आपण आज अखेर पर्यंत क्रियापदांची वर्तमानकाळी रूपे कशी करायची, वाक्यात कर्ता, कर्म व क्रियापद कसे योजावयाचे त्याची माहिती घेतली. देव व वन शब्दांची रूपे कशी होतात ते पाहिले. अस्मद्, युष्मद् व तद् या सर्वनामांची मी फक्त प्रथमा विभक्ती सांगितली होती. कारण आपण त्यांची रूपे वाक्यात कर्ता म्हणून उपयोगात आणणार होतो.
यद् पुलिंगी = य: यौ ये प्रथमा
तद् पुंलिंगी = स: तौ ते प्रथमा
किम् पुंलिंगी = क: कौ के. प्रथमा
आज आपण त्यांची बाकीची रूपे पहाणार आहोत.
आज मी तुम्हाला तद् सर्वनामाची रूपे कशी होतात ते सांगणार आहे. तद् म्हणजे पुंलिंगात तो, स्त्रीलिंगात ती व नपुंसकलिंगात ते असा अर्थ होतो. अर्थातच त्याची रूपे प्रत्येक लिंगात वेगवेगळी होतात. पण पुंलिंग व नपुंसकलिंगामधे फक्त प्रथमा व द्वितीयेची रूपे वेगळी असतात. बाकी सर्व रूपे पुंलिंगाप्रमाणेच होतात.
तद् (पुं) = तो
स: तौ ते प्रथमा
तं तौ तान् द्वितीया
तेन ताभ्यां तै: तृतीया
तस्मै ताभ्यां तेभ्य: चतुर्थी
तस्मात् ताभ्यां तेभ्य: पंचमी
तस्य तयो: तेषां षष्ठी
तस्मिन् तयो: तेषु सप्तमी
तद् (नपुं) = ते
तद् ते तानि प्रथमा
तद् ते तानि द्वितीया
तेन ताभ्यां तै: तृतीया
तस्मै ताभ्यां तेभ्य: चतुर्थी
तस्मात् ताभ्यां तेभ्य: पंचमी
तस्य तयो: तेषां षष्ठी
तस्मिन् तयो: तेषु सप्तमी
तद् प्रमाणेच यद् व किं या सर्वनामाची रूपे सुद्धा होतात. आता त्यांचे फोटो पोस्ट करते. या रूपांकडे पाहिले तर एक लक्षात येते की ही सर्वनामे सुद्धा खूपशी पुंलिंगात देव प्रमाणे व नपुंसकलिंगात वन प्रमाणेच चालतात. फक्त चतुर्थी एकवचन तस्मै व पंचमी ए. व. तस्मात् व सप्तमी ए. व. तस्मिन् व षष्ठी ब. व. तेषां एवढाच फरक आहे. यद् तद् व किं ही सर्वनामे कशी चालतात ते पुस्तकातील फोटो पण पोस्ट केले आहेत. आज फक्त या सर्वनामांची माहिती द्यायची होती. आज होमवर्क असणार नाही व उद्या आपण संस्कृत साहित्याविषयी जाणून घेणार आहोत.
" पाठ २० वा यद्, तद्, व किम् सर्वनामाची पुंलिंगी व नपुंसकलिंगी रूपे " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment