पाठ ५० वा ह्रस्व इकारान्त पुंलिंगी शब्द* (उजळणी प्रथमा विभक्ती)
नमस्कार, इतके दिवस आपण वाक्यात शब्दांची योजना करतांना त्यांना विभक्ती-प्रत्यय कसे लावायचे ते शिकलो. पुन्हा एकदा हा भाग उजळणी म्हणून आपण घेत आहोत.
आपण एक पाहिले की वाक्यात प्रथमा विभक्ती ही कर्त्याची योजायची असते. तसेच कर्ता ज्या पुरुषाचा वा वचनाचा असेल त्याप्रमाणे क्रियापदाचे रूप योजायचे असते.
अहम्, आवाम्, वयम्; म्हणजे मी, आम्ही दोघे व आम्ही सर्व हे प्रथम पुरुषाचे कर्ते आहेत. त्वं, युवाम्, यूयम्; म्हणजे तू, तुम्ही दोघे व तुम्ही सर्व हे द्वितीय पुरुषाचे कर्ते आहेत. तर स:, तौ, ते म्हणजे तो, ते दोघे वा ते सर्व हे तृतीय पुरुषाचे कर्ते आहेत. आता तृतीय पुरुषामधे सा, ते, ता: म्हणजे ती, त्या दोघी, त्या सर्व असे स्त्रीलिंगी कर्तेही असू शकतील किंवा नामे सुद्धा उपयोगात आणता येतील. स: नमति, सा नमति, महेश: नमति, सुरेश: नमति असे कोणत्याही प्रकारचे वाक्य तयार करता येईल. संस्कृतमधे मराठी वा हिंदी प्रमाणे क्रियापदाला लिंग नसते हे आपण पाहिले. रमेश: नमति, कविता नमति । दोन्ही ठिकाणी नमति हे क्रियापद सारखेच आहे. अस्मद् व युष्मद् ही सर्वनामे सर्वलिंगी समान चालतात. रमेशही म्हणेल ‘अहं नमामि’ कविताही म्हणेल ‘अहं नमामि’.
आपण देव शब्दाची रूपे कशी होतात ती पाहिली होती. आज इतर काही स्वरांत शब्दांची प्रथमा विभक्ती पाहूया.
देव (अकारान्त पुंलिंगी.)
देव: देवौ देवा: प्रथमा
वन (अकारान्त नपुंसकलिंगी.)
वनम् वने वनानि प्रथमा
माला (आकारान्त स्त्रीलिंगी.)
माला माले माला: प्रथमा
कवि (ह्रस्व इकारान्त पुंलिंगी.)
कवि: कवी कवय: प्रथमा
मति (ह्रस्व इकारान्त स्त्रीलिंगी.)
मति: मती मतय: प्रथमा
वारि (ह्रस्व इकारान्त नपुंसकलिंगी.)
वारि वारिणी वारीणि प्रथमा
नदी (दीर्घ ईकारान्त स्त्री.)
नदी नद्यौ नद्य: प्रथमा
आता प्रथमा विभक्ती योजून तयार केलेला चित्रपाठ पाहूया.
photos for following not available on phone
१) एष: सागर: । जलधि:, अब्धि:, सरित्पति:, उदधि: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । तस्मिन् तरङ्गा: उद्भवन्ति । उदधि: मत्स्यानां निवासस्थानमस्ति ।
२) एते गिरय: । पर्वत:, नग:, अद्रि: शैल:, महीधर: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । गिरि: उत्तुङ्ग: अस्ति । तस्मिन् वृक्षा: रोहन्ति । केचित् गिरय: वनै: परिपूर्णा: वर्तन्ते । केचित् पाषाणमया: सन्ति ।
३) एष: ऋषि: । ऋषय: वने निवसन्ति । तत्र तेषाम् आश्रमा: भवन्ति स्म । वाल्मीकि: आदिकवि: । तस्य रामायणं काव्यं प्रसिद्धम् । श्रीव्यासस्य महाभारतं नाम काव्यं प्रसिद्धमस्ति ।
४) चन्द्र: निशापति: । रजनीनाथ:, शीतांशु:, चन्द्रमा:, सोम: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । स: रात्रौ आकाशे उदेति । चन्द्रस्य किरणा: शीतला: । चन्द्र: पौर्णिमायां परिपूर्ण: अस्ति अमावास्यायां स: न दृश्यते । चन्द्र: समुद्रात् उद्भूत: इति पुराणानि कथयन्ति । यदा चन्द्र: उदेति तदा गगनं मनोहरं भवति । तस्य किरणा: अमृतमया: वर्तन्ते । चकोरा: तत् अमृतं पिबन्ति इति कविकल्पना अस्ति ।
५) एष: नृपति: । नृपति: नाम राजा । भूपति: महीपति: भूपाल:, नृप:, राजा, इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । प्राचीनकाले भारतदेशे बहुविधा: नृपा: विद्यन्ते स्म । एते भूपा: परस्परं युध्यन्ते स्म । हर्ष:, भोज:, विक्रम:, चन्द्रगुत:, पृथ्वीराज:, अशोक: इत्यादय: नैके नृपा भारतदेशस्य शासनं कुर्वन्ति स्म ।
६) अहि: नाम सर्प: । भुजग:, भुजङ्ग:, भुजङ्गम:, नाग: सरीसृप: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । सर्पाणां विविधा: प्रजातय: सन्ति । नागराज: शङ्करस्य कण्ठे वर्तते । सर्प: कृषकाणां मित्रम् । सर्पस्य दन्ते विषमस्ति । तस्य फाटाटोप: भयङ्कर: अस्ति ।
आता खाली स्वाध्यायासाठी चित्रं व त्याचे मराठीत वर्णन लिहीले आहे. त्याचं तुम्ही संस्कृतमधे भाषांतर करायचे आहे.
