पाठ ३८ सुभाषिते (पंचमी विभक्ती)
नमस्कार.
अपादान कारकाची पंचमी विभक्ती होते हे आपण मागच्या पाठात पाहिले. तसेच काही ठराविक अव्ययांना सुद्धा पंचमी विभक्तीची अपेक्षा असते.
१) ऋते = शिवाय
- ज्ञानात् ऋते न सुखम् ।
ज्ञानाशिवाय सुख नाही.
२) पूर्वं किंवा प्राक्
सूर्योदयात् पूर्वं / प्राक् नीलेश: उत्तिष्ठति ।
सूर्योदयाच्या आधी नीलेश उठतो.
३) प्रभृति = पासून
शैशवात् प्रभृति स: व्यायामं करोति ।
लहानपणापासूनच तो व्यायाम करतो.
४) पृथक् किंवा विना या अव्ययांना द्वितीया, तृतीया अथवा पंचमी विभक्ती लागते.
स: बन्धो: (बन्धुं बन्धुना) पृथक् वसति ।
तो भावापासून वेगळा रहातो
विद्याया: (विद्यां विद्यया) विना जीवनं पशुतुल्यम् ।
विद्येशिवाय जीवन पशुतुल्य आहे.
५) बहि: = बाहेर
सर्प: बिलात् बहि: न आगच्छति ।
साप बिळाच्या बाहेर येत नाही.
१) सर्प: क्रूर: खल: क्रूर: सर्पात् क्रूरतर: खल: । मन्त्रौषधिवश: सर्प: खल: केनोपशाम्यति ॥६-३९॥
संधिविग्रह - केन + उपशाम्यति
अन्वय - सर्प: क्रूर: अस्ति । खल: क्रूर: अस्ति । सर्पात् क्रूरतर: खल: । सर्प: मन्त्रौषधिवश: । खल: केनोपशाम्यति ?
अर्थ - साप क्रूर आहे, दुष्ट मनुष्य क्रूर आहे. पण सापापेक्षा दुष्ट मनुष्य अधिक क्रूर आहे. कारण मंत्र व औषधी यांनी साप ताब्यात येतो पण दुष्ट मनुष्य कशाने शांत होतो ?
२) पादपानां भयं वातात् पद्मानां शिशिराद्भयम् ।
पर्वतानां भयं वज्रात् साधूनां दुर्जनाद्भयम् ॥६-३५॥
संधी - पादपानां भयं वातात् पद्मानां शिशिरात् भयम् ।
पर्वतानां भयं वज्रात् साधूनां दुर्जनात् भयम्
अन्वय - पादपानां वातात् भयं (अस्ति) । पद्मानां शिशिराद्भयम् (अस्ति) ।
पर्वतानां वज्रात् भयं (अस्ति) साधूनां दुर्जनात् भयम् (अस्ति) ।
अर्थ - वृक्षांना वर्यापासून भय असते. शिशिरऋतूपसून कमळांना भय असते. पर्वतांना वज्रापासून भीती असते. तर सज्जनांना दुर्जनांपासून भिती असते.
३) अज्ञेभ्य: ग्रन्थिन: श्रेष्ठा: ग्रन्थिभ्यो धारिणा वरा: । धारिभ्य: कर्मिणो ज्ञेया: कर्मिभ्यश्चोपकारिण: ॥७४-१६८॥
संधिविग्रह - अज्ञेभ्य: ग्रन्थिन: श्रेष्ठा: ग्रन्थिभ्य: धारिणा: वरा: । धारिभ्य: कर्मिण: ज्ञेया: कर्मिभ्य: च उपकारिण: ।
अन्वय - अज्ञेभ्य: ग्रन्थिन: श्रेष्ठा: (सन्ति)। ग्रन्थिभ्य: धारिणा: वरा: (सन्ति)। धारिभ्य: कर्मिण: ज्ञेया: (सन्ति) । कर्मिभ्य: च उपकारिण: (सन्ति) ।
अर्थ - अज्ञ मनुष्यापेक्षा ग्रंथ बाळगणारे (वाचणारे) श्रेष्ठ आहेत, ग्रंथ बाळगणार्यांपेक्षा ग्रंथाचे मर्म जाणणारे श्रेष्ठ आहेत, मर्म जाणणार्यांपेक्षा त्याप्रमाणे कर्म करणारे श्रेष्ठ आहेत, कर्म करणर्यांपेक्षा उपकार करणारे श्रेष्ठ आहेत.
४) तावद्भयाद्धि भेतव्यं यावद्भयमनागतम् ।
आगतं तु भयं वीक्ष्य नर: कुर्याद् यथोचितम् ॥७४-१४४॥
संधिविग्रह - तावत् भयात् हि भेतव्यं यावत् भयम् अनागतम् ।
आगतं तु भयं वीक्ष्य नर: कुर्याद् यथोचितम् ।
अन्वय - भयात् तावत् हि भेतव्यं यावत् भयम् अनागतम् ।
आगतं तु भयं वीक्ष्य नर: कुर्याद् यथोचितम् ।
अर्थ - संकटाला तोपर्यंतच घाबरावे जोपर्यंत ते आलेले नाही. परंतु संकट आलेले पहाताच मनुष्याने योग्य तो उपाय करावा.
५) आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥७४-८०॥
संधि - आकाशात् पतितम्
अन्वय - यथा आकाशात् पतितं तोयं सागरम् गच्छति । (तथा) सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ।
अर्थ - आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार विष्णूप्रत जातो.
Monday, August 3, 2020
पाठ ३८ वा - सुभाषिते (पंचमी विभक्ती)
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
Subscribe to:
Post Comments (Atom)
पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते
पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च । अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...
-
पाठ १०४ वा - कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे मागच्या एका पाठात आपण विध्यर्थी धातूसाधित विशेषणे पाहिली . विध्यर्थी धातुस...
-
आपण संस्कृत वाक्यरचना कशी करायची ते शिकत आहोत. कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया विभक्ती व क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनाप्रमाणे हा भाग ...
-
नमस्कार सरस्वति नमस्तुभ्यं सर्वेभ्यो ज्ञानदायिनि । सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वरदा भव ॥ अन्वय - सर्वेभ्य: ज्ञानदायिनि सरस्वति, तुभ्य...
No comments:
Post a Comment