आपण आठवड्यातून एक दिवस संस्कृत साहित्याची ओळख करून घेत आहोत. त्यात वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. नंतर प्रासंगिक निमित्ताने व्यास व कालिदास यांची माहिती करून घेतली. वेदवाङ्मयानंतर माहिती करून घेण्याचा क्रम येतो तो रामायणाचा.
वेदांचे चार भाग आहेत. संहिता, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके व उपनिषदे. त्यापैकी पहिले दोन भाग वैदिकयुगांतर्गत येतात तर पुढचे दोन भाग उत्तर वैदिकयुगात येतात. नंतरचा काळ आहे तो रामायण व महाभारत या महाकाव्यांचा. भाषेच्या दृष्टीने सुद्धा वेदवाङ्मय व रामायण यात खूप अंतर आहे. वेदातील सूक्ते ही गायत्री, जगती वगैरे छंदात रचलेली आहेत. छंद म्हणजे वृत्त. रामायण हे अनुष्टुभ् छंदात रचलेले काव्य आहे. अनुष्टुभ् छंदात आठ अक्षरांचे चार चरण असतात. आपण जी सुभाषिते पहात होतो ती सर्व अनुष्टुभ् छंदातील होती. आता उत्तर वैदिक युग व रामायण यांच्या मधल्या कालखंडात काही साहित्य होऊनही गेले असेल. पण ते उपलब्ध नाही. वेदांनंतर उपलब्ध असणारे प्राचीन साहित्य कोणते तर रामायण व महाभारत. हे कुशीलव व सूत परंपरेतून आलेले आहे. ही आख्याने यज्ञ वगैरे प्रसंगी तोंडी सांगितली जात असत. नंतर केव्हातरी त्याला ग्रंथरूप मिळालेले आहे.
रामायण हे भारतीय साहित्यातील तसेच विश्वसाहित्यातील सुद्धा पहिले महाकाव्य आहे. म्हणून त्याला आदिकाव्य असे म्हणतात. वाल्मीकींनी ते रचलेले आहे. रामायणातच अशी कथा सांगितली आहे की एकदा वाल्मीकी ऋषी नेहेमीप्रमाणे तमसा नदीवर स्नानासाठी चालले होते. तेथे झाडावर एक क्रौंच पक्षाचे जोडपे क्रीडा करत होते. त्यावेळी तिथे एक पारधी आला व त्याने त्यातील एका पक्षाला ठार केले. आपला जोडीदार मृत्यु पावलेला पाहून दुसरा क्रौंच पक्षी अतिशय शोक करत होता. ते दृश्य वाल्मीकींच्या नजरेस आले. त्या क्रौंच पक्षाचा विलाप ऐकून त्यांना खूप वाईट वाटले व त्या दु:खाच्या भरात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वतीसमा: ।
यात्क्रौञ्चमिथुनादेकमधी: काममोहितम् ॥७५-२॥
अर्थ - हे पारध्या, या जगात यापुढे कधीही तुला मानसन्मान (मुक्ती) मिळणार नाही. कारण प्रेमात वेड्या झालेल्या क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यातील एकाला तू ठार मारले आहेस.
त्यांच्या मुखातून हा पारध्याला शाप दिला गेला. नंतर ते स्नान करून आपल्या कुटीत परतत असता त्यांच्या मनात विचार आला की हा श्लोक माझ्या मुखातून कसा बाहेर पडला ? ही आठ आठ अक्षरांनी युक्त अशी रचना आहे. तोपर्यंत संस्कृत साहित्यात या छंदात रचना झालेली नव्हती. आपल्या कुटीत याबद्दलचा विचार करत ते बसले असता तेथे ब्रह्मदेव प्रगट झाले व त्यांनी त्यांना या छंदात रामायणाची रचना करण्याचा आदेश दिला. व आशीर्वादही दिला की -
यावद् स्थास्यन्ति गिरय: सरितश्च महीतले ।
तावद् रामायणकथा लोकेषु प्रचरिष्यति ॥
अर्थ - जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत व नद्या रहातील तोपर्यंत या जगात रामायणकथा प्रचलित होत राहील.
नंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार वाल्मीकी ऋषींनी रामायणाची रचना केली. त्यांना जो शोक झाला होता तोच श्लोकारूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडला
म्हणून म्हटलं आहे की
समाक्षरैश्चतुर्भिर्य: पादैर्गीतो महर्षिणा । सोऽनुव्याहरणाद्भूय: शोक: श्लोकत्वमागत: ॥७५-७॥
अर्थ - सम अक्षरांनी, चार पादांनी, महर्षींनी जो शोक व्यक्त केला तो श्लोकत्वाप्रत आला.
म्हणजे त्याला श्लोकरूप प्राप्त झाले.
आणि तसेच झालेले दिसून येत आहे. इतकी हजार वर्षे लोटली असली तरी आजही रामकथा मोठ्या आवडीने गायिली जाते.
ही रामकथा इतकी प्रसिद्ध झाली की भारतात प्रत्येक प्रादेशिक भाषेत ही कथा पुन्हा पुन्हा गायिली गेली आहे. महाराष्ट्रात नाथांचे भावार्थ रामायण, दक्षिणेत कंब रामायण, उत्तरेत तुलसीदासांचे रामचरितमानस, गुजराथीमधे गिरिधर रामायण अशी अनेक रामायणे प्रसिद्ध आहेत. भारतीय भाषात रामायणे लिहिली गेली असल्यास नवल नाही. संस्कृतमधे सुद्धा पुन्हा पुन्हा रामकथा गायली आहे. त्यात योगवासिष्ठ महारामायण व अध्यात्म रामायण हे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्याव्यतिरिक्त अद्भुत रामायण व आनंद रामायण नावाने सुद्धा दोन रामायणे संस्कृत मधे आहेत.
या सर्व रामायणांना वाल्मीकी रामायण हा मूलाधार आहे. रामकथेची चौकट कायम ठेऊन इतर कवींनी पुन्हा पुन्हा रामायण गायिलेले आहे.
वाल्मीकींचे ‘रामायण’ हे आदिकाव्य लौकिक संस्कृत साहित्यातील पहिले महाकाव्य. म्हणून रामायणाला आदिकाव्य व वाल्मीकींना आदिकवी म्हणतात. हे महाकाव्य जरी वाल्मीकींनी रचलेले असले तरी ते केवळ या महाकाव्याचे कवीच नाहीत तर ते रामायणाचे साक्षीदार आहेत व रामायणात त्यांनी एक महत्वाची भूमिकाही बजावली आहे.
रामायणाची एकूण सात कांडे आहेत. १) बालकांड २) अयोध्याकांड ३) अरण्यकांड ४) किष्किंधाकांड ५) सुंदरकांड ६) युद्धकांड ७) उत्तरकांड
यामधे एकूण श्लोकसंख्या २४००० आहे. म्हणून त्याला चतुर्विंशतिसाहस्री संहिता असेही म्हणतात. किंवा रामांनी रावणाचा वध केला असल्यामुळे याला पौलस्त्यवध असेही नाव आहे.
