आजचा स्वाध्याय - आत्मनेपदी धातूंची रूपे
आत्मनेपदी धातूंची खालीलप्रमाणे रूपे होतात.
गाहे गाहावहे गाहामहे प्रथम पुरुष
गाहसे गाहेथे गाहध्वे द्वितीय पुरुष
गाहते गाहेते गाहन्ते तृतीय पुरुष
प्रथम गणातील आत्मनेपदी धातू
स्पर्ध् - स्पर्धते = स्पर्धा करणे , बाध् - बाधते = पीडा देणे, वन्द् - वन्दते = नमस्कार करणे, मुद्-मोद् - मोदते = आनंदणे, स्वद् - स्वदते = चव घेणे, कूर्द् - कूर्दते = उडी मारणे, स्वाद् - स्वादते = स्वाद घेणे, कत्थ् - कत्थते = वल्गना करणे, लोक् - लोकते = पहाणे, शङ्क् - शङ्कते = शंका घेणे, वेष्ट् - वेष्टते = गुंडाळणे, चेष्ट् - चेष्टते = प्रयत्न करणे, हिण्ड् - हिण्डते = फिरणे, वेप् - वेपते = थर थर कापणे, कम्प् - कम्पते = कापणे, थरथरणे, त्रप् - त्रपते = लाजणे, जृम्भ् - जृम्भते = जांभई देणे, क्षम् - क्षमते = क्षमा करणे, कम् - कामयतेइच्छा करणे, दय् - दयते = दया करणे, शिक्ष् - शिक्षते = शिकणे, भिक्ष् - भिक्षते = भिक्षा मागणे, ईक्ष् - ईक्षते = पहाणे, भाष् - भाषते = भाषण करणे, भास् - भासते = आभास होणे, ग्रस् - ग्रसते = ग्रासणे, ईह् - ईहते = इच्छा करणे, गर्ह् - गर्हते = निंदा करणे, प्र + काश् - प्रकाशते = प्रकाशणे अव + गाह् - अवगाहते = डुंबणे, बुडणे, द्युत्-द्योत् - द्योतते चकाकणे, = रुच्- रोच् - रोचते = आवडणे, शुभ्-शोभ् - शोभते = शोभणे, स्रंस् - स्रंसते = गळणे, वृत्-वर्त् - वर्तते = असणे, वृध्-वर्ध - वर्धते = वाढणे. डी-डय् = उडणे, परि + त्रै-त्राय् = रक्षण करणे, प्रथ् - प्रथते = प्रसिद्ध होणे
आत्मनेपदी धातू वापरून खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा. (प्रथमा विभक्ती)
१) दुर्जन पीडा देतो. २) मी नमस्कार करतो. ३) तुम्ही सर्व आनंदित होता. ४) अनुराधा चव घेते. ५) माखडे उड्या मारतात. ६) मधुरा पहाते. ७) मी शंका घेतो. ८) मुले प्रयत्न करतात. ९) मुलगा फिरतो. १०) अर्जुन थरथर काफतो. ११) पाने कंप पावतात. १२) तुम्ही दोघे जांभया देता. १३) परमेश्वर क्षमा करतो. १४) सज्जन दया करतात. १५) मी शिकतो
क्रियापदाचे योग्य ते वर्तमानकाळी रूप वापरा.
१) याचका: ---- (भिक्ष्)
२) यूयम् ---- (ईक्ष्)
३) वयं ---- (भाष्)
४) सङ्कटानि ---- (ग्रस्)
५) अहम् --- (ईह्)
६) राहु: --- (ग्रसते)
७) दुर्जना: ---- (गर्ह्)
८) सूर्य: --- (प्र + काश्)
९) तारका: --- (द्युत्-द्योत्)
१०) पुष्पाणि ---- (शुभ्-शोभ्)
११) वयं ---- (वृत्-वर्त्)
१२) वृक्षा: ---- (वृध्-वर्ध्)
१३) खग: --- (डी-डय्)
१४) नृप: --- (परि + त्रै-त्राय्)
१५) काव्यानि --- (प्रथ्)
काल भाषांतरासाठी दिलेल्या वाक्यांची उत्तरे. काल कर्ता व क्रियापद यांचीच फक्त योजना करायची होती.
