Tuesday, June 30, 2020

पाठ १७ वा सुभाषित ३

नमस्कार

आज आपण सुभाषितांचा पाठ घेणार आहोत. आपण कर्ता व कर्म यांची वाक्यात योजना कशी करायची ते पाहिले. कर्त्याची प्रथमा विभक्ती व कर्माची द्वितीया विभाक्ती योजावयाची. आणि क्रियापद कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे ठेवायचे. आता आपण त्या धर्तीचे सुभाषित पाहूया.

१) अधमा धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमा: । उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम् ॥

संधिविग्रह - अधमा: धनम् इच्छन्ति धनं मानं च मध्यमा: । उत्तमा: मानम् इच्छन्ति मान: हि महतां धनम् ॥

अन्वय - अधमा: धनम् इच्छन्ति । मध्यमा: धनं मानं च (इच्छन्ति) । उत्तमा: मानम् इच्छन्ति । हि मान: महतां धनम् ॥

अर्थ - कनिष्ठ लोक धन इच्छितात, मध्यम लोक हे धन व मान इच्छितात. उत्तम लोक हे मान इच्छितात. कारण मान हेच मोठ्या लोकांचे धन असते.

२) वयोवृद्धास्तपोवृद्धा ज्ञानवृद्धाश्च ये परे ।
ते सर्वे धनवृद्धस्य द्वारि तिष्ठन्ति किङ्करा: ॥


संधिविग्रह - वयोवृद्धा: तपोवृद्धा: ज्ञानवृद्धा: च ये परे । ते सर्वे धनवृद्धस्य द्वारि तिष्ठन्ति किङ्करा: ॥

अन्वय - ये  वयोवृद्धा: तपोवृद्धा: परे च ज्ञानवृद्धा: (सन्ति) । ते सर्वे धनवृद्धस्य द्वारि किङ्करा: (इव) तिष्ठन्ति ।

अर्थ - जे वयाने मोठे, तपश्चर्येने मोठे आणि दुसरे जे ज्ञानाने मोठे असे लोक असतात ते सगळे धनाने संपन्न असलेल्या मनुष्याच्या दारात सेवकाप्रमाणे तिष्ठत असतात.

३) यस्यास्ति वित्तं स नर: कुलीन: स: पण्डित: स: श्रुतवान् गुणज्ञ: । स एव वक्ता स च दर्शनीय: सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ति ॥

संधिविग्रह - यस्य अस्ति वित्तं स: नर: कुलीन: स: पण्डित: स: श्रुतवान् गुणज्ञ: । स: एव वक्ता स: च दर्शनीय: सर्वे गुणा: काञ्चनम् आश्रयन्ति ॥

अन्वय - यस्य वित्तं अस्ति, स: नर: कुलीन:, स: पण्डित:, स: श्रुतवान्, गुणज्ञ:, स: एव वक्ता, स: च दर्शनीय: । सर्वे गुणा: काञ्चनम् आश्रयन्ति ॥

अर्थ - ज्याच्याजवळ धन असते तो मनुष्य घरंदाज, विद्वान, शास्त्रज्ञ, रसिक, वाक्पटु व सुंदरही (समजला जातो). कारण सर्व गुण द्रव्यावर अवलंबून असतात.

६८) अमन्त्रमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् । अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ: ॥७४-६८॥

संधिविग्रह - अमन्त्रम् अक्षरं न अस्ति न अस्ति मूलम् अनौषधम् । अयोग्य: पुरुष: न अस्ति योजक: तत्र दुर्लभ: ॥

अन्वय - अमन्त्रम् अक्षरं न अस्ति । अनौषधम् मूलम् न अस्ति ।
 अयोग्य: पुरुष: न अस्ति । योजक: तत्र दुर्लभ: (अस्ति) ॥

अर्थ - मंत्र नसलेले असे एकही अक्षर नाही, औषध नसलेले असे एकही मूळ नाही व योग्यता नसलेला असा एकही मनुष्य नाही. योजना करणारा हाच त्या त्या बाबतीत दुर्मिळ असतो. 



" पाठ १७ वा सुभाषित ३ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Monday, June 29, 2020

पाठ १६) कर्मकारक

मागच्या पाठात आपण संस्कृत वाक्यरचना करतांना कर्त्याप्रमाणे क्रियापदांची योजना कशी कराय़ची ते पाहिले. तसेच वन या नपुं शब्दाची रूपे कशी होतात ते पाहिले.

संस्कृतमधे वचने तीन असल्यामुळे प्रत्येक पुरुषाचे ३/३ कर्ते असे नऊ कर्ते येतात. त्याप्रमाणे त्यापुढे नऊ क्रियापदे येतात हे आपण पाहिले.

कर्ता म्हणजे क्रियापदाने सांगितलेली क्रिया करणारा तो कर्ता. आता एक शंका येईल की कर्ता म्हणजे सजीव हवा का ?  पण वाक्यप्रयोगात कर्ता सजीवच असण्याची आवश्यकता नाही. दरड कोसळली, पाणी भरले, फळे पडली वगैरे वाक्यात दरड, पाणी, फळे हे त्या वाक्यांचे कर्ते झाले. वाक्यातली क्रिया करणारा तो कर्ता. कर्ता या नात्याने तो क्रियापदाशी जोडला आहे. कर्ताकारकाची प्रथमा विभक्ती असते. तर कर्म हे कियापदाशी त्या क्रियापदाचे कर्म या नात्याने जोडलेले असते. त्याला म्हणायचं कर्मकारक. कर्मकारकाची द्वितीया विभक्ती असते. वाक्यात कर्म नेहेमी द्वितीया विभक्तीत योजावयाचे.
उदा. बाल: देवं नमति ।

या वाक्यात नम् = नमस्कार करणे या धातूचे तृ. पु. ए. व. वापरले आहे. कारण नमस्कार करण्याची क्रिया करणारा ‘बाल’ हा शब्द तृतीय पुरुषी ए. व. आहे. तर नमस्कार करण्याची क्रिया ज्याच्यावर घडते तो देव शब्द हा या वाक्यातील कर्म आहे. म्हणून त्या शब्दाची द्वितीया विभक्ती योजली आहे. म्हणजे मुलगा देवाला वंदितो. येथे बाल (मुलगा) हा नमति या क्रियापदाचा कर्ता आहे. बाल: तृ. पु. ए. व. म्हणून क्रियापद तृ. पु. ए. व.
बाला: देवं नमन्ति । या वाक्यात कर्ता बहुवचनी आला. म्हणून क्रियापद बहुवचनी आले. कर्म मात्र दोन्ही वाक्यात एकवचनीच आले आहे. सगळ्या देवांना नमस्कार करतो असे म्हणायचे असेल तर कर्म बहुवचनी वापरावयाचे.

बाल: देवान् नमति । किंवा बाला: देवान् नमन्ति ।

आता अशीच काही वाक्ये पाहूया.


खालील सर्व वाक्ये कर्ता, कर्म व क्रियापद अशा तीन शब्दांनी युक्त आहेत. कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. कर्म द्वितीया विभक्तीत आहे व क्रियापद कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे आहे.

१) अहं अवगुणान् त्यजामि ।
२) त्वं फलानि खादसि ।
३) स: लेखं लिखति ।
४) भक्ता: देवान् अर्चन्ति ।
५) दुर्जना: सजन्नान् निन्दन्ति ।
६) आवाम् जलं पिबाम: ।
७) नृप: धनं यच्छति ।
८) यूयं परमेशं ध्यायथ ।
१०) दुर्जना: उपकारान् न स्मरन्ति ।
११) शिक्षका: ज्ञानं यच्छन्ति ।
१२) छात्रा: पुस्तकानि पठन्ति ।
१३) युवां दोषान् पश्यथ: ।
१४) सिंह: मांसं खादति ।
१५) गजा: मांसं न खादन्ति ।

मागच्या दोन चार पाठात मी पहिल्या गणाच्या क्रियापदांची यादी दिली होती. त्यात त्या धातूला प्रत्यय लावून आपण रूपे तयार केली.

    संस्कृतमधे अशी काही क्रियापदं आहेत की त्यांचे मूळ रूप एक असते व प्रत्यय दुसर्‍या रूपाला लागतात.
उदा. - कृष्-कर्ष् (१ प. प.) ओढणे, खेचणे, आकर्षून घेणे. असे याचे अर्थ आहेत. या धातूत मूळ धातू आहे कृष्, पण चालतांना कर्ष होतो व त्याला प्रत्यय लागतात. कृष् याला प्रत्यय लागत नाहीत.

कर्षामि  कर्षाव:  कर्षाम:
कर्षसि  कर्षथ:   कर्षथ
कर्षति  कर्षत: कर्षन्ति ।

अशाच आणखी काही धातूंची यादी आज तुम्हाला देते.

१) क्रम्-क्राम् = चालणे २) क्रुश्-क्रोश् = आक्रोश करणे ३) क्षि-क्षय् = झिजणे ४) गम्-गच्छ् = जाणे ५) गै-गाय् = गाणे ६) ग्लै-ग्लाय् = थकणे ७) घ्रा-जिघ्र् = वास घेणे ८) तृ-तर् = तरून जाणे ९) दंश्-दश् चावणे १०) दा-यच्छ् = देणे ११) दृश्-पश्य् = पहाणे १२) द्रु-द्रव् = वितळणे १३) ध्यै-ध्याय् - चिंतन करणे, ध्यान करणे १४) नी-नय् = नेणे १५) पा-पिब् = पिणे १६) भू-भव् = होणे, असणे. म्लै-म्लाय् = कोमेजणे १७) रुह्-रोह् = उगवणे १८) शुच्-शोच् = शोक करणे १९) श्रि-श्रय् - आश्रय घेणे २०) सद्-सीद् = खचणे २१) सृ-सर् = जाणे २२) स्था-तिष्ठ् = थांबणे, उभे रहाणे २३) स्मृ-स्मर् = आठवणे २४) स्रु-स्रव् - गळणे २५) हृ-हर् = हरण करणे २६) ह्वे-ह्वय् = हाक मारणे २७) बुध्-बोध् = जाणणे.

वरील सर्व क्रियापदांमधे मूळ धातू व त्यापुढे डॅश काढून चालणारा धातू दाखवला आहे. हे सर्व शब्द आपल्या मराठीत आपण वापरतो. त्यामुळे परिचयाचे आहेत.

वर संस्कृत वाक्ये दिली आहेत. त्यांचे मराठीत भाषांतर करा. व खाली मराठी वाक्ये दिली आहेत. त्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
जर कोणाला आठवले नाहीत तर कंसात त्या मराठी शब्दाला संस्कृत प्रतिशब्द दिले आहेत.

खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) गायक गाणे (गीत) गातो.
२) साप कुंभाराला (कुम्भकार) चावतो.
३) मुले पाणी (जल) पितात.
४) तू लेख लिहितोस.
५) आम्ही दोघे फळे खातो.
६) लोक चोराला (तस्कर) निंदतात.
७) राजा लोकांना (लोक) रक्षितो.
८) शेतकरी बियाणे (बीज) पेरतो.
९) आम्ही सर्व गाणी (गीत) गातो.
१०) तुम्ही दोघे पुस्तक (पुस्तक) नेता.

पाठ १६ ची उत्तरे
१) अहं अवगुणान् त्यजामि ।
मी अवगुण टाकतो.

२) त्वं फलानि खादसि ।
तू फळे खातोस

३) स: लेखं लिखति ।
तो लेख लिहीतो.

४) भक्ता: देवान् अर्चन्ति ।
भक्त देवाला पूजतात.

५) दुर्जना: सजन्नान् निन्दन्ति ।
दुर्जन सज्जनांना निंदितात.

६) आवाम् जलं पिबामः ।
आम्ही दोघे पाणी पितो.

७) नृप: धनं यच्छति ।
राजा धन देतो.

८) यूयं परमेशं ध्यायथ ।
तुम्ही सर्व परमेश्वराला चिंतिता.

१०) दुर्जना: उपकारान् न स्मरन्ति ।
दुर्जन उपकार स्मरत नाहीत.

११) शिक्षका: ज्ञानं यच्छन्ति ।
शिक्षक ज्ञान देतात.

१२) छात्रा: पुस्तकानि पठन्ति ।
विद्यार्थी पुस्तके अभ्यासतात.

१३) युवां दोषान् पश्यथ: ।
तुम्ही दोघे दोष पहाता.

१४) सिंह: मांसं खादति ।
सिंह मांस खातो.

१५) गजा: मांसं न खादन्ति ।
हत्ती मांस खात नाहीत.


खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) गायक गाणे (गीत) गातो.
गायक: गीतं गायति ।

२) साप कुंभाराला (कुम्भकार) चावतो.
सर्प: कुम्भकारं दशति ।

३) मुले पाणी (जल) पितात.
बालका: जलं पिबन्ति ।

४) तू लेख लिहितोस.
त्वं लेखं लिखसि ।

५) आम्ही दोघे फळे खातो.
आवां फलानि खादाव: ।

६) लोक चोराला (तस्कर) निंदतात.
जना: तस्करान् निन्दन्ति ।

७) राजा लोकांना (लोक) रक्षितो.
नृप: लोकान् रक्षति ।

८) शेतकरी बियाणे (बीज) पेरतो.
कृषीवल: बीजानि वपति ।

९) आम्ही सर्व गाणी (गीत) गातो.
वयं गीतानि गायाम: ।

१०) तुम्ही दोघे पुस्तक (पुस्तक) नेता.
यूवां पुस्तकानि नयथ: ।

" पाठ १६) कर्मकारक " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Saturday, June 27, 2020

संस्कृतसाहित्याची ओळख - १) वेदवाङ्‌मय

नमस्कार.

आपण संस्कृत भाषा शिकत आहोत त्याच बरोबर आता आपण आठवड्यातून एकदा दर शनिवारी संस्कृतमधील साहित्याविषयी थोडेफार जाणून घेणार आहोत. संस्कृत साहित्य हे विशाल समुद्रासारखे आहे. कारण हजारो वर्षे या भाषेमधे ग्रंथरचना होत गेली आहे. आयुर्वेदादी विषयांवरील हजारो हस्तलिखिते अजूनही पडून आहेत. त्यांना अजूनही पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्याचा योग आलेला नाही.

काळ -
संस्कृतभाषा ही सर्व जगातील प्राचीन भाषा हे आपण पाहिले. ह्या भाषेला प्राचीन भाषा म्हणण्याचे कारण काय ? तर या भाषेत उपलब्ध असलेले साहित्य सर्वात प्राचीन आहे. इतर कोणत्याही भाषेत इतके प्राचीन साहित्य उपलब्ध होत नाही.

संस्कृत साहित्यातील सगळ्यात प्राचीन साहित्य कोणते ? तर वेदवाङ्मय. हे वाङ्मय केव्हा रचले गेले ? विद्वानांमधे त्याविषयी मतभेद आहेत. मुळात आपल्याकडे इतिहासलेखनाची पद्धत नाही. म्हणजे काटेकोर इतिहास लिहिला गेलेला नाही. वास्तविक महाभारत हा इतिहासग्रंथच आहे. पण तो स्वत:ला पुराण म्हणवतो. एकूणच संस्कृत साहित्यात इतिहास ग्रंथ नगण्य आहेत. राजतरंगिणी या ग्रंथात थोडा काश्मिरचा इतिहास आहे. पण आपण खरेतर इतिहासलेखन शिकलो ते इंग्रजांकडून. इंग्रजांनी वेदवाङ्मयावर खूप संशोधन केलेले आहे. हे साहित्य फार जुने नाही हे ठरवण्याकडे इंग्रजांचा कल होता. त्यामुळे ते वेदांचा काळ इ.स. च्या जवळ आणतात. कीथ, मॅक्डोनल, विंटरनिट्झ वगैरे इंग्लिश लेखकांचे संस्कृत साहित्याचा इतिहास लिहिलेले ग्रंथ प्रसिद्ध आहेत. (आपल्याला सध्या मॅक्डोनल हे नाव फक्त बर्गरच्या संदर्भात माहीत आहे. पण मॅक्डोनल नावाचा एक इतिहाससंशोधक होऊन गेला आहे.) मॅक्समूलर हे तर कधीही भारतात आले नाहीत. पण त्यांनी ४० वर्षे वेदांचा अभ्यास केला व त्यांनी वेदांची छापिल प्रत उपलब्ध करून दिली. आपण लोकांनी तर ह्याबाबतीत खूपच अनास्था दाखवली आहे. नंतर इंग्रजांचे पाहून भारतीय पंडित सरसावले व त्यांनीही वेदांचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला. वेदांचा हा काळ इ.स.च्या मागे जितका नेता येईल तितका न्यायचा असा भारतीय पंडितांचा कल होता. वेद वाङ्मय इ.स. पूर्वी लाखोवर्षे ते २५००० वर्षांपर्यंत झाले आहे अशी मतांमधे विविधता आहे. पण लो. टिळकांनी त्यात आलेल्या ग्रहतार्‍यांच्या उल्लेखावरून वेदांचा काळ इ. स. पूर्व ६ ते ८ हजार वर्षे असावा असे मानले आहे. खगोलशास्त्राच्या आधारे हा काळ ठरवला असल्यामुळे तो प्रमाण मानण्यास हरकत नाही. एकूण हे वाङ्मय आठ ते दहा हजार वर्षांपूर्वीचे आहे असे मानण्यास प्रत्यवाय नाही.

संहिता -

आपण वेदवाङ्मयाला संहिता असे म्हणतो. संहिता हा शब्द सम् + धा = गोळा करणे ह्या धातूपासून बनलेला आहे. संहित म्हणजे गोळा केलेले. प्राचीनकाळी निरनिराळ्या देवतांना उद्देशून ऋषींनी सूक्ते रचली. हा कालावधी सुद्धा खूप मोठा आहे. वेदातील काही सूक्ते ही खूप प्राचीन आहेत तर काही सूक्ते त्यातल्या त्यात अर्वाचीन आहेत. असा खूप काळ लोटल्यावर ऋषींना हे सर्व वाङ्मय जतन करून ठेवावे असे वाटू लागले. जागतिक प्रलय, किंवा आतासारखी महामारी असे काहीतरी कारणही घडले असेल की त्यामुळे ही सूक्ते संगृहीत करण्याची गरज भासू लागली. त्यातूनच उपलब्ध होतील त्या सर्व सूक्तांचे संकलन केले गेले व त्याला संहिता असे नाव देण्यात आले.


ईश्वराचे नि:श्वसित -

आपण भारतीय लोक वेदाला ईश्वराचे नि:श्वसित असे म्हणतो. ईश्वराच्या श्वासोच्छ्वासातून आपल्याला हे वेद मिळालेले आहेत अशी आपली धारणा आहे. वास्तविक यातील सूक्ते ऋषींनी रचली आहेत. त्या त्या सूक्ताखाली त्याचा रचयिता कोण ते लिहिलेले आहे.  अर्थातच हे संगृहीत केलेले वाङ्मय असल्यामुळे याचा कोणी एक कर्ता नाही. त्या त्या ऋषींना योगबलाने वेदाचे दर्शन झाले आहे. ऋषी कोणाला म्हणावयाचे ? ‘अतीन्द्रियस्य वेदस्य परमेश्वरानुग्रहेण प्रथमत: दर्शनात् ऋषित्वम्’ परमेश्वराच्या अनुग्रहामुळे अतींद्रिय असलेल्या वेदाचे ज्यांना दर्शन होते ते ऋषी. ‘ऋषि: दर्शनात्’ अशी ऋषी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. थोडक्यात वेदातील मंत्रांचे ऋषींना ध्यानावस्थेत झालेले दर्शन आहे. म्हणून आपण त्याला ईश्वराचे नि:श्वसित असे म्हणतो.

स्थळ -

वेदांच्या निर्मितीचा काळ आपण पाहिला. आता हे वाङ्मय कोणत्या प्रदेशात रचले गेले ? ज्या काळात भारतीय आर्यांची सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवर वस्ती वस्ती होती त्या प्रदेशात ही सूक्ते रचली गेली आहेत. ही वस्ती पूर्व काबुलिस्तान पासून पंजाबपर्यंत पसरलेली होती.

वेद शब्दाची व्युत्पत्ती -

वेद शब्द विद् = जाणणे या धातूपासून झालेला आहे. म्हणून वेद म्हणजे ज्ञान. ऋक् म्हणजे स्तुतीपर काव्य किंवा श्लोक. म्हणून ऋग्वेद म्हणजे ऋचांमधून व्यक्त झालेले प्राचीनतम व सर्वपवित्र असे ज्ञान. प्राचीनकाळी ऋग्वेदाच्या अनेक शाखा होत्या असे उल्लेख आढळतात. महाभारताच्या शांतिपर्वात २१ हजार शाखांचा उल्लेख येतो. पूर्वी शाकल, बाष्कल, अश्वलायन, शांखायन व मांडूकेय अशा पाच शाखा प्रचलित होत्या. सध्या ऋग्वेदाची शाखल शाखेची प्रतच प्रचलित आहे, त्यात एकूण १०२८ सूक्ते आहेत.

त्रयी -

हजारो वेदमंत्र आहेत व त्यांचे विषयही वेगवेगळे आहेत. म्हणून त्यांचे तीन गटात विभाजन करण्यात आले. १) ऋक् २) यजुष् ३) साम. या तिघांचे सामूहिक नाव आहे त्रयी विद्या.

ऋक् म्हणजे प्रार्थना किंवा स्तुती. जे मंत्र देवतांच्या स्तुतीशी निगडित आहेत त्यांचा एक संग्रह करण्यात आला, तोच ऋग्वेद.

ज्या मंत्रांचा विषय पूजा असा आहे त्यांना ‘यजुष्’ असे म्हणतात. ‘यजते वा अनेन इति; ज्या मंत्रांच्या सहाय्याने पूजा केली जाते त्यांचा संग्रह यजुर्वेदात करण्यात आला. यात यज्ञीय मंत्र म्हणजे यज्ञात उपयोगी पडणारे मंत्र आहेत. ऋग्वेदात केवळ पद्यमय मंत्र आहेत तर यजुर्वेदात गद्य व पद्य मंत्र आहेत.

वरील दोन गटात ज्यांचा अंतर्भाव होत नव्हता अशा मंत्रांचा सामन् या तिसर्‍या गटात समावेश करण्यात आला. सामन् कोणाला म्हणावयाचे ? ‘स्यति नाशयति विघ्नम् इति सामन्’ विघ्नांचा नाश करते ते सामन्. म्हणून सामन् म्हणजे विघ्नशांती. ‘समयति सन्तोषयति देवान् इति सामन्’ म्हणून सामन् म्हणजे देवतुष्टी. त्या मंत्रांची संहिता म्हणजे सामवेद. यातील मंत्र ऋषीजन यज्ञाच्यावेळी
देवांना प्रसन्न करण्य़ासाठी गात असत.

या त्रयीतही मावू शकणार नाहीत असेही काही मंत्र होते. जारण, मारण, मोहन, उच्चाटन हा त्यांचा विषय होता. यांचा चौथा संग्रह करण्यात आला. त्याला अथर्ववेद म्हणतात. जारणा-मारण मंत्रांमुळे त्याला सुरवातीला वेद म्हणून मान्यता नव्हती. कारण आसुरी जगतातील जीवांना संतुष्ट करणार्‍या मंत्रतंत्रांनी हा वेद भरलेला आहे. तसेच भूत-प्रेतादि निम्नस्तरीय शक्तीला जादूटोण्याने वश करण्याचे मंत्रही यात आहेत. पण त्याच बरोबर काही चांगली सूक्तेही यात आलेली आहेत.

आता एक शंका येईल की इतके प्राचीन वाङ्मय छपाईची कला अस्तित्वात नसतांना जतन करून कसे ठेवण्यात आले ? तर पाठांतर पद्धतीने. साडेसातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरीतही पाठभेद आढळतात. मग इतके हजारो वर्षापूर्वीचे वाङ्मय जसेच्या तसे असेल का ? त्यात पाठभेद नसतील का ? तर त्याचे उत्तर आहे नाही, यात पाठभेद नाहीत. ही संहिता ज्या काळात केली गेली असेल तशीच ती आतापर्यंत चालत आलेली आहे. आश्चर्यकरण्य़ासारखी गोष्ट आहे ना ? ८ / १० हजार वर्षापूर्वीच्या या वाङ्गमयात पाठभेद नाहीत ? त्याचे कारण त्याच्या पाठांतरपद्धतीत आहे. ऋग्वेद जसाच्या तसा टिकून रहावा म्हणून त्याच्या पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ, घनपाठ, अशा अनेक पाठांतर पद्धती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोठे चूक आहे अशी शंका आली तर दुसर्‍या पाठाप्रमाणे ती दुरुस्त करता येते. त्यामुळे ऋग्वेदात पाठभेद नाहीत.

वेदातील देव कोणते आहेत ?

ऋग्वेदसंहितेत देवताशास्त्र तयार होत आहे. निसर्गातील सूर्य, अग्नि, उषा, पर्जन्य, यासारख्या घटनांना हळूहळू देवतांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. इंद्र, अग्नी, सूर्य, उषा, वरुण यांना यात देवत्व दिले गेले आहे. इंद्र व अग्नीला उद्देशून खूप सूक्ते यात आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश ह्या पौराणिक काळातील देवांचे स्थान वेदात नगण्य आहे. देवतांची स्तुती करून त्यांच्याकडे संतती, संपत्ती यांची मागणी करणारी सूक्ते, तत्वज्ञान सांगणारी नासदीय सूक्त, पुरुषसूक्त वगैरे सूक्ते, विवाह व और्ध्वदेहिक विधी सांगणारी सूक्ते, एखाद्या राजवंशातील राजाच्या विजयाचे वर्णन करणारी सूक्ते, राजांच्या दानशूरतेची स्तुती करणारी सूक्ते, नीतिशास्त्रीय सूक्ते, स्त्री-पुरुषविषयक दृष्टिकोन सांगणारी सूते, पुरुरवा-ऊर्वशी, यम-यमी, विश्वामित्र-नदी अशांचे काही संवाद असणारी सूक्ते असे या सूक्तांचे वेगवेगळे विषय आहेत.


या वेद वाङ्मयावरून प्राचीन भारतीय लोकांचे समाजजीवन कसे होते, संस्कृती काय होती, धर्म, स्त्री-पुरुषसंबंध कसे होते, देवताविषयक कल्पना काय होत्या, देवताशास्त्र कसे प्रगत होत गेले, या सर्वांची आपल्याला माहिती मिळते. त्यासाठी त्यांचा अभ्यस करायला हवा व त्यासाठी संस्कृत येणे आवश्यक आहे. कारण हे ग्रंथ संस्कृतमधे रचलेले आहेत. ‘संस्कृति: संस्कृताश्रिता खलु’ भारतीय संस्कृती ही संस्कृतभाषेचा आश्रय करून राहिलेली आहे. म्हणजे त्या साहित्यात ह्या संस्कृतीची बीजे दडलेली आहेत. आणि हे सर्व जाणून घेण्यास संस्कृत भाषा अवगत होणे आवश्यक आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर 

Friday, June 26, 2020

पाठ १५ वा

मागच्या शुक्रवारी आपण व्यवहारात वापरता येणारे शिष्टाचाराचे काही शब्द पाहिले. आता आपण एकमेकांना भेटल्यावर जे वाक्यप्रयोग करतो त्याविषयी जाणून घेऊया.
दोन व्यक्ती बरेच दिवसांनी भेटल्या आहेत. तर कसा संवाद होईल ?

१) सर्वं कुशलं ? = सर्व काही ठीक आहे ना ?
२) आम् कुशलम् । = हो ठीक आहे.
३) क: विशेष: ? = काय विशेष ?
४) भवता एव वक्तव्यम् । = आपणच सांगावं.
५) कुत: आगच्छसि ? = कोठून आलात ?
६) गृहत: आगच्छामि । घरातून आलो. पुण्यपत्तनत: आगच्छामि । पुण्याहून आलो. ग्रामत: आगच्छामि । गावाहून आलो
७) ज्ञातं वा ? = कळलं का तुम्हाला ?
८) कदा आगमनं भवत: ? = आपले आगमन केव्हा झाले ?
९) इदानीम् एव । अद्य एव । = आताच. आजच.
१०) किमर्थम् ? = कशासाठी ?
११) एवमेव । = सहजच.

आज मी नवीन काही पाठ घेणार नाहीये. मागच्या १३ व्या पाठात आपण काही फक्त कर्ता व क्रियापद असलेली वाक्ये पाहिली होती. त्या वाक्यांचे आपण मराठीत भाषांतर केले होते. आता मी काही मराठी वाक्ये देणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही त्यांचे संस्कृत भाषांतर करायचे आहे. वाक्ये सर्व पुरुषातील आहेत.

 पुन्हा एकदा एका धातूची कर्त्याबरोबर क्रियापदे कशी होतात ते चालवून दाखवते. म्हणजे तुम्हाला मागच्या नोट्स शोधत बसायला नकोत.

अहं नमामि । आवां नमाव: । वयं नमाम: ।
त्वं नमसि । युवां नमथ: । यूयं नमथ ।
स: नमति । तौ नमत: । ते नमन्ति ।

तसेच दोन पाठात दिलेल्या ३० क्रियापदांची यादीही परत देत आहे.

१) अर्च् = पूजा करणे २) काङ्क्ष् = इच्छा करणे ३) कूज् = कूजन करणे ४) क्रीड् = खेळणे ५) खाद् = खाणे ६) खेल् = खेळणे ७) गर्ज् = गर्जना करणे ८) गुञ्ज् = गुणगुणणे ९) चर् = फिरणे १०) चल् = चालणे ११) जप् = जप करणे १२) तप् = तप करणे १३) त्यज् = टाकणे १४) दह् = जाळणे १५) धाव् = धावणे १६) नन्द् = आनंदित होणे १७) निन्द् = निंदा करणे १८) पत् = पडणे १९) भज् = भजणे, २०) भ्रम् = भ्रमण करणे २१) रक्ष् = रक्षण करणे २२) राज् = शोभणे २३) वद् = बोलणे २४) वस् = रहाणे २५) वम् = ओकणे २६) वह् - वहाणे २७) वाञ्छ् = इच्छा करणे २८) व्रज् = जाणे २९) शप् = शाप देणे ३०) हस् = हसणे ३१) पठ् - अभ्यस करणे, वाचणे. ३२) अट् = फिरणे ३३) गद् = बोलणे

हे सर्व धातू आपल्या परिचयाचे आहेत.



प्रश्न १) खालील मराठी वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) वडील (जनक) पूजा करतात. २) मी इच्छा करतो. ३) तू धावतोस ४) सिंह गर्जना करतात. ५) मुले खेळतात. ६) दोन गायक गुणगुणतात ७) आम्ही सर्व चालतो ८) तुम्ही दोघे बोलता.९) सर्व साधक तप करतात. १०) कोकिळ कूजन करतो. ११) आम्ही सर्व जप करतो. १२) राजा रक्षण करतो १३) दोन पर्यटक भ्रमण करतात १४) मुनी शाप देतो १५) आम्ही दोघे अभ्यास करतो. १६) रमेश, महेश व सुरेश बोलतात. १७) मुले खेळतात. १८) साधक तप करतात. १९) अग्नि जाळतो. २०) आम्ही आनंदित होतो.

प्रश्न २ रा खालील तक्त्यावरून वाक्य तयार करा.

एक लक्षात ठेवायचे की ज्यावेळी स्वराने सुरू होणारे क्रियापद येईल त्यावेळी अनुस्वार न देता व्यंजन लिहावयाचे. अहं अटामि असे लिहायचे नाही.
उदा. अहम् अटामि । अहमटामि । असा संधी होऊन जातो. पण आपण आता संधी न करता सुटेच लिहावे.


Thursday, June 25, 2020

पाठ १४ वा सुभाषित २ ब


    काल मी तुम्हाला दोन सुभाषिते दिली होती व त्यातील क्रियापदे कोणती ते ओळखायला सांगितले होते. आज आपण त्याच सुभाषितांचा अर्थ पाहू.

तृणं खादति केदारे जलं पिबति पल्वले ।
दुग्धं यच्छति लोकेभ्यो धेनुर्नो जननी प्रिया ॥

संधिविग्रह -

तृणं खादति केदारे जलं पिबति पल्वले ।
दुग्धं यच्छति लोकेभ्य: धेनु: न: जननी प्रिया ॥

अन्वय - धेनु: केदारे तृणं खादति, पल्वले जलं पिबति । लोकेभ्य: दुग्धं यच्छति, (अत: धेनु:) न: प्रिया जननी (अस्ति)

अर्थ - गाय कुरणामधील गवत खाते, दबक्यातील पाणी पिते आणि लोकांना दूध देते. (म्हणून गाय) आमची प्रिय माता आहे.

मक्षिका व्रणमिच्छन्ति धनमिच्छन्ति पार्थिवा: । नीचा: कलहमिच्छन्ति वादमिच्छन्ति गर्विता: ॥

संधिविग्रह - मक्षिका: व्रणम् इच्छन्ति धनम् इच्छन्ति पार्थिवा: । नीचा: कलहम् इच्छन्ति वादम् इच्छन्ति गर्विता: ॥

अन्वय - मक्षिका: व्रणम् इच्छन्ति । पार्थिवा: धनम् इच्छन्ति । नीचा: कलहम् इच्छन्ति । गर्विता: वादम् इच्छन्ति ।

अर्थ - माशा जखमेची इच्छा करतात. राजे धनाची इच्छा करतात. अधम लोक भांडणाची इच्छा करतात तर गर्विष्ठ लोक वाद-विवादाची इच्छा करतात

२७) य: पठति लिखति परिपृच्छति पण्डितानुपाश्रयति ।
तस्य दिवाकरकिरणैर्नलिनीदलमिव विकास्यते बुद्धि: ॥

संधिविग्रह - य: पठति लिखति परिपृच्छति पण्डितान् उपाश्रयति ।
तस्य दिवाकरकिरणै: नलिनीदलम् इव विकास्यते बुद्धि:

अन्वय - य: पठति, लिखति, परिपृच्छति, पण्डितान् उपाश्रयति, तस्य बुद्धि: दिवाकरकिरणै: नलिनीदलम् इव विकास्यते ।

अर्थ - जो वाचतो, लिहितो, शंका विचारतो व पंडितांचा आश्रय घेतो (पंडितांच्या सहवासात असतो), सूर्याच्या किरणांनी कमळाच्या पाकळ्यांचा विकास होतो तशी त्याची बुद्धी (सर्व बाजूंनी) विकसित होते.

अशा धर्तीचा रामायणात एक छान श्लोक आलाय. फक्त कर्ते व क्रियापदे

वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति
ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति ।
नद्यो घना मत्तगजा वनान्ता:
प्रियाविहीना: शिखिन: प्लवंगमा: ॥४-२८-२७॥रामायण॥

संधिविग्रह - वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति
ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति ।
नद्य: घना: मत्तगजा: वनान्ता:
प्रियाविहीना: शिखिन: प्लवंगमा: ॥

अन्वय - नद्य: वहन्ति । घना: वर्षन्ति । मत्तगजा: नदन्ति । वनान्ता: भान्ति ।
प्रियाविहीना: ध्यायन्ति । शिखिन: नृत्यन्ति प्लवंगमा: समाश्वसन्ति ।

अर्थ - (या वर्षाऋतूत) नद्या वहात आहेत, मेघ वर्षाव करत आहेत, मदोन्मत्त हत्ती गर्जना करत आहेत, वनप्रदेश शोभत आहेत, आपल्या प्रियेचा वियोग झालेले लोक (तिचे) चिंतन करत आहेत, मोर नाचत आहेत तर माकडे उड्या मारत आहेत.


"पाठ १४ वा सुभाषित २ ब " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Wednesday, June 24, 2020

पाठ १३ वा पाठ तृतीय पुरुषी कर्ता असलेली वाक्ये

वाक्यात कर्ता व क्रियापद या दोन गोष्टी तरी आवश्यक असतात. त्याशिवाय वाक्य होऊ शकत नाही. कर्ता व क्रियापद यांची योजना कशी करायची ते कळून येण्य़ासाठी मी प्रथम तुम्हाला अकारांत पुंलिंगी देव हा एक शब्द व पहिल्या गणांची क्रियापदे तयार करण्याची पद्धत सांगितली. आज आपण तृतीय पुरुषी कर्ता असलेली काही वाक्ये पाहू.

१) स: अर्चति ।
२) बालका: हसन्ति ।
३) रक्षक: रक्षति ।
४) वसन्त: हेमन्त: च व्रजत: ।
५) तापस: शपति ।
६) चन्द्र: राजति ।
७) स: वदति ।
८) भक्ता: भजन्ति ।
९) गिर्यारोहक: भ्रमति ।
१०) दुर्जनौ निन्दत: ।
११) सज्जना: नन्दन्ति ।
१२) कन्दुका: पतन्ति ।
१३) छात्रौ क्रीडत: ।
१४) विनीत: विजय: च लिखत: ।

वरील सर्व वाक्यांमधले सर्व कर्ते हे तृ. पुरुषाचे आहेत. काही एक वचनात आहेत, काही द्वि, वचनात आहेत तर काही बहु वचनात आहेत. त्याप्रमाणे क्रियापदाचे सुद्धा वचन योजलेले आहे. आज मी संस्कृत वाक्ये दिली आहेत. उद्या उलट करू, मी मराठी वाक्ये देईन. त्या वाक्यांचे तुम्ही संस्कृतमधे भाषांतर करा.

मागच्या आठवड्यात काही क्रियापदे व त्यांचे अर्थ सांगितले होते. आता आज आपण वापरलेल्या पहिल्या गणातील धातू व त्यांचे अर्थ खाली देत आहे.

१६) नन्द् = आनंदित होणे
१७) निन्द् = निंदा करणे
१८) पत् = पडणे
१९) भज् = भजणे,
२०) भ्रम् = भ्रमण करणे
२१) रक्ष् = रक्षण करणे
२२) राज् = शोभणे
२३) वद् = बोलणे
२४) वस् = रहाणे
२५) वम् = ओकणे
२६) वह् - वहाणे
२७) वाञ्छ् = इच्छा करणे
२८) व्रज् = जाणे
२९) शप् = शाप देणे
३०) हस् = हसणे 

पाठ १३ ची उत्तरे
१३ व्या पाठातील वाक्यांचे मराठी भाषांतर

१) स: अर्चति । =
तो पूजा करतो
२) बालका: हसन्ति । =
मुले हसतात
३) रक्षक: रक्षति । =
रक्षक रक्षण करतो
४) वसन्त: हेमन्त: च व्रजत: । =
वसंत व हेमंत जातात.

५) तापस: शपति । =
तपस्वी शाप देतो.

६) चन्द्र: राजति । =
चंद्र शोभतो.

७) स: वदति । =
तो बोलतो.

८) भक्ता: भजन्ति ।
भक्त भक्ती करतात.

९) गिर्यारोहक: भ्रमति ।
गिर्यारोहक फिरतो.

१०) दुर्जनौ निन्दत: ।
दुर्जन निंदा करतात.

११) सज्जना: नन्दन्ति ।
सज्जन आनंदित होतात.

१२) कन्दुका: पतन्ति ।
चेंडू पडतात.

१३) छात्रौ क्रीडत: ।
विद्यार्थी खेळतात.

१४) विनीत: विजय: च लिखत: ।
विनीत व विजय लिहितात.

प्रश्न दुसरा - सुभाषितातील क्रियापदे ओळखा.
१ ले सुभाषित = खादति, पिबति, यच्छति
२ रे सुभाषित = इच्छन्ति 





" पाठ १३ वा पाठ तृतीय पुरुषी कर्ता असलेली वाक्ये " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Tuesday, June 23, 2020

पाठ १२) सुभाषित पाठ १

पाठ १२) सुभाषित पाठ १

आज आपला पहिला सुभाषितांचा तास. सुरवातीला दोन दोनच सोपी सुभाषिते सांगणार आहे. सदस्यांची मागणी असेल तर सुभाषितांची संख्या वाढवता येईल. हे सर्व केवळ आपण आपल्या आनंदासाठी शिकतोय. ह्या सुभाषितांवर गृहपाठ असणार नाही. संस्कृत भाषेचे चलन कळावे म्हणून सुभाषिते घेत आहे. सुभाषित हे संस्कृतभाषेचे वैशिष्ट्य आहे. ही सर्व साहित्याट विखुरलेली आहेत. त्यामुळे मी देत असलेले सुभाषित नेमक्या कोणत्या ग्रंथातील आहे हे सांगणे कठिण आहे. रामायण, महाभारत, पंचतंत्र हितोपदेश, सुभाषितशतके, पुराणे, नाटके असे असंख्य सुभाषितांचे स्रोत आहेत. तेव्हा आपण सुभाषितांचे सौंदर्य अनुभवूया.

काल आपण पाहिलं होतं की संस्कृतमधे आहे किंवा असणे हे सुभाषित वापरलेच पाहिजे असे नाही. ते न वापरताही पूर्ण अर्थ व्यक्त होतो. आज आपण अशी काही सुभाषिते पाहू की ज्यात क्रियापदच नाही.

१) यथा देशस्तथा भाषा यथा राजा तथा प्रजा । यथा भूमिस्तथा तोयं यथा बीजं तथाङ्कुर: ॥७४-८॥

संधिविग्रह - यथा देश: तथा भाषा यथा राजा तथा प्रजा । यथा भूमि: तथा तोयं यथा बीजं तथा अङ्कुर: ॥

अन्वय - यथा देश: तथा भाषा । यथा राजा तथा प्रजा । यथा भूमि: तथा तोयं । यथा बीजं तथा अङ्कुर: ॥

अर्थ - जसा देश तशी भाषा, जसा राजा तशी प्रजा, जशी जमीन तसे पाणी व जसे बी तसा अंकुर असतो.

२) पक्षिणां बलं आकाशं बालानां रोदनं बलम् । दुर्बलस्य बलं राजा मत्स्यानामुदकं बलम् ॥७४-१८॥

संधिविग्रह - पक्षिणां बलं आकाशं बालानां रोदनं बलम् । दुर्बलस्य बलं राजा मत्स्यानाम् उदकं बलम् ॥

अन्वय - आकाशं पक्षिणां बलं । रोदनं बालानां बलम् । राजा दुर्बलस्य बलं उदकं मत्स्यानाम् बलम् ।

अर्थ - पक्ष्यांचे बळ आकाशात असते. मुलांचे बळ रडण्यात असते. राजा हा दुर्बळांचे बळ आहे तर माशांचे पाणी हे बळ आहे. 


स्वाध्याय १२ 

प्रश्न १ला - वरील १५ वाक्यांचे मराठीत भाषांतर लिहा.

*प्रश्न २ रा खालील सुभाषितातील क्रियापदे ओळखा

तृणं खादति केदारे जलं पिबति पल्वले । दुग्धं यच्छति लोकेभ्यो धेनुर्नो जननी प्रिया ॥

मक्षिका व्रणमिच्छन्ति धनमिच्छन्ति पार्थिवा: । नीचा: कलहमिच्छन्ति वादमिच्छन्ति गर्विता: ॥  





"पाठ १२) सुभाषित पाठ १ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Monday, June 22, 2020

पाठ ११ वा - व्यक्ती वा वस्तूंची ओळख.

नमस्कार. आता रोज एखाद्या सुभाषिताने सुरवात करण्याऐवजी आठवड्यातला एखादा दिवस सोपी सोपी सुभाषिते समजावून द्यायचे योजले आहे. तेव्हा आता आपण उद्याचा तास सुभाषितांचा घेऊ. कारण आता थोडा अभ्यास पण वाढणार आहे. तेव्हा आठवड्यातून दोन पाठ घ्याय़चे दोन दिवस त्याचा अभ्यास करून स्वाध्याय सोडवायला एकेक दिवस द्यायचा. सोमवारचा पाठ होईल मंगळवार त्याच्या अभ्य़ासाला मिळेल. बुधवारी पाठ होईल गुरुवार त्याच्या अभ्यासाला मिळेल. म्हणून आपण मंगळवारी व गुरुवारी फक्त दोन चार सुभाषिते समजावून घेऊ. त्यादिवशी गृहपाठ असणार नाही. आणि शुक्रवारी बोली संस्कृतची वाक्ये व इतर थोडीफार माहिती घेऊ.

आपण दोन आठवडे सुरवातीला संस्कृत व्याकरणाची थोडीफार माहिती करून घेतली. महत्वाचा भाग म्हणजे कारकांचे अर्थ समजावून घेतले. अकारांत पुंलिंगी देव शब्दाची रूपे कशी होतात ते पाहिले व क्रियापदांची रूपे कशी होतात ते समजून घेतले.

देव अकारांत पुंलिंगी शब्दाप्रमाणे आपण इतरही अकारांत पुंलिंगी शब्द पाहिले त्यात काही शब्दांमधे तृतीया एकवचन व षष्ठी बहुवचनामधे न चा ण होऊन नृपेण व नृपाणां अशी रूपे होत होती.

न चा ण होण्याचा नियम -

एकाच शब्दात न् च्या पूर्वी ऋ, ॠ, र् किंवा ष् आल्यास त्या न् चा ण् होतो. उदा. पितृ - या शब्दात ष. बहु वचनाचा नाम् प्रत्यय लागतो. नाम् प्रत्यय लागायच्या आधी तृ मधे ऋ आहे. म्हणून नाम् ऐवजी णाम् असे होऊन पितॄणाम् असे रूप होईल.

ऋ, ॠ, र् किंवा ष् व पुढे येणारा न् यांच्यामधे कोणताही स्वर, किंवा क वर्गातील अथवा प वर्गातील कोणतेही व्यंजन शिवाय य्, र्, व्, ह्, ह्यातील व्यंजन आल्यास न् चा ण् होतो. इतर व्यंजने आल्यास न् चा ण् होत नाही.

 उदा. - रामेण इथे रा मधील आ स्वराच्या पुढे म् हे पवर्गातील व्यंजन आले आहे. म्हणून पुढे येणार्‍या न् चा ण् झाला. पण रामान् ह्या द्वितीया बहुवचनात न् चा ण् होत नाही. कारण ते व्यंजनांत पद आहे

शेवटी न् हे व्यंजन येत असेल तर त्याचा ण् होत नाही.

कर्ण - या शब्दात र् या वर्णापुढे ण् हा टवर्गातील वर्ण आहे. त्यामुळे इथे न चा ण होणार नाही. कर्णेन, कर्णानाम् अशी रूपे होतील.

पण अर्क, दर्प या शब्दात कवर्गातील क् व पवर्गातील प् हे व्यंजन असल्यामुळे अर्केण, दर्पेण अशी रूपे होतील.

रत या शब्दामधे र या वर्णापुढे त् वर्गातील व्यंजन आहे. त्यामुळे रतेन असे रूप होईल. इथे न् चा ण् झाला नाही. 

न चा ण कवर्गातील वा प वर्गातील व्यंजन असतील तरच होणार आहे.

संस्कृत वाक्यरचना

संस्कृतमधे वाक्य करत असतांना मराठीत जे आपण ‘आहे’ हे क्रियापद वापरतो ते संस्कृतमधे वापरलेच पाहिजे असे नाही. ते क्रियापद न वापरताही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.

१) प्रथम पुरुषी वाक्ये -
अहं कृषीवल: ।
मी शेतकरी (आहे).
आवां कृषीवलौ ।
आम्ही दोघे शेतकरी (आहोत).
वयं कृषीवला: ।
आम्ही सर्व शेतकरी (आहोत).

२) द्वितीय पुरुषी -
त्वं कृषीवल: ।
तू शेतकरी (आहेस).
युवां कृषीवलौ ।
तुम्ही दोघे शेतकरी (अहात).
यूयं कृषीवला: ।
तुम्ही सर्व शेतकरी (अहात).

३) तृतीय पुरुषी वाक्ये -
एष: कृषीवल: ।
हा शेतकरी (आहे).
एतौ कृषीवलौ ।
हे दोन शेतकरी (आहेत).
एते कृषीवला: ।
हे सर्वजणं शेतकरी (आहेत).

या संस्कृत वाक्यांमधे क्रियापदे वापरलेली नाहीत. पण जे सर्वनाम वापरले आहे ते क्रियापदाच्या वचनाप्रमाणे वापरलेले आहे. अहं, त्वं किंवा एष: ही एकवचनी सर्वनामे आहेत. म्हणून पुढे कृषीवल शब्दाचे एकवचन आले आहे.

आवां, युवां व एतौ ही द्विवचनी सर्वनामे आहेत. म्हणून त्यांच्यापुढे कृषीवल शब्दाचे द्विवचनी कृषीवलौ हे रूप आले.

तर वयं, यूयं व एते ही बहुवचनी सर्वनामे वापरली असल्यामुळे त्यांच्यापुढे कृषीवला: हे बहुवचन वापरले आहे.

इथे ‘आहे’ हे क्रियापद भाषांतरात कंसात ठेवले आहे. कारण मूळ वाक्यात ते नाही. मूळ वाक्यात एखादा संस्कृत शब्द नसेल पण भाषांतरात वापरावा लागत असेल तर तो भाषांतरात कंसात ठेवण्याची पद्धत आहे. अशाप्रकारे आपण कोणत्याही व्यक्तीची, प्राण्यांची किंवा वस्तूची ओळख करून देऊ शकतो.


स्वाध्याय ११
खाली काही व्यक्तींची ओळख करून देण्य़ासाठी काही शब्द दिले आहेत. सर्व अकारान्त पुंलिंगी शब्द आहेत. वर जसे कृषीवलाची ओळख करून देणारी वाक्ये लिहीली आहेत. तशी तुम्ही खालील शब्द वापरून वाक्ये बनवा. स्वाध्याय म्हणून पाच तरी बनवा. जास्त बनवल्यास प्रॅक्टिस होईल.

प्रश्न १ला - कृषीवलाची ओळख करून देणारी वाक्ये लिहीली आहेत. तशी तुम्ही खालील शब्द वापरून वाक्ये बनवा. (कोणतीही पाच)

लेखक, सुवर्णकार, आपणिक (दुकानदार), लोहकार, कुम्भकार, शिक्षक, छात्र, चर्मकार, अध्यापक, वैद्य, गायक, वादक, बालक, सेवक, संगीतकार, गीतकार, मालाकार.

प्रश्न २ रा कंसातील शब्दाचे योग्य वचन लिहा.

१) अहं ----- । (गीतकार)
२) ते ----- । (कुम्भकार)
३) युवां -----। (वैद्य)
४) स: -----। (सेवक)
५) यूयं -----। (सुवर्णकार)
६) आवां -----। अध्यापक()
७) तौ -----। (लोहकार)
८) त्वं -----। (लेखक)
९) वयं -----। (बालक)
१०) महेश: सुरेश: च -----।  (वादक)
११) छात्रा: -----। (गायक)
१२) पुण्डलिक: -----। (आपणिक ) 

पाठ ११ उत्तरे -

प्रश्न १ला - व्यक्तींची ओळख

अहं लेखक: । आवां लेखकौ । वयं लेखका: ।
त्वं लेखक: । युवां लेखकौ । यूयं लेखका: ।
स: लेखक: । तौ लेखकौ । ते लेखका: ।

अहं सुवर्णकार: । आवां सुवर्णकारौ । वयं सुवर्णकारा: ।
त्वं सुवर्णकार: । युवां सुवर्णकारौ । यूयं सुवर्णकारा: ।
राजीव: सुवर्णकार: । राजीव: जयवन्त: च सुवर्णकारौ । राजीव:, जयवन्त:, भरत: च सुवर्णकारा: ।

प्रश्न २ रा कंसातील शब्दाचे योग्य वचन लिहा.

१) अहं गीतकार: । (गीतकार)
२) ते कुम्भकारा: । (कुम्भकार)
३) युवां वैद्यौ । (वैद्य)
४) स: सेवक: । (सेवक)
५) यूयं सुवर्णकारा: । (सुवर्णकार)
६) आवां अध्यापकौ । (अध्यापक)
७) तौ लोहकारौ। (लोहकार)
८) त्वं लेखक: । (लेखक)
९) वयं बालका: । (बालक)
१०) महेश: सुरेश: च वादकौ ।  (वादक)
११) छात्रा: गायका: । (गायक)
१२) पुण्डलिक: आपणिक: । (आपणिक ) 




"११ वा पाठ व्यक्ती वा वस्तूंची ओळख " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Sunday, June 21, 2020

भारतातील अती महत्वाच्या संस्थांची घोषवाक्ये

भारतातील अती  महत्वाच्या संस्थांची  घोषवाक्ये संस्कृत मधील आहेत. आवश्य  वाचा.  अशी  माहीती  कोठे  वाचावयास  मिळणार  नाही.

●भारत सरकार👉 सत्यमेव जयते
●लोक सभा👉 धर्मचक्र प्रवर्तनाय
●उच्चतम न्यायालय👉 यतो धर्मस्ततो जयः
●आल इंडिया रेडियो👉 सर्वजन हिताय सर्वजनसुखाय

●दूरदर्शन👉 सत्यं शिवं सुन्दरम्
●गोवा राज्य👉 सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।
●भारतीय जीवन बीमा निगम👉 योगक्षेमं वहाम्यहम्
●डाक तार विभाग👉 अहर्निशं सेवामहे
●श्रम मंत्रालय👉 श्रम एव जयते
●भारतीय सांख्यिकी संस्थान👉 भिन्नेष्वेकस्य दर्शनम्
●थल सेना👉 सेवा अस्माकं धर्मः
●वायु सेना👉 नभःस्पृशं दीप्तम्
●जल सेना👉 शं नो वरुणः
●मुंबई पुलिस👉 सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
●हिंदी अकादमी👉 अहं राष्ट्री संगमनी वसूनाम्
●भारतीय राष्ट्रीय विज्ञानं अकादमी👉 हव्याभिर्भगः सवितुर्वरेण्यम्
●भारतीय प्रशासनिक सेवा अकादमी👉 योगः कर्मसु कौशलम्
●विश्वविद्यालय अनुदान आयोग👉 ज्ञान-विज्ञानं विमुक्तये
●नेशनल कौंसिल फॉर टीचर एजुकेशन👉 गुरुर्गुरुतमो धाम
●गुरुकुल काङ्गडी विश्वविद्यालय👉 ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत
●इन्द्रप्रस्थ विश्वविद्यालय👉 ज्योतिर्व्रणीत तमसो विज्ञानन
●काशी हिन्दू विश्वविद्यालय:👉 विद्ययाऽमृतमश्नुते
●आन्ध्र विश्वविद्यालय👉 तेजस्विनावधीतमस्तु
●बंगाल अभियांत्रिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय,
शिवपुर👉 उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत
●गुजरात राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय👉 आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः
●संपूणानंद संस्कृत विश्वविद्यालय👉 श्रुतं मे गोपाय
●श्री वैंकटेश्वर विश्वविद्यालय👉 ज्ञानं सम्यग् वेक्षणम्
●कालीकट विश्वविद्यालय👉 निर्भय कर्मणा श्री
●दिल्ली विश्वविद्यालय👉 निष्ठा धृति: सत्यम्
●केरल विश्वविद्यालय👉 कर्मणि व्यज्यते प्रज्ञा
●राजस्थान विश्वविद्यालय👉 धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा
●पश्चिम बंगाल राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विश्वविद्यालय👉
युक्तिहीने विचारे तु धर्महानि: प्रजायते
●वनस्थली विद्यापीठ👉 सा विद्या या विमुक्तये।
●राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद्👉
विद्याsमृतमश्नुते।
●केन्द्रीय विद्यालय👉 तत् त्वं पूषन् अपावृणु
●केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड👉 असतो मा सद्गमय
प्रौद्योगिकी महाविद्यालय, त्रिवेन्द्रम👉 कर्मज्यायो हि अकर्मण:
●देवी अहिल्या विश्वविद्यालय, इन्दौर👉 धियो यो नः प्रचोदयात्
●गोविंद बल्लभ पंत अभियांत्रिकी महाविद्यालय, पौड़ी👉 तमसो मा ज्योतिर्गमय
●मदनमोहन मालवीय अभियांत्रिकी महाविद्यालय गोरखपुर👉 योगः कर्मसु कौशलम्
●भारतीय प्रशासनिक कर्मचारी महाविद्यालय, हैदराबाद👉 संगच्छध्वं संवदध्वम्
●इंडिया विश्वविद्यालय का राष्ट्रीय विधि विद्यालय👉 धर्मो रक्षति रक्षितः
●संत स्टीफन महाविद्यालय, दिल्ली👉 सत्यमेव विजयते नानृतम्
●अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान👉 शरीरमाद्यं खलुधर्मसाधनम्
●विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपुर👉 योग: कर्मसु कौशलम्
●मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान,इलाहाबाद👉 सिद्धिर्भवति कर्मजा
●बिरला प्रौद्योगिकी एवं विज्ञान संस्थान, पिलानी👉 ज्ञानं परमं बलम्
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान खड़गपुर👉 योगः कर्मसुकौशलम्
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई👉 ज्ञानं परमं ध्येयम्
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर👉 तमसो मा ज्योतिर्गमय
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान चेन्नई👉 सिद्धिर्भवति कर्मजा
●भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुड़की👉 श्रमं विना नकिमपि साध्यम्
●भारतीय प्रबंधन संस्थान अहमदाबाद👉 विद्या विनियोगाद्विकास:
●भारतीय प्रबंधन संस्थान बंगलौर👉 तेजस्वि नावधीतमस्तु
●भारतीय प्रबंधन संस्थान कोझीकोड👉 योगः कर्मसु कौशलम्
●सेना ई एम ई कोर👉 कर्मह हि धर्मह
●सेना राजपूताना राजफल👉 वीर भोग्या वसुन्धरा
●सेना मेडिकल कोर👉 सर्वे संतु निरामया ..
●सेना शिक्षा कोर👉 विद्यैव बलम्
●सेना एयर डिफेन्स👉 आकाशेय शत्रुन् जहि
●सेना ग्रेनेडियर रेजिमेन्ट.👉 सर्वदा शक्तिशालिम्
●सेना राजपूत बटालियन👉 सर्वत्र विजये
●सेना डोगरा रेजिमेन्ट👉 कर्तव्यम् अन्वात्मा
●सेना गढवाल रायफल👉 युद्धया कृत निश्चयः
●सेना कुमायू रेजिमेन्ट👉 पराक्रमो विजयते
●सेना महार रेजिमेन्ट👉 यश सिद्धि?
●सेना जम्मू काश्मीर रायफल👉 प्रस्थ रणवीरता?
●सेना कश्मीर लाइट इंफैन्ट्री👉 बलिदानं वीर-लक्ष्यम्?
●सेना इंजीनियर रेजिमेन्ट👉 सर्वत्र
●भारतीय तट रक्षक-वयम् रक्षामः
●सैन्य विद्यालय👉 युद्धं प्रगायय?
●सैन्य अनुसंधान केंद्र👉 बलस्य मूलं विज्ञानम्
- - - - - - - - - -
मित्रों!
सिलसिला यहिं खतम नहीं होता,
विदेशी भी हमारे कायल हैं देखो जरा...
●नेपाल सरकार👉 जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी
●इंडोनेशिया-जलसेना 👉 जलेष्वेव जयामहे (इंडोनेशिया) -
पञ्चचित
●कोलंबो विश्वविद्यालय- (श्रीलंका)👉 बुद्धि: सर्वत्र भ्राजते
●मोराटुवा विश्वविद्यालय (श्रीलंका)👉 विद्यैव सर्वधनम्
पेरादे
 पञ्चचित
●पेरादेनिया विश्वविद्यालय👉 सर्वस्य लोचनशास्त्रम्
- - - -
मित्रों!
संस्कृत और संस्कृति ही भारतीयता का मूल है .. भारत का विकास इसी से संभव है- तो कीजिये अपने गौरव को याद और सिर उठाकर कहिये

"हम भारतीय हैं और संस्कृत हमारी पहचान है, हमें अपने गौरव का अभिमान है।"

भारत माता की जय

जयतु संस्कृतम् जयतु भारतम्

जयहिंद🚩

"ASHRAM 2020"


There is a village in remote interiors of Goa, on the banks of River Kushavati, called Rivona. As per history, its original name was Rishi Vana, a forest where Rishis reside. It's well known for its Buddhist caves.

Recently, Rivona became the talk of the town all over Goa, when one day, all of a sudden, the Prime Minister of India Modi made a phone call to the village to congratulate a 16-year old boy Priavrat Patil!

What made the Prime Minister of India call Priyavrat Patil, was that this young handsome teenager had cracked one of the most difficult exams in Sanskrit! This makes him one of the topmost scholars of Sanskrit in the country!

A few days back, i was in Margao with a friend for some work. The person I was to meet was at Quepem. So we went there. After concluding our work, my friend said why not go to Rivona to meet Patil Guruji?

When we reached Rivona it was quite dark, and Cyclone Nisarga was approaching. There we met Smt. Patil. Their house itself was the first revelation of it's scholarly atmosphere! It was not just a house, it was a Rishi Ashram! You could feel you are seating there and all of a sudden Shri Ram would enter with his huge bow or Shri Krishna with his flute, anytime!

The young man and his Father were not at the  home. So Smt. Patil called her Son on his mobile. The very first thing i noticed was, that this lady who was talking to us in fluent Konkani and Marathi, was talking with the same fluency to her Son in Sanskrit!

Pryavrat's Father Mahamahopadhyaya Devdutt Patil and his Mother together run a Sanskrit Gurukul in this village. It's a small institution with 30-odd resident students. Not many in Goa may know about it, but the President of India and the Prime Minister of India know who they are, and what work they do! This small unaided school is one of the topmost Sanskrit Research Centres in the world!

Gurukul is an entirely different kind of study system. Unlike our regular schools, here boys and girls are dedicated to study their given topics. They reside in the House of their Guru, do Community Work, learn life skills, and at the same time specialise in their subject!

Learning Sanskrit in the traditional way is no joke! There are no classrooms or books! You learn to memorise a book fully, like a song. When asked you sing the entire book page by page, paragraph by paragraph, word by word without making a single spelling or pronunciation error, knowing each and every meaning of the word in the same tone and at the same pitch! Every word is a mantra!

The Gurukul admits boys after 7th standard and girls after 10th! There is no other criteria! Students come from all over the country! Education is free! No fees! The School is run by a Public Charitable Trust on public donations!

The course is of 6 years, and in this 6 years you learn 3 topics. Sanskrit Vyakran, Mimansa and Nyaya. That is grammar, interpretation and art of debating! That's it. If you are a passout of this small unaided Institute not affliated to any Board or University, all the Universities in the country will come rushing to you, requesting you to head their Sanskrit Department!

Remember this is not a Ved Pathshala. They dont teach Vedas or Shastras or Upanishads. They teach you PhD level Sanskrit. If you learn it, all the  knowledge of the Gods is open to you! Who doesn't want the keys to the Heaven's Paradise Gates in this life itself?

In life, if you are a Hindu, you may not go to any Temple ever. But do something for preservation of the Vedas. Dharma is not about hating other religions. It is about finding your way to God through the struggles in life!

Saturday, June 20, 2020

संस्कृतसाहित्याची ओळख - कालिदास

दर शनिवारी मी आपल्याला संस्कृत साहित्याची, एखाद्या कवीची ओळख करून द्याय़चे ठरवले आहे. आता संस्कृतचे प्राचीन साहित्य म्हणजे वेद वाङ्मय. त्यापासून खरतर सुरवात करायला हवी. पण आज मी हा क्रम थोडा बदलणार आहे. त्याचे कारण असे आहे की उद्या अमावास्या झाल्यानंतर सोमवारी आषाढ प्रतिपदा येते व तो दिवस आपण कालिदासदिन म्हणून साजरा करतो.

उपमा कालिदासस्य भारवेर्थगौरवम् ।
दण्डिन: पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा: ॥

आता आषाढ प्रतिपदा हा दिन कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून आज मी तुम्हाला संस्कृत कवी कालिदास याच्याविषयी सांगणार आहे.

आषाढ प्रतिपदेला कालिदास दिन साजरा केला जातो. मग आषाढ प्रतिपदा हा कालिदासाचा जन्मदिवस आहे का ? नाही, हा दिवस कालिदासाचा जन्मदिवस नाही. त्याचा जन्म केव्हा झाला, कोठे झाला याची काहीही माहिती उपलब्ध नाही. किंबहुना तशी कोणत्याच संस्कृत कवीची माहिती उपलब्ध नाही. संस्कृतकवींनी कधीही स्वत:विषयी फारसे काही लिहून ठेवलेले नाही. सर्व गोष्टींबद्दल आपल्याला अनुमानच करावे लागते. या कवीचा उल्लेख कोणी केला आहे ? त्यावरून हा कवीचा काळ त्या कवींच्या आधी मानायचा व ज्यांनी ह्याविषयी काहीही उल्लेख केलेला नाही त्या कवींच्या नंतर मानायचा अशी ही सर्वसाधारण पद्धती आहे. त्यामुळे इतर अनेक कवींप्रमाणेच कालिदासाच्या प्रामाणिक चरित्राविषयी सुद्धा मतमतांतरे आहेत. काहीजण त्याला बंगाली मानतात, काहीजण त्याला काश्मिरी मानतात तर काही त्याला उज्जैनीबद्दल त्याचा दिसून येणारा ओढा पाहून तो रहिवासी असावा असे मानतात.

कालिदास हा शैव असावा व तो उज्जैनीचा असावा असे काहीजणांनी त्याच्या साहित्यात येणार्‍या उज्जैनीप्रेमावरून ठरवले आहे. कालिदास हा भोजराजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता अशी प्रसिद्धी आहे. तेव्हा भोज राजाच्या समकालीन असावा. पण भोज राजे सुद्धा २/३ होऊन गेले. मग हा नेमका कोणत्या भोजाच्या दरबारात असावा ? कालिदासाने भास या नाटकाकाराच उल्लेख आपल्या काव्यात केलेला आहे. याचा अर्थ तो भासानंतर होऊन गेला. भास इ.स. पूर्व १ शतक ते इ.स. पहिले शतक अशा २०० वर्षात कधीतरी होऊन गेला. याचा अर्थ कालिदास इ.स. पहिल्या शतकानंतर कधीतरी होऊन गेला असावा, भाडांरकर, कीथ वगैरे इतिहासकारांनी त्याचा काळ इ.स. चौथे शतक ठरवला आहे. हा द्वितीय चंद्रगुप्ताचा काळ. त्याने त्याला राजाश्रय दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण कालिदास हा दीड हजार वर्षांपूर्वी कधीतरी होऊन गेला.

त्याच्याविषयी एक दंतकथा प्रसिद्ध आहे. कालिदास हा अत्यंत मूर्खशिरोमणी होता. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला घराबाहेर हाकलून दिले व पंडित झाल्याशिवाय घरी यायचे नाही अशी तंबी दिली. मग कालिदासाने कालिमातेची उपासना केली. कालिमाता त्याच्यावर प्रसन्न झाली व तिने त्याच्या जिभेवर हाताने काही लिहीले. आता आपण पंडित झालो असे मानून कालिदास घरी आला. दार ठोठावले. पत्नीने कोण आहे म्हणून विचारले तर त्याने आपली आपण तिचा पती असल्याची ओळख सांगितली. तेव्हा पत्नीने त्याला दाराआडूनच विचारले की ‘अस्ति कश्चिद्वाग्विशेष: ?’ तुला वाणीचा विलास काही प्राप्त झाला आहे का ? त्यावेळी कालिदासाने अस्ति, कश्चित्, वाग्विशेष: हे तीन शब्द सुरवातीला योजून तीन काव्ये लिहिली. त्यातील कश्चित् या शब्दाने मेघदूत काव्याची रचना झालेली आहे.

त्याचे आज तीन नाटके, दोन महाकाव्ये व दोन खंडकाव्ये असे सात ग्रंथ उपलब्ध आहेत. जणु हे सांस्कृतसाहित्यातील सात रंगांनी युक्त असे इंद्रधनुष्यच. विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम्, मालविकाग्निमित्रम् अशी त्याची तीन नाटके आहेत. रघुवंश व कुमारसंभव अशी त्याची दोन महाकाव्ये आहेत तर मेघदूत व ऋतुसंहार ही दोन खंडकाव्ये आहेत. महाकाव्य म्हणजे मोठे काव्य हे त्याच्या नावावरूनच कळते, तर खंडकाव्य म्हणजे शे-शंभर श्लोकांनी युक्त असे लहानसे काव्य. पुरुरवा-उर्वशी यांचे कथानक त्याने विक्रमोर्वशीयम् मधे गुंफले आहे तर दुष्यंत-शकुंतला यांचे कथानक शाकुंतल नाटकात आहे. मालविका व अग्निमित्र राजाचे कथानक मालविकाग्निमित्रम् या नाटकामधे आहे. रघुवंशम् या काव्यात त्याने रामाच्या पूर्वी व रामानंतर होऊन गेलेल्या राजांचे वर्णन केले आहे तर कुमारसम्भवम् काव्यात शंकर-पार्वतीचा प्रथम पुत्र षडानन म्हणजेच कार्तिकेय याने देवांचा सेनापती बनून देवांना विजय मिळवून दिल्याची कथा वर्णिली आहे. खंडकाव्यातील ऋतुसंहार काव्यात वसंतादी सहा ऋतूंचे वर्णन आहे तर मेघदूत हे संस्कृतसाहित्यातील प्रसिद्ध दूतकाव्य. हनुमान लंकेला दूत बनून गेला या कथानकावरून त्याला कदाचित हे सुचले असावे. या काव्यात असे वर्णन केले आहे की यक्ष हा कुबेराचा एक सेवक होता. त्याच्या कामात काही चूक झाली, त्यामुळे कुबेराने त्याला एक वर्षाची हद्दपारीची शिक्षा दिली. तेव्हा तो हिमालयातील अलका नगरीतून निघून रामगिरी पर्वतावर आला. तोपर्यंत शिक्षेचे आठ महिने संपले होते. नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे त्याला आपल्या पत्नीचीही आठवण येत होती. अशा मानसिक स्थितीत असतांना त्याला त्या पर्वतावर एक काळा मेघ दिसला. त्याने जाणले की हा मेघ आता हिमालयापर्यंत प्रवास करणार. तेव्हा त्याने त्यालाच दूत बनवून त्याच्या करवी आपल्या पत्नीला निरोप पाठवला की शिक्षेचे आठ महिने संपले आहेत, चारच महिने उरले आःएत. तेव्हा मी लवकरच येत आहे.

१०० श्लोकांच्या आसपास मंदाक्रांता वृत्तात लिहिलेले हे नितांतसुंदर काव्य आहे. या काव्यावरून दिसून येते की कालिदासाचा भूगोल पक्का आहे. सुरवातीला मेघाचा अनुनय, त्याला निरोप सांगण्याविषयी विनंती, मग मार्गाचे वर्णन, नंतर हिमालयात पोचल्यावर अलका नगरीचे वर्णन, आपल्या घराचे वर्णन करून शेवटी मी लवकरच येत आहे हा निरोप.

या काव्यात त्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघ दिसतो असे वर्णन असल्यामुळे आषाढ प्रतिपदेला कालिदासदिन आपण साजरा करतो.

सौ. मनीषा अभ्यंकर

Friday, June 19, 2020

पाठ १० वा - रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणारा शिष्टाचाराचे शब्द

संस्कृतभाषेविषयी एक कवी म्हणतो

३) अमृतं संस्कृतं मित्रं सरसं सरलं वच: । एकतामूलकं राष्ट्रे ज्ञानविज्ञानपोषकम् ॥८४-३॥

अर्थ - संस्कृतभाषा ही अमृताप्रमाणे आहे. ती आपला मित्रच असून ती सरळ व सरस आहे. ती भाषा राष्ट्राच्या एकात्मकतेस कारणीभूत आहे. तसेच ती ज्ञान व विज्ञानाला पोषक आहे.

संस्कृतभाषा ही राष्ट्राची एकात्मता टिकवून ठेवण्यास उपयोगी आहे. कारण प्रत्येक भारतीय नागरिकाला संस्कृत भाषेविषयी प्रेम, कुतुहल आहे.

आपण दोन दिवस क्रियापदे शिकत आहोत प्रथम गण परस्मैपद क्रियापदांची रूपे कशी कराय़ची ते आपण शिकलो. त्या अनुरोधाने अस्मद्, युष्मद् व तद् या तीन पुरुषातील तीन सर्वनामांचाही परिचय करून घेतला. त्याव्यतिरिक्त संस्कृतमधे वरचेवर वापरण्यात येणार्‍या सर्वनामांची प्रथमा विभक्ती पाहू. आता फक्त पुंलिंगाचीच प्रथमा विभक्ती सांगणार आहे.

यद् (सर्व पुं) - जो
य:  यौ  ये प्रथमा

किम् हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे.
किम् (पुं) = कोण, काय
क:  कौ  के प्रथमा

एतद् = हा, ही, हे
एतद् (पुं)
एष:  एतौ  एते  प्रथमा

आज आपण नेहेमी व्यवहारात वापरता येण्य़ासारख्या काही शब्दांचा परिचय करून घेऊया. नंतर पुढच्या आठवड्यात आपण छोटी छोटी वाक्ये पाहूया.

शिष्टाचार म्हणून आपण काही शब्दप्रयोग व्यवहारात करत असतो

१) हरि ॐ । - राम राम
२) नमस्ते / नमस्कार - नमस्ते
३) सुप्रभातम् - शुभप्रभात
४) शुभरात्रि: - शुभरात्री
५) धन्यवाद: - धन्यवाद
६) स्वागतम् - स्वागत असो
७) चिन्ता माऽस्तु - काळजी करू नका
८) कृपया - कृपा करून
९) क्षम्यताम् / क्षमस्व - क्षमा करा
१०) पुन: मिलाम: - पुन्हा भेटू
११) अस्तु - ठीक आहे.
१२) श्रीमन् / आर्य - महोदय
१३) मान्ये / आर्ये - बाईसाहेब, श्रीमतीजी
१४) साधु / समीचीनम् - छान / बरोबर आहे.

आता वर आलेले बरेचसे शब्द आपल्याला माहीत आहेत. आपण ते व्यवहारात उपयोगातही आणतो. फक्त ते संस्कृत आहेत हे आपल्याला माहीत नसते. त्यातील एक शब्द आहे स्वागतम्. आपण मराठीत सुस्वागतम् असे म्हणतो. पण तसा शब्दप्रयोग चुकीचा आहे. स्वागतम् मधे सु + आगतम् असे दोन शब्द आहेत. शुभ या अर्थी सु हा उपसर्ग आलेलाच आहे. तेव्हा आणखी एक सु उपसर्ग लावण्याची वास्तविक आवश्यकता नाही. पण मराठीत सुस्वागतम् शब्द रूढ झाला आहे.

आज स्वाध्याय मागच्या दोन पाठांवर आधारित आहे.

स्वाध्याय १०)

प्रश्न १ ला - अ गटातील शब्द व ब गटातील शब्दांच्या अर्थानुसार जोड्या लावा.
अ गट = वयम्, युवाम्, स:, त्वम्, क:, अहम्,  ते
ब गट = कोण, मी, तुम्ही दोघे, आपण सर्व, ते सर्व, तो, तू,

प्रश्न २ रा = खालील शब्दांमधील प्रथमा बहुवचन सांगा.
अस्मद्, तद्, हंस, धर्म, भूप

प्रश्न ३ रा - खालील मराठी क्रियापदांकरता संस्कृतमधे कोणते धातू आहेत ?
१) पूजा करणे २) खेळणे ३) चालणे ४) इच्छा करणे ५) खाणे

प्रश्न ४ था = खालील दिलेल्या क्रियापदांची त्या त्या पुरुषातील योग्य ती रूपे लिहा.
१) प्रथम पुरुष - कूज् गर्ज्
२) द्वितीय पुरुष - चर्, तप्
३) तृतीय पुरुष - धाव्, त्यज् 



८ व्या स्वाध्यायाची उत्तरे

प्रश्न १ ला - संस्कृतभाषेत मूळ धातूपासून किती क्रियापदे तयार होतात ?
    संस्कृतभाषेत तीन पुरुष व तीन वचने असल्यामुळे मूळ धातूपासून प्रथम पुरुषाची तीन, द्वितीय पुरुषाची तीन व तृतीय पुरुषाची तीन अशी एकूणा् ९ क्रियापदे तयार होतात.

प्रश्न २ रा - संस्कृतभाषेत धातूंची विभागणी कशी केली आहे ? 


    संस्कृतभाषेतील मूळ धातू प्रथम दहा गटात विभागलेले आहेत. पुन्हा हे दहा गटातील धातूंची परस्मैपद व आत्मनेपद या दोन गटात विभागणी झाली आहे.

प्रश्न ३ रा - धातूचे अंग कशाला म्हणातात ? 


    एखादा धातू कोणत्या गटातला आहे हे ओळखण्यासाठी म्हणून त्या प्रत्येक गटाला एकेक अक्षर दिलेले आहे. त्याला विकरण म्हणतात. जेव्हा धातूपासून क्रियापद बनवायचे असते, तेव्हा प्रथम ते विकरण धातूला जोडतात व नंतर त्यापुढे प्रत्यय ठेवतात. विकरण जोडून तयार झालेल्या धातूस धातूचे अंग असे म्हणतात.

  प्रश्न ४ था - प्रथम पुरुषाचे कोणते कर्ते आहेत ? 


    अस्मद् हे प्रथमपुरुषी सर्वनाम आहे. अहं (मी), आवां (आम्ही दोघे) वयं (आम्ही सर्व) हे प्रथम पुरुषाचे तीन कर्ते आहेत.

प्रश्न ५ वा - द्वितीय पुरुषाचे कोणते कर्ते आहेत ? 


युष्मद् हे द्वितीय पुरुषाचे सर्वनाम आहे. त्वं (तू), युवां (तुम्ही दोघे), यूयं (तुम्ही सर्व) असे द्वितीय पुरुषाचे तीन कर्ते आहेत.

प्रश्न ६ वा - तृतीय पुरुषाचे कोणते कर्ते आहेत ? 


तद् हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे. ह्या सर्वनामाची तिन्ही लिंगात वेगवेगळी रूपे होतात. पुंल्लिंगामधे स: (तो), तौ (ते दोघे) ते (ते सर्व) असे तृतीय पुरुषाचे तीन कर्ते आहेत. परंतु भाषेमधे तृतीय पुरुषामधे नाम किंवा सर्वनाम काहीही वापरले जाते. 




"१० वा पाठ - रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणारा शिष्टाचाराचे शब्द " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Thursday, June 18, 2020

पाठ ९ वा - क्रियापद विचार भाग २

९ वा पाठ - क्रियापद विचार भाग २

आजचं स्वरचित सुभाषित आहे संस्कृतभाषेवरच रचलेलं आहे.

संस्कृतेन जगत्सर्वं सुसंस्कारैर्युतं भवेत् ।
कीर्ते: परिमलमस्या: दिक्षु सर्वासु वै किरेत् ॥

अर्थ - संस्कृतभाषेमुळे सर्व जग सुसंस्कारांनी युक्त होईल. या भाषेचा कीर्तीपरिमल सर्व दिशात पसरेल.

आपण संस्कृत भाषेमधे क्रियापदे कशी तयार करतात ते पहात आहोत. काल आपण नम् (१प.प.) = नमस्कार करणे या धातूची वर्तमान काळातील रूपे पाहिली.

त्याप्रमाणे एका धातूपासून प्रत्येक काळात प्रथम पुरुषाची तीन, द्वितीय पुरुषाची तीन व तृतीय पुरुषाची तीन अशी नऊ क्रियापदे होणार आहेत.

मराठी भाषेमधे फक्त दोनच वचने आहेत. एक वचन व बहु.वचन त्यामुळे क्रियापदाची सहाच रूपे होतात.

उदा.
मी आहे, आम्ही आहोत.
तू आहेस, तुम्ही अहात
तो आहे, ते आहेत.
कर्त्याचे वचन बदलले की क्रियापदाचे सुद्धा वचन बदलते. तसेच संस्कृतमधे असते. फक्त आणखी एक द्वि. व. जास्त असल्यामुळे आणखी तीन क्रियापदे वाढतात इतकेच.

इंग्लिशमधे सुद्धा आपण अशीच कर्त्याप्रमाणे क्रियापदे योजतो. To be
ची I am.  We are.  You are.  You are. he is.  She is.  It is. They are. पण To go  ह्याबाबतीत मात्र तृतीय पु. क्रियापदापुढे फक्त ऽ हा प्रत्यय लागतो. बाकी साध्या वर्तमान काळात सारखीच रूपे येतात.

संस्कृतभाषेबाबत आणखी एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे मराठीमधे अथवा हिंदी भाषेमधे क्रियापदाला लिंग असते. उदा. राम खातो. सीता खाते. किंवा हिंदीमधे राम खाता है । सीता खाती है । कर्त्याचे लिंग बदलले की क्रियापदाचे लिंग बदलते. परंतु संस्कृतमधे मात्र क्रियापदाला लिंग नसते. राम: खादति । सीता खादति । कर्त्याचे लिंग बदलले म्हणून क्रियापदाचे काही लिंग बदलत नाही. इंग्लिश मधे सुद्धा क्रियापदाला लिंग नसते. She eats. He eats. म्हणजे या बाबतीत संस्कृतचे इंग्लिश भाषेशी साम्य आहे. तेव्हा लक्षात काय ठेवायचं तर संस्कृतमधे क्रियापदाला लिंग नसते.

आता पहिल्या गणातील सर्व धातूंची रूपे नम् धातूप्रमाणेच होणार आहेत. आज आपण आणखी काही क्रियापदे पाहू. सुरवातीला जे धातू आपण मराठीमधे सुद्धा त्याच अर्थाने वापरतो तेच धातू घेतले आहेत.

१) अर्च् = पूजा करणे
२) काङ्क्ष् = इच्छा करणे
३) कूज् = कूजन करणे
४) क्रीड् = खेळणे
५) खाद् = खाणे
६) खेल् = खेळणे
७) गर्ज् = गर्जना करणे
८) गुञ्ज् = गुणगुणणे
९) चर् = फिरणे
१०) चल् = चालणे
११) जप् = जप करणे
१२) तप् = तप करणे
१३) त्यज् = टाकणे
१४) दह् = जाळणे
१५) धाव् = धावणे

या सर्व धातूंची रूपे नम् धातूप्रमाणेच होणार आहेत.
एकदा ह्या सर्व धातूंची रूपे तुम्ही आपल्या मनाशी म्हणून पहा. एकदा लिहून पहा. 

स्वाध्याय ९)

काल आपण कोणत्या कर्त्यापुढे कोणते क्रियापद ठेवायचे ते पाहिले. त्या आधारे आता कर्त्यापुढे खालील क्रियापदांची योग्य रूपे लिहा. व त्या वाक्याचा अर्थ लिहा.
उदा. अहम् अर्चामि = मी पूजा करतो.

१) अहम्  ---- (अर्च्)
२) महेश: ---- (काङ्क्ष्)
३) खगा:  ---- (कूज्)
४) छात्रा: ------ (क्रीड्)
५) बालकौ ---- (खाद्)
६) वयं --- (खेल्)
७) सिंह: ----- (गर्ज्)
८) भ्रमरा: ----- (गुञ्ज्)
९) आवां ---- (चर्)
१०) अहं ----- (चल्)
११) भक्ता: --- (जप्)
१२) त्वं ---- (तप्)
१३) यूयं --- (त्यज्)
१४) आन्दोलका: --- (दह्)
१५) युवां ---- (धाव्)


 ९) स्वाध्याया ची उत्तरे१) अहम् अर्चामि । २) महेश: काङ्क्षति । ३) खगा: कूजन्ति । ४) छात्रा: क्रीडन्ति । ५) बालकौ खादत: । ६) वयं खेलाम: । ७) सिंह: गर्जति । ८) भ्रमरा: गुञ्जन्ति । ९) आवां चराम: । १०) अहं चलामि । ११) भक्ता: जपन्ति । १२) त्वं तपसि । १३) यूयं त्यजथ । १४) आन्दोलका: दहन्ति । १५) युवां धावथ: ।




"९ वा पाठ - क्रियापद विचार भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Wednesday, June 17, 2020

पाठ ८ वा क्रियापद-विचार


नमस्कार
आज आपण आठवा पाठ घेणार आहोत. पाठाचे नाव आहे क्रियापद विचार. पण प्रथम मी नेहेमी प्रमाणे  मी एका स्वरचित सुभाषिताने सुरवात करणार आहे. सुभाषित संस्कृत भाषेविषयीच हे सुभाषित आहे. काल संगणाकाला उपयुक्त असणार्‍या संस्कृतभाषेविषयी सुभाषित होते. संगणकभाषा म्हणून जर का तिचा प्रसार झाला तर काय होईल ?

ध्रुवं भाविनि काले तु एकभाषो जनो भवेत् ।
‘संस्कृतं मातृभाषा मे’ इत्येतत्सादरं वदेत् ॥

अर्थ - भावी काळामधे सर्व लोक एकभाषी होवोत. आणि ‘संस्कृत माझी मातृभाषा आहे’ असे सर्वजण आदराने म्हणोत.अशी इच्छा व्यक्त करायला तरी काही हरकत नाही. असो.

दोन दिवस आपण अकारांत पुलिंगी शब्दांची प्रथमा विभक्ती कशी होते त्याचा विचार केला. आज आपण क्रियापदे शिकणार आहोत. वाक्य बनण्यासाठी कमीत कमी कर्ता व क्रियापद हे दोन शब्द तरी आवश्यक असतात. तो जातो, तो खातो, मी उठते, वगैरे वाक्यात कमीत कमी दोन शब्द तरी आहेत.

संस्कृतमधे इतर भाषांप्रमाणे तीन पुरुष (प्रथम द्वितीय व तृतीय) आहेत व वचने मात्र तीन आहेत. त्यामुळे प्रथम पुरुषाची तीन वचनातील तीन क्रियापदे, द्वितीय पुरुषाची तीन व तृतीय पुरुषाची तीन अशी एका धातूपासून नऊ क्रियापदे तयार होतील.

आज आपण परस्मैपदी वर्तमानकाळ पाहू. त्याचे प्रत्यय आहेत -

आता संस्कृत भाषेमधे सुमारे २००० धातू आहेत. धातू म्हणजे मूळ क्रियापदे, उदा. जाणे, खाणे, बसणे वगैरे. ही क्रियापदे १० गटात विभागली आहेत. त्यांना गण म्हणतात. १ ला गण, दुसरा गण, वगैरे. पुन्हा ही क्रियापदे परस्मैपद व आत्मनेपद या दोन गटात विभागलेली आहेत. प्रत्येक गटात ह्या दोन्ही प्रकारची क्रियापदे असतात. १ला गण परस्मैपद व पहिला गण आत्मनेपद, दुसरा गण परस्मै पद व दुसरा गण आत्मनेपद, वगैरे. आता एखादा धातू कोणत्या गटातला आहे हे ओळखणार कसं ? म्हणून त्या प्रत्येक गटाला एकेक अक्षर दिलेले आहे. त्याला विकरण म्हणतात. ते विकरण प्रथम त्या धातूत मिसळायचे व नंतर पुढे प्रत्यय जोडायचे. आज आपण पहिला गण परस्मैपदातील धातूंची वर्तमानकाळी क्रियापदे कशी बनवायची ते पाहू.

मि   व:  म:

नम् (१ प.प) = नमस्कार करणे.
पहिल्या गटाला ‘अ’ हे विकरण दिलेले आहे. धातूपासून क्रियापद करतांना प्रथम त्या धातूत हे विकरण मिसळून घ्याय़चे
म्हणून नम् + अ = नम
अ विकरण मिसळल्यामुळे म् हे व्यंजन पूर्ण झाले व म हे अक्षर बनले. ‘नम’ हे झाले धातूचे अंग. म्हणजे विकरण मिसळून तयार झालेल्या धातूला धातूचे अंग असे म्हणतात. आता या क्रियापदाला प्रत्यय लावून क्रियापदाचे रूप बनवायचे आहे.



परस्मैपदी वर्तमानकाळ -

ए.व.   द्वि.व.  ब.व.
मि      व:     म:     प्र.पु.
सि         थ:         थ     द्वि.पु. 
ति         त:      अन्ति  तृ.पु.

असे वर्तमानकाळी क्रियापदाला लागणारे ९ प्रत्यय आहेत. प्रत्येक क्रियापदापासून नऊ क्रियापदे तयार होतील. 

नमामि   नमाव:   नमाम: - प्रथम पुरुष

नमसि    नमथ:   नमथ  - द्वितीय पुरुष

नमति      नमत:        नमन्ति - तृतीय पुरुष

एका धातूपासून झालेली ही नऊ रूपे आहेत. अशीच नऊ नऊ रूपे प्रत्येक काळामधे होणार आहेत. वाक्यात या क्रियापदांचा उपयोग करतांना लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे कोणताही काळ व अर्थ वापरावयाचा असला तरी कर्ता ज्या पुरुष व वचनाचा असेल त्याप्रमाणे त्या पुरुषाचे व वचनाचे क्रियापद योजायचे आहे.

प्रथम पुरुष मी किंवा आम्ही वक्ता जेव्हा स्वत:बद्दल बोलतो तेव्हा त्याला प्रथम पुरुष म्हणतात. संस्कृतमधे प्रथम पुरुषी सर्वनाम आहे अस्मद् = मी, आम्ही. त्याची प्रथमा विभक्ती आहे -

अहं   आवां   वयं

अहं म्हणजे मी, आवां म्हणजे आम्ही दोघं आणि वयं म्हणजे आम्ही सर्व. आता हे प्रथम पुरुषाचे तीन कर्ते झाले. कर्ता नेहेमी प्रथमा विभक्तीतच ठेवतात. म्हणून सध्या मी फक्त प्रथमा विभक्ती सांगितली आहे. या कर्त्यांपुढे कोणती क्रियापदे येतील ते पाहू.

अहं नमामि । = मी नमस्कार करतो.

आवां नमाव: । = आम्ही दोघे नमस्कार करतो.

वयं नमाम: । = आम्ही सर्वजणं नमस्कार करतो.

द्वितीय पुरुषी सर्वनाम आहे युष्मद् = तू, तुम्ही

युष्मद् सर्वनामाची प्रथमा विभक्ती आहे -

त्वं   युवां   यूयं

त्वं म्हणजे तू, युवां म्हणजे तुम्ही दोघे आणि यूयं म्हणजे तुम्ही सर्व.
ह्या कर्त्यांच्या बरोबर द्वितीय पुरुषाची क्रियापदे येतील.

त्वं नमसि । = तू नमस्कार करतोस

युवां नमथ: । = तुम्ही दोघे नमस्कार करता.

यूयं नमथ । तुम्ही सर्व नमस्कार करता.

तृतीय पुरुषाचे सर्वनाम आहे तद् = तो, ती, ते. ह्या सर्वनामाची रूपे तिन्ही लिंगात वेगवेगळी होतील सध्या आपण फक्त पुंल्लिंगी विचारात घेणार आहोत.

स:   तौ   ते

स: म्हणजे तो, तौ म्ह्णजे ते दोघे व ते म्हणजे ते सर्व.

आता प्रथम पुरुष किंवा द्वितीय पुरुष यांच्यामधे फक्त सर्वनामच वापरली जातात. मी किंवा तू. पण तृतीय पुरुषामधे नाम किंवा सर्वनाम दोन्हींचा वापर होतो. तो नमस्कार करतो किंवा धनंजय नमस्कार करतो. आधी मी सर्वनाम वापरले. नंतर मी विशेषनाम वापरले.

स: नमति । = तो नमस्कार करतो.

तौ नमत: । = ते दोघे नमस्कार करतात.

ते नमन्ति । ते सर्वजणं नमस्कार करतात.

पुढच्या पाठापासून आपण एकेका पुरुषाची वाक्ये विचारात घेऊ.



धातूंची दहा गटात विभागणी, पुन्हा त्यांची परस्मैपद व आत्मनेपद अशी विभागणी हेही संस्कृत भाषेचे व्याकरण किचकट होण्याचे कारण झाले आहे. 



८ व्या स्वाध्यायाची उत्तरे

प्रश्न १ ला - संस्कृतभाषेत मूळ धातूपासून किती क्रियापदे तयार होतात ?
    संस्कृतभाषेत तीन पुरुष व तीन वचने असल्यामुळे मूळ धातूपासून प्रथम पुरुषाची तीन, द्वितीय पुरुषाची तीन व तृतीय पुरुषाची तीन अशी एकूणा् ९ क्रियापदे तयार होतात.

प्रश्न २ रा - संस्कृतभाषेत धातूंची विभागणी कशी केली आहे ?
    संस्कृतभाषेतील मूळ धातू प्रथम दहा गटात विभागलेले आहेत. पुन्हा हे दहा गटातील धातूंची परस्मैपद व आत्मनेपद या दोन गटात विभागणी झाली आहे.

प्रश्न ३ रा - धातूचे अंग कशाला म्हणातात ?
    एखादा धातू कोणत्या गटातला आहे हे ओळखण्यासाठी म्हणून त्या प्रत्येक गटाला एकेक अक्षर दिलेले आहे. त्याला विकरण म्हणतात. जेव्हा धातूपासून क्रियापद बनवायचे असते, तेव्हा प्रथम ते विकरण धातूला जोडतात व नंतर त्यापुढे प्रत्यय ठेवतात. विकरण जोडून तयार झालेल्या धातूस धातूचे अंग असे म्हणतात.

  प्रश्न ४ था - प्रथम पुरुषाचे कोणते कर्ते आहेत ?
    अस्मद् हे प्रथमपुरुषी सर्वनाम आहे. अहं (मी), आवां (आम्ही दोघे) वयं (आम्ही सर्व) हे प्रथम पुरुषाचे तीन कर्ते आहेत.

प्रश्न ५ वा - द्वितीय पुरुषाचे कोणते कर्ते आहेत ?
युष्मद् हे द्वितीय पुरुषाचे सर्वनाम आहे. त्वं (तू), युवां (तुम्ही दोघे), यूयं (तुम्ही सर्व) असे द्वितीय पुरुषाचे तीन कर्ते आहेत.

प्रश्न ६ वा - तृतीय पुरुषाचे कोणते कर्ते आहेत ?
तद् हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे. ह्या सर्वनामाची तिन्ही लिंगात वेगवेगळी रूपे होतात. पुंल्लिंगामधे स: (तो), तौ (ते दोघे) ते (ते सर्व) असे तृतीय पुरुषाचे तीन कर्ते आहेत. परंतु भाषेमधे तृतीय पुरुषामधे नाम किंवा सर्वनाम काहीही वापरले जाते. 




"पाठ ८ वा क्रियापद-विचार " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Tuesday, June 16, 2020

पाठ ७ वा विभक्ति विचार भाग २



काल आपण विभक्तींची ओळख करून घेतली. आज मी काही नवीन शिकवणार नाहीये. आपण तोच भाग पुन्हा थोडा पहाणार आहोत. पण प्रथम नेहेमीप्रमाणे एखाद्या सुभाषिताने सुरवात करूया.

आपण संस्कृतभाषेविषयी सुभाषित पहात आहोत. आज मी पाठाची सुरवात स्वरचित संस्कृत सुभाषिताने करणार आहे. कधीतरी बरेच दिवसापूर्वी ‘संस्कृतभाषा - ह्य: अद्य श्व:’ म्हणजे संस्कृतभाषा काल, आज आणि उद्या असा निबंध लिहिला होता तेव्हा लिहीलेले विचार आहेत.

युक्ता सङ्गणकार्थं वै या भाषा सुरभारती ।
अस्या: भासा प्रकाशेत सर्वमेतच्चराचरम् ॥

अर्थ - जी देवभाषा संस्कृतभाषा संगणकासासाठी उपयुक्त आहे, तिच्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशित होईल यात संशय नाही.

संगणकाला थोडक्या शब्दात पुष्कळ माहिती पुरवणारी भाषा आवश्यक असते. त्या दृष्टीने संस्कृतभाषा उपयुक्त आहे असे तज्ञांचे मत आहे व तसे प्रयत्नही सुरू आहेत. एकदा संगणकभाषा म्हणून तिचा वापर केला जाऊ लागला तर संस्कृतभाषेला सर्व जगात मागणी असेल. आणि त्यावेळी आपण संस्कृतभाषेला जवळ जवळ हद्दपार केल्यामुळे आपल्याला संस्कृतशिक्षक आयात करावे लागणार आहेत. असो. तेव्हा आपल्यावरच आपली भाषा जतन करून ठेवण्याची जबाबदारी आहे. आणि ह्या निमित्ताने आपण आपला वाटा उचलत आहोत. असो.

आपण संस्कृतभाषेमधे विभक्ती प्रत्यय कसे लावले जातात ते पहात आहोत. काल आपण देव शब्दाला प्रत्यय पावून शब्दाची होणारी विभक्ती रूपे पाहिली. आज नवीन काही अभ्यास घेणार नाहीये. आज देव शब्दाप्रमाणेच इतर शब्दांची रूपे आपण तयार करूया. आज फक्त प्रथमा विभक्तीच पाहू.

आता मुळात विभक्ती हा शब्द कसा आला ?

ए.व.    द्वि.व.    ब.व.
देव:        देवौ        देवा: ।
राम:    रामौ        रामा: ।
मेघ:        मेघौ        मेघा: ।
घन:        घनौ        घना: ।
खग:      खगौ       खगा: ।
श्याम:    श्यामौ    श्यामा: ।
हंस:        हंसौ        हंसा: ।
नर:        नरौ        नरा: ।
सिंह:    सिंहौ      सिंहा: ।
व्याघ्र:    व्याघ्रौ    व्याघ्रा: ।

आता मी जे शब्द घेतले आहेत त्यांचे मराठीत व संस्कृतमधे समानच अर्थ आहेत. ह्या शब्दांची प्रथमा विभक्ती जी वर दिली आहे ती तुम्ही दहा वेळा वाचा. आपोआप संस्कृतभाषेचे जिभेला वळण लागेल.

खाली स्वाध्यायासाठी अकारान्त पुंल्लिंगी शब्द दिलेले आहेत. त्याची प्रथमा विभक्ती लिहा व तोंडाने म्हणा. हे सर्व मनातल्या मनात म्हणण्यापेक्षा मोठ्याने स्पष्ट शब्दात म्हणणे आवश्यक आहे. त्यामुळे जिभेला वळण लागते व उच्चार शुद्ध होतात. 

साधारणपणे आपण वाक्यरचना करतांना सुद्धा शक्यतो मराठीतही प्रचलित असणारे शब्द वापरणार आहोत, की जेणे करून तुम्हाला एकदम फरक जाणवणार नाही.

आता आणखी काही शब्दांची य़ादी देते. तुम्ही वर लिहून दाखवल्याप्रमाणे त्या शब्दांची प्रथमा विभक्ती लिहिण्याचा सराव करा. तुम्हालाही संस्कृतभाषा आपण बोलत असल्याचे समाधान मिळेल.

 स्वाध्याय -

अकारान्त पुंल्लिंगी शब्द -
 
बाल, बालक, पुत्र, जनक, नृप, सज्जन, दुर्जन, खल, शिष्य, सूर्य, चन्द्र, कर, वंश, वानर, गज, मयूर, प्रश्न, लोक, धर्म, शिक्षक, छात्र, अश्व, मृग, गर्दभ, विद्यालय, समाचार, 

 ७ व्या स्वाध्यायाची उत्तरे.

अकारान्त पुं शाब्दाची प्रथमा विभक्ती

१) बाल:  बालौ  बाला:
२) बालक: बालकौ  बालका:
३) पुत्र:  पुत्रौ  पुत्रा:
४) जनक:  जनकौ  जनका:
५) नृप:  नृपौ  नृपा:
६) सज्जन: सज्जनौ  सज्जना:
७) दुर्जन:  दुर्जनौ  दुर्जना:
८) खल:  खलौ  खला:
९) शिष्य:  शिष्यौ  शिष्या:
१०) सूर्य:  सूर्यौ  सूर्या:
११) चन्द्र:  चन्द्रौ  चन्द्रा:
१२) कर:  करौ  करा:
१३) वंश:  वंशौ  वंशा:
१४) वानर: वानरौ वानरा:
१५) गज:  गजौ  गजा:
१६) मयूर:  मयूरौ  मयूरा:
१७) प्रश्न:  प्रश्नौ  प्रश्ना:
१८) लोक:  लोकौ  लोका:
१९) धर्म:  धर्मौ  धर्मा:
२०) शिक्षक:  शिक्षकौ  शिक्षका:
२१) छात्र:  छात्रौ  छात्रा:
२२) अश्व:  अश्वौ  अश्वा:
२३) मृग:  मृगौ  मृगा:
२४) गर्दभ: गर्दभौ  गर्दभा:
२५) विद्यालय:  विद्यालयौ  विद्यालया:
२६) समाचार:  समाचारौ  समाचारा:



" ७ वा पाठ विभक्ति विचार भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Monday, June 15, 2020

पाठ ६ वा विभक्ति विचार भाग १

    नमस्कार. आपण संस्कृतभाषा शिकत आहोत. आज सुरवातीला संस्कृतभाषेविषयीचे एक सुभाषित पाहून आपण अभ्यासाला सुरवात करूया.

*तावदेषा देवभाषा देवी स्थास्यति भूतले ।
यावाच्च वंशोऽस्त्यार्याणां तावदेषा ध्रुवंध्रुवा ॥८४-१॥*

अन्वय - यावत् आर्याणां वंश: अस्ति तावत् एषा देवी देवभाषा भूतले ध्रुवंध्रुवा स्थास्यति ।

अर्थ - जोपर्यंत आर्यांचा वंश य़ा पृथ्वीतलावर टिकून असेल तोपर्यंत ही देवभाषा संस्कृतभाषा या जगात अढळस्थानी राहील.
 
आज पाश्चात्य देशात या भाषेचा होत असलेला प्रसार पाहून ही देवभाषा या पृथ्वीवर नक्कीच टिकून राहील असे दिसून येत आहे. असो.

    पाच दिवस आपण संस्कृत वर्णमाला, अक्षरांची उच्चारस्थाने, शब्द, जोडाक्षरे वगैरे पूर्वी ज्या गोष्टी शाळेत शिकलो होतो त्याचाच पुनर्विचार केला. त्याव्यतिरिक्त व्याकरणात वापरण्यात येणार्‍या शब्दांचा परिचय करून घेतला. आता आपल्याला संस्कृतमधे वाक्यरचना करायला शिकायचे आहे.

    दोन किंवा जास्त वर्ण एकत्र येऊन शब्द बनतात. आणि दोन किंवा जास्त शब्द एकत्र येऊन वाक्य बनते. पण नुसते शब्द एकत्र ठेऊन वाक्य बनत नाही. तो शब्दसमूह वक्त्याला अभिप्रेत असलेला अर्थ श्रोत्यापर्यंत पोचवण्यास असमर्थ असतो. म्हणजे शब्द एकत्र येऊन त्या शब्दसमूहाने अपेक्षित अर्थ सुद्धा व्यक्त केला पाहिजे.

उदा. महेश शाळा जाणे असे नुसते मूळ शब्द एकापुढे एक ठेवले तर त्यातून अर्थ व्यक्त होत नाही. पण ‘महेश शाळेत जातो, महेशने आंबा खाल्ला, महेशने देवाला नमस्कार केला’ ही वाक्ये अर्थ स्पष्ट करतात. अर्थातच वाक्याचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी शब्दांना उचित विभक्तीप्रत्यय लावून ते शब्द वाक्यात योजावे लागतात. असे विभक्तिप्रत्यय प्रथमा ते सप्तमी असे सात प्रकारचे आहेत. संबोधन ही विभक्ती नाही. हाक मारण्यासाठी ते वापरले जाते.

विभक्ती विचार - कारक विभक्ति

    वाक्यामधे क्रियापद मुख्य असते. बाकी शब्द क्रियापदाशी संबंधित असतात. म्हणून त्यांना कारक विभक्ती असे म्हणतात. षष्ठी विभक्ती मात्र कारक विभक्ती नाही.

आपण एक वाक्य पाहूया. कर्ण सकाळी स्वत:च्या हाताने सूर्याला अर्घ्य देतो. (कर्ण: प्रभाते स्वहस्तेन सूर्याय अर्घ्यं यच्छति ।)

१) कर्ता-कारक -
वाक्यात क्रियापद मुख्य. या वाक्यात क्रियापद आहे ‘देतो’. क्रियापदाने सांगितलेली क्रिया कोण करतो ? तर कर्ण. म्हणजे कर्ण हा शब्द कर्ता या नात्याने क्रियापदाशी जोडलेला आहे. ह्याला म्हणायचे कर्ता-कारक. वाक्यात कर्ता शब्दाची नेहेमी प्रथमा विभक्ती असते 

२) कर्म-कारक -

    वरील वाक्यात देण्याची क्रिया कुणावर घडते ? तर अर्घ्य या शब्दावर. म्हणून अर्घ्य हे कर्म आहे. येथे अर्घ्य हा शब्द देणे या क्रियापदाचे कर्म आहे. वाक्यात कर्माची नेहेमी द्वितीया विभक्ती असते. ‘ला, ना’ हे मराठीतील प्रत्यय आहेत.

३) करण-कारक -

    करण म्हणजे क्रियेचे साधन. क्रिया करण्यास अत्यंत उपयोगी पडते ते. येथे अर्घ्य देण्याची क्रिया कशाच्या सहाय्याने पार पडते ? तर हाताच्या सहाय्याने. वाक्यात करण कारक नेहेमी तृतीया विभक्तीत असते. म्हणून स्वहस्तेन हे वाक्यातील करण आहे. ‘ने. शी, ही’ असे त्याचे मराठीतील प्रत्यय आहेत.

४) संप्रदान-कारक -

    कर्ता एखादी गोष्ट देतो, तेव्हा तो आपला त्यावरील हक्क सोडून त्यावर दुसर्‍याचा हक्क प्रस्थापित करतो. हा जो दुसरा घेणारा आहे तो संप्रदान ठरतो. वाक्यात संप्रदान-कारक चतुर्थी विभक्तीत असते. वरील वाक्यातील सूर्य हा शब्द संप्रदान-कारक आहे. मराठीत त्यासाठी स, ला, ते, स, ला, ना, ते’ असे प्रत्यय लावतात.

५) अपादान-कारक -

    प्रथम दोन वस्तु एकत्र असतात. नंतर त्यातील एक दूर जाते. त्यातील जी स्थिर वस्तु असते तिला अपादान कारक म्हणतात. वरील वाक्यात अपादान कारक नाही. आपण दुसरे वाक्य पाहूया. ‘झाडावरून पान पडते’. पान प्रथम झाडावर होते. नंतर ते झाडापासून दूर गेले, विलग झाले. या वाक्यात पडणारे कोण ? तर पान. पान हा पडणे या क्रियापदाचा कर्ता आहे. झाड हे स्थिर आहे, तेव्हा झाड हे अपादान-कारक होते. अपादान-कारकाची वाक्यात पंचमी विभक्ती होते. मराठीत त्याचे ‘ऊन, हून, पासून’ असे प्रत्यय आहेत.

अधिकरण-कारक -

    अधिकरण कारक म्हणजे क्रियेचा आधार. उदाहरण पाहूया. ‘चेंडू जमिनीवर पडतो’. पडणारा चेंडू म्हणून चेंडू हा शब्द पडणे या क्रियापदाचा कर्ता झाला. आणि पडण्याच्या क्रियेचा आधार काय तर जमीन. म्हणून जमीन हे अधिकरण कारक झाले. आणखी एक उदाहरण पाहूया. ‘आई स्वयंपाकघरात पातेल्यात भात शिजवते.’ शिजवणे क्रियापदाचा आई हा शब्द कर्ता झाला. भात हे कर्म झालं. स्वयंपाकघर हे आईचे स्थान झाले तर पातेले हे भाताचे स्थान झाले. इथे दोन अधिकरणे आली एक कर्त्याकडून व एक कर्माकडून. अधिकरण कारकाची सप्तमी विभक्ती असते. थोडक्यात स्थानवाचक व कालवाचक शब्द हे सप्तमी विभक्तीत येतात.

षष्ठी ही कारक विभक्ती नाही. कारण ती क्रियापदाशी संबंधीत नाही. दोन शब्दातील संबंध दाखवण्याकरता या विभक्तीचा वापर होतो. उदा. देवाचे मंदीर, माझा हात, झाडाचे पान, मालकाचा सेवक. इथे फक्त दोन शब्दातील संबंध दाखवला आहे. मालक-मालकी संबंध, अवयव-अवयवी संबंध, किंवा नातेसंबंध दाखवण्यासाठी षष्ठी विभक्तीचा उपयोग करतात.
मालक-मालकी संबंध - माझा सेवक, माझ्या बांगड्या, तुझे पुस्तक
अवयव-अवयवी संबंध - झाडाचे पान, माझा हात
नातेसंबंध - माझा मुलगा, आजीचा नातु
मराठीत षष्ठी विभक्तीचे चा, ची, चे असे प्रत्यय आहेत.

संबोधन हे हाक मारण्याकरता वापरले जाते.

आज आपण वाक्यात विभक्ती कशाप्रकारे वापरल्या जातात त्याची माहिती घेतली. नंतर आपण एकेक दिवस एकेक विभक्ती वाक्यात वापरायला शिकणार आहोत. आता आपण एक देव या शब्दाची विभक्ती लाऊन रूपे कशी होतात ती पाहू.

देव हा शब्द कसा बनला आहे ?
द् + ए + व् + अ = देव. म्हणजे या शब्दाच्या शेवटी ‘अ’ हा स्वर आला आहे व शब्दाचे लिंग पुंलिंग आहे. देवी किंवा देवता हे स्त्रीलिंगी शब्द झाले व दैवत हा नपुंसकलिंगी शब्द झाला.

देव हा अकारान्त पुं  शब्द आहे. त्याची प्रथमा ते संबोधनाची रूपे पाहू.

ए.व.    द्वि.व.      ब.व.
देव:   देवौ      देवा:   प्रथमा 
देवं    देवौ     देवान्  द्वितीया
देवेन  देवाभ्याम्  देवै:   तृतीया
देवाय देवाभ्याम् देवेभ्य:   चतुर्थी
देवात्  देवाभ्याम् देवेभ्य: पंचमी
देवस्य  देवयो:  देवानाम्  षष्ठी
देवे     देवयो:  देवेषु    सप्तमी
हे देव   हे देवौ   हे देवा:  संबोधन

देव हा अकारांत पुंलिंगी शब्द आहे. तेव्हा खग, दीप, दीपक, नायक, काम, रस वगैरे सर्व अकारान्त पुंल्लिंगी शब्दांची रूपे देव शब्दाप्रमाणेच होतील.

विद्यार्थ्यांनी तरी हे शब्द पाठ करावेतच. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी सुद्धा हे पाठ करून ठेवावे. एक शब्द पाठ केला की सर्व शब्द पाठ केल्याप्रमाणेच होते.

आता या विभक्तींचे अर्थ व उच्चारण ऑडिओ मधे सांगितले आहे. ते ऐकून उच्चारणाची सवय करावी.

आता या शब्दाकडे एक नजर टाकली तर आपल्याला काय दिसते ? देव शब्दामधे विसर्ग, अनुस्वार व व्यंजनांनी अंत पावणारे शब्द दिसून येतात. आपल्याला ते तसेच वाक्यात उपयोगात आणायचे आहेत. म्हणजे हे सुद्धा एक संस्कृतभाषेचे वैशिष्ट्य आहे. मराठीत मन:पूत, अध:पात वगैरे काहीच शब्द आपण विसर्गासहित वापरतो. एरवी स्वरांत शब्द वापरतो. तेव्हा असे शब्द असणे हे सुद्धा संस्कृतभाषेचे वैशिष्ट्य आहे.

अनुस्वार व विसर्गाचे उच्चार लाभदायक कसे आहेत त्याविषयी मला आपल्या एका अभ्यासार्थीने पोस्ट पाठवली आहे ती तशीच नंतर फॉरवर्ड करते.

आज आपण सर्व कारकांचे अर्थ पाहिले. आता उद्यापासून आपण एकेक कारक वाक्यात कसे उपयोगात आणायचे ते पहाणार आहोत.

सौ. मनीषा अभ्यंकर.



स्वाध्याय़ ६ वा
१) वाक्य कशाला म्हणतात ?
२) विभक्ति कशाला म्हणतात?
३) कारक विभक्ती म्हणजे काय ?
४) षष्ठी ही कारक विभक्ती का नाही ?
५) षष्ठी विभक्ती कोणते संबंध व्यक्त करण्याकरता वापरली जाते ? 


६ व्या स्वाध्यायाची उत्तरे.

१) वाक्य कशाला म्हणतात ?
दोन किंवा जास्त वर्ण एकत्र येऊन शब्द बनतात. आणि दोन किंवा जास्त शब्द एकत्र येऊन वाक्य बनते. परंतु दोन किंवा जास्त शब्द एकत्र येऊन तो शब्दसमूह जेव्हा वक्त्याला अभिप्रेत असणारा अर्थ श्रोत्यापर्यंत पोहोचवण्यास समर्थ असतो, तेव्हा त्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. म्हणजेच तो शब्दसमूह अर्थाचा बोध करणारा असला पाहिजे.

२) विभक्ति कशाला म्हणतात?
वक्यात योजलेल्या शब्दांनी वक्त्याला अभिप्रेत असलेला अर्थ श्रोत्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या शब्दांना जे प्रत्यय लावावे लागतात त्यांना विभक्ति प्रत्यय असे म्हणतात. असे प्रथमा ते सप्तमी पर्यंतचे सात प्रकाअचे विभक्तीप्रत्यय आहेत.

३) कारक विभक्ती म्हणजे काय ?
वाक्यामधे क्रियापद मुख्य असते. बाकी शब्द क्रियापदाशी वेगवेगळ्या संबंधांनी जोडलेले असतात. हे संबंध वेगवेगळ्या विभक्ती-प्रत्ययांतून स्पष्ट होतात. त्या विभक्तींना कारक विभक्ती म्हणातात.

४) षष्ठी ही कारक विभक्ती का नाही ?
षष्ठी ही विभक्ती कारक विभक्ती नाही. कारण षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लावलेले शब्द हे दोन शब्दांमधील संबंध स्पष्ट करतात. ते क्रियापदाशी संबंधित नसतात. म्हणून षष्ठी विभक्ती ही कारक विभक्ती नाही.

५) षष्ठी विभक्ती कोणते संबंध व्यक्त करण्याकरता वापरली जाते ?
षष्ठी विभक्ती ही खालील तीन प्रकारचे संबंध व्यक्त करण्याकरता वापरली जाते.
१) मालकी संबंध - उदा. माझे पुस्तक, त्याची शाळा
२) अवयव-अवयवी संबंध - झाडाचे पान, बाळाचे पाय,
नातेसंबंध - उदा. त्याचा मित्र, नीरजाचा मुलगा, त्याची आई 





" ६ वा पाठ विभक्ति विचार भाग १ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...