आपल्याला वाल्याकोळ्याचा वाल्मीकी झाला ही कथा लहानपणापासून माहीत आहे. पण वाल्मीकी रामायणाच्या उत्तरकांडात स्वत:ची ओळख करून देतांना वाल्मीकी श्रीरामांना म्हणतात -‘प्रचेतसोऽहं दशम: पुत्रो राघवनन्दन’. म्हणजेच ‘हे श्रीरामा, मी प्रचेतसाचा म्हणजे वरुणाचा दहावा मुलगा आहे. तसेच ‘इति संदिश्य बहुशो मुनि: प्राचेतसस्तदा’ असाही एक उल्लेख रामायणात आहे, त्यावरून वाल्मीकी हे वरुणाचे पुत्र होते ही गोष्ट सिद्ध होते. मनुस्मृतीत वाल्मीकी हे वसिष्ठ, नारद व भृगु यांचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. मग हा वाल्या कोळ्याचा वाल्मीकी कधी झाला ? हे कथानक कुठून आले ? तर हे कथानक अध्यात्मरामायणात आलेले आहे. हे कथानक अध्यात्मरामायणाच्या कवीने वाल्मीकींच्या मुखी घातले आहे. पूर्वायुष्यात एक व्याध म्हणून जीवन व्यतीत करत असतांना ऋषिगणांच्या उपदेशानुसार त्यांनी रामनामाचा जप केला व महर्षीपद प्राप्त करून घेतले. या प्रसिद्ध कथानकाला स्कंदपुराणाचा आधार आहे. स्कंद पुराणातील वैशाख महात्म्यात वाल्मीकी हे पूर्वजन्मात व्याध असल्याचे म्हटले आहे. अर्थात पद्मपुराणात ते पूर्वजन्मात व्याध असल्याचे म्हटले आहे तर अध्यात्मरामायणात ते पूर्वायुष्यात व्याध असल्याचे म्हटले आहे.
नारदऋषींनी त्यांना रामनामाचा मंत्र दिला व त्या मंत्राचा जप करण्यास सांगितले. वाल्मीकींनी आपले पूर्वीचे व्याधजीवन सोडून दिले व ते रामनामाचा जप करू लाघले. प्रथम त्यांच्या मुखातून ‘मरा, मरा’ असा उलटा जप होत होता. हे सर्व कथानक आपल्याला माहीतच आहे. अशी नामजपाची त्यांनी बारा वर्षे साधना केली. बारा वर्षानंतर जेव्हा नारद परत आले तेव्हा त्यांना एका वारूळातून रामनामाचा जप ऐकू येत होता. तेव्हा त्यांनी ते वारुळ फोडले व त्यातून वाल्मीकी बाहेर आले. संस्कृतमधे बल्मीक म्हणजे वारुळ. वारुळातून बाहेर आले म्हणून त्यांना वाल्मीकी म्हणतात.
तसेच वनवासात असतांना मारीच राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप घेतले व तो रामाला त्यांच्या कुटीपासून दूर घेऊन गेला. रामांचा बाण लागल्यावर ‘लक्ष्मणा धाव’ असे रामाच्या आवाजात ओरडला. ते शब्द ऐकून सीतेला राम संकटाट आहे असे वाटले व तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीला जाण्यास सांगितले. लक्ष्मण नाही म्हणत असता ती त्याला दुर्वचने बोलली व त्याला जाण्यास भाग पाडले. त्यावेळी लक्ष्मण कुटी भोवती एक रेखा आखून जातो व त्या रेघेबाहेर पाऊन न टाकण्याची सीतेला विनंती करतो. हा जो लक्ष्मणरेषेचा कथाभाग येतो, तो सुद्धा वाल्मीकिरामायणात नाही. एकनाथी रामायणात आहे. त्याअर्थी हे कथानक जनमानसात चालत आलेले असावे. एकूण बाकीच्या कवींनी रामायणकथेची चौकट कायम ठेऊन त्या कथेत विविध रंग भरले आहेत.
योगवासिष्ठ महारामायण
योगवासिष्ठ महारामायणात वसिष्ठांनी वैराग्य प्राप्त झालेल्या रामांना उपदेश केला आहे. या ग्रंथाची ओळख करून देतांना वसिष्ठ दुसर्या प्रकरणात म्हणतात की मोक्षाचे उपाय सांगणे हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. याची वैराग्य, मुमुक्षु-व्यवहार, उत्पत्ती, स्थिती, उपशम व निर्वाण अशी सहा प्रकरणे असून श्लोकसंख्या ३३००० आहे.
अध्यात्मरामायण -
या रामायणाची सुरवात शिव पार्वतीच्या संवादातून झालेली आहे. पार्वतीला राममाहात्म्य मान्य आहे. ‘श्रीरामचन्द्रेऽखिललोकसारे भक्तिर्दृढा नौर्भवति प्रसिद्धा’ अखिललोकसार श्रीरामचंद्रांची भक्ती ही संसारसागर तरून जाण्यास सुदृढ नौका आहे ही गोष्ट तिला माहीत आहे. पण त्यामुळे तिच्या मनात एक शंका उद्भवली की राम परब्रह्म असूनही आपल्याच मायेने आवृत्त झाल्यामुळे आत्मस्वरूप जाणत नव्हते. त्यासाठी त्यांना वसिष्ठांकडून उपदेश ग्रहण करावा लागला. राम जर आत्मतत्त्व जाणत होते तर त्यांनी सीतेकरता एखद्या सामान्य मानवाप्रमाणे शोक का केला व जर ते आत्मस्वरूप जाणत नव्हते तर त्यांना सामान्य मानवच म्हटले पाहिजे. मग जर ते सामान्य मानव असतील तर त्यांची भक्ती कशाला केली पाहिजे ? या पार्वतीच्या प्रश्नाला उत्तर म्हणून शंकरांनी पार्वतीला राम हे परब्रह्मस्वरूप कसे आहेत ते सांगितले.
या रामायणात पावलोपावली अनेक प्रसंगांमधून भक्ती, ज्ञान, उपासना, नीती व सदाचाराविषयी उपदेश केलेला आहे. यात अनेक विषयांचे वर्णन आलेले असले तरी अध्यात्मतत्त्वाचे यात विशेष विवेचन केलेले आहे. म्हणून या रामायणाला अध्यात्म-रामायण असे म्हणतात. भगवान श्रीराम हेच मूर्तिमंत अध्यात्मतत्त्व या रामायणात मानलेले आहे. वाल्मीकींचा राम मानव कोटीतील असून त्याची देवत्वाप्रत वाटचाल झालेली आहे. वाल्मीकींचा आदर्श रामराजा अध्यात्म-रामायणात मात्र प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा अवतार म्हणून पृथ्वीतलावर अवतरलेला आहे. तसेच पृथ्वीवरील सर्वांनाच या गोष्टीची कल्पना आहे. स्वत: रामांनीही आपण अवतार असल्याचे या रामायणात वेळोवेळी सांगितले आहे.
वाल्मीकी रामायणातील उपाख्याने व इतर विस्तार वगळून सर्व महत्वाच्या घटना या रामायणात आलेल्या आहेत. त्यामुळे या रामायणाचा विस्तार वाल्मीकि-रामायणापेक्षा खूपच कमी आहे. यात सात कांडे असून एकूण ५० सर्ग आहेत. वाल्मीकि-रामायणाची श्लोकसंख्या २४००० आहे तर या रामायणाची श्लोकसंख्या ४२४८ आहे.
आनंदरामायण
आनंदरामायण हे वाल्मीकिमहामुनिकृत शतकोटीरामचरितांतर्गत संस्कृत भाषेत रचलेले रामायण आहे. अध्यात्मरामायणाप्रमाणे शंकर पार्वतीला हे रामायण सांगत आहेत. परंतु वाल्मीकिरामायण अथवा अध्यात्मरामायणाप्रमाणे यात नेहेमीची सात कांडे नाहीत. या रामायणात एकूण ९ कांडे आहेत. १) सारकांड २) यात्राकांड ३) यागकांड ४) विलासकांड ५) जन्मकांड ६) विवाहकांड ७) राज्यकांड पूर्वार्ध व उत्तरार्ध ८) मनोहर कांड ९) पूर्णकांड
या रामायणात श्रीरामविषयक विविध कथा आलेल्या आहेत. त्याव्यतिरिक्त यात १०८ रामनामे असलेले स्तोत्र, विष्णुस्तोत्र, शिवकृत रामस्तवराजस्तोत्र, पक्षांनी गायिलेले रामस्तोत्र, रामांनी सीतेला देहरामायणाचा केलेला उपदेश आणि रामाने केलेल्या देहरामायणाचा उपदेश सीतेने रामाच्या जीवनाला लाऊन दाखवलेला कथाभाग, रामाच्या मानसपूजेचा विधी, विविध व्रते, हनुमत्कवच, रामकवच, सीताकवच, सीताष्टोत्तरशतनामस्तोत्र, लक्ष्मणकवच, रामरक्षा, भरतकवच, शत्रुघ्नकवच, मनन-कीर्तन करण्यास योग्य राममंत्र, अशी अनेक स्तोत्रेही यात आलेली आहेत. या रामायणाची रचना ९ सर्गात झाली आहे व श्लोकसंख्या १२२९९ आहे.
अद्भुतरामायण
अद्भुतरामायणाची कथा नावाप्रमाणेच अद्भुत आहे.
अद्भुतरामायणाचा प्रारंभच अकल्पित आहे. याचे एकूण २७ सर्ग आहेत. परंतु वाल्मीकींनी सांगितलेली रामकथा फक्त तोंडीलावण्यापुरतीच आहे. कुणाकुणाला मिळालेल्या शापापोटी राम व सीता यांनी जन्म घेतल्याच्या विविध कथा यात आल्या आहेत. यातील कथानकाला एकजिनसीपणा नाही. वाल्मीकी रामायणातील कैकेयीचा दुष्टावा, दशरथाचा मृत्यू, रामांचा वनवास या महत्वाच्या घटनांचा यात उल्लेख सुद्धा नाही. रामलक्ष्मण सीतेसह कोणत्यातरी हेतूने दंडकारण्यात गेल्याचे म्हटले आहे. परशूरामांना विश्वरूपदर्शन, हनुमंताला चतुर्भुजरूपाचे दर्शन, रामांना भव्य ऐश्वर्यशाली देवीस्वरूपाचे दर्शन, हनुमानांना केलेला सांख्य तत्वज्ञान, भक्तियोग, उपनिषदातील तत्वज्ञानाचा उपदेश, यात आला आहे. रावणवध हा यात महत्वाचा नसून सीतेचे रामाच्या जीवनातील स्थान महत्वाचे आहे हे या रामायणाला दाखवायचे आहे. रामांचे सामर्थ्य कमी पडताच उग्ररूप धारण करून तिने रामांचे रक्षण केले आहे व रामांना वरदान दिले आहे. सप्तशतीतील देवीच्या पराक्रमांच्या व अवतारांच्या कथेचा प्रभाव या रामायणातील सीतेच्या पराक्रमावर दिसून येतो. या रामायणातील कथेप्रमाणेच यातील तत्वज्ञानही एकजिनसी नाही. सांख्यतत्वज्ञान, वेदांतातील परमात्मस्वरूपाचे वर्णन किंवा शाक्त तत्वज्ञानही या रामायणात स्पष्टपणे सांगितलेले नाही. एकूण कथानकातील अद्भुताचा अंशच या रामायणात प्रभावी झालेला आहे.
रामायणातील दुसर्या अयोध्याकांडापासून युद्धकांडापर्यंत रामाचरिताचे सलग कथानक येते. परंतु पाहिल्या बालकांडात व शेवटच्या उत्तरकांडात इतर कथानके येतात. पहिल्या कांडात विश्वामित्र चरित्र थोडक्याट आले आहे. त्यावरून विद्वानांचे असे मानणे आहे की बालकांडात व उत्तरकांडात प्रक्षिप्त भाग आहे. प्रक्षिप्त मधे प्र + क्षिप् हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे टाकणे, फेकणे. नंतरच्या कवींनी काही कथाभाग त्यात घुसडला असावा. म्हणून त्यांना प्रक्षिप्त असे म्हणतात.
वास्तविक सीतेला सोडवून श्रीराम अयोध्येला परत आल्यानंतर रामायण कथाभाग संपला असे विद्वानांचे मानणे आहे.
वाल्मीकी ऋषींना ब्रह्मदेवाने जो वर दिला की जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत व नद्या आहेत तोपर्यंत रामायणकथा प्रचलित राहील. तो वर अक्षरश: खरा ठरला आहे.

" संस्कृत साहित्याची ओळख - ४ - रामायण " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment