Tuesday, July 7, 2020

पाठ २२ वा सुभाषित ५

कालच्या तासाला आपण विशेषणांची माहिती पाहिली. संस्कृत भाषेत विशेषणे नेहेमी नामाच्या लिंग, विभक्ती व वचन यांच्याप्रमाणेच येतात. म्हणजे दोघांचेही लिंग, विभक्ती व वचन एकच असते. आज आपण त्या धर्तीची सुभाषिते पाहू.

७) काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेद: पिककाकयो: । वसन्तसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ॥७४-३०॥

संधिविग्रह - काक: कृष्ण: पिक: कृष्ण: क: भेद: पिककाकयो: । वसन्तसमये प्राप्ते, काक: काक: पिक: पिक: ।

अन्वय - काक: कृष्ण: (अस्ति) । पिक: कृष्ण: (अस्ति) । क: भेद: पिककाकयो: ? वसन्तसमये प्राप्ते, काक: काक: पिक: पिक: ।

कृष्ण = काळा
पिक = कोकिळ

अर्थ - कावळा काळा असतो, कोकिळपक्षीही काळा असतो. मग कावळा व कोकिळ यांच्यात फरक काय ? वसंतऋतू आल्यावर कावळा हा कावळा असतो व कोकिळ हा कोकिळ असतो. (वसंत ऋतू आल्यावर कोकिळ कुहू कुहू ओरडतो, पण कावळा मात्र काव कावच करतो).

८) हंस: श्वेतो बक: श्वेत: को भेद: हंसबकयो: । नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बक: ॥७४-३१॥

संधिविग्रह - हंस: श्वेत: बक: श्वेत: क: भेद: हंसबकयो: । नीरक्षीरविवेके तु, हंस: हंस: बक: बक: ।

अन्वय - हंस: श्वेत: (अस्ति) । बक: श्वेत: (अस्ति) । क: भेद: हंसबकयो: ?
 नीरक्षीरविवेके तु, हंस: हंस: बक: बक: ।

अर्थ - हंस पांढर्‍या रंगाचा आहे, बगळा पांढर्‍या रंगाचा आहे, मग हंस व बगळा यात फरक काय ? दूध व पाणी वेगळे करण्याच्या बाबतीत हंस हा हंस असतो व बगळा हा बगळा असतो.

कालच्या भूपाळीतील एक श्लोक आज आपण पहाणार आहोत.

रविरुदयाचलमागमिष्यति जगत्प्रकाशयितुम् ।
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन्नज्ञानं हन्तुम् ॥ध्रु॥

संधिविग्रह - रवि: उदयाचलम् आगमिष्यति जगत् प्रकाशयितुम्
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन् अज्ञानम् हन्तुम् ॥

अन्वय - जगत् प्रकाशयितुम् रवि: उदयाचलम् आगमिष्यति ।
(हे) स्वामिन् जागृहि, अज्ञानम् हन्तु
 (हे) स्वामिन् जागृहि ॥

अर्थ - सर्व जगाला प्रकाशित करण्यासाठी सूर्य उदयाचलावर येईल. हे स्वामीराया आपण जागे व्हा, आपणही आमच्या अज्ञानाचा समूळ नाश करण्यासाठी जागे व्हा.

षड्रिपुस्थानं चञ्चलहृदयमाशामभिपतति
कामक्रोधैर्विप्रकृतमिदं विवेकं उत्सृजति ।
आह्वयामि त्वां स्वामिन् स्वामिन् मार्गं दर्शयितुम्
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन्नज्ञानं हन्तुम् ॥१॥

संधिविग्रह - षड्रिपुस्थानं चञ्चलहृदयम् आशाम् अभिपतति
कामक्रोधै: विप्रकृतम् इदं विवेकं उत्सृजति ।
आह्वयामि त्वां स्वामिन् स्वामिन् मार्गं दर्शयितुम्
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन् अज्ञानं हन्तुम् ॥१॥

 अर्थ - षड्रिपुंचे स्थान असलेले हे माझे हृदय आशेवर तुटून पडत आहे. कामक्रोधांनी गांजलेले हे मन विवेकाचाही त्याग करत आहे. हे स्वामीराया, मार्ग दाखवण्यासाठी मी तुम्हाला हाका मारत आहे. म्हणून आपण आमच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी जागे व्हा. 



" पाठ २२ वा सुभाषित ५ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...