संधी सोडवून वाचलत की वाक्याचा अर्थ उलगडत जाईल. हा पाठ समजून सागणारा ऑडिओ मंगळवारी पोस्ट करते. तोपर्यंत एक दिवस तुम्ही स्वतः समजून घेता येतो का त्याचा प्रयत्न करा. स्वध्याय मोठा आहे . चार दिवस आहेत सोडवायला.
या पाठातील आणखी काही कठिण शब्दांचे अर्थ
अपर = दुसरा कश्चन = कोणी एक कानिचित् = काही विद्-विन्द (६प.) = मिळवणे
" पाठ ५९ - विशेषणांनी युक्त पाठ - सुभाषितानि " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
पहिल्या दोन भागात आपण स्वरसंधीचे सवर्णांचा दीर्घ संधी, गुणसंधी व वृद्धिसंधी हे तीन प्रकपाहिले. आज चौथा प्रकार पहावयाचा आहे.
४) यण् संधी
व्याकरणात य्, व्, र्, ल्, या वर्णांना यण् असे नाव आहे.
नियम -
पहिल्या पदाच्या अंती ह्रस्व किंवा दीर्घ इ, उ, ऋ, लृ आले व त्यापुढे कोणताही सवर्ण नसलेला विजातीय स्वर आला तर त्या पूर्व स्वराच्या जागी क्रमाने य्, व्, र्, ल् असे आदेश होतात. म्हणजे पूर्वीच्या इ च्या ठिकाणी य्, उ च्या ठिकाणी व्, ऋ च्या ठिकाणी र् व लृ च्या ठिकाणी ल् येईल. आदेश होणार म्हणजे पूर्वीचा वर्ण हटवून त्या जागी नवीन वर्ण स्थानापन्न होणार. येथे फक्त पूर्वीच वर्ण हटवला जाणार आहे. गुण वा वृद्धिसंधी प्रमाणे मागचा व पुढचा स्वर मिळून आदेश होणार नाही.
काही उदाहरणे पाहूया.
१) गच्छति + अस्तम् = गच्छत् + इ + अस्तम्
येथे इ या स्वरापुढे अ हा विजातीय स्वर आला आहे. इ हाच स्वर आला असता तर दीर्घ संधी झाला असता. थोडक्यात ह्रस्व किंवा दीर्घ इ या स्वरापुढे इ सोडून कोणताही स्वर आला तर यण् असा आदेश होईल. म्हणून इ या वर्णाच्या जागी य् असा आदेश होईल.
आज मी सुभाषिते न देता अनुष्टुभ छंदातील एक श्लोकबद्ध कथा देणार आहे. कथा तीन श्लोकातच सांगितलेली आहे. पण आज ती तुमची तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी फक्त संधी सोडवून दाखवणार आहे व कठिण शब्दांचा अर्थ देणार आहे. संधी सोडवले की श्लोकाची शक्ती थोडी कमी होते. नंतर प्रत्येक श्लोकातील विभक्ती पाहून तुम्ही त्यातील शब्दांची कर्ता, कर्म, क्रियापद अशी विभागणी तुम्ही करून घ्यायची आहे. पाहूया, तुम्हाला कसं जमतय ते.
प्रथम एक श्लोक घेतला की त्यातील क्रियापद शोधून काढायचे. त्यावरून त्या क्रियापदाचा कर्ता शोधायचा. एकदा कर्ता व क्रियापद कळले की त्या अनुरोधाने इतर शब्द समजून घेता येतात. खाली प्रश्न विचारले आहेत. त्या अनुरोधाने सुद्धा तुम्ही कथा समजून घेऊ शकाल. एकदा प्रयत्न करून पहा.
मागच्या एका भागात आपण स्वरसंधीचा सवर्णांचा दीर्घ संधी हा एक प्रकार पाहिला होता. सवर्ण म्हणजे ज्या स्वरांचे उच्चारस्थान एकच आहे ते एकमेकांचे सवर्ण झाले. उदा. अ आणि आ दोन्ही स्वरांचा उच्चार कंठातून होतो. म्हणून ते एकमेकांचे सवर्ण झाले. जेव्हा दोन सवर्ण स्वर एकमेकांपुढे येतात तेव्हा त्यांचा दीर्घ संधी होतो. अ वर्ण + अ वर्ण = आ. इ वर्ण + इ वर्ण = ई. उ वर्ण + उ वर्ण = ऊ. ऋ वर्ण + ऋ वर्ण = ॠ
संधी २ - गुणसंधी
व्याकरणात पाणिनीने अ, ए आणि ओ या स्वरांना गुण असे नाव दिले आहे. जेव्हा अ, ए आणि ओ हे स्वर संधी म्हणून येतात तेव्हा त्या संधीला गुणसंधी असे म्हणतात.
नियम - अ किंवा आ या स्वरांपुढे ह्रस्व किंवा दीर्घ इ, उ, ऋ आणि लृ हे स्वर आल्यास त्या मागील व पुढील असा दोन स्वरांना मिळून गुणादेश होतो. आदेश होतो म्हणजे ते दोन्ही वर्ण हटवून त्या जागी गुण वर्ण येतो. (आदेश: शत्रुवत् असे म्हटले आहे).
उदा. न + इति = न् + (अ + इ) + ति
येथे न या वर्णातील शेवटच्या अ या स्वरापुढे इ हा वर्ण आला आहे. तेव्हा अ आणि इ या दोन स्वरांचा मिळून गुणसंधी होणार आहे. गुण म्हणजे अ, ए आणि ओ. मग या तीन स्वरातील कोणता वर्ण त्यांच्या ऐवजी येईल ? त्यासाठी आपल्याला या सर्व वर्णांचे उच्चारस्थान पहावे लागेल. अ वर्णाचे उच्चारस्थान आहे कंठ व इ वर्णाचे उच्चारस्थान आहे तालु. तेव्हा गुणा म्हणून जे स्वर येणार आहेत त्या स्वरांपैकी ह्या दोन्ही उच्चारस्थानांचा समावेश होणारा स्वर कोणता ? तर तो ए हा स्वर आहे. गुणा वर्णांपैकी अ चे उच्चारस्थान कंठ आहे. ए चे उच्चारस्थान कंठतालु आहे. तर ओ चे उच्चारस्थान कंठ-ओष्ठ आहे. तेव्हा कंठतालू हे उच्चारस्थान असणारा ए हा वर्ण तेथे गुण म्हणून येईल.
= न् +(अ + इ) + ति = न् + (ए) + ति = नेति असा संधी होईल.
परम + ईश्वर: = परमेश्वर: यथा + इष्टम् = यथेष्टम् अशी याची काही आणखी उदाहरणे झाली.
चन्द्र + उदय: = च + न्द्र् + (अ + उ) + दय: आता येथे अ णि उ या वर्णांचा क्रमश: कंठ व ओष्ठ उच्चारस्थान असलेला ओ हा वर्ण संधी म्हणून येईल.
= च + न्द्र् + (ओ) + दय: चन्द्रोदय:
देव + ऋषि: = दे + व् + (अ + ऋ) + षि:
आता येथे अ आणि ऋ यांचे उच्चारस्थान कंठ व मूर्धा हे आहे. गुण वर्णातील ए आणि ओ हे वर्ण येथे येऊ शकणार नाहीत. मग राहिला अ वर्ण. पण ऋ या स्वराच्या मूर्धा स्थानाची जोड देण्याकरता त्याला र् हा वर्ण जोडून अर् असे पाणिनीच्याच एका सूत्रानुसार करून घ्यावे लागते. आता अ आणि ऋ या दोन स्वरांच्या ऐवजी अर् असा गुणादेश होईल.
= दे + व् + (अ + ऋ) + षि: = दे + व् + (अर्) + षि: = देवर्षि:
लृ वर्ण पुढे येऊन होणार्या संधीची उदाहरणे भाषेमधे नाहीत. म्हणून उदाहरणादाखल एक संधी सांगितला जातो
तव + लृकार: = तवल्कारः
तसेच दीर्घ ॠ ने सुरु होणाराही शब्द नाही.
थोडक्यात अ किंवा आ या वर्णांपुढे इ-ई हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून ए हा स्वर संधी म्हणून येतो.
अ किंवा आ या वर्णांपुढे उ-ऊ हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून ओ हा स्वर संधी म्हणून येतो.
अ किंवा आ या वर्णांपुढे ऋ-ॠ किंवा लृ हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून अर् किंवा अल् हा आदेश संधी म्हणून येतो.
३) वॄद्धिसंधी
पाणिनी व्याकरणात आ, ऐ आणि औ या स्वरांना वृद्धि असे नाव आहे. जेव्हा आ, ऐ आणि औ हे स्वर संधी म्हणून येतात तेव्हा त्या संधीला वृद्धिसंधी असे म्हणतात.
नियम - पहिल्या पदाच्या अंती अ किंवा आ हे स्वर व पुढे ए किंवा ऐ स्वर आले तर त्या दोन स्वरांच्या ऐवजी त्यांना ऐ असा आदेश होतो, किंवा अ आणि आ या स्वरांच्या पुढे ओ हा स्वर आला तर त्या दोन स्वरांना मिळून औ हा वृद्धिआदेश होतो.
उदा. तेन + एव = तेन् + (अ + ए) + व = तेन् + (ऐ) + व = तेनैव
१) सैनिक चोराला काठीने मारतात. २) स्त्रिया अलंकारांनी शरीर सजवतात. ३) लोक नावेने नदी ओलांडतात. ४) अभिराम धनुष्याने रावणाबरोबर युद्ध करतो ५) राजा राजवाड्यातून लोकांना पहाटो. ६) महेश झाडावर चढतो ७) सूर्यापासून आपण प्रकाश मिळवतो ८) दशरथाचा मुलगा वनात जातो. ९) चंद्राचा प्रकाश आह्लाददायक असतो. १०) सिंह पर्वतप्रदेशात रहातात. ११) मनुष्याचे रोग अओषधाने नाहीसे होतात. १२) ज्ञानामुळे सुख मिळते. १३) लोकांच्या कल्याणासाठी राजा प्रयत्न करतो. १४) शिष्य गुरूंची सेवा करतो. १५) मनुष्य गुणांनी शोभून दिसतो. १६) सज्जन ईश्वराच्या चिंतनात मग्न होतात. १७) वाघ गवत खात नाही. १८) पापापासून दु:खे उद्भवतात. १९) मूर्खांचे ज्ञान वाढत नाही. २०) उंच झाडावर पक्षी बसतात.
सरावासाठी अभ्यास
प्रश्न १) माला शब्दाप्रमाणे विद्या शब्द चालवा, लिहून बघा. प्रश्न २) आत्मनेपदी वर्तमानकाळ लिहा - १) रम् (१ आ. प.) २) मन् (४ आ. प.) ३) मृ-म्रिय् (६ आ. प.) ४) मन्त्र् (१०. आ प.)
आज दोन संधी मुद्दाम एकत्र घेतले. तुलनात्मक कळावं म्हणून.
अ/आ + इ/ई = ए अ/आ + ए/ऐ = ऐ
अ/आ + उ /ऊ = ओ अ/आ + ओ/औ = औ
देव + ऋषि = देवर्षि
एवढं सूत्ररूपाने लक्षात ठेवायचे आहे.
====================================
" पाठ ५६ वा स्वरसंधी भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
एकदा भोजराजा एक समस्या उद्घोषित करतो की हरिणाला घाबरून सिंह पळून जातो. वनाचा राजा असणारा सिंह क्षुद्र हरिणाला पाहून पळून जातो ! केवढी ही विपरीत गोष्ट ! मोठ्या कुतुहलाने श्रोते दुसर्या दिवशी सभेत उपस्थित होतात. वेगवेगळ्या प्रांतांतून अनेक कवी सुद्धा अहमहमिकेने समस्यापूर्ती करण्याकरता (राजवाड्यात) येतात.
प्रथम: कवि: आसनादुत्थाय राजानं प्रणम्य वदति, 'हे धाराधीश, शृणोतु मम समस्यापूर्तिम्' । पहिला कवी आसनावरून उठून राजाला नमस्कार करून म्हणतो, “ हे धाराधीश, माझी समस्यापूर्ती ऐकावी.”
अर्थ - माझ्या भांडणामधे बरोबरीच्या नसलेल्यांशी माझी बरोबरी सिद्ध होईल (हरिणाशी युद्ध केले तर तो माझ्याशी सामर्थ्याबाबत माझ्याशी बरोबरी करेल) असे मानून मानी सिंह हरणापासून पळून जातो.
अर्थ - (कर्ण म्हणतो) हे अर्जुना, थांब. मी तुला बाणांनी ठर मारणार आहे. (अर्जुन म्हणतो) हे कर्णा, हा मी थांबलो आहे. हरणाला घाबरून सिंह पळून जातो की काय ?
युद्धात कर्णाचे गर्विष्ठपणाचे बोलणे अर्जुन ऐकतो व त्याला ताबडतोप प्रत्युत्तर देतो, “मला काय तू भित्रा समजतोस ? कधी हरिणाला घाबरून सिंह पळून गेला आहे का ?” प्रश्नाची योजना करून कवी चातुर्य दाखवतो व अर्थपरिवर्तन करतो. रसिकांना ही समस्यापूर्ती खूप आवडते.
तीन चरणांमधे तीन प्रश्न आहेत. शेवटच्या चरणात त्यांची उत्तरे आहेत. अशाप्रकारे समस्यापूर्तीने सर्व श्रोतृगण संतुष्ट होतो. प्रसन्न झालेला भोजराजा सम्मानपूर्वक सर्व कवींना पारितोषिके देतो.
============================
प्रश्न २रा संस्कृतमधे उत्तरे द्या.
१) भोजराजा कुत्र प्रशास्ति स्म ? पुरा धारानगर्यां रसिकवर: उदार: भोज: नाम राजा प्रशास्ति स्म ।
भास हा संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार. संस्कृत साहित्यात उपलब्ध नाटक-परंपरेचा प्रवर्तक भास हा आहे. इतर अनेक कवींप्रमाणेच त्याचे प्रामाणिक चरित्र इतिहासाला ज्ञात नाही. त्यामुळे ह्या कवीचाही काळ काही दंतकथा व बहि:साक्ष प्रमाणांवरच ठरवावा लागतो.
भासाच्या नाटकात ज्या संस्कृतीचा व आचारविचारांचा समावेश झालेला आहे त्यावरून कोणी त्याला दक्षिणभारतातील त्रावणकोरचा निवासी आहे असे मानतात. तर कोणी त्याच्या नाटकात जे भरतवाक्य येते की त्याचा राजा हिमाचलापासून विन्धाचला पर्यंत एकछत्री शासन करो, त्यावरून कोणी त्याला उत्तरभारतीय ठरवतात. एका दंतकथेप्रमाणे तो धोबी आहे तर दुसर्या दंतकथेप्रमाणे तो कवी घटकर्पराचा ग्रामवासी आहे. एक दंतकथा सांगते की भास व व्यास ह्यांच्यामधे प्रतिष्ठेच्या प्रश्नावरून भांडण झाले. तेव्हा त्यांच्यात श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी दोघांचे ग्रंथ अग्नीत टाकले गेले. परंतु अग्नीने ते जाळले नाहीत. विशेषत: भासाचे 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक त्या अग्नीत जसेच्या तसे राहिले. एकूण ह्या दंतकथेवरून कवी भास हा श्रेष्ठ नाटककार होता व स्वप्नवासवदत्तम् ही त्याची श्रेष्ठ कलाकृती होती असे दिसते. नाटककार भासाचे अभ्यासक श्री पुसाळकर यांच्या मतानुसार भास हा धर्मभीरु ब्राह्मण होता व तो उत्तरभारतातील निवासी होता. एकूण भासाच्या प्रामाणिक चरित्राविषयी अभ्यासकांमधे मतभेद आहेत.
जी अवस्था चरित्राविषयीची आहे तीच अवस्था त्याच्या काळासंबंधीही आहे. इतिहासकार त्याला इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. से सहावे शतक या काळात केव्हातरी भास झाला असे मानतात. दंडी सहाव्या शतकात होऊन गेला त्याने भासाची प्रशंसा केली आहे. त्याअर्थी त्यापूर्वी भास होऊन गेला. ही त्याची उत्तरसीमा झाली. शूद्रकाचे मृच्छकटिक नाटकावर भासाच्या चारुदत्त नाटकाची छाप आहे. शूद्रक इ. स. च्या तिसर्या किंवा चौथ्या शतकात होऊन गेला. म्हणजे भास त्यापूर्वी होऊन गेला. कालिदासाने त्याला असामान्य महाकवी म्हटले आहे. म्हणजे तो कालिदासाच्या पूर्वी होऊन गेला असला पाहिजे. कालिदास इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. चे सहावे शतक अशा कालिदासाच्या कालाविषयी सुद्धा मतभेद आहेत. वाचस्पती गैरोलांनी कालिदासाचा काळ इ. स. पूर्व पहिले शतक असा सिद्ध केला आहे. त्याअर्थी भास हा इ. स. पूर्व पहिल्या शतकाच्या आधी होऊन गेला असावा.
भासाचा वर्णव्यवस्था, यज्ञ-पूजा-प्रार्थना, गोपूजन यावर विश्वास आहे. त्याच्या नाटकांवरून त्याला कोणत्या तरी राजाचा आश्रय मिळालेला असावा असं दिसून येतं. राजघराण्यातील प्रचलित रीतीरिवाजांची त्याला पूर्ण माहिती आहे. नम्र स्वभाव, हजरजबाबी, विनोदप्रिय, इत्यादी गुणांनी तो युक्त होता, असे त्याच्या साहित्यावरून दिसून येते.
