पाठ ६७ वा - पूर्वकालवाचक अव्यये भाग ३ ल्यबन्त अव्यये
पूर्वकालवाचक अव्ययांचा प्रकार दुसरा ल्यबन्त अव्यये
ज्यावेळी धातूला उपसर्ग लागलेला असतो त्यावेळी त्या धातूला ‘ल्यप्’ म्हणजे प्रत्यक्षात ‘य’ हा प्रत्यय लागतो. तेव्हा त्वा प्रत्यय लागत नाही. ल्यप् प्रत्ययाने ही अव्यये अंत पावत असल्यामुळे ह्या अव्ययांना ल्यबन्त अव्यये असे म्हणतात.
ल्यबन्त अव्ययांसंबंधी नियम
१) धातू जर उपसर्गसहित असेल तर त्यांना त्वा प्रत्यय न लागता य प्रत्यय जोडून ही अव्यये तयार होतात.
उदा.
सम् + भू = संभूय
अनु + इष् = अन्विष्य
वि + ईक्ष् = वीक्ष्य
सम् + ईक्ष् = समीक्ष्य
प्र + काश् = प्रकाश्य
उद् + डी = उड्डीय
सम् + तप् = सन्तप्य
अव + लम्ब् = अवलम्ब्य
वि + रम् = विरम्य
२) धातू उपसर्गसहित असून तो जर ह्रस्व स्वरान्त असेल तर ‘य्’ प्रत्यय लागण्य़ापूर्वी ‘त्’ हा आगम होतो व ‘त्य’ हा प्रत्यय लागतो.
उदा.
वि + जि = विजित्य
वि + धृ = विधृत्य
अनु + सृ = अनुसृत्य
वि + स्मि = विस्मित्य
प्र + हृ = प्रहृत्य
ल्यबन्त अव्यये -
उदा.
गम् = गत्वा. अव + गम् = अवगम्य
नम् = नत्वा. प्र + नम् = प्रणम्य
क्रन्द् = क्रन्दित्वा. आ + क्रन्द् = आक्रन्द्य
तृ-तर् = तीर्त्वा. अव + तृ-तर् = अवतीर्य
‘य’ प्रत्यय लागण्यापूर्वी धातूचे अंग ह्रस्व स्वराने युक्त असेल तर अंत्य स्वराला ‘त’ हा आगम होतो.
उदा. वि + जि येथे ‘जि’ हा धातू ह्रस्व स्वरान्त आहे. त्यामुळे ‘य’ प्रत्यय लागण्यापूर्वी ‘त’ हा आगम होऊन त्य हा प्रत्यय लागेल.
वि + जि = विजित्य
परंतु दा हा धातू दीर्घ स्वराने युक्त असल्यामुळे प्र + दा या धातूचे ल्यबन्त अव्यय प्रदाय असेच होईल.
खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) राजा सभेला उद्देशून म्हणतो. (उद् + दिश्)
२) माकड झाडावर चढून बसते. (आ + रुह्)
३) घोड्यावरून उतरून सेनापती पाणी आणतो. (अव + तृ-तर्)
४) चित्र पाहून मुले खूष होतात. (वी + ईक्ष्)
५) वसिष्ठ दशरथाला पाहून म्हणतात. (अव + लोक्)
६) हरि दोष टाकून गुण घेतो. (परि + त्यज्)
७) विद्यार्थी शास्त्र शिकून पंडित होतात. (प्र + पठ्)
८) शाळेत येऊन समीर शिक्षकांना म्हणतो. (आ + गम्)
९) गणपतीला नमस्कार करून तो प्रार्थना करतो. (प्र + नम्)
१०) धन चोरून चोर पळून जातात. (प्र + हृ)
११) ज्ञान मिळवून तो घरी येतो. (अधि + गम्)
१२) राजा संतुष्ट होऊन सेनापतीला धन देतो. (सम् + तुष्)
१३) मुलाला बोलावून आई बोलते. (आ + ह्वे)
१४) माशी उडून जाते. (उद् + डी-डय्)
१५) परीक्षा उत्तीर्ण होऊन ती बक्षिस मिळवते. (उद् + तृ-तर्)
१६) मोठ्या लोकांचे अनुसरण करून सामान्य लोक चालतात. (अनु + सृ-सर्)
१७) पाणी शोधून भीम परत येतो. (अनु + इष्)
१८) दुसर्याचे दु:ख ऐकून सज्जन दु:खी होतात.
१९) ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करून मानवांना म्हणतो. (निर् + मा)
२०) स्वत:चे रूप आरशात पाहून अंजली आनंदित होते. (प्र + दृश्)
पूर्वकालवाचक अव्यय लिहा (ल्यबन्त) =
वि + ईक्ष्, आ + काङ्क्ष्, प्र + काश्, सम् + कुप्, आ + कृष्, सम् + क्लृप्-कल्प्, प्र + क्षिप्, प्र + क्षुभ्, उद् + खन्, आ + गम्, अव + गाह्, प्र + गै, वि + घ्रा, आ + लोक्, आ + कर्ण्, प्र + आप्, वि + सृज्, सम् + त्यज्, निर् + ईक्ष्, वि + मुच्, वि + श्रम्, उद् + धृ, अनु + ज्ञा,
====================================
६७) पूर्वकालवाचक अव्यये भाग ३ ल्यबन्त अव्यये - उत्तरे
खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) राजा सभेला उद्देशून म्हणतो. (उद् + दिश्)
महीपाल: सभाम् उद्दिश्य वदति ।
२) माकड झाडावर चढून बसते. (आ + रुह्)
वानर: वृक्षम् आरुह्य उपविशति ।
३) घोड्यावरून उतरून सेनापती पाणी आणतो. (अव + तृ-तर्)
अश्वात् अवतीर्य सेनापति: जलम् आनयति ।
४) चित्र पाहून मुले खूष होतात. (वी + ईक्ष्)
चित्रं वीक्ष्य बालका: आनन्दन्ति ।
५) वसिष्ठ दशरथाला पाहून म्हणतात. (अव + लोक्)
वसिष्ठ: दशरथम् अवलोक्य भाषते ।
६) हरि दोष टाकून गुण घेतो. (परि + त्यज्)
हरि: दोषन् परित्यज्य गुणान् गृह्णाति ।
७) विद्यार्थी शास्त्र शिकून पंडित होतात. (प्र + पठ्)
छात्रा: शास्त्रं प्रपठ्य पण्डिता: भावन्ति ।
८) शाळेत येऊन समीर शिक्षकांना म्हणतो. (आ + गम्)
समीर: शालाम् आगत्य शिक्षकं गदति ।
९) गणपतीला नमस्कार करून तो प्रार्थना करतो. (प्र + नम्)
गणेशं प्रणम्य स: प्रार्थयते ।
१०) धन चोरून चोर पळून जातात. (प्र + हृ) धनं प्रहृत्य चौरा: पलायन्ते ।
११) ज्ञान मिळवून तो घरी येतो. (अधि + गम्)
ज्ञानम् अधिगत्य स: गृह्म् आगच्छति ।
१२) राजा संतुष्ट होऊन सेनापतीला धन देतो. (सम् + तुष्)
भूपाल: स्न्तुष्य सेनापतये धनं यच्छति ।
१३) मुलाला बोलावून आई बोलते. (आ + ह्वे)
पुत्रम् आहूय जननी वदति ।
१४) माशी उडून जाते. (उद् + डी-डय्)
मक्षिका उड्डीय गच्छति ।
१५) परीक्षा उत्तीर्ण होऊन ती बक्षिस मिळवते. (उद् + तृ-तर्)
परीक्षाम् उत्तीर्य सा पारितोषिकं लभते ।
१६) मोठ्या लोकांचे अनुसरण करून सामान्य लोक चालतात. (अनु + सृ-सर्)
सामान्या: जना: महाजनान् अनुसृत्य चलन्ति ।
१७) पाणी शोधून भीम परत येतो. (अनु + इष्)
जलम् अन्विष्य भीम: प्रत्यागच्छति ।
१८) दुसर्याचे दु:ख ऐकून सज्जन दु:खी होतात. (आ + कर्ण्)
परदु:खं आकर्ण्य सज्जना: दु:खिता: भावन्ति ।
१९) ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करून मानवांना म्हणतो. (निर् + मा)
ब्रह्मदेव: सृष्टिं निर्माय मानवान् वदति ।
२०) स्वत:चे रूप आरशात पाहून अंजली आनंदित होते. (प्र + दृश्)
स्वरूपं दर्पणे प्रदृश्य अञ्जलि: मोदते ।
पूर्वकालवाचक अव्यय लिहा (ल्यबन्त) =
वि + ईक्ष् - वीक्ष्य
आ + काङ्क्ष् - आकाङ्क्ष्य
प्र + काश् - प्रकाश्य
सम् + कुप् - सङ्कुप्य
आ + कृष् - आकृष्य
सम् + क्लृप्-कल्प् - सङ्कल्प्य
प्र + क्षिप् - प्रक्षिप्य
प्र + क्षुभ् - प्रक्षुभ्य
उद् + खन् -उत्खन्य
आ + गम् - आगम्य, आगत्य
अव + गाह् - अवगाह्य
प्र + गै - प्रगाय
वि + घ्रा - विघ्राय
आ + लोक् -आलोक्य
आ + कर्ण् - आकर्ण्य
प्र + आप् - प्राप्य
वि + सृज् - विसृज्य
सम् + त्यज् - सन्त्यज्य
निर् + ईक्ष् - निरीक्ष्य
वि + मुच् - विमुच्य
वि + श्रम् - विश्रम्य
उद् + धृ - उद्धृत्य
" पाठ ६७ वा - पूर्वकालवाचक अव्यये भाग ३ ल्यबन्त अव्यये " या Audio साठी खाली क्लिक् करा :
अनु + ज्ञा - अनुज्ञाय
No comments:
Post a Comment