१) हा रवि आहे. सूर्य सकाळी उगवतो. सूर्योदयाच्या वेळी आकाश लालसर होते. सूर्यास्ताच्या वेळीही ते लालसर होते. दुपारी त्याची किरणे प्रखर होतात. सूर्यप्रकाश लाभदायक असतो. सूर्य उगवल्यावर पक्षी किलबिल करतात.
(लालसर -रक्तवर्ण, दुपार - मध्याह्न, किलबिल करणे - कूज् (१प.)
२) हे कपी आहेत. वानर, मर्कट अशी त्याची अन्य नावे आहेत. कपी झाडांवर उड्या मारतात. काही वानर श्वेतमुख असतात. काही कृष्णमुख असतात. वानर श्रीरामांचे सहायक होते.
३) ही रत्ने आहेत. मणि असे त्यांचे दुसरे नाव आहे. मणी विविध रंगी असतात. ते मूल्यवान असतात. काही लाल रंगांचे असतात तर काही हिरव्या रंगाचे असतात. काही पांढर्या रंगांचे असतात. मणियुक्त आभूषणे सर्वांना प्रिय असतात.
================================
५० स्वाध्याय (उत्तरे)
१) एष: सागर: । जलधि:, अब्धि:, सरित्पति:, उदधि: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । तस्मिन् तरङ्गा: उद्भवन्ति । उदधि: मत्स्यानां निवासस्थानमस्ति ।
भाषांतर - हा सागर आहे. जलधी, अब्धी, सरित्पती, उदधी इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. त्यामधे लाटा निर्माण होतात. समुद्र माशांचे निवासस्थान आहे.
२) एते गिरय: । पर्वत:, नग:, अद्रि: शैल:, महीधर: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । गिरि: उत्तुङ्ग: अस्ति । तस्मिन् वृक्षा: रोहन्ति । केचित् गिरय: वनै: परिपूर्णा: वर्तन्ते । केचित् पाषाणमया: सन्ति ।
भाषांतर - हे पर्वत आहेत. पर्वत, नग, अद्री, शैल, महीधर इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. पर्वत उंच असतो. त्यावर झाडे उगवतात. काही पर्वत वनांनी परिपूर्ण असतात. काही पाषाणमय असतात.
३) एष: ऋषि: । ऋषय: वने निवसन्ति । तत्र तेषाम् आश्रमा: भवन्ति स्म । वाल्मीकि: आदिकवि: । तस्य रामायणं काव्यं प्रसिद्धम् । श्रीव्यासस्य महाभारतं नाम काव्यं प्रसिद्धमस्ति ।
भाषांतर - हा ऋषी आहे. ऋषी वनात रहातात. तेथे त्यांचे आश्रम असतात. वाल्मीकी हे आदिकवी आहेत. त्यांचे रामायण हे काव्य प्रसिद्ध आहे. श्रीव्यासांचे महाभारत हे काव्य प्रसिद्ध आहे.
४) चन्द्र: निशापति: । रजनीनाथ:, शीतांशु:, चन्द्रमा:, सोम: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । स: रात्रौ आकाशे उदेति । चन्द्रस्य किरणा: शीतला: । चन्द्र: पौर्णिमायां परिपूर्ण: अस्ति अमावास्यायां स: न दृश्यते । चन्द्र: समुद्रात् उद्भूत: इति पुराणानि कथयन्ति । यदा चन्द्र: उदेति तदा गगनं मनोहरं भवति । तस्य किरणा: अमृतमया: वर्तन्ते । चकोरा: तत् अमृतं पिबन्ति इति कविकल्पना अस्ति ।
भाषांतर - चंद्र म्हणजे निशापती. रजनीनाथ, शीतांशू, चंद्रमा, सोम इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. तो रात्री आकाशात उगवतो. चंद्राचे किरण शीतल असतात. चंद्र पौर्णिमेला परिपूर्ण असतो. अमावास्येला तो दिसत नाही. चंद्र हा समुद्रातून निर्माण झाला आहे असे पुराणे वर्णन करतात. जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा आकाश सुंदर होते. त्याचे किरण अमृतमय असतात. चकोरपक्षी ते अमृत पितात, अशी कविकल्पना आहे.
५) एष: नृपति: । नृपति: नाम राजा । भूपति: महीपति: भूपाल:, नृप:, राजा, इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । प्राचीनकाले भारतदेशे बहुविधा: नृपा: विद्यन्ते स्म । एते भूपा: परस्परं युध्यन्ते स्म । हर्ष:, भोज:, विक्रम:, चन्द्रगुत:, पृथ्वीराज:, अशोक: इत्यादय: नैके नृपा: भारतदेशस्य शासनं कुर्वन्ति स्म ।
भाषांतर - हा राजा आहे. नृपती म्हणजे राजा. भूपती, महीपती, भूपाल, नृप, राजा अशी त्याची अन्य नावे आहेत. प्राचीनकाळी भारतदेशामधे अनेक राजे होऊन गेले. हे राजे परस्पर युद्ध करत असत. हर्ष, भोज, विक्रम, चन्द्रगुप्त, पृथ्वीराज, अशोक इत्यादी अनेक राजे भारतदेशाचे शासन करत होते.
६) अहि: नाम सर्प: । भुजग:, भुजङ्ग:, भुजङ्गम:, नाग: सरीसृप: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । सर्पाणां विविधा: प्रजातय: सन्ति । नागराज: शङ्करस्य कण्ठे वर्तते । सर्प: कृषकाणां मित्रम् । सर्पस्य दन्ते विषमस्ति । तस्य फाटाटोप: भयङ्कर: अस्ति ।
भाषांतर - अही म्हणजे साप. भुजग, भुजंग, भुजंगम, नाग, सरीसृप इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. सर्पांच्या विविध जाती आहेत. नागराज शंकराच्या गळ्यात असतो. सर्प हा शेतकर्यांचा मित्र आहे. सापाच्या दातात विष असते. त्याची फणा भायंकर असते.
मराठीचे संस्कृत भाषांतर करा.
१) हा रवि आहे. सूर्य सकाळी उगवतो. सूर्योदयाच्या वेळी आकाश लालसर होते. सूर्यास्ताच्या वेळीही ते लालसर होते. दुपारी त्याची किरणे प्रखर होतात. सूर्यप्रकाश लाभदायक असतो. सूर्य उगवल्यावर पक्षी किलबिल करतात.
भाषांतर - एष: रवि: । सूर्यं प्रभाते उदेति । सूर्योदयसमये गगनं रक्तवर्णं भवति । मध्याह्ने तस्य किरणा: चण्डा: भवन्ति । सूर्यप्रकाश: लाभदायक: । यदा सूर्य: उदेति तदा खगा: कूजन्ति ।
२) हे कपी आहेत. वानर, मर्कट प्लवंग अशी त्याची अन्य नावे आहेत. कपी झाडांवर उड्या मारतात. काही वानर श्वेतमुख असतात. काही कृष्णमुख असतात. वानर श्रीरामांचे सहायक होते.
भाषांतर - एते कपय: । वानर:, मर्कट:, प्लवङ्ग: तस्य अन्यानि नामधेयानि । वानरा: वृक्षे कूर्दन्ति । केचन कपय: श्वेतमुखा: । केचन कृष्णमुखा: । वानरा: श्रीरामस्य सहायका: ।
३) ही रत्ने आहेत. मणि असे त्यांचे दुसरे नाव आहे. मणी विविध रंगी असतात. ते मूल्यवान असतात. काही लाल रंगांचे असतात तर काही हिरव्या रंगाचे असतात. काही पांढर्या रंगांचे असतात. मणियुक्त आभूषणे सर्वांना प्रिय असतात.
भाषांतर - एतानि रत्नानि । मणय: इति तेषाम् अन्यत् नामधेयम् । मणय: विविधवर्णा: । केचन मणय: रक्तवर्णा:, केचन हरिता: । (कानिचन रत्नानि रक्तवर्णानि कानिचन हरितानि ।) केचन श्वेतवर्णा: सन्ति । (कानिचन रत्नानि श्वेतवर्णानि सन्ति ।) मणियुक्तानि आभूषणानि सर्वेषां प्रियाणि । (मणियुक्ता: अलङ्कारा: सर्वेषां प्रिया: ।)
===============================
No comments:
Post a Comment