मागच्या पाठात आपण संस्कृत वाक्यरचना करतांना कर्त्याप्रमाणे क्रियापदांची योजना कशी कराय़ची ते पाहिले. तसेच वन या नपुं शब्दाची रूपे कशी होतात ते पाहिले.
संस्कृतमधे वचने तीन असल्यामुळे प्रत्येक पुरुषाचे ३/३ कर्ते असे नऊ कर्ते येतात. त्याप्रमाणे त्यापुढे नऊ क्रियापदे येतात हे आपण पाहिले.
कर्ता म्हणजे क्रियापदाने सांगितलेली क्रिया करणारा तो कर्ता. आता एक शंका येईल की कर्ता म्हणजे सजीव हवा का ? पण वाक्यप्रयोगात कर्ता सजीवच असण्याची आवश्यकता नाही. दरड कोसळली, पाणी भरले, फळे पडली वगैरे वाक्यात दरड, पाणी, फळे हे त्या वाक्यांचे कर्ते झाले. वाक्यातली क्रिया करणारा तो कर्ता. कर्ता या नात्याने तो क्रियापदाशी जोडला आहे. कर्ताकारकाची प्रथमा विभक्ती असते. तर कर्म हे कियापदाशी त्या क्रियापदाचे कर्म या नात्याने जोडलेले असते. त्याला म्हणायचं कर्मकारक. कर्मकारकाची द्वितीया विभक्ती असते. वाक्यात कर्म नेहेमी द्वितीया विभक्तीत योजावयाचे.
उदा. बाल: देवं नमति ।
या वाक्यात नम् = नमस्कार करणे या धातूचे तृ. पु. ए. व. वापरले आहे. कारण नमस्कार करण्याची क्रिया करणारा ‘बाल’ हा शब्द तृतीय पुरुषी ए. व. आहे. तर नमस्कार करण्याची क्रिया ज्याच्यावर घडते तो देव शब्द हा या वाक्यातील कर्म आहे. म्हणून त्या शब्दाची द्वितीया विभक्ती योजली आहे. म्हणजे मुलगा देवाला वंदितो. येथे बाल (मुलगा) हा नमति या क्रियापदाचा कर्ता आहे. बाल: तृ. पु. ए. व. म्हणून क्रियापद तृ. पु. ए. व.
बाला: देवं नमन्ति । या वाक्यात कर्ता बहुवचनी आला. म्हणून क्रियापद बहुवचनी आले. कर्म मात्र दोन्ही वाक्यात एकवचनीच आले आहे. सगळ्या देवांना नमस्कार करतो असे म्हणायचे असेल तर कर्म बहुवचनी वापरावयाचे.
बाल: देवान् नमति । किंवा बाला: देवान् नमन्ति ।
आता अशीच काही वाक्ये पाहूया.
खालील सर्व वाक्ये कर्ता, कर्म व क्रियापद अशा तीन शब्दांनी युक्त आहेत. कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. कर्म द्वितीया विभक्तीत आहे व क्रियापद कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे आहे.
१) अहं अवगुणान् त्यजामि ।
२) त्वं फलानि खादसि ।
३) स: लेखं लिखति ।
४) भक्ता: देवान् अर्चन्ति ।
५) दुर्जना: सजन्नान् निन्दन्ति ।
६) आवाम् जलं पिबाम: ।
७) नृप: धनं यच्छति ।
८) यूयं परमेशं ध्यायथ ।
१०) दुर्जना: उपकारान् न स्मरन्ति ।
११) शिक्षका: ज्ञानं यच्छन्ति ।
१२) छात्रा: पुस्तकानि पठन्ति ।
१३) युवां दोषान् पश्यथ: ।
१४) सिंह: मांसं खादति ।
१५) गजा: मांसं न खादन्ति ।
मागच्या दोन चार पाठात मी पहिल्या गणाच्या क्रियापदांची यादी दिली होती. त्यात त्या धातूला प्रत्यय लावून आपण रूपे तयार केली.
संस्कृतमधे अशी काही क्रियापदं आहेत की त्यांचे मूळ रूप एक असते व प्रत्यय दुसर्या रूपाला लागतात.
उदा. - कृष्-कर्ष् (१ प. प.) ओढणे, खेचणे, आकर्षून घेणे. असे याचे अर्थ आहेत. या धातूत मूळ धातू आहे कृष्, पण चालतांना कर्ष होतो व त्याला प्रत्यय लागतात. कृष् याला प्रत्यय लागत नाहीत.
कर्षामि कर्षाव: कर्षाम:
कर्षसि कर्षथ: कर्षथ
कर्षति कर्षत: कर्षन्ति ।
अशाच आणखी काही धातूंची यादी आज तुम्हाला देते.
