Tuesday, September 22, 2020

पाठ ५७ वा पद्यकथा चटका

पाठ  ५७ वा पद्यकथा चटका

आज मी सुभाषिते न देता अनुष्टुभ छंदातील एक श्लोकबद्ध कथा देणार आहे. कथा तीन श्लोकातच सांगितलेली आहे. पण आज ती तुमची तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी फक्त संधी सोडवून दाखवणार आहे व कठिण शब्दांचा अर्थ देणार आहे. संधी सोडवले की श्लोकाची शक्ती थोडी कमी होते. नंतर प्रत्येक श्लोकातील विभक्ती पाहून तुम्ही त्यातील शब्दांची कर्ता, कर्म, क्रियापद अशी विभागणी तुम्ही करून घ्यायची आहे. पाहूया, तुम्हाला कसं जमतय ते.


प्रथम एक श्लोक घेतला की त्यातील क्रियापद शोधून काढायचे. त्यावरून त्या क्रियापदाचा कर्ता शोधायचा. एकदा कर्ता व क्रियापद कळले की त्या अनुरोधाने इतर शब्द समजून घेता येतात. खाली प्रश्न विचारले आहेत. त्या अनुरोधाने सुद्धा तुम्ही कथा समजून घेऊ शकाल. एकदा प्रयत्न करून पहा.


भक्ष्यार्थमेका चटका गृहं विशति कस्यचित् ।
अकस्मादीक्षते तत्र भित्तौ विमलदर्पणम् ॥१॥

स्वबिम्बं दर्पणे तस्मिन् यदाऽऽलोकयते च सा ।
मन्यते चापरा काऽपि चटका वर्तते खलु ॥२॥

प्रहरत्यतिकोपेन चञ्च्वा तस्मिन् हि दर्पणे ।
वारंवारमत: श्रान्ता गता मूर्छां पतत्यध: ॥३॥

कठिण शब्दांचे अर्थ -
चटका = चिमणी, भित्ति = भिंत, अपरा = दुसरी, चञ्चु = चोच, मूर्च्छा = बेशुद्धी, अध: = खाली

संधीविग्रह -
भक्ष्यार्थमेका = भक्ष्यार्थम् + एका
अकस्मादीक्षते = अकस्मात् ईक्षते
यदाऽऽलोकयते = यदा + आलोकयते
चापरा = च + अपरा
काऽपि = का + अपि
प्रहरत्यतिकोपेन = प्रहरति + अतिकोपेन
वारंवारमत: = वारंवारम् + अत:
पतत्यध: = पतति + अध:

खालील प्रश्नांची उत्तरे द्या -

१) चटका कुत्र विशति ?
२) चटका किम् ईक्षाते ?
३) दर्पणं कुत्र अस्ति ?
४) चटका दर्पणे किम् ईक्षते ?
५) स्वप्रतिबिम्बं दृष्ट्वा (पाहून) चटका किं मन्यते ?
६) चटका अतिकोपेन किं करोति ?

रूपे ओळखा -
विशति =
गृहम् =
ईक्षते =
भित्तौ =
आलोकयते =
मन्यते =
प्रहरति =
चञ्च्वा =
मूर्छाम् =
पतति =

सरावासाठी अभ्यास

१) कवि शब्दाची तृतीया विभक्ती आहे -
कविना कविभ्याम् कविभ्य:

त्याप्रमाणे कपि, मुनि, अलि, वह्नि, अग्नि, यति, मणि या शब्दांची तृतीया विभक्ती लिहा.


२) खालील धातूंचा परस्मैपदी वर्तमानकाळ लिहा. धातू दहाव्या गणाचे आहेत.


चुकून कविभिः च्या ऐवजी कविभ्यः टाईप झाले आह, सरावाच्या अभ्यासात.

=============================================

" पाठ ५७ वा पद्यकथा चटका " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...