पाठ ५५ वा - समस्यापूर्ति:
पुरा धारानगर्यां रसिकवर: उदार: भोज: नाम राजा प्रशास्ति स्म । काव्यानुरागिणस्तस्य नैका: आख्यायिका: प्रसिद्धा: ।
पूर्वी धारा नगरीमधे रसिकांमधे श्रेष्ठ, उदार असा भोज नावाचा राजा राज्य करत होता. काव्यावर प्रेम करणार्या त्याच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
एकदा भोजराजा समस्यां उद्घोषयति, 'मृगात् सिंह: पलायते' इति । वनराज: मृगेन्द्र: क्षुद्रं मृगं पश्यति भीत्या च पलायते । अहो विपरीतार्थऽयम् । महता कुतुहलेन महान् श्रोतृगण: अन्येद्यु: राजसभायामुपस्थित: । विभिन्नप्रान्तत: नैके कवयोऽपि अहमहमिकया समस्यां पूरयितुं समायाता: ।
एकदा भोजराजा एक समस्या उद्घोषित करतो की हरिणाला घाबरून सिंह पळून जातो. वनाचा राजा असणारा सिंह क्षुद्र हरिणाला पाहून पळून जातो ! केवढी ही विपरीत गोष्ट ! मोठ्या कुतुहलाने श्रोते दुसर्या दिवशी सभेत उपस्थित होतात. वेगवेगळ्या प्रांतांतून अनेक कवी सुद्धा अहमहमिकेने समस्यापूर्ती करण्याकरता (राजवाड्यात) येतात.
प्रथम: कवि: आसनादुत्थाय राजानं प्रणम्य वदति, 'हे धाराधीश, शृणोतु मम समस्यापूर्तिम्' ।
पहिला कवी आसनावरून उठून राजाला नमस्कार करून म्हणतो, “ हे धाराधीश, माझी समस्यापूर्ती ऐकावी.”
असमाने समानत्वं भविता कलहे मम ।
इति मत्वा ध्रुवं मानी मृगात् सिंह: पलायते ॥१॥
अर्थ - माझ्या भांडणामधे बरोबरीच्या नसलेल्यांशी माझी बरोबरी सिद्ध होईल (हरिणाशी युद्ध केले तर तो माझ्याशी सामर्थ्याबाबत माझ्याशी बरोबरी करेल) असे मानून मानी सिंह हरणापासून पळून जातो.
जना: तत् काव्यम् आकर्णयन्ति तं च प्रशंसन्ति ।
द्वितीय: कवि: महाभारतकथाया: आधारेण समस्यां पूरयति ।
लोक ते काव्य ऐकतात व त्याची प्रशंसा करतात. दुसरा कवी महाभारतकथेच्या आधाराने समस्यापूर्ती करतो.
तिष्ठार्जुनाद्य संग्रामे त्वां हनिष्याम्यहं शरै: ।
तिष्ठामि कर्ण किं मूढ मृगात् सिंह: पलायते ॥२॥
अर्थ - (कर्ण म्हणतो) हे अर्जुना, थांब. मी तुला बाणांनी ठर मारणार आहे. (अर्जुन म्हणतो) हे कर्णा, हा मी थांबलो आहे. हरणाला घाबरून सिंह पळून जातो की काय ?
युद्धे कर्णस्य दर्पयुक्तं वचनं अर्जुन: आकर्णयति तस्मै झटिति प्रत्युत्तरं यच्छति, 'किं मां कातरं मन्यसे ? कच्चिद् मृगं दृष्ट्वा सिंह: पलायते ?' प्रश्नं योजयित्वा कवि: चातुर्यं दर्शयति अर्थपरिवर्तनं च करोति । रसिकेभ्य: नितरां एषा समस्यापूर्ति: रोचते ।
युद्धात कर्णाचे गर्विष्ठपणाचे बोलणे अर्जुन ऐकतो व त्याला ताबडतोप प्रत्युत्तर देतो, “मला काय तू भित्रा समजतोस ? कधी हरिणाला घाबरून सिंह पळून गेला आहे का ?” प्रश्नाची योजना करून कवी चातुर्य दाखवतो व अर्थपरिवर्तन करतो. रसिकांना ही समस्यापूर्ती खूप आवडते.
तृतीय: कवि: उत्तिष्ठति वदति च, 'अहमपि समस्यापूर्तिं करोमि' ।
यदा भोजराजा अनुज्ञां यच्छति तदा तृतीय: कवि: वदति -
तिसरा कवी उठतो व म्हणतो, 'मी सुद्धा सममस्यापूर्ती करीन. जेव्हा भोजराजा परवानगी देतो, तेव्हा तिसरा कवी म्हणतो -
कस्तूरी जायते कस्मात् को हन्ति करिणां शतम् ।
भीरु: कुर्वीत किं युद्धे मृगात् सिंह: पलायते ॥३॥
अर्थ - कस्तूरी कशापासून निर्माण होते ? (कस्तूरीमृगापासून.) शेकडो हत्तींना कोण ठार मारतो ? (सिंह). भित्रा मनुष्य युद्धात काय करतो ? (पळून जातो.)
त्रीषु चरणेषु त्रय: प्रश्ना: । अन्तिमे चरणे तेषां प्रश्नानां उत्तराणि सन्ति । एवं समस्यापूर्तिना श्रोतृवृन्द: संतुष्ट: । प्रसन्न: धाराधीशऽपि सर्वेभ्य: कविभ्य: सम्मानपूर्वकं पारितोषिकाणि यच्छति ।
तीन चरणांमधे तीन प्रश्न आहेत. शेवटच्या चरणात त्यांची उत्तरे आहेत. अशाप्रकारे समस्यापूर्तीने सर्व श्रोतृगण संतुष्ट होतो. प्रसन्न झालेला भोजराजा सम्मानपूर्वक सर्व कवींना पारितोषिके देतो.
============================
प्रश्न २रा संस्कृतमधे उत्तरे द्या.
१) भोजराजा कुत्र प्रशास्ति स्म ?
पुरा धारानगर्यां रसिकवर: उदार: भोज: नाम राजा प्रशास्ति स्म ।
२) भोजराजस्य कस्मिन् रुचि: अस्ति ?
भोजराजस्य काव्ये रुचि: अस्ति ।
३) भोजराजा कां समस्यां उद्घोषयति ?
भोजराजा समस्यां उद्घोषयति, 'मृगात् सिंह: पलायते' इति ।
४) श्रोतृगण: कुत्र उपस्थित: ?
श्रोतृगण: अन्येद्यु: राजसभायामुपस्थित: ।
५) द्वितीय: कवि: कस्य आधारेण समस्यापूर्तिं करोति ?
द्वितीय: कवि: महाभारतकथाया: आधारेण समस्यां पूरयति ।
६) कर्ण: अर्जुनं किं वदति ?
कर्ण: अर्जुनं वदति, “अर्जुन, तिष्ठ, अद्य संग्रामे त्वां शरै: अहं हनिष्यामि ।
७) अर्जुन: कर्णाय किं प्रत्युत्तरं यच्छाति ?
अर्जुन: प्रत्युत्तरं यच्छति, “कर्ण, तिष्ठामि । मूढ, मृगात् सिंह: किं पलायते ॥२॥
८) कस्तूरी कस्मात् जायते ?
कस्तूरी मृगात् जायते ।
९) करिणां शतं क: हन्ति ?
सिंह: करिणां शतं हन्ति ।
१०) भीरु: युद्धे किं करोति ?
भीरु: युद्धात् पलायते ।
======================================
" पाठ ५५ वा - समस्यापूर्तिः " या Audio साठी खाली क्लिक् करा :
No comments:
Post a Comment