आज मी तुम्हाला व्यंजनांत शब्द शिकवणार आहे. आपण स्वरांत शब्दांमधे अ स्वराने अंत पावणारे पुं. व नपुं शब्द पाहिले, तसेच माला शब्दही पाहिला. पुढच्या स्वरांत शब्दांची ओळख करून द्यायच्या आधी मी व्यंजनान्त शब्द का घेणार आहे असा प्रश्न कदाचित तुम्हास पडेल. पण त्याचे कारण असे आहे की व्यंजनांत शब्द एक पाठ केला की जवळपास किरकोळ भेद सोडले तर सर्व शब्दांची रूपे सारखीच होतात. पुंलिंगी व स्त्रीलिंगी शब्दही जवळपास सारखेच चालतात. हे लक्षात घेणे जास्त सोपे आहे असे वाटून मी प्रथम व्यंजनांत शब्द घेत आहे.
मरुत् (त् कारान्त पुं) = वारा
मरुत् मरुतौ मरुत: प्रथमा
मरुतम् मरुतौ मरुत: द्वितीया
मरुता मरुद्भ्याम् मरुद्भि: तृतीया
मरुते मरुद्भ्याम् मरुद्भ्य: चतुर्थी
मरुत: मरुद्भ्याम् मरुद्भ्य: पंचमी
मरुत: मरुतो: मरुताम् षष्ठी
मरुति मरुतो: मरुत्सु सप्तमी
मरुत् मरुतौ मरुत: संबोधन
आता आपण तृतीया विभक्तीचा वापर केलेली काही सुभाषिते पाहू.
तृतीया विभक्तीचा उपयोग केलेली सुभाषिते
१) शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया विभाति नभ: ।
पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सर: ॥
अन्वय - शशिना निशा (विभाति) । निशया शशी विभाति । शशिना निशया च नभ: विभाति ।
पयसा कमलं विभाति । कमलेन पय: विभाति । पयसा कमलेन सर: विभाति ।
अर्थ - चंद्रामुळे रात्र शोभून दिसते तर रात्रीमु्ळे चंद्र शोभून दिसतो. आणि चंद्र व रात्र यांच्यामुळे आकाश शोभून दिसते. पाण्यामुळे कमळ शोभून दिसते, कमळामुळे पाणी शोभून दिसते तर पाणी व कमळ यांच्यामुळे सरोवर शोभून दिसते.
२) मणिना वलयं वलयेन मणि: मणिना वलयेन विभाति कर: । कविना च विभु: विभुना च कवि: कविना विभुना च विभाति सभा ॥
अन्वय - मणिना वलयं (विभाति) । वलयेन मणि: (विभाति) । मणिना वलयेन कर: विभाति । कविना च विभु: (विभाति) विभुना च कवि: (विभाति) कविना विभुना च सभा विभाति ॥
अर्थ - रत्नामुळे बांगडी व बांगडीमुळे रत्न शोभून दिसते, आणि रत्नयुक्त बांगडीमुळे हात शोभून दिसतो. तसेच कवीमुळे राजा शोभून दिसतो व राजामुळे कवी शोभून दिसतो आणि राजा व कवीमुळे सभा शोभून दिसते.
३) गुरुशुश्रुषया विद्या पुष्कलेन धनेन वा ।
अथवा विद्यया विद्या चतुर्थी नोपलभ्यते ॥३-४१॥
संधी - न + उपलभ्यते
अन्वय - विद्या गुरुशुश्रुषया लभ्यते । वा पुष्कलेन धनेन लभ्यते । अथवा विद्यया विद्या लभ्यते । चतुर्थी (विद्या न उपलभ्यते) । (इथे लभ्यते हे क्रियापद कर्मणी आहे. त्याची आपण नंतर माहिती करून घेऊ. अर्थ होतो मिळवली जाते.)
अर्थ - गुरूंची सेवा करून, पुष्कळ धन देऊन किंवा विद्येच्या बदल्यात असे विद्या मिळवण्याचे तीन मार्ग आहेत. विद्या प्राप्त करण्याचा चौथा उपाय दिसून येत नाही.
४) श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन दानेन पाणिर्न तु कङ्कणेन ।
विभाति काय: खलु सज्जनानां परोपकारेण न चन्दनेन ॥१६-६॥ (नी.श.)
संधिविग्रह - श्रोत्रं श्रुतेन एव न कुण्डलेन दानेन पाणि: न तु कङ्कणेन ।
विभाति काय: खलु सज्जनानां परोपकारेण न चन्दनेन ॥१६-६॥
अन्वय - (सज्जनानां) श्रोत्रं श्रुतेन एव (विभाति) कुण्डलेन न (विभाति) (सज्जनानां) पाणि: दानेन (विभाति) न तु कङ्कणेन (विभाति) । सज्जनानां काय: खलु परोपकारेण विभाति चन्दनेन न विभाति ।
अर्थ - सज्जनांचे कान कुंडलांनी शोभून दिसत नाहीत, तर विद्येने शोभून दिसतात. त्यांचे हात कंकणांनी शोभून दिसत नाहीत तर दानाने शोभून दिसतात. त्यांचे शरीर चंदनाने शोभून दिसत नाही तर परोपकाराने शोभून दिसते.

"३० वा पाठ सुभाषित (तृतीया विभक्तीवर आधारित) " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment