Monday, August 10, 2020

पाठ ४२ वा सुभाषिते षष्ठी विभक्ती

पाठ ४२ सुभाषिते षष्ठी विभक्ती

१) विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये ।
आद्या हास्याय वृद्धत्वे द्वितियाद्रियते सदा ॥

संधिविग्रह - द्वितीया + आद्रियते

अन्वय - शस्त्रस्य विद्या, शास्त्रस्य विद्या, द्वे विद्ये प्रतिपत्तये ।
वृद्धत्वेआद्या हास्याय , द्वितिया सदा आद्रियते ॥३-२२॥

अर्थ - शस्त्र व शास्त्र यांची विद्या ही ज्ञानासाठी असते. पण पहिली म्हातारपणी ही हास्यास्पद ठरते व दुसरीचा सदा आदर केला जातो.

२) खलानां धनुषां चापि सद्वंशजनुषामपि ।
गुणलाभो भवेदाशु परहृद्भेदकारक: ॥

संधिविग्रह - खलानां धनुषां च अपि सद्वंशजनुषाम् अपि ।*
*गुणलाभ: भवेत् आशु परहृद् भेदकारक: ॥

अन्वय - सद्वंशजनुषाम् अपि खलानां, सद्वंशजनुषाम् अपि धनुषां च आशु गुणलाभ: भवेत् (तथापि स:) परहृद् भेदकारक: ।

अर्थ -  चांगल्या वंशात जरी दुर्जन जन्मलेले असले, तरी ज्याप्रमाणे चांगल्या बांबूपासून तयार केलेल्या  धनुष्याला गुणलाभ झाला की (दोरी मिळाली की) ते जसे दुसर्‍याच्या हृदयाचा वेध घेते तसेच दुर्जन चांगल्या गुणांचा उपयोग दुसर्‍याचा मर्मच्छेद करण्याकरता करतात.

३) आजन्मसिद्धं कौटिल्यं खलस्य च हलस्य च ।
सोढुं तयोर्मुखाक्षेपमलमेकैव सा क्षमा ॥

संधिविग्रह - तयो: मुखाक्षेपम् अलम्

अन्वय - खलस्य च हलस्य च कौटिल्यं आजन्मसिद्धं । तयो: मुखाक्षेपम् सोढुं एका एव सा क्षमा अलम् ।

अर्थ - दुष्ट व नांगर यांची कुटिलता ही जन्मसिद्ध आहे. एक पृथ्वीच फक्त त्यांच्या मुखाचे आक्षेप (दुष्टाचे दुष्ट बोलणे व नांगराचे जमिन उकरणे) सहन करण्यास समर्थ आहे.
 
४) अहो खलभुजङ्गस्य विचित्रोऽयं वधक्रम: ।
अन्यस्य दशति श्रोत्रमन्य: प्राणैर्वियुज्यते ॥६-१०॥

संधिविग्रह - अहो खलभुजङ्गस्य विचित्र: अयं वधक्रम: ।*
*अन्यस्य दशति श्रोत्रम् अन्य: प्राणै: वियुज्यते

अन्वय - अहो खलभुजङ्गस्य अयं वधक्रम: विचित्र: । अन्यस्य दशति श्रोत्रम् अन्य: प्राणै: वियुज्यते ।

अर्थ - अहो दुर्जनरूपी सापाची वध करण्याची तर्‍हा वेगळीच आहे. तो एकाचे कान चावतो व दुसराच प्राणास मुकतो.

५) सुलभा: पुरुषा: राजन् सततं प्रियवादिन: ।
अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता च दुर्लभ: ॥

अन्वय - राजन्, सततं प्रियवादिन: पुरुषा: सुलभा: । अप्रियस्य च पथ्यस्य श्रोता वक्ता च दुर्लभ: ।

अर्थ - हे राजा, या जगात नेहेमी गोड गोड बोलणारे लोक सहज मिळतात. पण अप्रिय असूनही हितकर भाषण करणारा व ते ऐकून घेणारा मात्र दुर्मिळ असतो.

६) अपूर्व: कोऽपि कोपाग्नि: सज्जनस्य खलस्य च ।
एकस्य शाम्यति स्नेहाद्वर्धतेऽन्यस्य वारित: ॥५-१॥

संधिविग्रह - अपूर्व: क: अपि कोपाग्नि: सज्जनस्य खलस्य च ।*
*एकस्य शाम्यति स्नेहात् वर्धते अन्यस्य वारित:

अन्वय - सज्जनस्य खलस्य च क: अपि कोपाग्नि: अपूर्व: । एकस्य स्नेहात्, वारित: शाम्यति, अन्यस्य  स्नेहात्, वारित: वर्धते ।

अर्थ - सज्जनाचा व दुर्जनाचा कोपरूपी अग्नी किती अपूर्व आहे ? एकाचा (सज्जनाचा) प्रेमाने (स्नेहात्)  व निवारण केल्यामुळे (वारित:) शांत होतो तर दुसर्‍याचा (दुष्टाचा) तेलाने (स्नेहात्) व पाणी टाकल्यामुळे  (वारित:) वाढतो.

खाली ५ सुभाषिते अर्थ सोपा आहे म्हणून
तुमच्या अभ्य़ासासाठी दिली आहेत.

स्तब्धस्य नश्यति यश: विषमस्य
मैत्री नष्टक्रियस्य कुलमर्थपरस्य धर्म: ।
विद्याफलं व्यसनिन: कृपणस्य सौख्यं
राज्यं प्रमत्तसचिवस्य नराधिपस्य ॥७४-४॥
 या सुभाषितात कोणाचे काय नाश पावते ते सांगितले आहे.

पक्षिणां बलं आकाशं
बालानां रोदनं बलम् ।
दुर्बलस्य बलं राजा
मत्स्यानामुदकं बलम् ॥७४-१८॥
या सुभाषितात कोणाचे बळ कोणते आहे ते सांगितले आहे.

नरस्याभरणं रूपं
रूपस्याभरणं गुण: ।
गुणस्याभरणं ज्ञानं
ज्ञानस्याभरणं क्षमा ॥७४-३३॥
या सुभाषितात कोणाचा कोणता दागिना आहे ते सांगितले आहे.

उदारस्य तृणं वित्तं
शूरस्य मरणं तृणम् ।
विरक्तस्य तृणं गेहं
नि:स्पृहस्य तृणं जगत् ॥७४-३५॥
या सुभाषितात कोणाला कोणत्या गोष्टी कस्पटासमान वाटतात ते सांगितले आहे.

हस्तस्य भूषणं दानं
सत्यं कण्ठस्य भूषणम् ।
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं
भूषणै: किं प्रयोजनम् ॥७४-७८॥
या सुभाषितात कोणाचा कोणता दागिना ते सांगितले आहे. 

====================================

४२ व्या पाठाची उत्तरे संस्कृत

स्तब्धस्य नश्यति यश: विषमस्य
मैत्री नष्टक्रियस्य कुलमर्थपरस्य धर्म: ।
विद्याफलं व्यसनिन: कृपणस्य सौख्यं
राज्यं प्रमत्तसचिवस्य नराधिपस्य ॥७४-४॥

अर्थ - थांबलेल्याची (आळशी) मनुष्याची कीर्ती, असमान लोकांची मैत्री, कृतिशून्य लोकांचे घराणे, पैशाच्या मागे लागलेल्याचा धर्म (न्याय), व्यसनी माणसाचे विद्येचे फळ, कंजुषाचे सुख, आणि उन्मत्त मंत्री असलेल्या राजाचे राज्य नाहीसे होते.

पक्षिणां बलं आकाशं
बालानां रोदनं बलम् ।
दुर्बलस्य बलं राजा
मत्स्यानामुदकं बलम् ॥७४-१८॥

अर्थ - पक्ष्यांचे बळ आकाशात असते. मुलांचे बळ रडण्यात असते. राजा हा दुर्बळांचे बळ आहे तर माशांचे पाणी हे बळ आहे.

नरस्याभरणं रूपं
रूपस्याभरणं गुण: ।
गुणस्याभरणं ज्ञानं
ज्ञानस्याभरणं क्षमा ॥७४-३३॥

अर्थ - रूप हा मनुष्याचा दागिना आहे. गुण हा रूपाचा दागिना आहे. ज्ञान हा गुणाचा दागिना आहे. तर क्षमा हा ज्ञानाचा दागिना आहे.

उदारस्य तृणं वित्तं
शूरस्य मरणं तृणम् ।
विरक्तस्य तृणं गेहं
नि:स्पृहस्य तृणं जगत् ॥७४-३५॥

अर्थ - उदार मनुष्याला धन हे कस्पटासमान वाटते. शूर मनुष्याला मरण हे कस्पटासमान वाटते. विरक्त मनुष्याला घर हे कस्पटासमान वाटते तर निरीच्छ मनुष्य़ाला सर्व जगच कस्पटासमान वाटते.

हस्तस्य भूषणं दानं
सत्यं कण्ठस्य भूषणम् ।
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं
भूषणै: किं प्रयोजनम् ॥७४-७८॥

अर्थ - हाताचा अलंकार दान करणे हा आहे. सत्य बोलणे हा गळ्याचा दागिना आहे. शास्त्र (विद्या) हा कानाचा अलंकार आहे. इतर दागिन्यांचा काय उपयोग ? 

 

 


No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...