Monday, July 27, 2020

पाठ ३३ आत्मनेपदी वर्तमानकाळ व चतुर्थी विभक्ती

मागच्या २९ व्या पाठात आपण आत्मनेपदी धातू कसे चालतात ते पाहिले. परस्मैपदाप्रमाणेच आत्मनेपदी धातूंची सुद्धा प्रत्येक काळात तीन पुरुषांची व तीन वचनांची मिळून ९ / ९ रूपे तयार होतील.

परस्मैपदाप्रमाणेच प्रथम पुरुषी कर्त्यापुढे प्रथमपुरुषी क्रियापदे, द्वितीय पुरुषी कर्त्यांपुढे द्वितीय पुरुषी क्रियापदे व तृतीय पुरुषी कर्त्यांपुढे तृतीय पुरुषी क्रियापदे येतील. ह्या गोष्टी दोन्हीकडे म्हणजे परस्मैपद व आत्मनेपद यांच्याकडे सारख्यच आहेत.

इ वहे महे
से इथे ध्वे
ते इते अन्ते

वन्दे   वन्दावहे  वन्दामहे  प्रथम पुरुष
वन्दसे  वन्देथे   वन्दध्वे   द्वितीय पुरुष
वन्दते  वन्देते   वन्दन्ते    तृतीय पुरुष

अहं वन्दे । मी नमस्कार करतो.
आवां वन्दावहे । आम्ही दोघे नमस्कार करतो.
वयं वन्दामहे । आम्ही सर्व नमस्कार करतो.

त्वं वन्दसे । तू नमस्कार करतोस.
युवां वन्देथे । तुम्ही दोघे नमस्कार करता.
यूयं वन्दध्वे । तुम्ही सर्व नमस्कार करता.

स: वन्दते । तो नमस्कार करतो
तौ वन्देते । ते दोघे नमस्कार करतात.
ते वन्दन्ते । ते सर्व नमस्कार करतात.

कर्ता ज्या पुरुषाचा व वचनाचा असेल त्याप्रमाणे क्रियापदाचे पुरुष व वचन योजावयाचे असते. हा नियम कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे.

वाक्यात संप्रदान कारकाची चतुर्थी विभक्ती वापरावयाची असते. एखादा मनुष्य एखादी दान देऊन ज्याला संतुष्ट करू इच्छितो तेव्हा घेणारा संप्रदान ठरतो व घेणार्‍याची चतुर्थी विभक्ती योजावयाची असते. संप्रदान शब्दाचा अर्थ आहे चांगले दान. अर्थात द्यावयाची गोष्ट ही नेहेमी करता दिलेली असते. दान दात्याकडे पुन्हा परत येत नाही.

उदा. नृप: दीनाय वस्त्रं यच्छति ।
राजा गरीबाला वस्त्र देतो.

    आपण धोब्याला कपडे देतो, पण ते दान देण्याच्या इच्छेने देत नाही तर ते धुवून परत घ्यायचे असतात. अशावेळी धोबी संप्रदान ठरत नाही. तेव्हा ‘स: रजकस्य वस्त्राणि यच्छति’ इथे धोब्याला (रजक) दिलेले कपडे देणारा परत घेणार असतो म्हणून येथे रजक संप्रदान ठरत नाही म्हणून त्या शब्दाची षष्ठी विभक्ती वापरलेली आहे.


आता आपण एक पाठ बघूया.

            सुमन्त्रस्य चातुर्यम् ।

    एकदा निशायां बाल: श्रीराम: आकाशे चन्द्रं प्रेक्षते । स: कौसल्यां भणति, “अम्ब, मह्यं एतं चन्द्रं यच्छ । अहं तम् अभिलषामि ।” तदा कौसल्या वदति, “वत्स श्रीराम, एष: चन्द्र: गगने वर्तते । त्वं कथं तम् अधिगच्छसि ?” इति । तत: बाल: श्रीराम:, ‘अहम् एनम् चन्द्रम् अभिलषामि । प्रयच्छ तं मे’ इति कौसल्यां पुन: पुन: भाषते क्रन्दति च । तदा सारथि: सुमन्त्र: तत्र आगच्छति । स: श्रीरामाय दर्पणम् एकम् यच्छति भाषते च, “बाल श्रीराम, एष: तव हस्ते चन्द्र: । पश्य एनम्” इति । तदा बाल: श्रीराम: दर्पणे चन्द्रं पश्यति आनन्दति च । तत्क्षणं स: रोदनात् विरमति ।

कठिण शब्दांचे अर्थ -
प्रेक्षते = प्रेक्ष् (१ आ. प.) = पहाणे
भणति = भण् (१ प. प.) बोलणे
यच्छ = दा-यच्छ् (१ प. प.) आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. = दे
भणति = भण् (१ प. प.) = बोलणे
वर्तते = वृत्-वर्त् (१ आ. प.) = असणे
अभिलषामि = अभि + लष् (१ प. प.) इच्छिणे
मे  = अस्मद् (सर्व. सर्वलिंगी समान) च. ए. व. = मला
वदति = वद् (१ प. प.) बोलणे
क्रन्दति = क्रन्द् (१ प. प.) रडणे
आगच्छति = आ + गम्-गच्छ् (१ प. प.) येणे
भाषते = भाष् (१ आ. प.) = बोलणे

स्वाधाय

प्रश्न १ ला - पाठाचे भाषांतर करा.

प्रश्न २ रा उत्तराणि लिखत -

प्रश्न १ - बाल: श्रीराम: आकाशे किं प्रेक्षते
प्रश्न २ -राम: कौसल्यां किं भाषते ?
प्रश्न ३ - बाल: श्रीराम: जननीं पुन: पुन: किं वदति ?
प्रश्न ४ - सुमन्त्र: किं करोति ?
प्रश्न ५ - बाल: श्रीराम: चन्द्रं कुत्र पश्यति ?

* प्रश्न ३ रा मेलनं कुरुत ।*
अ गट) - बाल:, आकाशे, एकम्
ब गट) - कृष्णवर्णे, दर्पणम् श्रीराम:

प्रश्न ४ रा - कंसातील शब्दाची योग्य ती विभक्ती वापरा.
१) श्रीराम: आकाशे ----- पश्यति । (तारका)
२) कौसल्या ----- वदति । (राधिका)
३) राम: ----- क्रीडति । (कन्दुक)
४) नृपा: ----- भवन्ति । (शूर)
५) मन्दार: ---- हस्तेन लिखति । (दक्षिण)

प्रश्न ५ था - कंसातील सूचनांनुसार बदल करा.
१) ----- पुस्तकं अधिगच्छामि । (योग्य कर्ता घाला)
२) श्रीराम: चन्द्रं पश्यति । (दृश्-पश्य् धातूऐवजी ईक्ष् धातू वापरा)
३) बालका: भणन्ति । (वाक्य एकवचनी करा)
४) खग: वृक्षे उपविशति । (वाक्य द्विवचनी करा).
५) वायस: (कावळा) डयते । (वाक्य बहुवचनी करा). 


span style="color: blue;"> " आत्मनेपदी वर्तमानकाळ व चतुर्थी विभक्ती " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...