प्रथमा विभक्ती -
१) तू वाचतोस. (पठ्)
त्वं पठसि ।
२) रावण हरण करतो. (हृ-हर्)
रावण: हरति ।
३) गोपाळ पितो. (पा-पिब्)
गोपाल: पिबति ।
४) मुले खेळतात. (क्रीड्)
बालका: क्रीडन्ति ।
५) तुम्ही दोघे जाता. (गम्-गच्छ्)
युवां गच्छथ: ।
६) तुम्ही सर्व बोलता. (वद्)
यूयं वदथ ।
७) तो टाकतो. (त्यज्)
स: त्यजति ।
८) त्या दोघी खेळतात. (क्रीड्)
ते क्रीडत: ।
९) आम्ही दोघे धावतो. (धाव्)
आवां धावाव: ।
१०) ती जाणते. (बुध्-बोध्)
सा बोधति ।
११) तू उभा रहातोस. (स्था-तिष्ठ्)
त्वं तिष्ठसि ।
१२) राजा जिंकतो. (जि-जय्)
भूप: जयति ।
१३) पाने पडतात (पत्)
पर्णानि पतन्ति ।
१४) वानर खातो. (खाद्)
वानर: खादति ।
१५) आम्ही सर्व आहोत. (भू-भव्)
वयं भवाम: ।
१६) तू आठवतोस. (स्मृ-स्मर्)
त्वं स्मरसि ।
१७) तुम्ही दोघे बोलता. (भण्)
युवां भणथ: ।
१८) शेतकरी नांगरतो. (कृष्)
कृषीवल: कृषति ।
१९) त्या दोघी लिहीतात. (लिख्)
ते लिखत: ।
२०) ब्राह्मण पूजा करतात. (अर्च्)
ब्राह्मणा: अर्चन्ति ।
कंसातील धातूचे योग्य क्रियापद योजा,
१) त्वं पश्यसि । (दृश्)
२) बालिके तिष्ठत: । (स्था-तिष्ठ्)
३) तानि गच्छन्ति । (गम्)
४) वयम् वदाम: । (वद्)
५) सेनापति: जयति । (जि-जय्)
६) युवां त्यजथ: । (त्यज्)
७) अहम् वसामि (वस्)
८) यूयं धावथ । (धाव्)
९) मार्जारा: पिबन्ति । (पा-पिब्)
१०) ता: स्मरन्ति । (स्मृ-स्मर्)
११) आवां खादाव: । (खाद्)
१२) पर्जन्य: भवति । (भू-भव्)
१३) त्वं बोधसि । (बुध्-बोध्)
१४) सा नयति । (नी-नय्)
१५) सङ्कटानि नश्यन्ति । (नश्)
१६) यूयं नन्दथ । (नन्द्)
१७) अजे चरत: । (चर्)
१८) मेघा: गर्जन्ति । (गर्ज्)
१९) वानरा: कूर्दन्ति । (कूर्द्)
२०) त्वम् अर्हसि । (अर्ह्)
==================================
द्वितीया विभक्ती -
संस्कृत वाक्यरचना करतांना कर्ता शब्द प्रथमा विभक्तीत योजतात तर कर्म शब्द द्वितीया विभक्तीत योजतात. उदा. 'मी लेख लिहीतो.' याचे भाषांतर 'अहं लेखं लिखामि' असे होईल. कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी प्रथमा विभक्तीत योजला आहे. त्याप्रमाणे क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी आहे. आणि लिखामि क्रियापदाचे लेख हे कर्म आहे. लेख हा शब्द पुंलिंगी आहे. त्यामुळे त्याची रूपे देव शब्दाप्रमाणे होतील. एकच लेख असेल तर 'लेखं' असे रूप येईल व अनेक लेख असतील तर 'लेखान्' असेही येईल.
मी अनेक लेख लिहीतो.
अहं लेखान् लिखामि ।
त्याप्रमाणे खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करायचे आहे. कोणताही शब्दाची विभक्ती योजतांना त्या शब्दाचे लिंग पण पहावे लागेल व त्याप्रमाणे त्या शाब्दाची प्रथमा अथवा द्वितीया विभक्ती योजावी लागेल. पर्जन्य: पतति । येथे पर्जन्य शब्द पुंलिंगी आहे व त्याची रूपे देव प्रमाणे होतील तर पर्णानि पतन्ति । येथे पर्ण शब्द नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे त्याची रूपे वन प्रमाणे होतील. सदस्यांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
संस्कृतमधे भाषांतर करा.
१) कावळा फळे खातो. २) आम्ही पाणी पितो. ३) ते दोघे चित्रपट पहातात. ४) आई तुला आठवते (आठवण काढते). ५) लोक केर (अवकर) टाकतात. ६) मुलगी सोने इच्छिते. ७) दास पुस्तके नेतात. ८) राजा शत्रूला जिंकतो. ९) तुम्ही दोघे विहीर (कूप) पहाता. १०) हरिणे गवत (तृण) खातात. ११) तुम्ही सर्व ज्ञान मिळवता (अधि + गम्) १२) विद्यार्थी कविता म्हणतात (पठ्) १३) अनेक शिक्षक ज्ञान देतात. १४) लेखक कथा लिहीतो. १५) रुग्ण वैद्याला बोलावतो. १६) आई चित्र दाखवते (दिश्) १७) तुम्ही सर्व देव पूजता. १८) शेतकरी जमीन खणतात. (खन्) १९) गायक गीते गातात. २०) याचक धन मागतात. (याच्)
=================================
उत्तरे प्रथमा विभक्ती कर्ता व क्रियापद आत्मनेपदी धातू
आत्मनेपदी धातू वापरून खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा. (प्रथमा विभक्ती)
१) दुर्जन पीडा देतो.
दुर्जन: बाधते (पीडयति)।
२) मी नमस्कार करतो.
अहं वन्दे ।
३) तुम्ही सर्व आनंदित होता.
यूयं मोदध्वे ।
४) अनुराधा चव घेते.
अनुराधा स्वदते ।
५) माकडे उड्या मारतात.
मर्कटा: कूर्दन्ते ।
६) मधुरा पहाते.
मधुरा ईक्षते ।
७) मी शंका घेतो.
अहं शङ्के ।
८) मुले प्रयत्न करतात.
बालका: यतन्ते ।
९) मुलगा फिरतो.
बालक: हिण्डते ।
१०) अर्जुन थरथर कापतो.
अर्जुन: वेपते ।
११) पाने कंप पावतात.
पर्णानि कम्पन्ते ।
१२) तुम्ही दोघे जांभया देता.
युवां जृम्भेथे ।
१३) परमेश्वर क्षमा करतो.
परमेश्वर: क्षमते ।
१४) सज्जन दया करतात.
सज्जना: दयन्ते ।
१५) मी शिकतो
अहं शिक्षे ।
क्रियापदाचे योग्य ते वर्तमानकाळी रूप वापरा.
१) याचका: भिक्षन्ते । (भिक्ष्)
२) यूयम् ईक्षध्वे । (ईक्ष्)
३) वयं भाषामहे । (भाष्)
४) सङ्कटानि ग्रसन्ते । (ग्रस्)
५) अहम् ईहे । (ईह्)
६) राहु: ग्रसते (ग्रस्)
७) दुर्जना: गर्हन्ते । (गर्ह्)
८) सूर्य: प्रकाशते । (प्र + काश्)
९) तारका: द्योतन्ते । (द्युत्-द्योत्)
१०) पुष्पाणि शोभन्ते । (शुभ्-शोभ्)
११) वयं वर्तामहे । (वृत्-वर्त्)
१२) वृक्षा: वर्धन्ते । (वृध्-वर्ध्)
१३) खग: डयन्ते । (डी-डय्)
१४) नृप: परित्रायते । (परि + त्रै-त्राय्)
१५) काव्यानि प्रथन्ते । (प्रथ्)
=====================================
No comments:
Post a Comment