आपण परवाच्या तासाला तृतीया विभक्तीचा वापर कसा करायचा ते पाहिले. क्रिया सिद्धीस जाण्यास अत्यंत उपकारी असते त्याला करण कारक म्हणातात व त्या करण कारकाची तृतीया विभक्ती योजावयाची असते.
आता त्याव्यतिरिक्त तृतीया विभक्ती कोणाची योजावयाची असते ते पाहूया.
१) ज्या लक्षणावरून एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते त्या लक्षणबोधक शब्दाची तृतीया विभक्ती होते.
उदा. जटाभि: तापस: ।
जटांवरून तो तपस्वी असल्याचे लक्षात येते, म्हणून जटा या शब्दाची तृतीया विभक्ती वापरलेली आहे. किंवा
स्वरेण स: महेशं अनुसरति ।
स्वराने तो महेशसारखा आहे. म्हणजे त्याचा आवाज महेशसारखा आहे.
२) शरीरामधील व्यंग सुद्धा तृतीया विभक्तीने दाखवले जाते.
उदा. स: नेत्रेण काण: अस्ति ।
तो एका डोळ्याने आंधळा आहे.
स: नेत्राभ्यां काण: अस्ति ।
तो दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे.
स: कर्णेन बधिर: अस्ति ।
तो एका कानाने बहिरा आहे.
३) हेतुबोधक शब्दांची पण तृतीया विभक्ती योजावयाची असते.
उदा. स: अध्ययनेन पुण्यपत्तने वसति ।
तो अध्ययनाच्या हेतूने पुण्यात रहात आहे.
विद्यया यश: लभते ।
विद्येमुळे यश लाभते.
स्मिता वीणावादनेन शीलां अतिशेते ।
स्मिता वीणा वाजवण्यात शीलाच्या वरचढ आहे.
४) काही अव्ययांना तृतीया विभक्तीची अपेक्षा असते.
सह, सार्धम्, साकम्, समम्, विना, किम्, अलम्, प्रयोजनम,
सीता रामेण सह / सार्धं / साकं वनं गच्छति ।
सीता रामाबरोबर वनात जाते.
मात्रा समं नास्ति शरीरपोषणम् ।
दशरथ: रामेण विना न जीवति ।
दशरथ रामाशिवाय जगू शकत नाही.
जीवितेन किम् ?
जगून काय उपयोग ?
धनेन किम् ?
धनाचा काय उपयोग ?
रोदनेन अलम् ।
रडणं पुरे.
५) फलप्राप्ती संबंधाने सुद्धा तृतीया विभक्ती योजतात.
उदा. - दशभि: वर्षै: अध्ययनं समाप्तम् ।
दहा वर्षांनी अध्ययन समाप्त झाले.
६) तुल्य अशा अर्थानेही तृतीया विभक्ती योजतात.
उदा. स: देवेन समान:, धर्मेण सदृश: ।
तो देवाप्रमाणे आहे. धर्माप्रमाणे आहे.
स्वाध्याय
तू गोत्राने कौशिक आहेस.
सुधाकर डोळ्याने आंधळा आहे.
अभिराम पायाने लंगडा आहे.
विनीत कानाने बहिरा आहे.
धनिक सुखाने जगतो.

================================
३१ वा पाठ उत्तरे - स्वाध्याय
१) तू गोत्राने कौशिक आहेस.
त्वं गोत्रेण कौशिक: असि ।
२) सुधाकर डोळ्याने आंधळा आहे.
सुधाकर: नयनेन (नेत्रेण) अन्ध: ।
३) अभिराम पायाने लंगडा आहे.
अभिराम: चरणेन खञ्ज: ।
४) विनीत कानाने बहिरा आहे.
विनीत: कर्णेन बधिर: ।
५) धनिक सुखाने जगतो.
धनिक: सुखेन जीवति ।
१) तू गोत्राने कौशिक आहेस.
त्वं गोत्रेण कौशिक: असि ।
२) सुधाकर डोळ्याने आंधळा आहे.
सुधाकर: नयनेन (नेत्रेण) अन्ध: ।
३) अभिराम पायाने लंगडा आहे.
अभिराम: चरणेन खञ्ज: ।
४) विनीत कानाने बहिरा आहे.
विनीत: कर्णेन बधिर: ।
५) धनिक सुखाने जगतो.
धनिक: सुखेन जीवति ।
"३१ वा पाठ तृतीया विभक्ती भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment