संस्कृतमधे कोणत्याही प्रकारची वाङ्मयनिर्मिती केली असली तरी त्याला काव्य असे म्हणतात. मराठीमधे आपण काव्य ही संज्ञा फक्त पद्य वाङ्मयाला लावतो. संस्कृतमधे सगळ्यालाच काव्य म्हटले जाते. मग इंद्रियग्राह्यतेच्या आधारावर याचे दोन प्रकार होतात. १) श्रव्य काव्य व २) दृश्य काव्य. श्रव्य काव्य म्हणजे फक्त त्या काव्याचा आनंद ऐकून घेतला जातो. व दृश्य काव्य म्हणजे त्या काव्याचा आनंद श्रवणाबरोबर डोळ्यांनी पाहूनही घेता येतो. त्यामुळे दृश्यकाव्यात नाटक हा प्रकार येतो. मनुष्य प्रत्यक्ष डोळ्यांनी ते काव्य डोळ्यासमोर घडतांना पहातो. आता त्यात सिनेमाचीही भर पडली आहे. पण पूर्वी फक्त नाटक हेच दृश्यकाव्य म्हणून ओळखले जात असे. आता या नाटकाचे दहा प्रकार होते म्हणून त्याला दशरूपक असेही म्हणतात. हा भाग आपण नंतर पाहू. प्रथम पाहूया ते श्रव्य काव्य.
श्रव्य काव्याचे पुन्हा गद्य व पद्य या आधारावर गद्य काव्य व पद्य काव्य असे प्रकार होतात. संस्कृत साहित्यकारांनी आणखी एक शैली विकसित केली होती. ती म्हणजे गद्य व पद्य मिश्रित काव्य. थोडं गद्यात लिहाय़चं थोडं पद्यात लिहायच. अशा प्रकारच्या काव्यांना चंपूकाव्य असे म्हणतात.
गद्यकाव्य -
संस्कृतमधे गद्य काव्य पद्यकाव्यापेक्षा तसे कमी प्रमाणात आहे. परंतु सुबंधूने वासवदत्ता नावाचे गद्यकाव्य रचले. त्याचे कथानक वासवदत्ता व उदयन यांच्या प्रसिद्ध कथानकाशी संबंधित नाही. त्याच्या ह्या ग्रंथातील वासवदत्तेचा उल्लेख कोणत्याही पूर्वीच्या कथानकात मिळत नाहीच पण नंतर सुद्धा त्याच्या कथानकावर आणखी काही रचना केलेल्या आढळत नाहीत.
दंडी या कवीचे दशकुमारचरित प्रसिद्ध आहे. त्यात मगध देशातील पुष्पपुरी मधे राज्य करणार्या राजहंस राजाला त्याचा मुलगा, त्याच्या मंत्र्यांची मुले व कुणीकुणी दिलेली मुले अशा दहा कुमारांच्या बद्दलचे कथानक गुंफलेले आहे. दहा मुले प्राप्त झाली. त्यांचे कथानक वर्णन केलेले आहे
बाणभट्टाची कादंबरी हे गद्यकाव्य प्रसिद्ध आहे. त्यात तीन तीन जन्मांचे कथानक गुंफलेले आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या कथांची साद्यंत मांडणी करणार्या वाङ्मयप्रकाराला मराठीत कादंबरी हे नाव रूढ झाले.
नंतरही काही गद्यग्रंथ लिहिले गेले, पण संस्कृत साहित्यात हे तीन गद्यग्रंथ प्रसिद्ध आहेत.
पद्यकाव्य -
पद्य काव्याचे सुद्धा पुन्हा महाकाव्य, खंडकाव्य, शतककाव्य, सुभाषितकाव्य, संदेशकाव्य, स्तोत्रकाव्य, कथाकाव्य असे त्याच्या स्वरूपावरून प्रकार पडतात.
महाकाव्याचे स्वरूप त्याच्या नावावरूनच कळते. हे खूप मोठे काव्य असते. रामायण व महाभरत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन संस्कृतमधे अनेक महाकाव्ये रचली गेली. त्यातील पंचमहाकाव्ये प्रसिद्ध आहेत. कालिदासाची दोन रघुवंशम् व कुमारसम्भवम्. यातील रघुवंशामधे रामाच्या पूर्वीचे व नंतरचे जे राजे होऊन गेले त्यांचे वर्णन आहे. तर कुमारसंभवम् मधे शंकर-पार्वतीचा पुत्र षडानन याने देवासुर संग्रामात देवांना विजय मिळावून दिला ते कथानक गुंफलेले आहे. तिसरे काव्य आहे भारवी या कवीचे किरातार्जुनीयम्. यात अर्जुन अस्त्रप्राप्तीसाठी इंद्रकील पर्वतावर तपस्या करत असतांना त्याला किराताच्या वेषातील शंकर प्रसन्न झाले व त्यांनी त्याला पाशुपतास्त्र दिले त्यावर कथानक गुंफलेले आहे. चौथ महाकाव्य आहे माघाचे शिशुपालवधम्. यात श्रीकृष्णांनी केलेल्या शिशुपालवधाचे वर्णन केलेले आहे. तर पाचवे महाकाव्य आहे श्रीहर्षाचे नैषधीयचरितम्. यात निषध देशाचा राजा नल व दमयंती याचे कथानक आहे. इतरही अनेक महाकाव्ये आहेत. पण या पाच काव्यांना पंचमहाकाव्यांचा मान मिळालेला आहे. त्याशिवाय अश्वघोषाचे सौन्दरानन्द, बुद्धचरित, भट्टीचे भट्टिकाव्य. त्याव्यतिरिक्तही १९ व्या शतकापर्यंत अनेक महाकाव्ये संस्कृतमधे रचली गेली.
चम्पूकाव्य
संस्कृत कवींनी विकसित केलेली ही काव्याची एक अभिनव शैली. वर्ण्य विषयाचे प्रतिपादन गद्यभाषेत केलेले असते आणि ते अधिक आकर्षक करण्याकरता पद्यमय भाषेचा उपयोग केलेला असतो. गद्यामधे जे सांगितले असते तेच पुन्हा पद्यात संक्षिप्तपणे सांगितलेले असते.
ही काव्यशैली इ. स. सनाच्या पहिल्या शतकापूर्वीच विकसित झालेली होती. चंपूकाव्य सुद्धा संस्कृतमधे बरीच उपलब्ध आहेत. नलचंपू, यशस्तिलकचम्पू, रामायणचम्पू, भागवतचंपू, उदयनसुंदरी कथा, विश्वगुणादर्शचंपू अशी बरीच चंपूकाव्य उपलब्ध आहेत.
ऐतिहासिक काव्य -
भारतीय साहित्यात इतिहास विषयाचे महत्व स्वीकारलेले होते. पुराणे व इतिहास यांना वेदांच्या बरोबरीने स्थान देण्यात आले होते. पण तरीही संस्कृत साहित्यात ऐतिहासिक काव्य नगण्य आहेत. कवींनी रामकृष्णादि ऐतिहासिक पात्रांचे खूप वर्णन केले, पण समकालीन राजांचे वर्णन मात्र अभावानेच केले. ज्या कवींना राजाश्रय मिळाला होता त्यांनी आपल्या आश्रयदात्या राजांचे अतिरंजित रूपात वर्णन केले आहे. राजतरंगिणी नावाचा एक काश्मीरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणारा ग्रंथ आहे. त्यात अतिशयोक्तीपूर्ण वर्णने असल्यामुळे ऐतिहासिक तथ्य शोधावी लागतात. संस्कृत साहित्यात थोडीफार ऐतिहासिक सामुग्री मिळते ती दानपत्र, शिलालेख, ताम्रपट यातूनच मिळते. काटेकोर इतिहासलेखन मात्र संस्कृतसाहित्यात केलेले दिसत नाही. तसं पाहिलं तर इतिहासलेखन हा आपला पिंडच नाही असे म्हणावे लागते.
रामायण व महाभारत हे मूलत: इतिहासग्रंथच आहेत.
कथाकाव्य -
संस्कृत साहित्यात कथासाहित्य मात्र खूप प्रमाणात उपलब्ध आहे. कथासाहित्याची बीजे आपल्याला वैदिक साहित्यात दिसून येतात. वेदांमधे काही संवादसूक्ते आलेली आहेत. नंतर उपनिषदांमधे अनेक छोट्यामोठ्या कथा सांगितलेल्या आहेत. अर्थात अध्यात्म-चिंतन हा उपनिषदातील कथासाहित्याचा उद्देश आहे. पुराणांनी कथासाहित्य अधिक लोकव्यापी बनवले.
पशुपक्षांवर मानवी भावनांचे आरोपण करून सुंदर ढंगात नीतिकथा सांगितलेल्या आहेत. त्यात पंचतंत्र, हितोपदेश यांचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. गुणाढ्याने कथासरित्सागर नावाचा मोठा कथाग्रंथ मूळ पैशाची भाषेत लिहिला होता. त्याची तीन संस्कृत संस्करणे उपलब्ध आहेत. कथासरित्सागर, बृहत्कथा, बृहत्कथामंजरी. विक्रमादित्य राजाशी संबंधित सिंहासद्वात्रिंशिका हा एक कथासंग्रह प्रसिद्ध आहे. मराठीत त्याचे सिंहासनबत्तीशी नावाने भाषांतर झाले होते.
सुभाषितकाव्य
सुभाषितकाव्य संस्कृत साहित्यात शीर्षस्थानी मानावे लागेल. सुभाषितकाव्ये लोकप्रिय झालेली आहेत. काही कवींनी सुभाषित शतके रचलेली आहेत. त्यात भर्तृहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कवींच्या काव्यात आलेली सुभाषिते एकत्र करून सुभाषितसंग्रह प्रसिद्ध केलेले आहेत. महाभारत तर सुभाषितांचा खाजिनाच आहे. ग्रंथरूपात उपलब्ध असणारे पहिले सुभाषित काव्य म्हणाजे गाथा सप्तशती. आर्यासप्तशती, सूक्तिमुक्तावली, सुभाषितसुधानिधी, शार्ङ्गधरपद्धती, सुभाषितावली असे अनेक सुभाषित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
खंडकाव्य म्हणजे एखाद्या विषयाला धरून केलेले छोटेखानी काव्य. उदा. महाकवी कालिदासाची ऋतुसंहार व मेघदूत ही दोन खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत.
शास्त्रीयग्रंथ - शास्त्रीय शब्दात शास् असा धातू आहे. त्याचा अर्थ आहे शासन करणे, सत्ता चालवणे. गणितशास्त्र, गण् म्हणजे मोजणे, तेव्हा मोजणे या सदराखाली जे जे येईल ते सर्व गणितशास्त्रात मोडेल. खागोल. ख म्हणजे आकाश. आकाशाच्या गोलाविषयीची सर्व प्रकारची माहिती ही खगोल शास्त्रात येईल.
संस्कृतमधे धर्मवाङ्मय खूप प्रमाणात आहे. मग संस्कृतमधे शास्त्रीय ग्रंथ आहेत की नाहीत ? अशी शंका येईल. पण संस्कृतमधे शास्त्रीय ग्रंथ पण आहेत. प्रामुख्याने आयुर्वेदशास्त्राविषयी खूप ग्रंथ उपलब्ध आहेत व पुष्कळ हस्तलिखीते अजूनही धूळ खात पडून आहेत. आयुर्वेद म्हणजे आयुष्याचे ज्ञान. चरक, सुश्रुत, वाग्भट हे श्रेष्ठ आयुर्वेदाचार्य होऊन गेले. त्यांचे संहिताग्रंथ उपलब्ध आहेत. कायचिकित्सा, शल्यविकित्सा, कौमारभृत्यचिकित्सा, विविध विषांवर औषधोपचार सांगणारे अगदतंत्र, दीर्घायुष्यासाठी रसायनतंत्र वगैरे आयुर्वेदाच्या शाखा आहेत.
गणितशास्त्र - गणिताचा व खगोलशास्त्राचा उगम हा यज्ञसंस्कृतीत झाला. यज्ञ करण्यासाठी ठराविक आकाराची यज्ञकुंडे आवश्यक असत. तसेच यज्ञ करण्यास ठराविक ग्रहांची पण अपेक्षा असे. त्यामुळे आकाश दर्शन व गणित वेदकालापासून चालत आलेले आहे.
गणितावरचा बाराव्या शतकात होऊन गेलेल्या भास्कराचार्यांचा लीलावती हा पद्य ग्रंथ उपलब्ध आहे. त्यात त्यांनी लीलावती ही एक लहान मुलगी कल्पून आपण तिला गणित शिकवत आहोत अशी कल्पना करून अनेक वृत्तांमधे हा ग्रंथ रचलेला आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार, वर्ग घन वगैरेंच्या पद्धतींपासून ते परमिटेशन कॉम्बिनेशन पर्यंत सर्व प्रकारचे गणित ह्यात आलेले आहे.
खागोलशास्त्रावर चौथ्या शतकात होऊन गेलेल्या आर्यभट्टांचा ग्रंथ, भास्कराचार्यांचा ज्योतिर्गणितावरचा ग्रंथ ही काही उदाहरणे आहेत.
त्याशिवाय साहित्यशास्त्रांतर्गत नाट्यशास्त्र, व्याकरणाशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहासशास्त्र, अलंकारशास्त्र इत्यादी विषयांवरही खूप ग्रंथसामग्री उपलब्ध आहे.
संस्कृत साहित्यकारांनी आणखी एक ग्रंथलेखनाची शैली विकसीत केली होती ती सूत्रग्रंथांची.
कारण प्राचीनकाळी टिकाऊ लेखनसाहित्य, छपाईचे तंत्र अवगत नव्हते. सर्व ग्रंथ पाठ करून ठेवावे लागत असत. कालांतराने जशी वाङ्मयात भर पडत गेली तसतसे हे वाङ्मय पाठ करून टिकवणे सुद्धा अवघड होऊ लागले. त्यामुळे थोडक्या शब्दात की जेणेकरून ते पाठ करणे सोपे होईल अशी वाङ्मयनिर्मिती करणे ही काळाची गरज ठरली. सूत्रग्रंथ हे थोडक्यात लिहिलेले असल्यामुळे पाठ करणे सुकर होत असे. त्यामुळे प्राचीनकाळी सूत्रशैली अस्तित्वात आली. सूत्र या शब्दाचे दोरा, कठपुतळीच्या संचालनाचा धागा, शिवण्याचा दोरा, वेष्टन, लघुवाक्य असे अनेक अर्थ आहेत. सूत्रशब्दाची व्याख्या अशी आहे -
अल्पाक्षरमसंदिग्धं सारवद्विश्वतोमुखम् ।
अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदु: ॥
कमितकमी शब्दात जास्तीत जास्त आशय नि:संदिग्धपणे, अर्थहानी न होता ज्यात सांगितला जातो ते सूत्र. अशा वाङ्मयनिर्मितीच्या वेळी एखादे जरी अक्षर कमी करता आले तरी त्यावेळी विद्वानांना पुत्रजन्माचा आनंद होत असे. विविधांगी ज्ञानसांभार छोट्याशा संपुटात बसवण्याकरता ही अभिनव सूत्रशैली त्याकाळी विकसित झाली. या सूत्रशैलीत निरनिराळ्या विषयांवरचे सूत्रग्रंथ लिहिले गेले. उदा. कल्पसूत्रे, गृह्यसूत्रे, व्याकरणसूत्रे, ब्रह्मसूत्रे वगैरे. असे सूत्रग्रंथ रचून, गुरु आपला शिष्यवर्ग तयार करत असे. सूत्रग्रंथ थोडक्यात लिहिलेले असल्यामुळे त्यातील विषयांचे शंकासमाधान गुरु तोंडी सांगत असत. त्यामुळे सूत्रे पाठ करणे व गुरूंनी सांगितलेला सूत्रार्थ जशाचा तसा लक्षात ठेवणे ही शिष्याची जबाबदारी असे. अध्ययन-अध्यापनाचा जो पाया स्मृती, तिला ताण पडू नये म्हणून जरी सूत्रग्रंथ निर्माण झाले असले तरी गुरूंनी तोंडी सांगितलेला सूत्रार्थ जशाचा तसा लक्षात ठेवतांना स्मृतीला ताण पडतच असे. शिष्य जर सूत्रार्थ विसरला व त्य़ाने त्याचा दुसराच अर्थ सांगितला तर मूळ सूत्राचा अर्थ लोप पावतो. मूळ ग्रंथकाराचा अभिप्राय त्यामुळे लक्षात येणार नाही. सूत्रग्रंथ लिहून जर एखादी पिढी झाली की असे होण्याची शक्यता जास्तच निर्माण होत असे. प्रारंभी कितीही स्पष्टार्थक असले तरी काळाच्या ओघात अखंड, पारंपारिक स्पष्टीकरणाच्या अभावी सूत्रे गूढ, दुर्बोध होऊ लागली. त्यामुळे त्या सूत्राचा मूळ अर्थ, सूत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणे सुद्धा गरजेचे झाले. त्यातून भाष्यग्रंथांची निर्मिती झाली. त्यातून सूत्रग्रंथांवर विवरणवृत्ती, भाष्य, व्याख्या, वार्तिक, टीका इत्यादी विविधरूपात साहित्याचा विकास झाला. भाष्यग्रंथाची व्याख्या अशी आहे -
सूत्रार्थो वर्ण्यते यत्र पादै: सूत्रानुसारिभि: ।
स्वपदानि च वर्ण्यन्ते भाष्यं भाष्यविदो विदु: ॥
भाष्यात सूत्राच्या अर्थाचे विवेचन केलेले असते. तदंतर्गत गोष्टींचा खुलासा केलेला असतो. संभाव्य आक्षेपांचे निरसन केलेले असते. तसेच सूत्रावर जर विरुद्ध अर्थ लादले गेले असतील तर त्यांचे खंडन केले असते. भाष्याची ही प्रमुख कार्ये आहेत.
अशाप्रकारे संस्कृत साहित्य हे एखाद्या विशाल समुद्रासारखे आहे.

"संस्कृत साहित्याची ओळख ६ - संस्कृत साहित्यातील वाङ्मयप्रकार " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment