Monday, August 31, 2020

पाठ ५१ वा काळ-विचार

पाठ ५१ वा काळ-विचार

वाक्यातील क्रियापदावरून काळ व क्रिया कोणी केली म्हणजे कर्त्याचे पुरुष व वचन कळते. संस्कृतमधे क्रियापदे काळसूचक व आज्ञादीसूचक अशी दोन्ही प्रकारची असतात. अशी एकूण १० प्रकारची क्रियापदे तयार होतात. त्यांना संस्कृतमधे १० लकार असे म्हणतात. कारण त्यांची नावे ‘ल्’ या अक्षराने सुरू होतात. 


१) वर्तमानकाळ = लट्
२) अनद्यतन भूतकाळ = लङ्
३) सामान्य भूतकाळ = लुङ्
४) परोक्षभूतकाळ = लिट्
५) सामान्य भविष्यकाळ = लृट्
६) अनद्यतन भविष्यकाळ (प्रथम भविष्यकाळ) = लुट्
७) आज्ञार्थ = लोट्
८) विधि = विधिलिङ्
९) आशीर्वाद = आशीर्लिङ्
१०) क्रियातिपत्ति (हेतुहेतुमद्भाव) = लृङ्

१) वर्तमानकाळ -
संस्कृतमधे वर्तमानकाळ एकच आहे. इंग्लिशमधे I do,  I am doing,  I have done असे जे साधा वर्तमानकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ व पूर्ण वर्तमानकाळ असे जे काळाचे प्रकार असतात, तसे संस्कृतमधे नाहीत. त्याचे संस्कृतमधे मी करतो, मी करत आहे, मी केलेले आहे, वगैरे संदर्भानुसार  अर्थ करावे लागतात. अहं खादामि वाक्याचा अर्थ मी खातो, मी खात आहे किंवा मी खाल्लेले आहे असा संदर्भानुसार करावा लागेल.

भूतकाळ -
भूतकाळाचे तीन प्रकार आहेत. पाणिनीने त्यात अर्थाचा फरक केला आहे. सगळे भूतकाळ ‘भूते’ म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी या अधिकाराखाली येतात.
२)  अनद्यतनभूतकाळ (प्रथम भूतकाळ) - अद्यतन = आजचा. म्हणून अनद्यतन म्हणजे आजचा नव्हे तो अनद्यतन. अशी गोष्ट भूतकाळातही असू शकते वा भविष्यकाळातही असू शकते.   
 ज्या गोष्टी आज घडलेल्या नाहीत, ज्या क्रिया नुकत्याच घडून गेल्या आहेत, ज्या गोष्टींना आपण साक्षी असतो त्यासाठी प्रथम भूतकाळ म्हणजेच अनद्यतन भूतकाळ वापरतात.
३) परोक्षभूतकाळ (द्वितीय भूतकाळ) - परोक्ष = अक्ष्ण: परम् = दृष्टीच्या आड. (मराठीत परोक्ष व अपरोक्ष हे शब्द बरोबर विरुद्ध अर्थाने रूढ झालेले आहेत.) ज्या घटना दृष्टीआड घडलेल्या आहेत. ज्या घटानांचे आपण साक्षीदार नसतो, अशा घटनांचा उल्लेख करण्यासाठी साधारणपणे परोक्ष भूतकाळाचा उपयोग करतात. म्हणून पौराणिक किंवा ऐतिहासिक घटनांचे वर्णन करण्यासाठी परोक्ष भूतकाळाचा उपयोग केला जातो. त्यामुळे परोक्ष भूतकाळाची प्रथम पुरुषी रूपे अपवादात्मक दिसतात. स्वप्नातील घटना सांगतांना तसेच कर्त्याने जाणीव नसतांना किंवा बेहोष अवस्थेत एखादी गोष्ट केली असेल तरच प्रथमपुरुषी रूपांचा वापर झालेला दिसतो. द्वितीय पुरुषातही परोक्षभूतकाळाची रूपे फारशी वापरात नाहीत. एखादी गोष्ट सर्वस्वी नाकारायची असेल तरच परोक्ष भूतकाळाचा द्वितीय पुरुषी वापर दिसून येतो.

४) सामान्यभूतकाळ - (तृतीय भूतकाळ)
ज्या गोष्टी अनद्यतनही नाहीत वा परोक्षही नाहीत अशा गोष्टींसाठी सामान्य भूतकाळ वापरला जात असे. परंतु पुढे सामान्य भूतकाळाच्या रूपांच्या वापराविषयी काहीही राहिले नाही. तरीही खूप पूर्वीच्या घटना सांगण्यासाठी याचा उपयोग झालेला दिसून येतो. या भूतकाळाची रूपे बरीचशी अनियमित व क्लिष्ट आहेत. याचे प्रत्ययही सात प्रकारचे आहेत. त्यामुळे शालेय व्याकरणात याचा सहसा समावेश केलेला नसतो. फक्त रूपे ओळखता यावीत एवढीच अपेक्षा असते.

संस्कृतमधे भविष्यकाळही दोन आहेत.
५) अनद्यतन भविष्यकाळ - (प्रथम भविष्यकाळ)
‘क्रिया पुढे होणार आहे’ असे समजले म्हणजे त्या विधानातील क्रियापद भविष्यकाळी होते. अद्यतन म्हणजे आज. म्हणून अनद्यतन म्हणजे जे आज नाही ते. जी गोष्ट आज घडलेली नाही, पुढे घडणार आहे त्यासाठी अनद्यतन भविष्यकाळ योजला जातो. यालाच प्रथम भविष्यकाळ असेही म्हणतात.

६) सामान्य भविष्यकाळ (द्वितीय भविष्यकाळ)
ज्या घटना अनद्यतन नाहीत, आजच पण नंतर करावयाच्या आहेत अशा घटना दाखवण्यासाठी द्वितीय भविष्यकाळ वापरावा असा पाणिनीने या दोन भविष्यकाळात फरक केलेला आहे. पण साहित्यात असा फरक दिसून येत नाही. साधारणपणे द्वितीय भविष्यकाळाची रूपे साहित्यात प्रचारात आहेत.
७) आज्ञार्थ - आज्ञा करण्याकरता आज्ञार्थ वापरला जातो हे सुपरिचित आहे. पण त्याव्यतिरिक्त संस्कृतमधे इतर अनेक गोष्टींसाठी आज्ञार्थ वापरला जातो. बोलणारा व ऐकणारा यांच्या परस्परसंबंधांवर द्वितीय पुरुषी आज्ञार्थाच्या रूपातून हुकूम व्यक्त होतो. खा, पी, उठ, बस वगैरे. हुकुम, आज्ञा यांच्या बरोबरच विनंती, विनवणी, इच्छा इत्यादी अनेक छटाही त्यातून दिसून येतात. बोलणारी व्यक्ती राजा वा अधिकारी असेल तर त्याने वापरलेल्या आज्ञार्थातून हुकूम किंवा आज्ञा व्यक्त होते. वडीलधार्‍या मंडळींना जेव्हा लहानांना किंवा समवयस्कांना मार्गदर्शन करायचे असेल तेव्हा आज्ञार्थी क्रियापदे वापरून त्यातून उपदेश किंवा इच्छेची छटा व्यक्त होते. इतरांचे मन वळवण्य़ासाठी आज्ञार्थाचा उपयोग केल्यास त्यातून विनंती, विनवणी या छटा स्पष्ट होतात.
८) विध्यर्थ - आज्ञा, उपदेश, अपेक्षा, इच्छा, योग्यता, शक्यता, संभव वगैरे वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्यासाठी विध्यर्थाचा वापर करतात. काही वेळा विध्यर्थाचा उपयोग भविष्यकाळीही केलेला दिसून येतो.
९) आशीर्वादार्थ - आशीर्वाद देण्याकरता वा इच्छा प्रदर्शित करण्यासाठी या क्रियापदांचा उपयोग करतात. ही रूपे वाङ्गमयात अभावानेच आढळतात.
उदा. कुशलं ते भूयात्
अर्थ - तुझे कल्याण होवो. 'ङ्ग'

१०) हेतुहेतुमद्भाव किंवा संकेतार्थ -
. जेव्हा दोन वाक्यात कार्यकारणभाव असतो तेव्हा हेतुहेतुमद्भावाचा प्रयोग होतो. काही वेळा दोन वाक्यांशात एक वाक्यांश मुख्य असतो व दुसरा गौण असतो. गौण वाक्यातील घटनेवर मुख्य वाक्यांशातील घटना अवलंबून असते. तसेच पहिली घटना घडून न आल्यामुळे दुसरीही घटना घडून येत नाही, अशी स्थिती असते, अशा वेळी संकेतार्थाचा वापर करतात.
उदा.
१) सुवृष्टिश्चेदभविष्यत्, तदा सुभिक्ष्यमवर्तिष्यथ ।
अर्थ - चांगला पाऊस पडला असता तर चांगले पीक आले असते.


या वाक्यात चांगला पाऊस पडण्यावर चांगले पीक येणे अवलंबून आहे. म्हणजे दोन्ही घटनांमधे कार्यकारणभाव आहे. आणि चांगला पाऊस झाला नाही म्हणून चांगले पीक आले नाही, असे वक्त्याला म्हणावयाचे आहे. येथे पहिली घटना घडून आली नाही म्हणून दुसरी घटना घडली नाही. 


३) यदि राम: दण्डकारण्यं नागमिष्यत् तर्हि राक्षसानां संहार: नाभवत् ।
अर्थ - जर राम वनात गेला नसता तर राक्षसांचा संहार झाला नसता.


या वाक्यात राक्षसांचा संहार न होणे ही घटना रामाच्या दंडकारण्यात न जाण्यावर अवलंबून होती. पण रामाचे दंडकारण्यात न जाणे घडले नाही व राक्षसांचा संहार न होणे टळले नाही म्हणजे राम दंडकारण्यात गेला व राक्षसांचा संहार झाला. 


थोडक्यात कार्य-कारणभाव असलेल्या दोन वाक्यामधे पहिल्या वाक्यातील घटना घडून न आल्यामुळे दुसर्‍या वाक्यांशातील घटनाही घडली नाही असे सांगायचे असेल तर संकेतार्थाचा वापर होतो.

स्वाध्याय -
प्रश्न १ - खाली काही शब्द दिले आहेत. त्यांचा वाक्यात उपयोग करा.

पाणि (हात). अग्नि, कवि, सारथि, गणपति, अलि (भुंगा), दाशरथि, माला, वनानि.

प्रश्न २)  खाली चार सुभाषिते दिली आहेत. त्यांचे मराठीमधे भाषांतर करा.

१) न च विद्यासमो बन्धुर्न च व्याधिसमो रिपु: । न चापत्यसम: स्नेह: न च दैवात् परं बलम् ॥७४-२१९॥

२) अहिंसा परमो धर्म: तथाऽहिंसा परो दम: । अहिंसा परमं दानं अहिंसा परमं तप: ॥७४-१२६॥

३) नास्ति लोभसमो व्याधि: नास्ति क्रोधसमो रिपु: । नास्ति दारिद्र्यवद्दु:खं नास्ति ज्ञानात् परं सुखम् ॥७४-११४॥

४) जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दन: ।
जनक: पञ्चमश्चैव जकारा: पञ्च दुर्लभा: ॥७४-१२८॥ 

=========================================

५१ स्वाध्याय उत्तरे - 


प्रश्न १ - खाली काही शब्द दिले आहेत. त्यांचा वाक्यात उपयोग करा.

पाणि (हात).
मम पाणौ आम्रफलम् अस्ति ।

अग्नि
सुवर्णस्य परीक्षा अग्नौ भवति ।

कवि
कवि: काव्यानि करोति ।

सारथि
श्रीकृष्ण: अर्जुनस्य सारथि: अस्ति ।

गणपति
गणपति: विद्याया: देवता ।

अलि (भुंगा)
पुष्पेषु अलय: भ्रमन्ति ।

दाशरथि
दाशरथि: नाम श्रीराम: ।

माला
नार्य: पुष्पाणां माला शिरसि धारयन्ति ।

वन
ऋषय: वने निवसन्ति ।

प्रश्न २) खाली चार सुभाषिते दिली आहेत. त्यांचे मराठीमधे भाषांतर करा.

न च विद्यासमो बन्धुर्न च व्याधिसमो रिपु: ।
न चापत्यसम: स्नेह: न च दैवात् परं बलम् ॥

अर्थ - विद्येसारखा दुसरा भाऊ नाही, रोगासारखा दुसरा शत्रू नाही, मुलासारखे दुसरे प्रेम नाही व दैवासारखे दुसरे बल नाही.

२) अहिंसा परमो धर्म: तथाऽहिंसा परो दम: ।
अहिंसा परमं दानं अहिंसा परमं तप: ॥

अर्थ - अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे, तसेच अहिंसा हा इंद्रियसंयम आहे. अहिंसा हे श्रेष्ठ दान आहे व अहिंसा हे श्रेष्ठ तप आहे.

३) नास्ति लोभसमो व्याधि: नास्ति क्रोधसमो रिपु: ।
नास्ति दारिद्र्यवद्दु:खं नास्ति ज्ञानात् परं सुखम् ॥

अर्थ - लोभासारखा दुसरा रोग नाही, क्रोधासारखा दुसरा शत्रु नाही, दारिद्र्यासारखे दुसरे दु:ख नाही व ज्ञानासारखे दुसरे सुख नाही.

४) जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दन: ।
जनक: पञ्चमश्चैव जकारा: पञ्च दुर्लभा: ॥

अर्थ - जननी म्हणजे आई, जन्मभूमी जाह्नवी म्हणजे गंगा, जनार्दन म्हणजे विष्णु व जनक म्हणजे वडील हे पाच जकार म्हणजे ज ने सुरू होणारे शब्द नेहेमी दुर्लभ आहेत.

=========================================
 

" पपाठ ५१ वा काळ-विचार " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Sunday, August 30, 2020

पाठ  ५० वा ह्रस्व इकारान्त पुंलिंगी शब्द*  (उजळणी प्रथमा विभक्ती)

 पाठ  ५० वा  ह्रस्व इकारान्त पुंलिंगी शब्द*  (उजळणी प्रथमा विभक्ती) 

 

नमस्कार, इतके दिवस आपण वाक्यात शब्दांची योजना करतांना त्यांना विभक्ती-प्रत्यय कसे लावायचे ते शिकलो. पुन्हा एकदा हा भाग उजळणी म्हणून आपण घेत आहोत.


आपण एक पाहिले की वाक्यात प्रथमा विभक्ती ही कर्त्याची योजायची असते. तसेच कर्ता ज्या पुरुषाचा वा वचनाचा असेल त्याप्रमाणे क्रियापदाचे रूप योजायचे असते.

अहम्, आवाम्,  वयम्; म्हणजे मी, आम्ही दोघे व आम्ही सर्व हे प्रथम पुरुषाचे कर्ते आहेत. त्वं, युवाम्, यूयम्; म्हणजे तू, तुम्ही दोघे व तुम्ही सर्व हे द्वितीय पुरुषाचे कर्ते आहेत. तर स:, तौ, ते म्हणजे तो, ते दोघे वा ते सर्व हे तृतीय पुरुषाचे कर्ते आहेत. आता तृतीय पुरुषामधे सा, ते, ता: म्हणजे ती, त्या दोघी, त्या सर्व असे स्त्रीलिंगी कर्तेही असू शकतील किंवा नामे सुद्धा उपयोगात आणता येतील. स: नमति, सा नमति, महेश: नमति, सुरेश: नमति असे कोणत्याही प्रकारचे वाक्य तयार करता येईल. संस्कृतमधे मराठी वा हिंदी प्रमाणे क्रियापदाला लिंग नसते हे आपण पाहिले. रमेश: नमति, कविता नमति । दोन्ही ठिकाणी नमति हे क्रियापद सारखेच आहे. अस्मद् व युष्मद् ही सर्वनामे सर्वलिंगी समान चालतात. रमेशही म्हणेल ‘अहं नमामि’ कविताही म्हणेल ‘अहं नमामि’. 


आपण देव शब्दाची रूपे कशी होतात ती पाहिली होती. आज इतर काही स्वरांत शब्दांची प्रथमा विभक्ती पाहूया.


देव (अकारान्त पुंलिंगी.)
देव:   देवौ   देवा:   प्रथमा

वन (अकारान्त नपुंसकलिंगी.)
वनम्   वने   वनानि   प्रथमा

माला (आकारान्त स्त्रीलिंगी.)
माला   माले   माला:   प्रथमा

कवि (ह्रस्व इकारान्त पुंलिंगी.)
कवि:   कवी   कवय:   प्रथमा

मति (ह्रस्व इकारान्त स्त्रीलिंगी.)
मति:   मती   मतय:   प्रथमा

वारि (ह्रस्व इकारान्त नपुंसकलिंगी.)
वारि   वारिणी   वारीणि   प्रथमा

नदी (दीर्घ ईकारान्त स्त्री.)
नदी   नद्यौ   नद्य:   प्रथमा

आता प्रथमा विभक्ती योजून तयार केलेला चित्रपाठ पाहूया.

photos for following not available on phone

१) एष: सागर: । जलधि:, अब्धि:, सरित्पति:, उदधि: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । तस्मिन् तरङ्गा: उद्भवन्ति । उदधि: मत्स्यानां निवासस्थानमस्ति ।

२) एते गिरय: । पर्वत:, नग:, अद्रि: शैल:, महीधर: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । गिरि: उत्तुङ्ग: अस्ति । तस्मिन् वृक्षा: रोहन्ति । केचित् गिरय: वनै: परिपूर्णा: वर्तन्ते ।  केचित् पाषाणमया: सन्ति ।


३) एष: ऋषि: । ऋषय: वने निवसन्ति । तत्र तेषाम् आश्रमा: भवन्ति स्म । वाल्मीकि: आदिकवि: । तस्य रामायणं काव्यं प्रसिद्धम् । श्रीव्यासस्य महाभारतं नाम काव्यं प्रसिद्धमस्ति ।


४) चन्द्र: निशापति: । रजनीनाथ:, शीतांशु:, चन्द्रमा:, सोम: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । स: रात्रौ आकाशे उदेति । चन्द्रस्य किरणा: शीतला: । चन्द्र: पौर्णिमायां परिपूर्ण: अस्ति अमावास्यायां स: न दृश्यते । चन्द्र: समुद्रात् उद्भूत: इति पुराणानि कथयन्ति । यदा चन्द्र: उदेति तदा गगनं मनोहरं भवति । तस्य किरणा: अमृतमया: वर्तन्ते । चकोरा: तत् अमृतं पिबन्ति इति कविकल्पना अस्ति ।


५) एष: नृपति: । नृपति: नाम राजा । भूपति: महीपति: भूपाल:, नृप:, राजा, इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । प्राचीनकाले भारतदेशे बहुविधा: नृपा: विद्यन्ते स्म । एते भूपा: परस्परं युध्यन्ते स्म । हर्ष:, भोज:, विक्रम:, चन्द्रगुत:, पृथ्वीराज:, अशोक: इत्यादय: नैके नृपा भारतदेशस्य शासनं कुर्वन्ति स्म ।


६) अहि: नाम सर्प: । भुजग:, भुजङ्ग:, भुजङ्गम:, नाग: सरीसृप: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । सर्पाणां विविधा: प्रजातय: सन्ति । नागराज: शङ्करस्य कण्ठे वर्तते । सर्प: कृषकाणां मित्रम् । सर्पस्य दन्ते विषमस्ति । तस्य फाटाटोप: भयङ्कर: अस्ति ।


आता खाली स्वाध्यायासाठी चित्रं व त्याचे मराठीत वर्णन लिहीले आहे. त्याचं तुम्ही संस्कृतमधे भाषांतर करायचे आहे.


१) हा रवि आहे. सूर्य सकाळी उगवतो. सूर्योदयाच्या वेळी आकाश लालसर होते. सूर्यास्ताच्या वेळीही ते लालसर होते.  दुपारी त्याची किरणे प्रखर होतात. सूर्यप्रकाश लाभदायक असतो. सूर्य उगवल्यावर पक्षी किलबिल करतात.

(लालसर -रक्तवर्ण, दुपार - मध्याह्न, किलबिल करणे - कूज् (१प.)

२) हे कपी आहेत. वानर, मर्कट अशी त्याची अन्य नावे आहेत. कपी झाडांवर उड्या मारतात. काही वानर श्वेतमुख असतात. काही कृष्णमुख असतात. वानर श्रीरामांचे सहायक होते.


३) ही रत्ने आहेत. मणि असे त्यांचे दुसरे नाव आहे. मणी विविध रंगी असतात. ते मूल्यवान असतात. काही लाल रंगांचे असतात तर काही हिरव्या रंगाचे असतात. काही पांढर्‍या रंगांचे असतात. मणियुक्त आभूषणे सर्वांना प्रिय असतात.

================================

 ५० स्वाध्याय (उत्तरे)

१) एष: सागर: । जलधि:, अब्धि:, सरित्पति:, उदधि: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । तस्मिन् तरङ्गा: उद्भवन्ति । उदधि: मत्स्यानां निवासस्थानमस्ति ।

भाषांतर - हा सागर आहे. जलधी, अब्धी, सरित्पती, उदधी इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. त्यामधे लाटा निर्माण होतात. समुद्र माशांचे निवासस्थान आहे.

२) एते गिरय: । पर्वत:, नग:, अद्रि: शैल:, महीधर: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । गिरि: उत्तुङ्ग: अस्ति । तस्मिन् वृक्षा: रोहन्ति । केचित् गिरय: वनै: परिपूर्णा: वर्तन्ते ।  केचित् पाषाणमया: सन्ति ।

भाषांतर - हे पर्वत आहेत. पर्वत, नग, अद्री, शैल, महीधर इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. पर्वत उंच असतो. त्यावर झाडे उगवतात. काही पर्वत वनांनी परिपूर्ण असतात. काही पाषाणमय असतात.

 ३) एष: ऋषि: । ऋषय: वने निवसन्ति । तत्र तेषाम् आश्रमा: भवन्ति स्म । वाल्मीकि: आदिकवि: । तस्य रामायणं काव्यं प्रसिद्धम् । श्रीव्यासस्य महाभारतं नाम काव्यं प्रसिद्धमस्ति ।

भाषांतर - हा ऋषी आहे. ऋषी वनात रहातात. तेथे त्यांचे आश्रम असतात. वाल्मीकी हे आदिकवी आहेत. त्यांचे रामायण हे काव्य प्रसिद्ध आहे. श्रीव्यासांचे महाभारत हे काव्य प्रसिद्ध आहे.

४) चन्द्र: निशापति: । रजनीनाथ:, शीतांशु:, चन्द्रमा:, सोम: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । स: रात्रौ आकाशे उदेति । चन्द्रस्य किरणा: शीतला: । चन्द्र: पौर्णिमायां परिपूर्ण: अस्ति अमावास्यायां स: न दृश्यते । चन्द्र: समुद्रात् उद्भूत: इति पुराणानि कथयन्ति । यदा चन्द्र: उदेति तदा गगनं मनोहरं भवति । तस्य किरणा: अमृतमया: वर्तन्ते । चकोरा: तत् अमृतं पिबन्ति इति कविकल्पना अस्ति ।

भाषांतर - चंद्र म्हणजे निशापती. रजनीनाथ, शीतांशू, चंद्रमा, सोम इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. तो रात्री आकाशात उगवतो. चंद्राचे किरण शीतल असतात. चंद्र पौर्णिमेला परिपूर्ण असतो. अमावास्येला तो दिसत नाही. चंद्र हा समुद्रातून निर्माण झाला आहे असे पुराणे वर्णन करतात. जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा आकाश सुंदर होते. त्याचे किरण अमृतमय असतात. चकोरपक्षी ते अमृत पितात, अशी कविकल्पना आहे.

५) एष: नृपति: । नृपति: नाम राजा । भूपति: महीपति: भूपाल:, नृप:, राजा, इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । प्राचीनकाले भारतदेशे बहुविधा: नृपा: विद्यन्ते स्म । एते भूपा: परस्परं युध्यन्ते स्म । हर्ष:, भोज:, विक्रम:, चन्द्रगुत:, पृथ्वीराज:, अशोक: इत्यादय: नैके नृपा: भारतदेशस्य शासनं कुर्वन्ति स्म ।

भाषांतर - हा राजा आहे. नृपती म्हणजे राजा. भूपती, महीपती, भूपाल, नृप, राजा अशी त्याची अन्य नावे आहेत. प्राचीनकाळी भारतदेशामधे अनेक राजे होऊन गेले. हे राजे परस्पर युद्ध करत असत. हर्ष, भोज, विक्रम, चन्द्रगुप्त, पृथ्वीराज, अशोक इत्यादी अनेक राजे भारतदेशाचे शासन करत होते.

६) अहि: नाम सर्प: । भुजग:, भुजङ्ग:, भुजङ्गम:, नाग: सरीसृप: इत्यादीनि तस्य अन्यानि नामधेयानि । सर्पाणां विविधा: प्रजातय: सन्ति । नागराज: शङ्करस्य कण्ठे वर्तते । सर्प: कृषकाणां मित्रम् । सर्पस्य दन्ते विषमस्ति । तस्य फाटाटोप: भयङ्कर: अस्ति ।

भाषांतर - अही म्हणजे साप. भुजग, भुजंग, भुजंगम, नाग, सरीसृप इत्यादी त्याची अन्य नावे आहेत. सर्पांच्या विविध जाती आहेत. नागराज शंकराच्या गळ्यात असतो. सर्प हा शेतकर्‍यांचा मित्र आहे. सापाच्या दातात विष असते. त्याची फणा भायंकर असते.

मराठीचे संस्कृत भाषांतर करा.

१) हा रवि आहे. सूर्य सकाळी उगवतो. सूर्योदयाच्या वेळी आकाश लालसर होते. सूर्यास्ताच्या वेळीही ते लालसर होते.  दुपारी त्याची किरणे प्रखर होतात. सूर्यप्रकाश लाभदायक असतो. सूर्य उगवल्यावर पक्षी किलबिल करतात.

भाषांतर - एष: रवि: । सूर्यं प्रभाते उदेति । सूर्योदयसमये गगनं रक्तवर्णं भवति । मध्याह्ने तस्य किरणा: चण्डा: भवन्ति । सूर्यप्रकाश: लाभदायक: । यदा सूर्य: उदेति तदा खगा: कूजन्ति ।

२) हे कपी आहेत. वानर, मर्कट प्लवंग अशी त्याची अन्य नावे आहेत. कपी झाडांवर उड्या मारतात. काही वानर श्वेतमुख असतात. काही कृष्णमुख असतात. वानर श्रीरामांचे सहायक होते.

भाषांतर - एते कपय: । वानर:, मर्कट:, प्लवङ्ग: तस्य अन्यानि नामधेयानि । वानरा: वृक्षे कूर्दन्ति । केचन कपय: श्वेतमुखा: । केचन कृष्णमुखा: । वानरा: श्रीरामस्य सहायका: ।

३) ही रत्ने आहेत. मणि असे त्यांचे दुसरे नाव आहे. मणी विविध रंगी असतात. ते मूल्यवान असतात. काही लाल रंगांचे असतात तर काही हिरव्या रंगाचे असतात. काही पांढर्‍या रंगांचे असतात. मणियुक्त आभूषणे सर्वांना प्रिय असतात.

भाषांतर - एतानि रत्नानि । मणय: इति तेषाम् अन्यत् नामधेयम् । मणय: विविधवर्णा: । केचन मणय: रक्तवर्णा:, केचन हरिता: । (कानिचन रत्नानि रक्तवर्णानि कानिचन हरितानि ।) केचन श्वेतवर्णा: सन्ति । (कानिचन रत्नानि श्वेतवर्णानि सन्ति ।) मणियुक्तानि आभूषणानि सर्वेषां प्रियाणि । (मणियुक्ता: अलङ्कारा: सर्वेषां प्रिया: ।)

===============================



" ह्रस्व इकारान्त पुंलिंगी शब्द* (उजळणी प्रथमा विभक्ती) " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Thursday, August 27, 2020

९) भरतमुनी व नाट्यशास्त्र

 ९) भरतमुनी व नाट्यशास्त्र  

भारतात नाटकांची परंपरा किती प्राचीन आहे ते आपण मागच्या भागात पाहिले. आज आपण भरतांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राची माहिती घेणार आहोत.

छंदशास्त्र, गणितशास्त्र, व्याकरणशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्थापत्यशास्त्र, साहित्यशास्त्र, असे अनेक विषयांवर संस्कृतभाषेत शास्त्रीय ग्रंथ लिहीले गेले आहेत. नाट्यशास्त्र हे साहित्यशास्त्रातच समाविष्ट होते. 


भरतमुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ साहित्यशास्त्रातील अतिशय प्राचीन ग्रंथ आहे. भरतांच्या नाट्यशास्त्रात कोहल, शांडिल्य, वात्स्य, धूर्तिल वगैरे अन्य आचार्यांचा उल्लेख मिळतो. पण त्यांचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे भरतांनाच नाट्यशास्त्राचे प्रधान आचार्य मानले जाते. कदाचित त्याकाळात उपलब्ध असलेल्या सर्व मतांचा विचार करूनच नाट्यशास्त्र या विस्तृत ग्रंथाचे लेखन भरतांनी केले असल्यामुळे भरतांचा ग्रंथ व नाव लोकप्रिय झाले असावे. कारण हा ग्रंथ नाट्यशास्त्राविषयी परिपूर्ण माहिती देणारा व विशाल ग्रंथ आहे. 


संस्कृत साहित्यिक आपला परिचय ग्रंथामधून देत नाहीत. एकंदर सर्व संस्कृत साहित्यक प्रसिद्धी-पराङ्मुखच आहेत. सहाजिकच संस्कृत साहित्यिकांचा काळ, त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांचे कार्य याविषयी इतर ग्रंथकारांनी दिलेल्या माहितीवरूनच आणि त्यांचे उपलध असलेले ग्रंथ यावरूनच माहिती गोळा करावी लागते. 


परंपरेप्रमाणे भरतमुनी हे नाट्यशास्त्राचे प्रणेते आहेत. ही गोष्ट सर्वांनी मान्य केली आहे. पुराणे वगैरे प्राचीन साहित्यात अनेक भरतांचा उल्लेख मिळतो. १) दशरथपुत्र भरत २) दुष्यंत-शकुंतलेचा पुत्र भरत की ज्यांच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेले आहे. ३) मान्धाताचा पणतु भरत ४) जडभरत. हे सर्व भरत कोणत्या ना कोणत्या तरी राजवंशाशी संबंद्ध आहेत. त्यापैकी कोणीही नाट्यशास्त्राचा प्रणेता नसावा. नाट्यशास्त्र लिहिणारे भरत ही एक वेगळीच ऐतिहासिक व्यक्ति असावी. (काहींच्या मते भरत हे एका जातीचे नाव असावे. नाट्यशास्त्र त्यांच्या जातीय कलेचा प्रतिपादक ग्रंथ असावा. आणि त्याची रचना अनेक भरतांनी वेळोवेळी केलेली असावी). एकूण भरतांच्याविषयी कोणतीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. (नाट्यशास्त्रकार भरतांचा मत्स्यपुराणाव्यतिरिक्त कुठल्याही पुराणाने त्यांचे स्मरण केलेले नाही).


नाट्य़शास्त्रग्रंथाचा काळ -

कालिदासाने ‘विक्रमोर्वशीयम्’ नाटकात भरतमुनींचा स्पष्ट उल्लेख केला आहे. कालिदासाचा काळ इ. स. चे पहिले शतक ते चौथे शतक यामधे मानला जातो. कालिदासाच्या काळीच भरत हे एक पौराणिक व्यक्ति म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे नाट्यशास्त्राचा काळ इ. स. पूर्व २ रे वा ३ रे शतक मानला जात असला तरी ते त्याहूनही प्राचीन असण्याची शक्यता आहे. कारण नाट्यशास्त्राची भाषा सूत्रमय आहे. या सूत्रशैलीवरून त्या ग्रंथाची अतिप्राचीनता सिद्ध होते. त्यावरून काही विद्वान त्याचा काळ इ. स. पूर्व पाचवे शतक मानतात.


भरतांनी लिहिलेल्या ग्रंथावरून ही गोष्ट सिद्ध होते की भरतांच्या काळीच नाटक विकसित अवस्थेत होते. तोपर्यंत नाट्यशास्त्रावर अनेक आचार्यांनी ग्रंथही लिहीले होते. म्हणजे भरतांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहीला व त्यानंतर नाटकप्रणाली चालू झाली असे झालेले नाही. नाट्यशास्त्रात जे नटी, नृत्य, वाद्य, संगीत, संवाद, कथावस्तु, रंगमंच यांचे जे उल्लेख आलेले आहेत त्यावरूनच भरतांच्या काळी नाटक विकसित अवस्थेत होते हे दिसून येते. 


नाट्यशास्त्रानुसार भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहीले व आपल्या १०० मुलांना ते शिकवले. पुढे यातील अनेक मुलांनी नाट्यशस्त्रविषयक ग्रंथाची रचना केली.


नाट्यशास्त्रीय विवरणावरून असे दिसते की भरतमुनींचा आश्रम हिमालय पर्वतावर असावा. हिमालय पर्वतावर असणार्‍या भगवान शंकरांच्या आदेशावरून त्यांनी तांडवनृत्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. तसेच त्यांनी शंकरांसमोर त्रिपुरदाह नावाच्या नाटकात ते तांडवनृत्य सादर केले. त्यांच्या या ग्रंथात हिमलय पर्वताचे व शिव-पार्वतीच्या तांडवनृत्याचे मनोहर वर्णन आहे. त्यावरून ते हिमालयवासी असावेत असे अनुमान काढता येते. काही आलोचकांच्या मताप्रमाणे नाट्यशास्त्रात आलेल्या हिमालयातील वृक्षांच्या वर्णनावरून ते काश्मिरनिवासी असावेत.. हे सिद्ध करण्याकरता एक तर्क प्रस्तुत केला जातो की काशिमरमधे नाट्यशास्त्राचे परंपरागत अध्ययन सर्वात जास्त प्रमाणात होत आले आहे. नाट्यशास्त्रावर टीकाग्रंथ लिहिणारे लोल्लट, भट्टनायक, अभिनवगुप्त हे काश्मिरीपंडितच होते.


कालिदासाने भरतमुनींचा उल्लेख नाट्यशास्त्राचे आचार्य असा केला आहे. दामोदर गुप्त, बाण, दंडी यांच्या काळी जे नाट्यशास्त्राचे स्वरूप होते तेच स्वरूप आजही विद्यमान आहे. साधारण बाणाचा काळ इ. स. सातवे शतक मानला जातो आणि नाट्यशास्त्राचे स्वरूप त्यावेळपासून आजही तसच टिकून आहे.


नाट्यशास्त्राची निर्मिती -


भरतमुनी म्हणतात की स्वायंभव मनूचे सत्य युग उलटून गेल्यावर वैवस्वत मनूचे त्रेतायुग आले. या युगात सर्व समाज काम-क्रोधादि व्यसनांनी पोखरला गेला होता. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांनी पृथ्वीवरील दुरवस्थेची कहाणी ब्रह्मदेवाला ऐकवली. या जंबूद्वीपातील लोकांना सुखाची प्राप्ती व्हावी, त्यांनी सदाचरणी बनावे, सर्व वर्णातील लोकांना एकेठिकाणी बसून त्यांना आनंद प्राप्त व्हावा असा एखादा उपाय योजण्याची विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेवाने देवतांची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन देवतांना स्वस्थानी पाठवून दिले. नंतर ब्रह्मदेवांने चारही वेदांचे चिंतन केल्यावर त्यांना पाचवा नाट्यवेद निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गायन, यजुर्वेदातून अभिनय व अथर्ववेदातून रस घेऊन ५ व्या नाट्यवेदाची निर्मिती केली. देवतांमधे या नाट्यवेदाचा प्रचार करण्यास त्यांनी इंद्राला सांगितले. परंतु देवतालोक नाट्य कर्मात कुशल नाहीत. वेदांचे मर्म जाणणारे मुनीलोकच या नाट्यवेदाचे ग्रहण करण्यास व प्रयोग करण्यास समर्थ आहेत, असे इंद्राने ब्रह्मदेवाला उत्तर दिले. म्हणून ब्रह्मदेवांनी भरतमुनींना हा पंचमवेद दिला व त्याचा प्रसार करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार भरतमुनींनी ह्या ५ व्या नाट्यवेदाचे शिक्षण आपल्या १०० मुलांना दिले .


भरतमुनींनी ह्या नाट्यवेदाचा भार स्वीकारल्यानंतर स्त्रीपात्रांसाठी अनिंद्यसुंदर अप्सरांची योजना केली. रंगशाळेची जबाबदारी विश्वकर्म्यावर सोपवली. सर्व सामग्रीने सुसज्जित होऊन ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना इंद्राच्या ध्वजोत्सवात या नाट्यवेदाचा सर्वप्रथम प्रयोग करण्यची विनंती केली. त्याप्रमाणे प्रथम त्यांनी इंद्रविजय नाटक सादर केले. या प्रयोगात देवांचा विजय व दानवाचा पराजय दाखवलेला पाहून देव प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना बक्षिसे दिली. पण दानव क्रुद्ध झाले व नाटकात विघ्ने निर्माण करू लागले. म्हणून इंद्राने दानवांना प्रत्युत्तर दिले व नाट्यगृह बनवण्याची विश्वकर्म्याला आज्ञा दिली. नाट्यगृह निर्माण झाल्यावर स्वत: ब्रह्मदेवाने तिथे देवतांची स्थापना केली. त्यामुळे नाटकातील पात्रे व नाटक दोन्हींचे दानवांच्यापासूण रक्षण होऊ लागले. ब्रह्मदेवाने दैत्यांना समजावले की नाट्यवेद सर्वांसाठी आहे. ज्याप्रमाणे ‘इंद्रविजय’ या नाटकमधे देवांचा विजय दाखवला आहे त्याप्रमाणे अन्य नाटकामधे देवांचा पराजय सुद्धा दाखवला जाऊ शकतो. ब्रह्मदेवाच्या समजावण्याने दैत्य शांत झाले. नंतर त्रिपुरदाह, समुद्रमंथन ही नाटके सादर झाली.


नाट्य शब्दाची व्याखा -
योऽयं स्वभावो लोकस्य सुखदु:खसमन्वित: ।
सोऽङ्गाद्यभिनयोपेतो नाट्यत्वमित्यभिधीयते ॥१-११९॥
अर्थ - सुखदु:खमिश्रित जे लोकांचे स्वभाव असतात ते जेव्हा आंगिक वगैरे अभिनयाने सादर केले जातात तेव्हा त्याला नाट्य असे म्हणतात.

नाटकाचा उद्देश -

भरतांनी श्रव्य काव्यापेक्षा दृश्यकाव्य जे नाटक ते सर्वश्रेष्ठ मानले आहे. कारण नाटकाला सार्ववर्णिक वेद म्हटले आहे. इतर वेदांचा उपयोग फक्त द्विजांनाच आहे. परंतु नाटाकाचा आस्वाद सर्व वर्गीय लोकांना घेता येतो. नाटक सर्व प्रकारच्या लोकांचे मनोरंजन करते. कारण त्याचा विषय सीमित नसतो. त्रैलोक्यातील भावदर्शन नाटकाच्या माध्यमातून साकारता येते. नाटक शक्तिहीनांमधे शक्तीचा संचार करते. शौर्यासाठी लोकांचा उत्साह वाढवते. अज्ञानी लोकांना ज्ञान देते तर विद्वानांमधील विद्वत्तेचा उत्कर्ष होतो. 


या विशाल विश्वपटावर सुखदु:खांचा खेळ चाललेला असतो. त्यामुळे मानवजीवन सुखमय किंवा दु:खमय बनते. त्या सर्वांचे चित्रण करणे हा नाटकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून भरतमुनी म्हणतात की ज्ञान, शिल्प, विद्या कला, कर्म अशी कोणतीही गोष्ट नाही की जी नाटकात दाखवली जात नाही. केवळ मनोरंजन हाही नाटकाचा उद्देश नसावा, तर मनोरंजनाबरोबर मनुष्याने चारित्र्यवान बनावे, त्याचे जीवन उदात्त बनावे यासाठी नाटकाने जागरूक असले पाहिजे. 


नाटक उत्तम, अधम व मध्यम अशा सर्व प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्व करते व त्यांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे उपदेश करते. दु:खार्त, सुखार्त, शोकार्त, तपस्वी अशा सर्व लोकांच्या मनोरंजनाचे ते साधन असावे. त्याचबरोबर धर्म, अर्थ व काम हे तीनही पुरुषार्थ मिळवून देण्यास समर्थ असावे.


नाट्यशास्त्रातील विषय -

भारतमुनींचे नाट्यशास्त्र हा उपलब्ध नाट्यविषयक ग्रंथात प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ नाट्यविषयक माहितीने परिपूर्ण ग्रंथ आहे. यात एकूण ३६ अध्याय़ आहेत. 


१ ते १३ अध्याय़ात नाट्योत्पत्ती, अभिनय, वाद्य, नृत्य, मंडप, रंगदेवतेचे पूजन, ताण्डवलक्षण, पूर्वरंग, रसविवेचन, भावव्यंजना, अंगाभिनय, उपांगाभिनय, अशा अनेक विषयांचा ऊहापोह केलेला आहे. 


१४ ते ३६ अध्यायांमधे वाचिक अभिनय, नाट्यलक्षण, छंद, अलंकार, काव्याचे गुणदोष, काकू-स्वरविधान, दशरूपक लक्षण, कथावस्तु, संधी, संध्यंग, केशिकी वगैरे वृत्ती, आहार्य अभिनय, नायक-नायिका भेद, चित्राभिनय, नाट्यप्रयोग अशा अनेक विषयांच्या सांगोपांग माहितीने भरलेला असा हा ग्रंथ आहे.


रंगमंच -

भारतीय नाटकांचे प्रयोग आरंभापासून नाट्यगृहातच होतात. कारण विश्वकर्म्यालाच नाट्यगृह रचण्याची आज्ञा केलेली आहे. भरतमुनींनी याविषयी विवरण केलेले आहे. रंगमंचाची सर्वांगीण व्यवस्था, रमणीय सज्जा, व वैज्ञानिक निर्मिती यामुळे भारतीय रंगमंच आपले स्वत:चे असे एक वैशिष्ट्य दाखवून देतो. ते वैशिष्ट्य आजही दिसून येते. 


रंगमंचाचे प्राचीन नाव आहे प्रेक्षागृह किंवा रंगशाला. भरतांच्या वचनानुसार प्रेक्षागृहाच्या नाट्यमंडपाचे ३ प्रकार असतात. विकृष्ट, चतुरस्र व त्र्यस्र.
विकृष्ट प्रेक्षागृह - १०८ हात लांबीचे हे कदाचित गोलाकार असावे. हे देवतांसाठी नियत केले गेले होते. 


चतुरस्र प्रेक्षागृह - हे आयताकृती असे ६४ हात लांब व ३२ हात रुंद सांगितलेले आहे. राजा व जनतेसाठी हे प्रेक्षागृह आदर्श मानले जात असे. 


त्र्यस्र प्रेक्षागृह - हे त्रिकोणाकृती असे. त्याची प्रत्येक भुजा ३२ हात लांब असे. या प्रेक्षागृहाचा उपयोग छोट्या नाटकांच्या प्रयोगासाठी होत असे.


भरतांच्या मते चतुरस्र प्रेक्षागृह हे आदर्श आहे. रंगपीठावरील नटांचे संवाद व गाय़न प्रेक्षकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पहाता आला पाहिजे. या दोन्ही गोष्टी चतुरस्र प्रेक्षागृहात शक्य आहेत. 


प्रेक्षागृहाची निर्मिती कशी करावी त्याच्या सूचना भरतमुनींनी दिल्या आहेत. प्रेक्षागृहाच्या निर्मितीला शुभमुहूर्तावर प्रारंभ करावा. भूमी समतल करावी. नांगराने नांगरून घ्यावी. चार कोपर्‍यावर चार मुख्य खांब रोवावे. 


रंगशाळेचे मुख्य दोन भाग असत. अर्धा भाग प्रेक्षकांना बसण्यासाठी व उरलेल्या अर्ध्या भागात रंगशीर्ष, नेपथ्यगृह, रंगपीठ असावे. १६ हात लांब व  ८ हात रुंद असे रंगपीठ, रंगपीठाच्या मागे नेपथ्यगृह ८ हात लांब ४ हात रूंद व त्यामागे ८ हात लांब व ४ हात रुंद असे रंगशीर्ष असावे. रंगशीर्ष भागात देवी देवतांची पूजा होत असे. नेपथ्यगृहाचा वापर पात्रांच्या सजावटीसाठी होत असे. आणि रंगपीठावरून प्रत्यक्ष अभिनय सादर केला जात असे. 


नाट्यगृहाचा मंडप पर्वताच्या गुहेच्या आकाराचा असावा. नाट्यमंडपाच्या भिंतीवर नाना प्रकारची चित्रे असावीत. नाट्यविषयाशी संबंधित चित्रे विशेष उपयुक्त ठरतात असे भरतांचे मत आहे. रंगशाळेची रचना विशेष हवेशीर ठिकाणी नसावी. कारण आवाज श्रोत्यांपर्यंत पोचणार नाही. प्रेक्षकांना बसण्य़ासाठी सोपानाकृती (सोपान = जिना) आसन मांडणी त्यांनी सांगितली आहे. जमिनीपासून १ हात उंच वर अशी पायर्‍यांची आसन रचना असावी. प्रेक्षागृहातील आसने वीट किंवा लाकडापासून बनवली जात असत. ‘इष्टिकादारुभि: कार्यं प्रेक्षकाणां निवेशनम्’. कुठल्याही स्थानावरून रंगमंचावरील पात्रांचा अभिनय दिसला पाहिजे. अशी प्रेक्षागृहाची रचना असवी. 


अशाप्रकारे नाट्यकलेच्या प्रारंभी प्रभातकालीच सर्वांगीण व सुव्यवस्थित रूपात भारतामधे प्रेक्षागृह निर्माण झाले आहे.


नाटकाची वैशिष्ट्ये - 


भरतमुनींनी नाटकाकरता काही नियम घालून दिलेले आहेत.
१) नाटक यथार्थवादी असावे. परंतु घृणास्पद अथवा उद्वेगजनक दृश्यांचे प्रदर्शन करू नये.
२) रंगपीठावर युद्ध, भोजन, स्वप्न वा प्रणय प्रसंग दाखवू नयेत.
३) एका अंकात एका मुहूर्तामधे म्हणजे साडे तीन तासात घडणार्‍या घटना दाखवाव्यात.
४) नाटक सुखांत असावे.
५) दशरूपकातील नाटक हा प्रकार ५ ते १० अंकी असावा.
६) शृंगार किंवा वीररस मुख्य असावा.
७) राजा, मंत्री, ब्राह्मण, या नटांनी संस्कृत बोलावे व राणी, नोकर व इतर स्त्रिया यांनी प्राकृत बोलावे.
८) विदूषक हास्यरस निर्मिती असला तरी नायकाला अनेक कामात मदत करणारा, नायकाचा मित्र, सर्व स्थितीत समान साथ देणारा व जातीने ब्राह्मण असावा, पण त्याने भाषा मात्र प्राकृत बोलावी.
९) नाटकाचे कथानक लोकप्रसिद्ध असावे, रामायण, महाभारत, पुराण, बृहत्कथा अशा कोणत्यातरी ग्रंथाचा कथानकाला आधार असावा. कथानक कविकल्पित असू नये. प्रसिद्ध कथानकांमधे नाटककाराने आवश्यकतेनुसार बदल करायला हरकत नाही.

नाट्यमंडपात कोणती आवश्यक कृत्ये करावीत, विभिन्न देवतांची पूजा कशी करावी, त्या पूजेचे फळ काय त्याचे सांगोपांग विवेचन त्यांनी तिसर्‍या अध्य़ायात केले आहे. 


नृत्याभिनयाच्या संपूर्ण विवेचनात मुद्रा, हात, पाय, मान यांच्या स्थिती, नृत्यास वाद्याची व संगीताची जोड, नूपूर, समूहनृत्य, नृत्याचे नाटकात केव्हा केव्हा संयोजन करावे त्याविषयी माहिती दिलेली आहे.


पूर्वरंग, नांदी, प्रस्तावना, सूत्रधारप्रवेश, यांची माहिती पाचव्या अध्यायात आहे. शृंगार, करुणादी रस, स्थायी संचारी भाव, यांचेही विवरण या ग्रंथात आहे. आठव्या अध्य़ायापासून अभिनयाची माहिती आली आहे. आंगिक, वाचिक, सात्विक हे अभिनयाचे प्रकार सांगून भरतांनी आंगिक अभिनयांतर्गत येणार्‍या उपांगाभिनयाचेही विवेचन केले आहे. रंगभूमीवर प्रवेश करणार्‍या सर्व पात्रांची गती कशी असावी, चालण्याच्या गतीतून भाव कसे व्यक्त करावेत याचे सांगोपांग विवेचन केलेले आहे. निरनिराळ्या मन:स्थितीत भुवया फिरवण्याचे प्रकार, ओठ, डोळे, डोळ्यांच्या पापण्या, बुबुळे हलवण्याचे प्रकार, नासिकेचे सहा प्रकारचे अभिनय, गालांचा अभिनय, हनुवटी, उभे रहाण्याचे प्रकार, हस्तक्रियेने दाखवायचे संकेत इत्यादी सखोल माहितीने भरलेला असा हा ग्रंथ आहे. वाचिक अभिनयात स्वरोच्चारण, काकू स्वराचे विवेचन आहे. नेपथ्य, वेषभूषा, आभूषणे, स्त्री-पुरुषांनी घालायचे अलंकार, फुलांचे अलंकार यांची माहिती आहे. नकली अलंकार घालण्याची सूचना पण भारतांनी केली आहे. वेगवेगळ्या जातीच्या पात्रांची वेशभूषा, हर्ष, शोक वगैरे भाव व्यक्त करण्याच्या पद्धती, संगीत शास्त्रातील ग्राम, मूर्छना, श्रुति, स्वरांचे प्रकार, चार प्रकारची वाद्ये, बासरीचे स्वरूप, वादनविधी, ताल, लय, वादकाचे गुण, योग्यता, कोणत्या वेळी कोणते वाद्य वाजवावे वगैरेंचे सूक्ष्म विवेचन केलेले आहे. 


कोणत्या प्रदेशातील लोकांनी कोणत्या प्रकारची केशरचना करावी त्याचीही माहिती आली आहे. भरत म्हणतात की गोपींनी वेणी घालावी. गौड देशातील स्त्रियांनी केस कुरळे करावेत. पूर्वेकडील व उत्तरेकडील स्त्रियांनी कपाळावरील केस कापून बाकीचे उलटे फिरवावेत, मुनिकन्यांनी एक वेणी घालावी. अप्सरा, विद्याधरी वगैरे स्त्रियांनी फणा काढलेल्या सापाप्रमाणे केशरचना करावी. यक्ष स्त्रियांनी केस मोकळे सोडावेत. अवंती देशातील स्त्रियांनी शेपूट सोडलेला अंबाडा घालावा. तर दक्षिणेकडील स्त्रियांनी खोपा घालावा. 


पुरुषांनी शेंडी, टक्कल, जटा वेगवेगळ्या प्रकारच्या दाढीमिशा कशा राखाव्यात याचीही माहिती भरतांनी दिलेली आहे. 


एकूण नाट्याभिनयास आवश्यक अशा सर्व अंगांनी परिपूर्ण असा हा ग्रंथ आहे. 


Wednesday, August 26, 2020

पाठ ४९ वा क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग ३)

 पाठ क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग ३)

    मागच्या दोन भागात आपण पहिला, चौथा व सहाव्या गणातील धातूंची रूपे कशी बनतात ते पाहिले. आज आता दहाव्या गणातील धातूंमधे काय बदल होतात ते पहावयाचे आहे.
    दहाव्या गणातील सर्व धातू बहुतेक उभयपदी आहेत. काही धातू मात्र आत्मनेपदी आहेत. दहाव्या गणाचे ‘अय’ हे विकरण विकारक आहे. ते विकरण लागतांना धातूमधे बदल घडून येतो. ज्या धातूंमधे बदल होत नाहीत त्या धातूंची रूपे सरळ पालयति-पालयते, भक्षयति-भक्षयते अशी होतात.

१) ‘अय’ हे विकारक विकरण पुढे असतांना उपान्त्य ह्रस्व इ, उ किंवा ऋ या स्वरांचा गुण होतो. म्हणजे इ च्या जागी ए, उ च्या जागी ओ व ऋ च्या जागी अर् असा आदेश होतो. त्यामुळे रिच्-रेचयति, शिष्-शेषयति, चुर्-चोरयति, धृष्-धर्षयति, वृज्-वर्जयति अशी रूपे तयार होतात.  
२) ‘अय’ हे विकरण लागण्यापूर्वी धातूतील उपान्त्य ‘अ’ वर्णाची वृद्धी होते. वृद्धी म्हणजे अ च्या जागी आ हा वर्ण येतो. उदा. क्षल्-क्षालयति, छद्-छादयति, तड्-ताडयति, लल्-लालयति अशी रूपे तयार होतात.
३) आता नियमाला अपवाद असतातच किंवा अपवादाने नियम सिद्ध होतो असे म्हणतात. त्याप्रमाणे कथ्, गण्, रच्, रह्, वर्, स्पृह, मृग् असे काही धातू आहेत की त्यांच्यात काही बदल होत नाही. ही रूपे सिद्ध करतांना हे धातू पाणिनीने अकारान्त मानले आहेत व अ हा उपान्त्य वर्ण नाही असे म्हटले आहे. अर्थातच ती ती रूपे सिद्ध करण्यासाठी पाणिनीने अशा काही क्लृप्त्या लढवल्या आहेत.
४) धू व प्री या धातूंच्या बाबतीत ‘नुम्’ म्हणजे प्रत्यक्षात ‘न्’ असा आगम होतो व धूनयति प्रीणयति अशी रूपे सिद्ध होतात.
५) तसेच प्रयोजक रूपे तयार करतांना सुद्धा तो धातू कोणत्याही गणाचा असला तरी त्याला दहाव्या गणाचे ‘अय’ हे विकरण लावून रूपे तयार करतात. उदा.
बालक: चलति ।
माता बालकं चालयति ।
मुलगा चालतो, आई मुलाला चालवते. यातील पहिल्या वाक्यात मुलगा चालण्याची क्रिया आपल्याच प्रेरणेने करतो. परंतु दुसर्‍या वाक्यात मुलगा चालण्याची क्रिया दुसर्‍याच्या प्रेरणेने करतो. अशा दुसर्‍या प्रकारच्या प्रयोगाला प्रयोजक वाक्यरचना असे म्हणतात. ही रूपे सुद्धा सिद्ध करतांना वरील सर्व नियम लागू होतात.

क्रियापदापासून रूपे बनवतांना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -

१)     मूलत:
    मि वस् मस्
    सि थस् थ
    ति तस् अन्ति
असे वर्तमानकाळी प्रत्यय आहेत. पदांती येणार्‍या ‘स्’ या व्यंजनाचा विसर्ग होतो. म्हणून व:, म:, थ:, त: असे रूपांतर झालेले आहे.
२) व् आणि म् या वर्णांनी सुरू होणारे प्रत्यय पुढे आले असता धातूचे अकारांत अंग दीर्घ बनते. म्हणून नमामि, नमाव:, नमाम: अशी रूपे झाली आहेत.
३) अकारान्त अंगापुढे गुणसंज्ञक स्वर (अ, ए, ओ) पुढे आले असता पररूप संधी होतो. उदा.
वद + अन्ति = वदन्ति
येथे अ + अ = आ असा संधी न होता पररूप म्हणजे पुढचा वर्णच दोन्ही अ बद्दल येतो. म्हणून वदन्ति असे रूप होते. वदान्ति असे रूप बनत नाही.
४) पहिल्या गणाचे ‘अ’ हे विकरण व दहाव्या गणाचे ‘अय’; हे विकरण धातूमधे बदल घडवून आणते, विकार घडवून आणते म्हणून त्यांना विकारक असे म्हणतात. पण सहाव्या गणाचे अ विकरण असा धातूत बदल घडवून आणत नाही म्हणून त्याला अविकारक म्हणतात. त्यामुळे सहाव्या गणातील धातू व पहिल्या गणातील धातू ओळखण्य़ाची ती एक खूण आहे. कृष्-कर्ष् या धातूत बदल झाला आहे व कर्षति असे रूप झाले आहे. म्हणजे हा धातू पहिल्या गणाचा आहे. तर सृज = निर्माण करणे ह्या धातूत असा काही बदल न होता सृजति असे रूप बनते. त्याअर्थी तो सहाव्या गणाचा आहे.
५) विकारक अय विकरणामुळे उपान्त्य अ आणि अन्त्य स्वराची वृद्धी होते. आणि उपान्त्य इ, उ, ऋ, लृ यांना गुणादेश होतो.
६) १, ४, ६, १० या गणातील धातूंचे विकरण हे अकारान्त असल्यामुळे आणि या चार गणांतील धातूंचे अंग एकसारखे अकारान्तच होत असल्यामुळे या धातूंचा एक गट बनतो. त्यांची रूपे सुद्धा बर्‍याच प्रमाणात सारखीच होतात. पण उरलेले २, ३, ५, ७, ८, ९ या गणातील धातूंचे अंग एकसारखे नसते.  
७) काही धातू परस्मैपदी असतात. काही धातू आत्मनेपदी असतात तर काही धातूंना दोन्ही पदांचे प्रत्यय लागू शकतात. त्यांना उभयपदी धातू म्हणतात. दहाव्या गणातील बहुतेक सर्व धातू उभयपदी आहेत. फक्त काही धातू आत्मनेपदी आहेत. 




"क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग ३) " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Tuesday, August 25, 2020

पाठ ४८ वा - क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग २)

४८ वा पाठ क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग २)

    आपण पहिल्या गणातील धातूंमधे अ विकरण लागतांना का, कसे व कोणते बदल होतात ते पाहिले. आता चौथ्या व दहाव्या गणातील विकरण त्या धातूपुढे आले तर कोणते बदल होतात ते पाहू.

चौथा गण -
    या गणाचे विकरण आहे ‘य’. हे विकरण अविकारक आहे. म्हणजे हे विकरण लागतांना धातूत बदल घडून येत नाहीत. पण त्यालाही काही अपवाद आहेत. उदा. शम्, दम्, श्रम्, भ्रम् वगैरे काही धातूंना चौथ्या गणाचे ‘य’ हे विकरण लागतांना उपान्त्य स्वर दीर्घ होतो.
उदा. - शम् + य
= श् + अ + म् + य
= श् + आ + म् + य
= शाम्य. हे झालं धातूचे अंग. आता त्याला प्रत्यय लागून शाम्यति हे रूप तयार होईल.
 
तसेच दम्-दाम्यति, श्रम्-श्राम्यति, भ्रम्-भ्राम्यति अशी रूपे होतात.

जन् या चौथ्या गणाच्या धातूला जा असा आदेश होऊन ‘जायते’ असे रूप होते. भ्रंश् (४ प. प.) व रञ्ज् (४ उ. प.) या धातूंमधील अनुनासिकाचा य विकरण लागतांना लोप होतो व भ्रश्यति, रज्यति-रज्यते अशी रूपे बनतात.

सहावा गण -
    सहाव्या गणाचे ‘अ’ हे विकरण अविकारक आहे. ते धातूला लागल्यावर धातूत बदल होत नाही. त्यामुळे लिखति, जुषते अशी सरळ रूपे तयार होतात.

आता सहाव्या गणाचे ‘अ’ हे अविकारक विकरण लागत असतांना गुण वगैरे बदल होत नसला तरी धातूतील विशिष्ट स्वरात बदल दिसून येतो.

१) उदा. ह्रस्व किंवा दीर्घ इकारान्त-उकारान्त धातूतील ‘इ’ ला किंवा ‘उ’ ला ‘इय्’ किंवा ‘उव्’ असे आदेश होतात. मग त्यांना ‘अ’ हे विकरण जोडून धातूचे अंग बनते.
उदा. क्षि (६प. प.)
क्षि + अ
= क्ष् + इ + अ  
= क्ष् + इय् + अ
= क्षिय् + अ
= क्षिय असे धातूचे अंग तयार झाले.

२) ऋकारान्त धातूंच्या मधे ‘ऋ’ च्या जागी ‘रिय्’ येतो. उदा. मृ-म्रियते, धृ-ध्रियते

३) दीर्घ ऋकारान्त धातूमधे ऋ या स्वराच्या जागी ‘इर्’ असा बदल होतो. उदा. कॄ -किरति, गॄ - गिरति

४) त्रुट् हा धातू मूलत: सहाव्या गणाचा असूनही विकल्पाने त्याला चौथ्या गणाचे ‘य्’ हे विकरण लावले जाते व त्रुटति, त्रुट्यति अशी दोन दोन रूपे बनतात.

५) प्रच्छ् (६ प. प.) धातूला अविकारक ‘अ’ हे विकरण पुढे असतांना संप्रसारण होऊन पृच्छ् असा बदल होतो. त्याप्रमाणेच व्रश्च्-वृश्चति, व्यच्-विचति, भ्रस्ज्-भृज्जति अशी रूपे तयार होतात.

६) लिप्, मुच्, सिच्, विद्, हे सहाव्या गणाचे उभयपदी धातू व कृत् हा सहाव्या गणाचा परस्मैपदी धातू यांना ‘अ’ हे विकरण लागण्यापूर्वी अन्त्य व्यंजनाच्या आधी नुम् असा आगम होतो. म्हणजे ‘न्’ हा वर्ण येतो.
उदा. विद् + अ
= वि + द् + अ
= वि + न् + द् + अ
= विन्दति
तसे लिम्पति, मुञ्चति, सिञ्चति कृन्तति अशी रूपे तयार होतात.

७) मस्ज्, लस्ज् या धातूतील ‘स्’ या वर्णाच्या ऐवजी ‘ज्’ हा वर्ण येतो आणि मज्जति, लज्जते अशी रूपे तयार होतात.

८) शद्, सद् या धातूंना ‘अ’ हे विकरण लागण्यापूर्वी शीय् सीद् असे आदेश होऊन शीयते, सीदति अशी रूपे होतात.
 

स्वाध्याय

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति |
  वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ||१-२९||
  गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते |
  न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ||१-३०||

 
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव |
  न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ||१-३१||

 न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च |
  किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ||१-३२||

हे गीतेतील पहिल्या अध्यायातील अर्जुनाच्या तोंडचे चार श्लोक आहेत.

या श्लोकांमधील क्रियापदे व त्यांचे कर्ते कोण आहेत ते लिहा.
 

क्रियापदांची रुपे कशी बनतात ती माहिती असावी म्हणून हे पाठ पाठवले आहेत. ऑडिओ ऐकतांना पाठ डोळ्यासमोर असेल तर समजायला जास्त मदत होईल. सोमवार पासून आपण सर्वही विभक्तींची उजळणी करणार आहोत.


" क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग २) " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ] 
 
=======================================

४८ स्वाध्याय - गीतेच्या श्लोकातील क्रियापदांचे कर्ते व क्रियापदे

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति |
  वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ||१-२९||

- मम गात्राणि सीदन्ति । मम मुखं परिशुष्यति ।
मे शरीरे वेपथु: रोमहर्ष: च जायते ।

  गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते |
  न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ||१-३०||

- मे हस्तात् गाण्डीवं स्रंसते । मे त्वच् परिदह्यते । अवस्थातुं न शक्नोमि । मे मन: भ्रमति ।
 
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव |
  न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ||१-३१||

- विपरीतानि निमित्तानि पश्यामि । श्रेय: न अनुपश्यामि ।

 न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च |
  किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ||१-३२||

- (अहं) विजयं, राज्यं, सुखानि च न काङ्क्षे । 

  

Monday, August 24, 2020

पाठ ४७ वा क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग १)

४७ वा पाठ क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग १)

    आपण सामान्यपणे क्रियापदांची रूपे कशी बनतात त्याची माहिती घेतली. पहिल्या व सहाव्या गणाच्या धातूचे विकरण ‘अ’ असे आहे, चौथ्या गणाचे विकरण ‘य’ आहे तर दहाव्या गणाचे विकरण ‘अय’ असे आहे. मूळ धातूमधे ते विकरण जोडून धातूचे अंग तयार केले जाते व त्यानंतर त्याला प्रत्यय लावले जातात. एक, चार, सहा व दहा या गटातील धातूंची अंगे अकारांत होतात. धातूचे अंग तयार करून घेतल्यावर मग प्रत्यय लावून पहिल्या गणाची नमति, वन्दते; चौथ्या गणाची तुष्यति, युध्यते; सहाव्या गणाची क्षिपति, क्षिपते  व दहाव्या गणाची कथयति, कथयते अशी धातू पासून क्रियापदाची परस्मैपदी व आत्मनेपदी रूपे तयार होतात.

    क्रियापदातील रूपात धातू, विकरण व प्रत्यय असे तीन घटक असतात. धातूवरून क्रियेचा अर्थ कळतो, विकरणावरून गण समजतो व प्रत्ययावरून पुरुष, वचन, काळ किंवा अर्थ यांचा बोध होतो.

पहिल्या व सहाव्या गणाच्या ‘अ’ या विकरणाविषयी माहिती -

    पहिल्या गणाचे विकरण पाणिनीच्या परिभाषेत शप् (श् + अ + प्) असे आहे तर सहाव्या गणाचे विकरण नुसते ‘श’ (श् + अ) असे आहे. प्रत्यक्षात पहिल्या गणाच्या विकरणांमधील ‘श्’ चा व अंत्य ‘प्’ चा लोप होऊन नुसते अ विकरण धातूला लागते. तर व सहाव्या गणातील ‘श’ यातील ‘श्’ चा लोप होतो व ‘अ’ हे विकरण धातूला लागते. त्यातील ‘शप्’ हे पहिल्या गणाचे विकरण लागतांना त्या विकरणातील ‘प्’ या अनुबंधामुळे संधीच्या नियमानुसार धातूचे अंग बनवतांना त्या धातूमधे बदल होतो. परंतु सहाव्या गणामधे असा ‘प्’ हा अनुबंध नसल्यामुळे सहाव्या गणाच्या धातूचे अंग बनवतांना धातूमधे बदल होत नाही व लिख् - लिखति, क्षिप् - क्षिपति, क्षिपते, मिल् - मिलति अशी रूपे तयार होतात. म्हणून पहिल्या गणाचे ‘अ’ हे विकरण विकारक आहे. म्हणजे धातूमधे बदल करणारे आहे. पण सहाव्या गणाचे ‘अ’ हे विकरण अविकारक आहे. कारण ते विकरण धातूमधे बदल घडवून आणत नाही.

पहिल्या गणातील भू-भव्, बुध्-बोध् वगैरे धातूंमधे बदल होण्याची कारणे -

आता शप् प्रत्यय लागतांना पहिल्या गणाच्या धातूचे अंग तयार करतांना त्या धातूमधे का व कसे बदल होतात ते पहावयाचे आहे. तत्पूर्वी विकरण लावून धातूचे अंग तयार करणे सुलभ व्हावे म्हणून धातूंचे वर्गीकरण कसे केलेले आहे ते पाहू.

धातूंचे वर्गीकरण -

    प्रथमत: धातूंचे वर्गीकरण दोन गटात होते.
१) व्यजनान्त धातू - हिंस्, लप्, जप्, गम्.
२) स्वरान्त धातू - नी, क्षि, म्लै, श्रि, हृ, दा, पा, शी, हे स्वरान्त धातू आहेत.

    असे स्वरान्त व्यंजनान्त धातू सर्व गणांमधे असतात. त्यातही स्वरान्त धातूंची संख्या व्यजनान्त धातूंपेक्षा कमी आहे.

यातील दोन्ही प्रकारच्या धातूंचे पुन्हा प्रत्येकी दोन गट पडतात.

व्यंजनान्त धातूंचे दोन गट -
१) इ, उ, ऋ, लृ हे ह्रस्व सोडून इतर स्वर उपान्ती आलेले व्यंजनान्त धातू.
उदा. पत्, धाव्, ईक्ष्, सेव् वगैरे.
अन्त्य वर्ण म्हणजे शेवटचा वर्ण व उपान्त्य वर्ण म्हणजे शेवटून दुसरा वर्ण.

पत् = प् + अ + त् म्हणजे येथे अ हा उपान्त्य वर्ण आहे.
धाव् = ध् + आ + व् = येथे आ हा उपान्त्य वर्ण आहे.
ईक्ष् = ई + क्ष् = येथे ई हा उपान्त्य वर्ण आहे.
सेव् = स् + ए + व् = येथे ए हा उपान्त्य वर्ण आहे.
 
आता नियम असा आहे की ह्रस्व इ, उ, ऋ आणि लृ सोडून कोणताही स्वर उपान्त्य स्थानी आला तर धातूमधे बदल होत नाही. म्हणून वरील धातूंची पतति, धावति, ईक्षते, सेवते अशी सरळ रूपे तयार होतात.

२) व्यंजनान्त धातूंचा दुसरा गट आहे उपान्ती इ, उ, ऋ, लृ हे ह्रस्व स्वर असलेले व्यंजनान्त धातू. उदा. सिध्, बुध्, कृष्, क्लृप्. या धातूंमधे क्रमाने इ, उ, ऋ, लृ हे ह्रस्व स्वर उपान्त्य स्थानी क्रमाने आलेले आहेत.
सिध् = स् + इ + ध् = उपान्त्य वर्ण आहे इ
बुध् = ब् + उ + ध् = उपान्त्य वर्ण आहे उ
कृष् = क् + ऋ + ष् = उपान्त्य वर्ण आहे ऋ
क्लृप् = क् + लृ + प् = उपान्त्य वर्ण आहे लृ

या गटातील पहिल्या गणाच्या धातूंपुढे ‘अ’ हे विकरण आले असता उपान्त्य वर्णांना गुणादेश होतो. पाणिनी व्याकरणात ‘अ, ए, ओ’ या स्वरांना गुण म्हटले आहे. म्हणजे इ, उ, ऋ आणि लृ यांना अनुक्रमे ए, ओ, अर्, अल् असे आदेश होतात. म्हणजे ‘इ’ च्या जागी ए येतो, ‘उ’ च्या जागी ‘ओ’ येतो. ‘ऋ’ च्या जागी ‘अर्’ येतो तर ‘लृ’ च्या जागी अल् असा आदेश होतो. आदेश म्हणजे पहिला वर्ण हटवून त्या जागी दुसरा वर्ण येतो. उदा.
चित् (१ प. प.) = ज्ञान होणे, कळणे, समजणे
चित् + अ (शप्)
= च् + इ + त् + अ (शप्)
= च् + ए + त् + अ (शप्)
= चेत् + अ (शप्)
= चेत असे धातूचे अंग तयार झाले.

बुध् + शप्
= ब् + उ + ध् + शप्
= ब् + ओ + ध् + शप्
बोध् + अ (शप्)
बोध

अशाप्रकारे बुध् मधील ‘उ’ या वर्णाला ओ, कृष् यातील ‘ऋ’ या वर्णाला अर् व क्लृप् यातील लृ या वर्णाला अल् असा गुणादेश होऊन बोध, कर्ष व कल्प अशी धातूची अंगे तयार होतात.

तेव्हा तो धातू सहाव्या गणातील आहे की पहिल्या गणातील आहे हे ओळखण्याची ही एक खूण झाली की असा बदल होत असेल तर तो धातू पहिल्या गणातील आहे. अर्थात वर दिलेल्या पहिल्या गटातील धातू मात्र असे ओळखता येणार नाहीत.

स्वरान्त धातूंचे दोन गट -
३) आ, इ-ई, उ-ऊ, ऋ-ॠ हे स्वर अन्त्य असलेले धातू. म्हणजेच ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर सोडून इतर स्वर अन्त्यपदी असलेले धातू

उदा. जि, नी, द्रु, भू, कॄ हे पहिल्या गणाचे धातू आहेत.

या गटातील धातूंच्या पुढे जेव्हा पहिल्या गटातील ‘अ’ (शप्) हे विकरण आले असता इ-ई, उ-ऊ, ऋ-ॠ या अंत्य स्वरांना गुणादेश होतात व मग संधीनियमानुसार धातूचे अंग बनते.
उदा. जि (१. प. प.) = जिंकणे
जि + अ (शप्)
= ज् + इ + अ
= ज् + ए + अ
= जे + अ
जय् + अ = जय
आता जे मधील ए स्वरापुढे अ आल्यामुळे त्या अन्त्य ए वर्णाला ‘अय्’ असा आदेश होईल. ए, ओ, ऐ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला की त्या अन्त्य स्वरांना क्रमाने अय्, अव्, आय्, आव् असे आदेश होतात. म्हणून

जे + अ
= ज् + ए + अ
= ज् + अय् + अ
= जय् + अ
= जय
असे धातूचे अंग तयार झाले. त्याप्रमाणेच नी-नय्, द्रु-द्रव्, भू-भव्, सृ-सर्, तृ-तर् असा बदल होतो.

४) धातूंच्या वर्गीकरणाचा चौथा प्रकार आहे की काही धातूंच्या अंती संयुक्त स्वर असतो. संयुक्त स्वर म्हणजे ए, ऐ, ओ, औ. उदा. धे, गै, ध्यै.  संयुक्त स्वरांपैकी ‘औ’ या वर्णाने अंत पावणारे धातू नाहीत.
धातू संयुक्त स्वराने युक्त असेल तर पहिल्या गणाचे ‘अ’ हे विकरण लागतांना संधिनियमानुसार त्या धातूतील ए, ओ, ऐ, औ या स्वरांना अय्, अव्, आय्, आव् असे क्रमाने आदेश होतात. म्हणजे ए वर्णाला अय्, ओ वर्णाला अव्, ऐ वर्णाला आय् आणि औ वर्णाला आव् असे आदेश होतात.

उदा. गै + अ (शप्)
= ग् + ऐ + अ (शप्)
= ग् + आय् + अ (शप्)
= गाय् +अ (शप्)
= गाय हे धातूचे अंग तयार झाले व पुढे प्रत्यय लावून गायति असे रूप तयार होईल.

प्रथम गणामधे काही अनियमित धातू आहेत. असे काही धातू आहेत की मूळ धातू एक असतो व त्याचे चालणारे रूप वेगळेच असते. विकरण लागण्यापूर्वी तसे आदेश होतात. उदा. गम्-गच्छ्, पा-पिब्, ऋ-ऋच्छ्, घ्रा-जिघ्र्, दा-यच्छ्, दृश्-पश्य, यम्-यच्छ्, सद्-सीद्, स्था-तिष्ठ्. हे धातू परस्मैपदी आहेत व त्यांची गच्छति, पिबति, ऋच्छति, जिघ्रति अशी रूपे होतात. 

 

 

 



" क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग १) " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Wednesday, August 19, 2020

पाठ ४६ वा सुभाषिते संबोधन



आज संबोधनावर आधारित काही सुभाषिते पाहूया. 


१) भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहं त्वत्प्रसादत:
पश्याम्यहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन ॥१५-१॥

संधिविग्रह - भो दारिद्र्य नम: तुभ्यं सिद्ध: अहं त्वत्प्रसादत: । पश्यामि अहं जगत् सर्वं न मां पश्यति कश्चन ।

अन्वय - भो दारिद्र्य, तुभ्यं नम: । अहं त्वत्प्रसादत: सिद्ध: । अहं सर्वं जगत् पश्यामि कश्चन मां न पश्यति ।


अर्थ - हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो. मी तुझ्यामु्ळे सिद्ध पुरुष झालो आहे. मी सर्व जग पहातो, पण मला मात्र कोणीही पाहू शकत नाही.

२) दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकि
गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् ।
विद्याविहीने गुणवर्जिते च
मुहूर्तमात्रं न रतिं करोषि ॥

संधिविग्रह - दारिद्र्य भो: त्वं परमं विवेकि गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् ।
विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोषि ।

अन्वय - भो: दारिद्र्य त्वं परमं विवेकि (असि) (हि त्वं) गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् (असि) ।
विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं रतिं न करोषि ।

अर्थ - हे दारिद्र्या तू अतिशय विवेकी आहेस. कारण गुण अधिक असणार्‍या पुरुषावर तू भाळतोस. विद्याहीन व गुणहीन माणसावर मात्र तू अजिबात प्रेम करत नाहीस.

३) रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयता
मम्भोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा: ।
केचित्वृष्टिभिराद्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच: ॥३१-१७॥

संधिविग्रह - रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयताम् अम्भोदा: बहव: हि सन्ति गगने सर्वे अपि न एतादृशा: ।
केचित् वृष्टिभि: आद्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचित् वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरत: मा ब्रूहि दीनं वच: ।

अन्वय - रे रे मित्र चातक, सावधानमनसा क्षणं श्रूयताम् । गगने अम्भोदा: बहव: सन्ति हि सर्वे अपि न एतादृशा: ।
केचित् धरणीं वृष्टिभि: आद्रयन्ति । केचित् वृथा
गर्जन्ति । (अत:) यं यं पश्यसि तस्य तस्य पुरत: दीनं वच: मा ब्रूहि ।

अर्थ - हे मित्रा चातका, क्षणभर चित्त स्थिर करून मी सांगतो ते श्रवण कर. आकाशात मेघ अनेक आहेतपरंतु सर्वच सारखॆ णाहीत. काही वृष्टीच्या योगाने भूमंडळ भिजवून टाकतात व काही शुष्क गर्जना मात्र करत रहातात. म्हणून जो जो दृष्टीस पडेल त्याच्या पुढ्यात उगीच दीन भाषण करू नकोस.

४) अपसर मधुकर दूरं,
परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे ।
इह न हि मधुलवलाभो
भवति परं धूलिधूसरं वदनम् ॥

संधिविग्रह - अपसर मधुकर दूरं, परिमलबहुले अपि केतकीकुसुमे ।*
इह न हि मधुलवलाभ: भवति परं धूलिधूसरं वदनम् ॥

अन्वय - हे मधुकर, दूरं अपसर । हि इह परिमलबहुले अपि केतकीकुसुमे मधुलवलाभ:  न भवति । परं वदनम् धूलिधूसरं (भवति) ।

अर्थ - हे भ्रमरा, दूर जा. या केवड्य़ाच्या फुलात पुष्कळ सुगंध असला तरी येथे तुला थेंबभर सुद्धा मध मिळणार नाही. तुझे तोंड मात्र धुळीने माखले जाईल.
 
कवीला यातून काय सांगायचे आहे की एखाद्याच्या बाह्य देखाव्याला भुलून जाऊ नये. त्याच्याकडे तसे चांगले गुण असतील असे नाही.
 
५) हे हेरम्ब किमम्ब रोदिषि कुत: कर्णौ लुठत्यग्निभू:
किं ते स्कन्द विचेष्टितं मम पुरा सङ्ख्या कृता चक्षुषाम् ।
नैतत्तेऽप्युचितं गजास्य चरितं नासां मिमीतेऽम्ब मे
तावेवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु व: ॥५०-४॥

संधिविग्रह - हे हेरम्ब किम् अम्ब रोदिषि कुत: कर्णौ लुठति अग्निभू:
किं ते स्कन्द विचेष्टितं मम पुरा सङ्ख्या कृता चक्षुषाम् ।
न एतत् ते अपि उचितं गजास्य चरितं नासां मिमीते अम्ब मे
तौ एवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु व: ।

अन्वय -
पार्वती - हे हेरम्ब,
गजानन: - किम् अम्ब ?
पार्वती - रोदिषि कुत: ?
गजानन: - अग्निभू: कर्णौ लुठति ।
पार्वती - स्कन्द ते किं विचेष्टितं ?
स्कंद: - (गजाननेन) पुरा मम चक्षुषाम् सङ्ख्या कृता ।
पार्वती - गजास्य ते अपि एतत् चरितं न उचितं ।
गजानन: - अम्ब, (स्कन्द:) मे नासां मिमीते ।
कवि: - तौ एवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु व: ।


अर्थ -
पार्वती - हे गणेशा,
गणपती - काय आई ?
पार्वती - का बरं रडतोस ?
गणपती - स्कंद माझे कान पिळत आहे.
पार्वती - अरे स्कंदा, हा काय तुझा खोडकरपणा ?
स्कंद - अगं, याने माझे आधी डोळे मोजले.
पार्वती - अरे गजानना, हे तुझं वागणं काही योग्य नाही.
गणपती - आई, यानं आधी माझ्या नाकाची लांबी मोजली.
कवी - त्या दोघांना अशा प्रकारे अविचाराने वागतांना (भांडतांना) पाहून हसू लागलेली पार्वती तुमचे रक्षण करो. 

 

span style="color: blue;"> " सुभाषिते संबोधन " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Tuesday, August 18, 2020

पाठ ४५ वा संस्कृतभाषा न कठिना !

पाठ ४५ वा संस्कृतभाषा न कठिना ! 


(एष: शिक्षिकया सह बालानां संवाद:)

अध्यापिका - सुवर्णे, त्वं किं करोषि ?
अध्यापिका - सुवर्णा, तू काय करत आहेस ?

सुवर्णा - आचार्ये, अहं संस्कृतभाषां पठामि । संस्कृतभाषा कठिना अस्ति किम् ? 


सुवर्णा - आचार्ये, मी संस्कृतभाषा वाचत आहे. संस्कृतभाषा कठीण आहे का ?

अध्यापिका - न हि, न हि, सा तु अतीव सरला, सुबोधा सरसा चास्ति । 


अध्यापिका - नाही, नाही, ती तर अतिशय सरळ, सुबोध व सरस आहे.

महेश: - आचार्ये, संस्कृतभाषा न अस्माकं व्यवहारभाषा, न वा विश्वभाषा । तथापि संस्कृताध्ययनं किमर्थं कर्तव्यम् ? 


महेश - आचार्ये, संस्कृतभाषा आपली व्यवहाराची भाषा नाही अथवा जगाचीही भाषा नाही. मग संस्कृतचे शिक्षण कशाला घ्याय़चे ?

अध्यापिका - शोभन: प्रश्न: । महेश, संकृतभाषा अस्माकं प्राचीना भाषा । संस्कृतभाषाया: अध्ययनेन अन्यभाषाणामध्ययनं सुकरं भवति । सर्वासां भारतीयभाषाणां अग्रजा खलु संस्कृतभाषा । 


अध्यापिका - छान प्रश्न आहे. महेश, संस्कृत भाषा आपली प्राचीन भाषा आहे. संस्कृतभाषेच्या अध्ययनाने इतर भाषांचे अध्ययन करणे सोपे होते. सर्व भारतीय भाषांची खरतर संस्कृतभाषा ही मोठी बहीणच आहे.

पूजा - आचार्ये, अन्ये के के लाभा: संस्कृतभाषाध्ययनेन भवन्ति ?
पूजा - आचार्ये, संस्कृतभाषेच्या अध्ययनाने इतर कोणते फायदे होतात ?

अध्यापिका -  संस्कृतभाषायां बहूनि गेयानि मधुराणि च सुभाषितानि । तथा च वक्तृत्वकलायां निपुणतासम्पादनार्थं तानि अतीवोपयुक्तानि । उच्चारणशुद्धता अपि लभते संस्कृताध्ययनेन । 


अध्यापिका - संस्कृतभाषेत खूप गाण्याजोगी व मधुर अशी सुभाषिते आहेत. तसेच वकृत्वकलेत नैपुण्य मिळवण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहेत. संस्कृतभाषेच्या अध्ययनाने उच्चार सुद्धा शुद्ध होतात.

दीपाली - आचार्ये, ‘संस्कृतभाषायां विपुलं, समृद्धं साहित्यं वर्तते’ इति जना: वदन्ति । अपि सत्यमेतत् ? 


दीपाली - आचार्ये, ‘संस्कृतभाषेत विपुल व समृद्ध साहित्य आहे असे’ लोक म्हणातात. ही गोष्ट खरी आहे का ?

अध्यापिका - आम्, बहव: कवय: स्वकाव्यै: संस्कृतभाषां भूषयन्ति । वाल्मीके: रामायणं श्रीव्यासस्य महाभारतं च अस्माकं आर्षमहाकाव्ये (स्त:)।
अध्यापिका - होय. खूप कवींनी स्वत:च्या काव्यानी संस्कृतभाषेला भूषवले आहे. वाल्मीकींचे रामायण व श्रीव्यासमहर्षींचे महाभारत ही आपली (दोन) आर्ष महाकाव्ये आहेत.

प्रीति: - आचार्ये, संस्कृतभाषायां शास्त्रीया: ग्रन्था: अपि विद्यन्ते किम् ?
प्रीती - आचार्ये, संस्कृतभाषेमधे शास्त्रीयग्रंथ सुद्धा आहेत का ?

अध्यापिका -  अथ किम् । प्राचीनकालेऽपि व्याकरणशास्त्रं, खगोलशास्त्रं, गणितशास्त्रं, स्थापत्यशास्त्रं वैद्यकशास्त्रमित्यादीनि नैकानि शास्त्राणि विकसितानि आसन् । भारतीयतत्वज्ञानं निखिले जगति प्रसिद्धं तत्वज्ञानमस्ति । ‘संस्कृति: संस्कृताश्रिता’ खलु । अत: भारतीयसंस्कृते: यथार्थज्ञानार्थं संस्कृतभाषाध्ययनमावश्यकमेव । 


अध्यापिका - हो ना ! प्राचीनकाळी सुद्धा व्याकरणाशास्त्र, खगोलशास्त्रं, गणितशास्त्रं, स्थापत्यशास्त्रं वैद्यकशास्त्र, इत्यादी अनेक शास्त्रे विकसित झालेली होती. भारतीय तत्वज्ञान सर्व जगात प्रसिद्ध तत्वज्ञान आहे. ‘संस्कृती ही संस्कृताश्रित असते’. म्हणून भारतीय संस्कृतीच्या यथार्थ ज्ञानासाठी संस्कृतभाषेचे अध्ययन आवश्यकच आहे.
 
स्वाध्याय
प्रश्न १ - संस्कृतभाषायां उत्तरत ।

    १) संस्कृतभाषा कीदृशी अस्ति ?
    २) संस्कृतभषाया: अध्ययनं किमर्थं कर्तव्यम् ?
    ३) का प्राचीना भाषा ?
    ४) संस्कृतभषाध्ययनेन के के लाभा: भवन्ति ?
    ५) सुभाषितानि कीदृशानि ?
    ६) प्राचीनकाले कानि शास्त्राणि विकसितानि आसन् ?
    ७) के आर्षमहाकाव्ये ?
    ८) संस्कृतभाषा कासाम् अग्रजा ?
    ९) सुभाषितानि किमर्थम् उपयुक्तानि ?
    १०) का लोकोक्ति: प्रसिद्धा ?
    ११) भारतीयसंस्कृते: यथार्थज्ञानं कथं भावति ?

प्रश्न २ रा रिक्तस्थानानि उचितेन शब्देन पूरयत ।
    १) त्वं संस्कृतभाषां ------ (पठ् वर्तमान)
    २) संस्कृतभाषा न ----- (कठिन)
    ३) -----, संस्कृतभाषा मह्यं रोचते । (कविता - संबोधन)
    ४) प्रश्न: ---- अस्ति । (शोभन)
    ५) संस्कृतभाषाया: ----- (अध्ययन) अन्यभाषाणाम् अध्ययनं --- (सुकर)
भवति ।
    ६) ---- (संस्कृतभाषा) बहूनि गेयानि ---- (सुभाषित)।
    ७) ---- अध्ययनेन उच्चारणशुद्धता लभते । (संस्कृतभाषा)
    ८) ----- (संस्कृतभाषा) विपुलं, समृद्धं ---- (साहित्य) वर्तते ।
    ९) वाल्मीकि: रामायणं --- (लिख् - वर्त.) स्म ।
    १०) अस्माकं द्वे ---- (आर्षमहाकाव्य) ।

प्रश्न ३) रिक्तस्थानानि पूरयत ।
स्था-तिष्ठ्(१ प.)
तिष्ठामि   -------   ------

 वृत्-वर्त् (१ आ.)  
------   वर्तेथे  ------

दिश् (६ उ.प.)
----   ----  दिशथ
----   दिशेथे ----

युध् (४ आ)
युध्यते  -----   ------

कुप् (४ प.)
कुप्यति -----   ------

अर्थ् (१० आ.)
-----   अर्थयावहे  ------

तड्-ताड् (१० उ.प.)
ताडयति -----   ------
-----  -----   ताडयन्ते

span style="color: blue;"> " संस्कृतभाषा न कठिना ! " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ] 
 
=======================================
 
गणपती पाठावरील स्वाध्याय व संस्कृत भाषा न कठिना या पाठावरील स्वाध्याय.

तो  ते दोघे  ते सर्व प्रथमा

त्याला त्या दोघांना त्या सर्वांना द्वितीया

त्याने त्या दोघांनी त्या सर्वांनी  तृतीया

त्याला त्या दोघांना त्या सार्वांना चतुर्थी

त्याच्यापासून त्या दोघांपासून त्या सर्वांपासून
पंचमी

त्याचे त्या दोघांचे त्या सर्वांचे  षष्ठी

त्याच्यामधे  त्या दोघांमधे  त्या सर्वांमधे सप्तमी

असेच सर्वच सर्वनामांचे अर्थ होतील. 
 
पाठ ४५ ची उत्तरे -

संस्कृत अध्ययन
पाठ ४५
संस्कृतभाषा न कठिना ।
(एष: शिक्षिकया सह बालानां संवाद:)

अध्यापिका - सुवर्णे, त्वं किं करोषि ?
अध्यापिका - सुवर्णा, तू काय करत आहेस ?

सुवर्णा - आचार्ये, अहं संस्कृतभाषां पठामि । संस्कृतभाषा कठिना अस्ति किम् ?
सुवर्णा - आचार्ये, मी संस्कृतभाषा वाचत आहे. संस्कृतभाषा कठीण आहे का ?

अध्यापिका - न हि, न हि, सा तु अतीव सरला, सुबोधा सरसा चास्ति ।
अध्यापिका - नाही, नाही, ती तर अतिशय सरळ, सुबोध व सरस आहे.

महेश: - आचार्ये, संस्कृतभाषा न अस्माकं व्यवहारभाषा, न वा विश्वभाषा । तथापि संस्कृताध्ययनं किमर्थं कर्तव्यम् ?
महेश - आचार्ये, संस्कृतभाषा आपली व्यवहाराची भाषा नाही अथवा जगाचीही भाषा नाही. मग संस्कृतचे शिक्षण कशाला घ्याय़चे ?

अध्यापिका - शोभन: प्रश्न: । महेश, संकृतभाषा अस्माकं प्राचीना भाषा । संस्कृतभाषाया: अध्ययनेन अन्यभाषाणामध्ययनं सुकरं भवति । सर्वासां भारतीयभाषाणां अग्रजा खलु संस्कृतभाषा ।
अध्यापिका - छान प्रश्न आहे. महेश, संस्कृत भाषा आपली प्राचीन भाषा आहे. संस्कृतभाषेच्या अध्ययनाने इतर भाषांचे अध्ययन करणे सोपे होते. सर्व भारतीय भाषांची खरतर संस्कृतभाषा ही मोठी बहीणच आहे.

पूजा - आचार्ये, अन्ये के के लाभा: संस्कृतभाषाध्ययनेन भवन्ति ?
पूजा - आचार्ये, संस्कृतभाषेच्या अध्ययनाने इतर कोणते फायदे होतात ?

अध्यापिका -  संस्कृतभाषायां बहूनि गेयानि मधुराणि च सुभाषितानि । तथा च वक्तृत्वकलायां निपुणतासम्पादनार्थं तानि अतीवोपयुक्तानि । उच्चारणशुद्धता अपि लभते संस्कृताध्ययनेन ।
अध्यापिका - संस्कृतभाषेत खूप गाण्याजोगी व मधुर अशी सुभाषिते आहेत. तसेच वकृत्वकलेत नैपुण्य मिळवण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहेत. संस्कृतभाषेच्या अध्ययनाने उच्चार सुद्धा शुद्ध होतात.

दीपाली - आचार्ये, ‘संस्कृतभाषायां विपुलं, समृद्धं साहित्यं वर्तते’ इति जना: वदन्ति । अपि सत्यमेतत् ?
दीपाली - आचार्ये, ‘संस्कृतभाषेत विपुल व समृद्ध साहित्य आहे असे’ लोक म्हणातात. ही गोष्ट खरी आहे का ?

अध्यापिका - आम्, बहव: कवय: स्वकाव्यै: संस्कृतभाषां भूषयन्ति । वाल्मीके: रामायणं श्रीव्यासस्य महाभारतं च अस्माकं आर्षमहाकाव्ये (स्त:)।
अध्यापिका - होय. खूप कवींनी स्वत:च्या काव्यानी संस्कृतभाषेला भूषवले आहे. वाल्मीकींचे रामायण व श्रीव्यासमहर्षींचे महाभारत ही आपली (दोन) आर्ष महाकाव्ये आहेत.

प्रीति: - आचार्ये, संस्कृतभाषायां शास्त्रीया: ग्रन्था: अपि विद्यन्ते किम् ?
प्रीती - आचार्ये, संस्कृतभाषेमधे शास्त्रीयग्रंथ सुद्धा आहेत का ?

अध्यापिका -  अथ किम् । प्राचीनकालेऽपि व्याकरणशास्त्रं, खगोलशास्त्रं, गणितशास्त्रं, स्थापत्यशास्त्रं वैद्यकशास्त्रमित्यादीनि नैकानि शास्त्राणि विकसितानि आसन् । भारतीयतत्वज्ञानं निखिले जगति प्रसिद्धं तत्वज्ञानमस्ति । ‘संस्कृति: संस्कृताश्रिता’ खलु । अत: भारतीयसंस्कृते: यथार्थज्ञानार्थं संस्कृतभाषाध्ययनमावश्यकमेव ।
अध्यापिका - हो ना ! प्राचीनकाळी सुद्धा व्याकरणाशास्त्र, खगोलशास्त्रं, गणितशास्त्रं, स्थापत्यशास्त्रं वैद्यकशास्त्र, इत्यादी अनेक शास्त्रे विकसित झालेली होती. भारतीय तत्वज्ञान सर्व जगात प्रसिद्ध तत्वज्ञान आहे. ‘संस्कृती ही संस्कृताश्रित असते’. म्हणून भारतीय संस्कृतीच्या यथार्थ ज्ञानासाठी संस्कृतभाषेचे अध्ययन आवश्यकच आहे.
 
स्वाध्याय
प्रश्न १ - संस्कृतभाषायां उत्तरत ।

१) संस्कृतभाषा कीदृशी अस्ति ?
उत्तर - संस्कृतभाषा अतीव सरला, सुबोधा सरसा च अस्ति ।

२) संस्कृतभषाया: अध्ययनं किमर्थं कर्तव्यम् ?
उत्तर - संकृतभाषा अस्माकं प्राचीना भाषा । संस्कृतभाषाया: अध्ययनेन अन्यभाषाणामध्ययनं सुकरं भवति । अत: संस्कृतभाषाया: अध्ययनं कर्तव्यम् ।

३) का प्राचीना भाषा ?
उत्तर - संकृतभाषा अस्माकं प्राचीना भाषा ।

४) संस्कृतभषाध्ययनेन के के लाभा: भवन्ति ?
उत्तर - संस्कृतभाषायां बहूनि गेयानि मधुराणि च सुभाषितानि । तथा च वक्तृत्वकलायां निपुणतासम्पादनार्थं तानि अतीवोपयुक्तानि । उच्चारणशुद्धता अपि लभते संस्कृताध्ययनेन ।
 
५) सुभाषितानि कीदृशानि ?
उत्तर - सुभाषितानि गेयानि मधुराणि च ।

६) प्राचीनकाले कानि शास्त्राणि विकसितानि आसन् ?
उत्तर - प्राचीनकालेऽपि व्याकरणशास्त्रं, खगोलशास्त्रं, गणितशास्त्रं, स्थापत्यशास्त्रं वैद्यकशास्त्रमित्यादीनि नैकानि शास्त्राणि विकसितानि आसन् ।

७) के आर्षमहाकाव्ये ?
उत्तर - वाल्मीके: रामायणं श्रीव्यासस्य महाभारतं च अस्माकं आर्षमहाकाव्ये

८) संस्कृतभाषा कासाम् अग्रजा ?
उत्तर - संस्कृतभाषा सर्वासां भारतीयभाषाणां अग्रजा ।


९) सुभाषितानि किमर्थम् उपयुक्तानि ?
उत्तर - सुभाषितानि वक्तृत्वकलायां निपुणतासम्पादनार्थं तानि अतीवोपयुक्तानि ।

१०) का लोकोक्ति: प्रसिद्धा ?
उत्तर - ‘संस्कृति: संस्कृताश्रिता’ इति लोकोक्ति: प्रसिद्धा ।

११) भारतीयसंस्कृते: यथार्थज्ञानं कथं भवति ?
उत्तर - संस्कृतभाषाध्ययनेन भारतीयसंस्कृते: यथार्थज्ञानं भवति ।

प्रश्न २ रा रिक्तस्थानानि उचितेन शब्देन पूरयत ।

१) त्वं संस्कृतभाषां पठसि (पठ् वर्तमान)
२) संस्कृतभाषा न कठिना (कठिन)
३) कविते, संस्कृतभाषा मह्यं रोचते । (कविता - संबोधन)
४) प्रश्न: शोभन: अस्ति । (शोभन)
५) संस्कृतभाषाया: अध्ययनेन (अध्ययन) अन्यभाषाणाम् अध्ययनं सुकरं (सुकर)
भवति ।
६) संस्कृतभाषायां (संस्कृतभाषा) बहूनि गेयानि सुभाषितानि (सुभाषित)।
७) संस्कृतभाषाया: अध्ययनेन उच्चारणशुद्धता लभते । (संस्कृतभाषा)
८) संस्कृतभाषायां (संस्कृतभाषा) विपुलं, समृद्धं साहित्यं (साहित्य) वर्तते ।
९) वाल्मीकि: रामायणं लिखति (लिख् - वर्त.) स्म ।
१०) अस्माकं द्वे आर्षमहाकाव्ये (आर्षमहाकाव्य) ।

प्रश्न ३) रिक्तस्थानानि पूरयत ।
स्था-तिष्ठ्(१ प.)
तिष्ठामि   तिष्ठाव:   तिष्ठाम:

 वृत्-वर्त् (१ आ.)   
वर्तसे   वर्तेथे  वर्तध्वे

दिश् (६ उ.प.)
दिशसि   दिशथ:  दिशथ
दिशसे   दिशेथे   दिशध्वे

युध् (४ आ)
युध्यते   युध्येते   युध्यन्ते

कुप् (४ प.)
कुप्यति कुप्यत:   कुप्यन्ति

अर्थ् (१० आ.)
अर्थेये   अर्थयावहे  अर्थयामहे

तड्-ताड् (१० उ.प.)
ताडयति ताडयत: ताडयन्ति
ताडयते  ताडयेते   ताडयन्ते


  

Monday, August 17, 2020

पाठ ४४ वा सुभाषित सप्तमी विभक्ती,


१) शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे । 

साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ॥४-१५॥

संधिविग्रह - साधव: + न

अन्वय - शैले शैले न माणिक्यं (अस्ति) । 

गजे गजे  मौक्तिकं न (अस्ति) । 

वने वने चन्दनं न (अस्ति) । 

हि साधव: सर्वत्र न (सन्ति) ।

अर्थ - प्रत्येक पर्वतावर रत्न सापडत नाहीत, प्रत्येक हत्तीच्या मस्तकावर मोती नसतो, प्रत्येक वनात चंदनवृक्ष नसतात त्याप्रमाणे सज्जन लोक सुद्धा सर्वत्र नसतात.

२)  व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणाङ्गणे भवति । 

विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षा च दुर्भिक्षे ॥७४-१॥

 

अन्वय - व्यसने मित्रपरीक्षा (भवति) । 

शूरपरीक्षा रणाङ्गणे भवति । 

विनये भृत्यपरीक्षा (भवति) । 

दानपरीक्षा च दुर्भिक्षे (भवति) ।

अर्थ - संकटसमयी मित्राची परीक्षा होते. शूर मनुष्याची परीक्षा रणांगणात होते. विनयामधे सेवकाची परीक्षा होते तर दुष्काळामधे दानाची परीक्षा होते.


३) पदे पदे च रत्नानि योजने रसकूपिका । 

भाग्यहीना न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा ॥७४-९४॥

संधिविग्रह - भाग्यहीना: न

अन्वय - पदे पदे च रत्नानि (सन्ति) योजने रसकूपिका  (अस्ति) । 

भाग्यहीना: न पश्यन्ति बहुरत्ना वसुन्धरा

अर्थ - पावलापवलावर रत्ने व एक योजन अंतरावर पाण्याने भरलेली विहिर असते, पण दुर्दैवी लोक ते पहात नाहीत. पृथ्वी अनेक मौल्यवान रत्नांनी परिपूर्ण आहे. (फक्त पहाणार्‍याची दृष्टी हवी)


४) शुन: पुच्छमिव व्यर्थं जीवितं विद्यया विना । 

न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे ॥३-४॥

संधिविग्रह - पुच्छम् + इव

अन्वय - (शुन: पुच्छम्) न गुह्यगोपने शक्तं न च दंशनिवारणे शुन: पुच्छम् इव विद्यया विना जीवितं व्यर्थं ।

अर्थ - (कुत्र्याचे शेपूट) गुह्यांग झाकू शकत नाही व दंश करणार्‍या माशांचे निवारणही करू शकत नाही्. त्यामुळे कुत्र्याचे शेपूट जसे व्यर्थ आहे त्याप्रमाणे विद्येशिवाय जीवन व्यर्थ आहे.

५) शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पण्डित: । 

वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ॥३४॥

अन्वय - शूर: शतेषु जायते । सहस्रेषु च पण्डित: (जायते) । 

वक्ता दशसहस्रेषु (जायते) । दाता भवति वा न वा (भवति)
 
अर्थ - शंभरामधे एखादा मनुष्य शूर असतो हजारात एखादा पंडित असतो. दहा हजारात एखादा वक्ता असतो. दानी दानी मात्र होईल किंवा न होईल.

span style="color: blue;"> " सुभाषित सप्तमी विभक्ती, " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

Sunday, August 16, 2020

पाठ ४३ वा - सप्तमी विभक्ती,

४३) पाठ सप्तमी विभक्ती, 

आज आपण सप्तमी विभक्ती वाक्यात केव्हा योजायची असते ते पहाणार आहोत.

    वाक्यात अधिकरण कारकाची सप्तमी विभक्ती वापरली जाते. क्रियेच्या आधाराला अधिकरणकारक असे म्हणतात. हा क्रियेचा आधार कर्त्याकडून वा कर्माकडूनही असू शकतो. उदा. आई स्वयंपाकगृहात पातेल्यात भात शिजवते. इथे ‘आई भात शिजवते’ हे कर्ता, कर्म व क्रियापदाने युक्त असे मूळ वाक्य झाले. वरील वाक्यातील स्वयंपाकगृह हा क्रिया करण्याचा आईचा आधार झाला व पातेले हा भात जे कर्म त्याचा आधार झाला.
माता स्वयंपाकगृहे स्थाल्यां  ओदनं पचति ।

    थोडक्यात स्थानवाचक शब्द व कालवाचक शब्द सप्तमी विभक्तीत योजावयाचे असतात. त, मध्ये वर हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत.

तसेच युक्त, तत्पर, व्यापृत, कुशल, निपुण, पटु वगैरे शब्दांबरोबर सुद्धा सप्तमीचा वापर होतो.

आज त्याव्यतिरिक्त आपण सहाव्या गणाचे व दहाव्या गणाचे धातू पहाणार आहोत. सहाव्या गणाच्या धातूचे ‘अ’ हेच विकरण आहे. त्यामुळे सहाव्या गणाचे धातू हे पहिल्यागणासारखेच दिसतात. त्यामुळे त्या धातूचा गण लक्षातच ठेवावा लागतो.

दहाव्या गणाचे अय हे विकरण आहे. दहाव्या गणाच्या धातूत हे विकरण मिसळून धातूचे अंग बववून घ्याय़चे व नंतर त्याला कालार्थ प्रत्यय लावायचे. हा धातू उभयपदी असल्यामुळे त्याची दोन्ही प्रकारची रूपे होतील.

उदा. कथ् (१० उ. प.) = सांगणे
कथ् + अय = कथय हे झाले धातूचे अंग.

परस्मैपदी रूपे
कथयामि  कथयाव:  कथयाम:  प्र. पु.
कथयसि  कथयथ:  कथयथ  द्वि. पु.
कथयति  कथयत:  कथयन्ति  तृ. पु.

आत्मनेपदी रूपे
कथये  कथयावहे  कथयामहे  प्र. पु.
कथयसे  कथयेथे  कथयध्वे  द्वि. पु.
कथयते  कथयेते  कथयन्ते  तृ. पु.

आता आपण एकत्रित ह्या चारही गणातील धातू पाहू.
हृ-हर् (१ उ. प.) = हरण करणे =
हरति, हरते

नह् (४ उ. प.) = बांधणे, धारण करणे
नह्यति, नह्यते

क्षिप् (६ उ. प.) = फेकणे
क्षिपति, क्षिपते

पूज् (१० उ. प.) = पूजा करणे
पूजयति, पूजयते 


आता 'श्रीगणेशः' हा चित्रपाठ पाहूया. 

 

 

 


span style="color: blue;"> " सप्तमी विभक्ती, " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ] 
 
स्वाध्याय ४३ -
प्रश्न १  संस्कृतभाषायाम् उत्तरत ।
१) गणेशस्य कानि अन्यानि नामधेयानि ?
उत्तर - गणेशस्य गजानन:, लम्बोदर:, विघ्नहर्ता, सुखकर्ता, गणनायक:, गणाधिपति:, व्रक्रतुण्ड: एतानि अन्यानि नामधेयानि ।

२) गणेशस्य मस्तके किम् अस्ति ?
उत्तर - श्रीगणेशस्य मस्तके मुकुटं विराजते ।

३) गणेशस्य का माता ?
उत्तर - पार्वती गणेशस्य माता

४) गणेशस्य क: पिता ?
उत्तर - शङ्कर: गणेशस्य पिता

५) गणेशस्य क: बन्धु: ?
उत्तर - स्कन्द: गणेशस्य बन्धु: ।

६) गणेशाय किं रोचते ?
उत्तर - गणेशाय मोदक: रोचते ।

७) श्रीव्यास: महाभारतं कस्मै कथयति ?
उत्तर - श्रीव्यास: गणेशाय महाभारतं कथयति

८) विद्याया: कं देव: ?
उत्तर - श्रीगणेश: विद्याया: देव: ।

९) बाला: कं नमन्ति ?
उत्तर - बाला: विद्यारम्भे गणेशं नमन्ति

१०) बाल: गणपतिं कथं पूजयति ?
उत्तर - बाल: गणपतिं पुष्पै: पूजयति ।

प्रश्न २ - उचितेन रूपेण रिक्तस्थानानि पूरयत ।
१) गजाननस्य शङ्कर: जनक: । ( गजानन)
२) षडानन: गणेशस्य बन्धु: । (गणेश)
३) व्रक्रतुण्ड: इति लम्बोदरस्य सार्थं नामधेयम् । (लम्बोदर, नामधेय)
४) गजाननस्य उदरं विशालम् । (गजानन, विशाल)
५) लम्बोदराय मोदका: रोचन्ते । (लम्बोदर)

प्रश्न ३ निर्देशानुसारं धातूनाम् उचितं रूपं लिखत ।
१) दा-यच्छ् (१ प. प.) - प्रथम पुरुष
यच्छामि  यच्छाव: यच्छाम:

२) तड्-ताड् (१० आ. प.) तृतीय पुरुष
ताडयते ताडयेते ताडयन्ते

३) नृत् (४ प. प.) तृतीय पुरुष
नृत्यति नृत्यत: नृत्यन्ति

४) याच् (१ आ. प.) - द्वितीय पुरुष
याचसे  याचेथे  याचध्वे

५) जन्-जा (४ आ. प.) प्रथम पुरुष
जाये जायावहे जायामहे

६) लिख् ( ६ प. प.) द्वितीय. पुरुष
लिखसि लिखथ: लिखथ

७) मन्त्र् (१० आ. प.) प्रथम पुरुष
मन्त्रये मन्त्रयावहे मन्त्रयामहे

८) मृ-म्रिय् (६ आ. प.) तृतीय पुरुष.
म्रियते म्रियेते म्रियन्ते 
 

  

Thursday, August 13, 2020

पाठ ४२A दृश्यकाव्य व भारतीय नाट्यशास्त्राची परंपरा

८) दृश्यकाव्य व भारतीय नाट्यशास्त्राची परंपरा  

    प्राणिजगतात मनुष्य सर्वाधिक संवेदनाशील मनुष्य आहे. पावलोपावली त्याला सुख-दु:ख, हर्ष-शोक यांची अनुभूती येत असते. त्यामुळे मानवाच्या मनात भाव व विचारांचे तरंग सतत उठत असतात. जेव्हा भावनांचा आवेग तीव्र होतो तेव्हा त्या विचारांची अभिव्यक्ती होते. आणि त्या अभिव्यक्तीचे माध्यम असते वाणी. अनुभूती व अभिव्यक्ती यांचा जेव्हा मणिकांचनसंयोग होतो तेव्हा वाणी आपला चमत्कार दाखवते व त्यातून काव्य निर्माण होते. तसेच तात्विक चर्चा करण्याच्या हेतूने शास्त्रग्रंथ निर्माण होतात. देश, काल व सामाजिक स्थितीत होणारी परिवर्तने यामुळे शास्त्र प्राचीन होत जाते. परंतु काव्य नेहेमी नित्य-नूतन व रमणीय असते. शास्त्र व काव्य यात अशा प्रकारचा फरक असला तरी काव्य हे शास्त्रविरोधी नसते. उलट हितोपकारक व कांतासंमित उपदेश देणारे असल्यामुळे शास्त्रातील शाश्वत सिद्धांतांचे अनुकरण करणारेच असते. दु:खांनी होरपळ्यानंतर त्या दु:खापासून दूर नेऊन काही काळ अलौकिक आनंदात रमवण्याची क्षमता काव्यात असते. जेथे चंद्रसूर्यांचा प्रकाशच पोचत नाही अशा मानवी हृदयाच्या आंतरिक क्षेत्राला प्रकाशित करण्याचे सामर्थ्य काव्यात असते.

(श्रव्य काव्याचा आनंद श्रवणेंद्रियांनी घेता येतो. ही काव्ये श्रवणीय व पठनीय असतात. यात शब्दांच्या द्वारा कल्पनेच्या सहाय्याने मानसिक चित्रे प्रस्तुत केलेली असतात. दृश्य काव्यात कवीने रंगवलेली मानसिक चित्रे डोळ्यांनी पाहून त्यांचे सौंदर्य व आनंद उपभोगता येतो. यात श्रवणेंद्रियांची आवश्यकता असली तरी नेत्रेंद्रियांचे प्राधान्य असते. श्रव्य काव्यापेक्षा दृश्य काव्याचा मनावर ठसा अधिक सखोल असतो. एखादी गोष्ट ऐकण्यापेक्षा ती पहाणे हे जास्त आनंददायक असते. )

संस्कृत साहित्यातील वाङ्मय प्रकार यामधे आपण श्रव्य काव्याविषयी माहिती घेतली होती. आता काव्याचा जो दुसरा प्रकार दृश्य काव्य त्याची माहिती आज करून घ्यायची आहे.

दृश्यकाव्य म्हणजे संस्कृतच्या संदर्भात नाटक. कारण ज्यावेळी संस्कृत भाषा आपल्या परम उत्कर्षावस्थेत होती, त्यावेळी चित्रपटाचा शोध लागलेला नव्हता. तेव्हा दृश्य काव्याचा आस्वाद नाटकामधूनच घेतला जात असे. वामन काव्यालंकारसूत्रात म्हटले आहे की ‘सन्दर्भेषु दशरूपकं श्रेय: । तद्धि चित्रं चित्रपटवत् विशेषसाकल्यात् ।’ चित्र ज्याप्रमाणे भिन्न भिन्न रंगांच्या मिश्रणाने सहृदय दर्शकाला आनंदित करते त्याप्रमाणे नाटक सुद्धा नट, वेशभूषा, नेपथ्य वगैरे अनेक अंगांनी दर्शकावर प्रभाव टाकते. काव्यापेक्षा नाटक श्रेष्ठ असण्याचे आणखीही एक कारण आहे. काव्याचा आस्वाद घेण्यास कवित्वमय वातावरणाची अपेक्षा असते. सर्वच वाचक असे वातावरण निर्माण करू शकत नाहीत. कारण ही वातावरण-निर्मिती कल्पनेतून निर्माण होते. अशी कल्पनाशक्ती सर्वांजवळच असते असे नाही. परंतु अशा रसानुभूतिसाठी नाटकात कवित्वमय वतावरण सहजच उपस्थित असते. ते वातावरण कल्पनेतून निर्माण करावे लागत नाही. त्यामुळे सर्वसामान्य दर्शक सुद्धा नाटकामुळे अधिक प्रभावित होतो. म्हणून ‘नाटकान्तं कवित्वम्’ नाटक हे कवित्वाची अखेरची सीमा आहे.

भारतीय नाटकाची उत्पत्ती केव्हा झाली असावी याविषयी पाश्चात्यांनी अनेक मते लढवली आहे.
 
    डॉ. रिजवे या ग्रीक तत्वज्ञाच्या मते भारतात नाटकाची उत्पत्ती वीरपूजेमधून झाली आहे. दिवंगत वीरपुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे सामूहिक समारंभ आयोजित केले जात असत त्यातून भारतीय नाटकाचा जन्म झाला असावा. कारण ग्रीक नाटकांची उत्पत्ती अशाप्रकारे झाली आहे. पण हे मत इतर पाश्चिमात्त्यांना सुद्धा मान्य नाही.
    भारतीय नाटकात सूत्रधार महत्वाचा आहे. या शब्दातील सूत्र म्हणजे दोरी. कठपुतळ्यांचा खेळ पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर होत असे. तेव्हा भारतीय नाटकांचा उगम (पपेट शो) मधून म्हणजे या कठपुतळ्यांच्या खेळात आहे, असे जर्मन विद्वान डॉ. पिशेल मानतात
    काही पाश्चात्य विद्वान छायानाटकातून नाटकाची उत्पत्ती मानतात तर काही भारतीय नाट्यकलेवर ग्रीक नाट्यकलेचा प्रभाव मानतात.

वास्तविक पहाता संस्कृत नाटकांचा उगम वेदामधेच दिसून येतो. ऋग्वेदामधे अनेक संवादसूक्ते आहेत. त्यात नाटकीय अंश दिसून येतात. पुरुरवा-उर्वशी, यम-यमी, इंद्र-इंद्राणी-वृषाकपी, सरमा-पणी या ऋग्वेदातील संवादसूक्तात नाटकाची बीजे आहेत. तर यज्ञप्रसंगी सोमरस काढण्याच्या वेळी सांअगायन केले जात असे. त्यामुळे संगीत शास्त्राचा उगम सामवेदात आहे. तेव्हा वैदिक युगामधेच संगीत व नाटक यांचा विकास होऊ लागला होता असे दिसून येते. कारण नाट्याच्या विकासासाठी लागणार्‍या संवाद, नृत्य, गीत, वाद्य इ. आवश्यक गोष्टी वैदिक युगात भरपूर प्रमाणात होत्या.

    रामायण व महाभारत या दोन आर्ष महाकाव्यात नाटकाचे काही स्पष्ट उल्लेख मिळतात. रामायणात अयोध्यावर्णनात वाल्मीकींनी तेथे असलेल्या नाटकमंडळींचा उल्लेख केला आहे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी नट, नर्तक व गायकांची उपस्थिती व आपल्या कलेने त्यांनी लोकांना आनंदित केल्याचे वर्णन आढळते. वाल्मीकी म्हणतात की ज्या देशात राजा नाही, त्या देशातील नट व नर्तक लोक प्रसन्न दिसून येत नाहीत. महाभारताच्या विराटपर्वात रंगशाळा, नट, नर्तक यांचे उल्लेख आहेत. बुद्धांनी आपल्या अनुशासनात नाट्याभिनय न करण्याची आज्ञा केली आहे. पाणिनीने आपल्या अष्टाध्यायीत शिलाली व कृशाश्व ज्यांनी नाटकावर सूत्रग्रंथ लिहिले त्यांचा उल्लेख केला आहे. पतंजलीने महाभाष्यात कंसवध व वालिवध या दोन नाटकांचा उल्लेख केला आहे. हरिवंशात रामायणकथा अभिनीत केल्याचा उल्लेख आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात नाटक व नटांचा उल्लेख आहे. अग्निपुराण, विष्णुपुराण यामधे सुद्धा नाटकासंबंधी पर्याप्त उल्लेख आहेत.

    मौर्य साम्राज्य स्थापन करणार्‍या आर्य चाणक्याने ‘अर्थशास्त्र’ हा राज्यशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ लिहीला. त्यात गणिका, दासी, अभिनेत्री, गायिका इत्यादींसाठी चित्रकला, वीणावादन, वेणुवादन, मृदंगवादन वगैरे ६४ कलांचे शिक्षण देण्यासाठी राजाने सुयोग्य आचार्यांचा प्रबंध केला पाहिजे असे म्हटले आहे. अर्थशास्त्रावरून कळून येते की त्यावेळी नट, नर्तक, गायक, वादक, कुशीलव, डोंबारी, इंद्रजालविद्या जाणणारे, नाटक, गायन वगैरे कलांवर आपली उपजीविका करत असत.
    आर्य चाणक्य हा चंद्रगुप्ताचा मंत्री. त्याचा काळ इ. स. पूर्व ४ त्ये शतक हा आहे.
    या सर्व उल्लेखांवरून संस्कृत नाटकांची प्राचीनता सिद्ध होते. नटांच्या शिक्षणासाठी ग्रंथ लिहिले जात असत. नाट्यकला ही आपली संपत्ती आहे. दुसर्‍या देशाकडून उधार घेतलेले धन नाही, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.

संस्कृत नाटकांचे प्राचीनत्व -
    भारतात संस्कृत नाटकांची एक विशिष्ट परंपरा आहे.
संस्कृत साहित्यात नाटकांची उत्पत्ती फार प्राचीन काळातच झालेली असली पाहिजे. कारण संस्कृत साहित्यातील प्रसिद्ध नाटककार भास हा इ. स. पूर्व दुसरे ते चौथ्या शतकाच्या सुमारास होऊन गेला. व कालिदासाचा काळ हा इ. स. पूर्व १ ले शतक ते इ. स. चे ४ थे शतक मानला जातो. ज्ञात इतिहासात भास हाच प्रथम संस्कृत नाटककार आहे. त्याची १३ नाटके प्रसिद्ध आहेत. भास व कालिदासाच्या काळात संस्कृत नाटक यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते. यावरून संस्कृत नाटकांचा उगम किती प्राचीन आहे याची कल्पना करता येते.

span style="color: blue;"> " दृश्यकाव्य व भारतीय नाट्यशास्त्राची परंपरा " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...