भाषांतर)
हा शेतकरी (आहे).
गोपाल असे त्याचे नाव (आहे).
गोपाल सकाळी शेतात जातो.
बैलांच्या मदतीने हा शेत नांगरतो व बीज पेरतो.
म्हणून तो धान्य मिळवतो.
त्याचे जीवन कष्टमय आहे.
त्याच्या अगणित कष्टांमुळे राष्ट्राचे पोषण होते.
स्वाध्य़ाय २३
संस्कृतमधे प्रश्नांची उत्तरे द्या -
१) क: एष: ?
एष: कृषीवल: ।
२) कृषीवलस्य किं नामधेयम् ?
गोपाल: इति कृषीवलस्य नामधेयम् ।
३) गोपाल: कुत्र गच्छति ?
गोपाल: क्षेत्रं गच्छति ।
४) गोपाल: क्षेत्रे कदा गच्छति ?
गोपाल: प्रभाते क्षेत्रं गच्छति ।
५) स: क्षेत्रे किं करोति ?
स: क्षेत्रे बलीवर्दानां सहाय्येन भूमिं कृषति ।
६) गोपाल: किं विन्दति ?
गोपाल: सस्यानि विन्दति ।
७) कस्य जीवनं श्रमपूर्णम् ?
गोपालस्य जीवनं श्रमपूर्णम् ।
८) क: राष्ट्रस्य पोषणं करोति ?
कृषीवल: राष्ट्रस्य पोषणं करोति ।

" पाठ २३ वा विशेषणे वाक्यात कोठेही असली तरी का चालतात ? " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment