WHATSAPP वर नव्याने संस्कृत शिकण्यासाठी "संस्कृत भाषा अध्ययन्" नांवे एक ग्रूप तयार करण्यात आला. त्यातील सर्व लेख या ’ब्लॉग’ मध्ये येणार आहेत. सौ. मनिषा अभ्यंकर या मुख्यत्वें संचालन करतील.त्याची भूमिका खालील ध्वनिफितीतून सांगते -
Whatsapp Group 'संस्कृत अध्ययना'मागीक भूमिका

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नमस्कार. सर्व सदस्यांचे हार्दिक स्वागत आहे संस्कृत अध्ययनाच्या ग्रुपमधे. नवीन ऍकॅडेमिक वर्षाच्या सुमुहूर्तावर संस्कृत भाषाध्ययन सुरू झाले आहे. पण आपण कोणाकडून संस्कृत शिकत आहोत याची उत्सुकता असल्यामुळे मी माझा परिचय थोडक्यात देत आहे.
मी सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर (M. A. एम् संपूर्ण संस्कृत)
शिक्षण चालू असतांनाच लग्न झाल्यामुळे शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. नंतर मुलं लहान असल्यामुळे लग्नानंतरची पंधरा वर्षे संसारात फार बिझी गेली. पण शिक्षणाची ओढ काही कमी होत नव्हती. नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून मी १९९१ ते १९९३ तीन वर्ष संस्कृत घेऊन Ex. B. A. केले. तेथेही मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नंतर शिवाजी विद्यापीठातून संस्कृत घेऊन M. A. केले. शिवाजी विद्यापीठाचे मला गोल्डमेडल मिळाले. सर्हिस कधी केली नाही. कारण तशी आवश्यकता नव्हती. पण २० वर्ष संस्कृतचे शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेत होते. आता दोन वर्षापूर्वी बंद केले आहेत.
सध्या विविध मासिकातून पारमार्थिक ग्रंथावर लेखन चालू आहे.
प्रकाशित पुस्तके
१) रामकृष्ण - विवेकानंद गुरुशिष्यसंबंध
२) कथांजली - विवेकानंदांनी व्याख्यानातून सांगितलेल्या कथांचे संकलन.
३) ये हृदयीचे - रामकृष्णवचनामृतातील रामकृष्ण व विवेकानंद यांच्यात झालेल्या संवादांचे संकलन.
ही तिन्ही पुस्तके विवेकानंदकेंद्र पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेली आहेत.
४) अभंग मनोबोध - मनाच्या श्लोकांचे अभंग रूपांतर - हे पुस्तक कोल्हापूरच्या अथर्व प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
अभंग मनोबोध सत्संगधारा.com या साईटवर उपलब्ध आहे.
माझे काही साहित्य
soham-hansa.co.uk या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर
No comments:
Post a Comment