१) क्रम्-क्राम् = चालणे २) क्रुश्-क्रोश् = आक्रोश करणे ३) क्षि-क्षय् = झिजणे ४) गम्-गच्छ् = जाणे ५) गै-गाय् = गाणे ६) ग्लै-ग्लाय् = थकणे ७) घ्रा-जिघ्र् = वास घेणे ८) तृ-तर् = तरून जाणे ९) दंश्-दश् चावणे १०) दा-यच्छ् = देणे ११) दृश्-पश्य् = पहाणे १२) द्रु-द्रव् = वितळणे १३) ध्यै-ध्याय् - चिंतन करणे, ध्यान करणे १४) नी-नय् = नेणे १५) पा-पिब् = पिणे १६) भू-भव् = होणे, असणे. म्लै-म्लाय् = कोमेजणे १७) रुह्-रोह् = उगवणे १८) शुच्-शोच् = शोक करणे १९) श्रि-श्रय् - आश्रय घेणे २०) सद्-सीद् = खचणे २१) सृ-सर् = जाणे २२) स्था-तिष्ठ् = थांबणे, उभे रहाणे २३) स्मृ-स्मर् = आठवणे २४) स्रु-स्रव् - गळणे २५) हृ-हर् = हरण करणे २६) ह्वे-ह्वय् = हाक मारणे २७) बुध्-बोध् = जाणणे.
वरील सर्व क्रियापदांमधे मूळ धातू व त्यापुढे डॅश काढून चालणारा धातू दाखवला आहे. हे सर्व शब्द आपल्या मराठीत आपण वापरतो. त्यामुळे परिचयाचे आहेत.
वर संस्कृत वाक्ये दिली आहेत. त्यांचे मराठीत भाषांतर करा. व खाली मराठी वाक्ये दिली आहेत. त्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
जर कोणाला आठवले नाहीत तर कंसात त्या मराठी शब्दाला संस्कृत प्रतिशब्द दिले आहेत.
खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) गायक गाणे (गीत) गातो.
२) साप कुंभाराला (कुम्भकार) चावतो.
३) मुले पाणी (जल) पितात.
४) तू लेख लिहितोस.
५) आम्ही दोघे फळे खातो.
६) लोक चोराला (तस्कर) निंदतात.
७) राजा लोकांना (लोक) रक्षितो.
८) शेतकरी बियाणे (बीज) पेरतो.
९) आम्ही सर्व गाणी (गीत) गातो.
१०) तुम्ही दोघे पुस्तक (पुस्तक) नेता.
पाठ १६ ची उत्तरे
१) अहं अवगुणान् त्यजामि ।
मी अवगुण टाकतो.
२) त्वं फलानि खादसि ।
तू फळे खातोस
३) स: लेखं लिखति ।
तो लेख लिहीतो.
४) भक्ता: देवान् अर्चन्ति ।
भक्त देवाला पूजतात.
५) दुर्जना: सजन्नान् निन्दन्ति ।
दुर्जन सज्जनांना निंदितात.
६) आवाम् जलं पिबामः ।
आम्ही दोघे पाणी पितो.
७) नृप: धनं यच्छति ।
राजा धन देतो.
८) यूयं परमेशं ध्यायथ ।
तुम्ही सर्व परमेश्वराला चिंतिता.
१०) दुर्जना: उपकारान् न स्मरन्ति ।
दुर्जन उपकार स्मरत नाहीत.
११) शिक्षका: ज्ञानं यच्छन्ति ।
शिक्षक ज्ञान देतात.
१२) छात्रा: पुस्तकानि पठन्ति ।
विद्यार्थी पुस्तके अभ्यासतात.
१३) युवां दोषान् पश्यथ: ।
तुम्ही दोघे दोष पहाता.
१४) सिंह: मांसं खादति ।
सिंह मांस खातो.
१५) गजा: मांसं न खादन्ति ।
हत्ती मांस खात नाहीत.
खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) गायक गाणे (गीत) गातो.
गायक: गीतं गायति ।
२) साप कुंभाराला (कुम्भकार) चावतो.
सर्प: कुम्भकारं दशति ।
३) मुले पाणी (जल) पितात.
बालका: जलं पिबन्ति ।
४) तू लेख लिहितोस.
त्वं लेखं लिखसि ।
५) आम्ही दोघे फळे खातो.
आवां फलानि खादाव: ।
६) लोक चोराला (तस्कर) निंदतात.
जना: तस्करान् निन्दन्ति ।
७) राजा लोकांना (लोक) रक्षितो.
नृप: लोकान् रक्षति ।
८) शेतकरी बियाणे (बीज) पेरतो.
कृषीवल: बीजानि वपति ।
९) आम्ही सर्व गाणी (गीत) गातो.
वयं गीतानि गायाम: ।
१०) तुम्ही दोघे पुस्तक (पुस्तक) नेता.
यूवां पुस्तकानि नयथ: ।

" पाठ १६) कर्मकारक " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment