१) संसारकटुवृक्षस्य द्वे फले अमृतोपमे ।
सुभाषितरसास्वाद: सङ्गति: सुजनै: सह ॥२-३॥
अर्थ - संसाररूपी कडु वृक्षाची दोन फळे अमृताप्रमाणे (गोड) आहेत. एक म्हणजे सुभाषितांच्या रसाचा आस्वाद व दुसरे म्हणजे सज्जनांबरोबर संगत.
२) सुभाषितरस्वाद: सज्जनै: सह सङ्गति: ।
सेवा विवेकिभूपस्य दु:खनिर्मूलनं त्रयम् ॥२-९॥
अर्थ - सुभाषितांच्या रसाचा आस्वाद, सज्जनांबरोबर संगत व विवेकी राजाची सेवा या तीन गोष्टी दु:ख समूळ नाहीसे करतात.
किं = काय उपयोग
३) किं कुलेन विशालेन शीलमेवात्र कारणम् ।
कृमय: किं न जायन्ते कुसुमेषु सुगन्धिषु ॥३८-११॥
अर्थ - केवळ कुळ मोठे असून उपयोग काय ? (मोठेपणासाठी) खरतर चारित्र्यच कारणीभूत आहे. सुगंधी फुलांमधे कीटक नाही का निर्माण होत ?
शीलम् + एव + अत्र
४) किं कोकिलस्य विरुतेन गते वसन्ते किं कातरस्य बहुशस्त्रपरिग्रहेण ।
मित्रेण किं व्यसनकालपराङ्मुखेन किं जीवितेन पुरुषस्य निरक्षरेण ॥४७-१॥
अर्थ - वसंत ऋतू निघून गेल्यावर कोकिळ पक्ष्याच्या ओरडण्याचा काय उपयोग ? भित्र्या मनुष्याने अनेक शस्त्रांचा साठा करून काय उपयोग ? संकटकाळी पराङ्मुख होणार्या मित्राचा काय उपयोग ? तसेच निरक्षर मनुष्य जगून तरी काय उपयोग ?

"३२ वा पाठ सह अव्ययाचा उपयोग " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment