Sunday, August 9, 2020

पाठ ४१ वा षष्ठी विभक्ती

पाठ ४१ षष्ठी विभक्ती

नमस्कार. आजपर्यंत आपण पंचमी विभक्ती पर्यंतचा अभ्यास केला. आता आज षष्ठी विभक्ती वाक्यात कधी उपयोगात आणायची असते ते पहावयाचे आहे. मराठीमधे चा, ची चे, हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत.

    षष्ठी विभक्ती ही कारक विभक्ती नाही. कारण ती विभक्ती क्रियापदाशी संबंधित नाही. दोन शब्दातील संबंध दाखवण्याकरता या विभक्तीचा उपयोग होतो. स्वामी-सेवक संबंध, मालक-मालकी संबंध, जन्य-जनक संबंध, कार्य व कारण वगैरे संबंध दाखवण्यासाठी षष्ठी विभक्तीचा वाक्यात उपयोग केला जातो.

१) न हि परगुणानां विज्ञातार: बहव: सन्ति । (दुसर्‍याच्या गुणांचे जाणकार खूप कमी लोक असतात).
२) पुत्र, लोकव्यवहाराणाम् अनभिज्ञ: असि ।
(बाळा, तू लोकव्यवहारांचा जाणकार नाहीस.
३) अलसस्य कुतो विद्या - (आळशाला विद्या कोठून मिळणार ?
४) देवस्य मन्दिरम् - देवाचे मंदिर

त्याव्यतिरिक्त काही अव्ययांना षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते.

उपरि - जलस्य उपरि
उपरिष्ठात् - जलस्य उपरिष्ठात्
अध: - वृक्षस्य अध:
अधस्तात् - वृक्षस्य अधस्तात्
पुर: - रामस्य पुरत:
पुरस्तात् - रामस्य पुरस्तात्
पश्चात् - सेवकस्य पश्चात्
अग्रे - नृपस्य अग्रे
उत्तरत: - नगरस्य उत्तरत:
दक्षिणत: - नगरस्य दक्षिणत:
कृते - दानस्य कृते 

निमित्त शब्दासाठी साधारणपणे सर्व विभक्ती लागतात. उदा.
किं निमित्तं वससि ?
केन कारणेन गच्छसि ?
कस्मै निमित्ताय,
कस्मात् निमित्तात् 

 

[07:33, 8/12/2020] Manisha Abhyankar: काल सुभाषिते थोडी जास्त झाली. म्हणून आज वेगळा पाठ घेत नाहीये. मोराच्या धड्याचे भाषांतर पाठवते आहे. व त्यावरील स्वाध्याय पाठवला आहे. त्या प्रश्नांची संस्कृतमधे उत्तरे लिहाय़ची आहेत.
[07:34, 8/12/2020] Manisha Abhyankar: पाठ ४१ मयूर: (भाषांतर)

१) एष: मयूर: । मयूर: खग: । मयूर: सर्वेषु खगेषु सुन्दर: । एतस्य केका प्रसिद्धा ।
 
भाषांतर- हा मोर आहे. मोर हा पक्षी आहे. मोर सर्व पक्षांमधे सुंदर आहे. त्याच्या केका प्रसिद्ध आहेत.

२) गरुड: पक्षिराज:, तथापि न स: राष्ट्रखग: । भारतस्य राष्ट्रखग: मयूर: एव वर्तते ।

भाषांतर- गरुड हा पक्षांचा राजा आहे, तरीही तो राष्ट्रीय पक्षी नाही. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

३) एतस्य चञ्चू: किञ्चित् दीर्घा ।

भाषांतर- याची चोच किंचित लांब असते.

४) मस्तके शिखा भवति । नृपस्य मस्तके मुकुटं भवति, तथा मयूरस्य मस्तके शिखा विराजते । अत: शिखी इत्यपि जना: तं वदन्ति ।

भाषांतर- (मोराच्या) डोक्यावर तुरा असतो. राजाच्या डोक्यावर मुकुट असतो, त्याप्रमाणे मोराच्या डोक्यावर तुरा शोभून दिसतो. म्हणून त्याला शिखी असेही लोक म्हणतात.*

५) अस्य कण्ठ: नील: । अत: नीलकण्ठ इति तस्य अपरं नामधेयम् ।
 
भाषांतर- याचा गळा निळा असतो. म्हणून नीलकंठ असेही त्याचे दुसरे नाव आहे.

६) अस्य कलाप: नयनमनोहर: अत: अस्य ‘कलापिन्’ इत्यपि नामधेयम् ।

भाषांतर- याचा पिसारा नयनरम्य असतो. म्हणून त्याचे ‘कलापिन्’ असेही नाव आहे.
 
७) मेघ: मयूरस्य मित्रम् ।
 
भाषांतर- मेघ मोराचा मित्र आहे.

८) यदा आकाशे मेघा: गर्जन्ति तदा एष: मयूर: आनन्दति नृत्यति च । अत: कश्चित् कवि: वदति -

भाषांतर- जेव्हा आकाशात मेघ गर्जना करतात, तेव्हा हा मोर आनंदित होतो व नृत्य करतो. म्हणून कोणी एक कवी म्हणतो -

९) गिरौ कलापी गगने पयोद:
लक्षान्तरेऽर्कश्च जले च पद्मम् ।
इन्दुर्द्विलक्षे कुमुदस्य बन्धु-
र्यो यस्य मित्रं नहि तस्य दूरम् ॥

संधिविग्रह - गिरौ कलापी गगने पयोद: लक्षान्तरे अर्क: च जले च पद्मम् । इन्दु: द्विलक्षे कुमुदस्य बन्धु: य: यस्य मित्रं नहि तस्य दूरम् ।

अन्वय - कलापी गिरौ (अस्ति), पयोद: गगने (अस्ति)  । अर्क: च लक्षान्तरे (अस्ति), पद्मम् च जले (अस्ति) । कुमुदस्य बन्धु: इन्दु: द्विलक्षे (अस्ति) । य: यस्य मित्रं नहि तस्य दूरम् ।

भाषांतर- मोर पर्वतावर असतो, (तर) मेघ आकाशात असतो. सूर्य लक्ष अंतरावर असतो तर सूर्यविकासी कमळ पाण्यात असते. चंद्रविकासी कमळाचा बंधू चंद्र दोन लक्ष अंतरावर असतो. जो ज्याचा मित्र आहे त्याला (आपला मित्र) दूर वाटत नाही. (मेघ इतक्या लांब असून सुद्धा मोर त्याला पाहून आनंडित होतो व नाचतो. सूर्य उगवला की तो लांब असला तरीही सूर्यविकासी कमळ फुलते तसेच चंद्र उगवला की तो लांब असला तरीही चंद्रविकासी कमळ फुलते. जो खरा मित्र असतो त्याला अंतराचे काही वाटत नाही.)

९) तस्य नृत्यमतीव नयनमनोहरम् । नर्तनसमये तस्य कलाप: विस्तृत: भवति । सर्वे जना: तस्य नृत्यं पश्यन्ति आनन्दन्ति च ।

भाषांतर- त्याचे नृत्य अत्यंत नयनरम्य असते. नृत्य करत असतांना त्याचा पिसारा विस्तृत होतो. सर्व लोक त्याला पहातात व आनंदित होतात.

११) मयूर: मेघात् किमपि न याचते । अत: एक: कवि: कल्पते -

भाषांतर- मोर मेघापासून कशाचीही इच्छा करत नाही. म्हणून एक कवी कल्पना करतो -

अहमस्मि नीलकण्ठस्तव खलु तुष्यामि शब्दमात्रेण ।
नाहं जलधर भवतश्चातक इव जीवनं याचे ॥३१-६४॥

संधिविग्रह - अहम् अस्मि नीलकण्ठ: तव खलु तुष्यामि शब्दमात्रेण । न अहं जलधर भवत: चातक इव जीवनं याचे ॥

अन्वय - जलधर, अहम् नीलकण्ठ: अस्मि । तव शब्दमात्रेण खलु तुष्यामि । अहं भवत: चातक इव जीवनं न याचे ।

भाषांतर- हे मेघा, मी निळा कंठ असणारा मोर आहे. केवळ तुझ्या आवाजानेच संतुष्ट होतो. मी तुझ्याकडून (भवत:) चातकाप्रमाणे पाणी मागत नाही.

१२) एतस्य पिच्छे विविधा: वर्णा: । एतस्य पिच्छे नीलवर्णस्याधिक्यं भवति । हरित:, पीत:, नील: पुनश्च अन्येऽपि वर्णा: मयूरस्य पिच्छे सन्ति । एते वर्णा: आकर्षका: । अत: मयूर: सर्वेषां चित्तानि आकर्षति ।

भाषांतर-याच्या पिसामधे वेगवेगळे रंग आहेत. याच्या पिसात निळा रंग जास्त प्रमाणात असतो. तसेच आणखी हिरवा, पिवळा, निळा व इतरही रंग मोराच्या पिसात असतात. हे रंग आकर्षक असतात. म्हणून मोर सर्वांची मने आकर्षून घेतो.

१३) एतस्य संपूर्णं शरीरं सुन्दरं परन्तु चरणौ असुन्दरौ । नृत्यसमये एतस्य चरणौ अपि सुन्दरौ भवत: ।

भाषांतर- याचे सर्व शरीर सुंदर असते, पण पाय मात्र सुंदर नसतात. परंतु नृत्याच्या वेळी त्याचे पायही सुंदर होतात. (त्याचा पदन्यास सुंदर असतो).

१४) मयूर: वने वसति । वृक्षेषु आरोहति । स: भूमौ चलति, धावति, आकाशे उड्डयते च ।

भाषांतर- मोर वनात रहातो. झाडावर चढतो. तो जमिनीवर चालतो, धावतो व आकाशात उडतो.

१५) स: सर्पानपि भक्षयति । स: मानवान् सर्पेभ्य: रक्षति ।

भाषांतर- तो सापांना खातो. तो सापांपासून मानवांचे रक्षण करतो.

१६) शङ्करस्य वाहनं वृषभ: ।

भाषांतर- शंकराचे वाहन बैल आहे.

१७) विष्णो: वाहनं गरूड: ।

भाषांतर- विष्णूचे वाहन गरुड आहे

१८) गणेशस्य वाहनं मूषक: ।

भाषांतर- गणपतीचे वाहन उंदीर आहे

१९) तथा सरस्वत्या: वाहनं मयूर: ।

भाषांतर- तसेच सरस्वतीचे वाहन मोर आहे.

२०) अत: कश्चित् सुभाषितकार: वदति -

भाषांतर-म्हणून कोणी एक सुभाषितकार म्हणतो -

मयूरो विहगो रम्य आनन्दयति मानवान् ।
पृष्ठे सरस्वती तस्य चोपविष्टेति मन्यते ॥७६-९॥
 
संधिविग्रह - मयूर: विहग: रम्य: आनन्दयति मानवान् ।
पृष्ठे सरस्वती तस्य च उपविष्टा इति मन्यते ।

अन्वय - मयूर: रम्य: विहग: । (स:) मानवान् आनन्दयति । तस्य पृष्ठे च सरस्वती उपविष्टा इति मन्यते ।

भाषांतर- मोर हा सुंदर पक्षी आहे. (तो) मानवांना आनंदित करतो. त्याच्या पाठीवर सरस्वती बसलेली आहे असे मानले जाते. 


पाठ ४१ मयूर: (स्वाध्याय)

प्रश्न १) उत्तराणि लिखत
    १) मयूर: केषु सुन्दर: ?
    २) कस्य केकारव: प्रसिद्ध: ?
    ३) क: पक्षिराज: ?
    ४) मयूर: कस्य देशस्य राष्ट्रखग: ?
    ५) मयूरस्य शिखा कुत्र विराजते ?
    ६) मयूरस्य कानि अन्यानि नामधेयानि ?
    ७) मेघ: कस्य मित्रम् ?
    ८) मयूर: कदा नृत्यति ?
    ९) चातक: मेघात् किं याचते ?
    १०) मयूरस्य पिच्छे के के वर्णा: सन्ति ?
    ११) वृषभ: कस्य वाहनम् ?
    १२) गरुड: कस्य वाहनम् ?
    १३) सरस्वती कुत्र उपविशति ? 

 

 

span style="color: blue;"> " षष्ठी विभक्ती " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ] 
 
 स्वाध्याय ४१  मयूर:

प्रश्न १) उत्तराणि लिखत
१) मयूर: केषु सुन्दर: ?
मयूर: सर्वेषु खगेषु सुन्दर: ।

२) कस्य केकारव: प्रसिद्ध: ?
मयूरस्य केकारव: प्रसिद्ध: ।

३) क: पक्षिराज: ?
गरुड: पक्षिराज: ।

४) मयूर: कस्य देशस्य राष्ट्रखग: ?
भारतस्य राष्ट्रखग: मयूर: एव वर्तते ।

५) मयूरस्य शिखा कुत्र विराजते ?
मयूरस्य मस्तके शिखा विराजते ।

६) मयूरस्य कानि अन्यानि नामधेयानि ?
नीलकण्ठ:, कलापी, बर्ही एतानि मयूरस्य अन्यानि नामधेयानि ।

७) मेघ: कस्य मित्रम् ?
मेघ: मयूरस्य मित्रम् ।

८) मयूर: कदा नृत्यति ?
यदा आकाशे मेघा: गर्जन्ति तदा एष: मयूर: आनन्दति नृत्यति च ।

९) चातक: मेघात् किं याचते ?
चातक: मेघात् जलं याचते

१०) मयूरस्य पिच्छे के के वर्णा: सन्ति ?
हरित:, पीत, नील: पुनश्च अन्येऽपि वर्णा: मयूरस्य पिच्छे सन्ति ।

११) वृषभ: कस्य वाहनम् ?
शङ्करस्य वाहनं वृषभ:

१२) गरुड: कस्य वाहनम् ?
विष्णो: वाहनं गरूड: ।

१३) सरस्वती कुत्र उपविशति ?
सरस्वती मयूरस्य पृष्ठे उपविशति 


  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...