जसे संप्रदान कारकाची चतुर्थी विभक्ती होते, त्याप्रमाणेच ज्या हेतूने क्रिया केली जाते त्याची सुद्धा चतुर्थी होते. थोडक्यात मराठीत आपण ज्याला साठी हा प्रत्यय लावतो त्या शब्दासाठी संस्कृतमधे चतुर्थी विभक्ती योजतात.
१) दानाय लक्ष्मी: सुकृताय विद्या चिन्ता परेषां सुखवर्धनाय ।
परावबोधाय वचांसि यस्य धन्यस्त्रिलोकितिलक: स एव ॥
संधिविग्रह - दानाय लक्ष्मी: सुकृताय विद्या चिन्ता परेषां सुखवर्धनाय ।
परावबोधाय वचांसि यस्य धन्य: त्रिलोकितिलक: स: एव ॥
अन्वय - यस्य लक्ष्मी: दानाय, (यस्य) विद्या सुकृताय, (यस्य) चिन्ता परेषां सुखवर्धनाय, (यस्य) वचांसि परावबोधाय, स: त्रिलोकितिलक: धन्य: एव ।
अर्थ - ज्याची संपत्ती ही दानासाठी, विद्या पुण्यकर्म करण्यासाठी व विचार नेहेमी दुसर्याचे सुख वाढवण्याविषयी असतो, ज्याची वचने नेहेमी दुसर्याला ज्ञान देण्यासाठी असतात तो त्रैलोक्याला ललामभूत असणारा मनुष्य धन्य आहे.
२) विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ति: परपीडनाय ।
साधोस्तु सर्वं विपरीतमेतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥५-४॥
संधिविग्रह - विद्या विवादाय धनं मदाय खलस्य शक्ति: परपीडनाय । साधो: तु सर्वं विपरीतम् एतद् ज्ञानाय दानाय च रक्षणाय
अन्वय - खलस्य विद्या विवादाय, (खलस्य) धनं मदाय; (खलस्य) शक्ति: परपीडनाय (अस्ति) । साधो: तु सर्वं एतद् विपरीतम् । (साधो: विद्या) ज्ञानाय, (साधो: धनं) दानाय च (साधो: शक्ति:) रक्षणाय (अस्ति) ।
अर्थ - दुष्ट मनुष्याची विद्या ही भांडणासाठी असते, त्याचे धन हे गर्विष्ठ होण्यासाठी असते तर त्याचे बल हे दुसर्यांना त्रास देण्यासाठी असते, सज्जनांचे मात्र त्याच्या विरुद्ध असते. त्याची विद्या ही ज्ञानासाठी, धन हे दानासाठी व शक्ती ही दुसर्याचे रक्षण करण्यासाठी असते.
३) संक्षेपात् कथ्यते धर्मो जना: किं विस्तरेण वा ।
परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम् ॥
संधिविग्रह - संक्षेपात् कथ्यते धर्म: जना: किं विस्तरेण वा । परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम् ॥
अन्वय - जना:, संक्षेपात् धर्म: कथ्यते । विस्तरेण किं वा । परोपकार: पुण्याय (भवति) परपीडनम् पापाय (भवति) ।
अर्थ - हे लोकहो, संक्षेपात धर्माचे सार सांगतो. उगाच विस्तार करून काय उपयोग ? परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो तर परपीडा पापाला कारणीभूत होते.
४) कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यति । अस्पृशन्नेव वित्तानि य: परेभ्य: प्रयच्छति ॥१२-१॥
संधिविग्रह - कृपणेन सम: दाता न भूत: न भविष्यति । अस्पृशन् एव वित्तानि य: परेभ्य: प्रयच्छति
अन्वय - कृपणेन सम: दाता न भूत: न भविष्यति । य: अस्पृशन् एव वित्तानि परेभ्य: प्रयच्छति ।
अर्थ - कंजूष मनुष्यासारखा दानी मनुष्य पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही. कारण तो धनाला स्पर्श न करताच ते धन तो दुसर्याला देतो
आता चौथ्यागणाचे धातू पाहूया.
आपण पाहिलं की संस्कृतमधे परस्मैपद व आत्मनेपद या दोन गटात धातू विभागलेले आहेत. त्या गटांमधे सुद्धा १, ४, ६ व १० या धातूंची विकरणे अकारान्त असल्यामुळे धातूंची रूपे जवळपास सारखी होतात. म्हणून या चार गणांचा एक गट पडतो व उरलेले गण दुसर्या गटात पडतात. सध्या आपण याच चार गणातील रूपे कशी होतात ते पहाणार आहोत.
पहिल्या गणाचे परस्मैपदी व आत्मनेपदी धातू आपण पाहिले. आता चौथ्या गणातील धातू पाहूया. चौथ्या गणाचे विकरण आहे ‘य’. त्यामुळे धातूला प्रत्यय लावतांना प्रथम ‘य’ हे विकरण लावायचे व मग त्याला क्रियापदांचे प्रत्यय लावायचे.
उदा. नृत् (४ प. प.) = नाचणे. हा धातू चौथ्या गणाचा आहे. म्हणून नृत् + य = नृत्य हे धातूचे अंग तयार झाले. आता त्याच्या पुढे क्रियापदाचे परस्मैपदी प्रत्यय येतील.
नृत्यामि नृत्याव: नृत्याम: प्रथम पुरुष.
नृत्यसि नृत्यथ: नृत्यथ द्वितीय पुरुष.
नृत्यति नृत्यत: नृत्यन्ति तृतीय पुरुष.
आता इथे प्रथम गण व चतुर्थ गणातील धातू स्पष्टपणे ओळखता येतो.
नमामि नृत्यामि. चौथ्या गणातील धातूंमधे य हे विकरणाचे अक्षर स्पष्टपणे क्रियापदामधे दिसते.
चौथ्या गणाचे धातू आत्मनेपदी असतील तर त्या धातूला य हे विकरण लागून पुढे आत्मनेपदी प्रत्यय लागतील.
उदा. युध् (४ आ. प.) = युद्ध करणे
युध् + य् (हे विकरण) = युध्य हे झाले धातूचे अंग. आता यापुढे आत्मनेपदी प्रत्यय येतील.
युध्ये युध्यावहे युध्यामहे
युध्यसे युध्येथे युध्यध्वे
युध्यते युध्येते युध्यन्ते

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment