१) शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे ।
साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ॥४-१५॥
संधिविग्रह - साधव: + न
अन्वय - शैले शैले न माणिक्यं (अस्ति) ।
गजे गजे मौक्तिकं न (अस्ति) ।
वने वने चन्दनं न (अस्ति) ।
हि साधव: सर्वत्र न (सन्ति) ।
अर्थ - प्रत्येक पर्वतावर रत्न सापडत नाहीत, प्रत्येक हत्तीच्या मस्तकावर मोती नसतो, प्रत्येक वनात चंदनवृक्ष नसतात त्याप्रमाणे सज्जन लोक सुद्धा सर्वत्र नसतात.
२) व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणाङ्गणे भवति ।
विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे ॥७४-१॥
अन्वय - व्यसने मित्रपरीक्षा (भवति) ।
शूरपरीक्षा रणाङ्गणे भवति ।
विनये भृत्यपरीक्षा (भवति) ।
दानपरीक्षा च दुर्भिक्षे (भवति) ।
अर्थ - संकटसमयी मित्राची परीक्षा होते. शूर मनुष्याची परीक्षा रणांगणात होते. विनयामधे सेवकाची परीक्षा होते तर दुष्काळामधे दानाची परीक्षा होते.
३) पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका ।
भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा ॥७४-९४॥
संधिविग्रह - भाग्यहीना: न
अन्वय - पदे पदे च रत्नानि (सन्ति) योजने रसकूपिका (अस्ति) ।
भाग्यहीना: न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा
अर्थ - पावलापवलावर रत्ने व एक योजन अंतरावर पाण्याने भरलेली विहिर असते, पण दुर्दैवी लोक ते पहात नाहीत. पृथ्वी अनेक मौल्यवान रत्नांनी परिपूर्ण आहे. (फक्त पहाणार्याची दृष्टी हवी)
४) शुन: पुच्छमिव व्यर्थं जीवितं विद्यया विना ।
न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे ॥३-४॥
संधिविग्रह - पुच्छम् + इव
अन्वय - (शुन: पुच्छम्) न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे शुन: पुच्छम् इव विद्यया विना जीवितं व्यर्थं ।
अर्थ - (कुत्र्याचे शेपूट) गुह्यांग झाकू शकत नाही व दंश करणार्या माशांचे निवारणही करू शकत नाही्. त्यामुळे कुत्र्याचे शेपूट जसे व्यर्थ आहे त्याप्रमाणे विद्येशिवाय जीवन व्यर्थ आहे.
५) शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पण्डित: ।
वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ॥३४॥
अन्वय - शूर: शतेषु जायते । सहस्रेषु च पण्डित: (जायते) ।
वक्ता दशसहस्रेषु (जायते) । दाता भवति वा न वा (भवति)
अर्थ - शंभरामधे एखादा मनुष्य शूर असतो हजारात एखादा पंडित असतो. दहा हजारात एखादा वक्ता असतो. दानी दानी मात्र होईल किंवा न होईल.
No comments:
Post a Comment