भासाचा उल्लेख मालविकाग्नी नाटकात कालिदासाने केलेला आहे. त्यावरून तो कालिदासापूर्वी होऊन गेला. कालिदासानंतर बाण (इ. स. ६५०), दण्डी (इ. स. ७००) वाक्पतिराज (इ. स. ७५०), व राजशेखर (इ. स. ९००), 'प्रसन्नराघव' नाटकाचा रचयिता कवी जयदेव (इ. स. १२००) यांनी भासाचे एक श्रेष्ठ नाटककार म्हणून स्मरण केले आहे व भासाचे 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक अग्निपरीक्षेतून खरे उतरले याचाही उल्लेख केला आहे. तसेच काव्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणार्या दंडी, भामह, वामन, अभिनवगुप्त यांनी भासाच्या नाटकातील श्लोक उदाहरणे म्हणून दिलेले आहेत. अर्थातच राजशेखरापर्यंत कवी भासाची नाटके उपलब्ध असली पाहिजेत. राजशेखराने 'भासनाटकचक्रम्' असे म्हणून त्याने अनेक नाटके लिहिली होती असा उल्लेख केला आहे. अभिनवगुप्त (इ. स. १०००), भोजदेव (इ. स. ११००), सर्वानंद (इ. स. ११५९) रामचन्द्र गुणभद्र (इ. स. १२००) शारदातनय (इ. स. १२००) या सर्वांनी भासाच्या 'स्वप्नवासवदत्तम्' नाटकाचा केवळ उल्लेखच नाही तर त्याच्या वैशिष्ट्यांची पण चर्चा केली आहे.
परंतु त्यानंतर मात्र त्याने लिहिलेली नाटके लिखित स्वरूपात मिळत नव्हती. त्यावेळचा काळही परकीय आक्रमणांचा होता. त्यामुळे त्याची नाटके काळाच्या ओघात नष्टही झालेली असावीत असा विद्वानांचा कयास होता. परंतु १९१२ मधे टी. गणपति शास्त्री यांना दक्षिणभारतात १३ नाटके असलेले एक हस्तलिखित बाड मिळाले. त्यात 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक होते. स्वप्नवासवदत्तम् हे नाटक व भास ह्यांचे समीकरण जुळले. त्याअर्थी गणपतिशास्त्री यांना मिळालेली नाटके भासाची असली पाहिजेत असे म्हणता येते. नंतर त्या सापडलेल्या सर्व नाटकांची भाषा, त्यांचे अंतरंग परीक्षण करून ती सर्व नाटके भासाची आहेत असे विद्वानांनी ठरवले. अर्थात त्या सिद्धांताला विरोध करणारीही मंडळी आहेतच.
टी. गणपती शास्त्री यांना भासाने लिहिलेली एकंदर १३ नाटके सापडली. त्यातील सात नाटके महाभारतावर आधारित, दोन नाटके रामायणावर आधारित, दोन नाटके उदयन राजाशी संबंधित आहेत तर दोन नाटकांना परंपरागत आख्यायिकांचा आधार आहे. स्वप्नवासवदत्तम्, प्रतिज्ञायौगन्धरायणम्, प्रतिमा, पञ्चरात्रम्, अभिषेकम्, मध्यमव्याय़ोगम्, कर्णभारम्, दूतवाक्यम्, घटोत्कचम्, उरुभंगम्, बालचरितम्, अविमारकम्, चारुदत्तम् अशी त्याची तेरा नाटके आहेत असे गणपती शास्त्रींनी शोधून काढले आहे.
रामायण, महाभारतादी ग्रंथावर आधारित ही नाटके असली तरी भासाने त्यात पर्याप्त बदल केलेले आहेत. भासाच्या नाटकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो रामायण अथवा महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण करतांना दिसतो. उदा. रामायणावर आधारित प्रतिमा नाटकामधे त्याने कैकयीचे उदात्तीकरण केले आहे. भरत जेव्हा कैकेयीला 'तू रामाला वनात का पाठवलेस' असे विचारतो त्यावेळी कैकेयी उत्तर देते की, 'दशरथांना पितृवियोगाने मृत्यू येईल असा शाप होता. तेव्हा दोन मृत्यू टाळण्यासाठी मी रामाला वनात धाडले.' पुन्हा भरत तिला विचारतो की रामालाच का वनात पाठवलेस ? मला का नाही पाठवलेस ? तेव्हा कैकेयी सांगते की तू आधीच मामाकडे गेलेला होतास. त्यामुळे तुझ्या वियोगाने दशरथांना इतके दु:ख झाले नसते की जेवढे रामाच्या वियोगाने झाले असते.' कैकेयीने सांगितलेली कारणेही अगदी समर्पक आहेत. अशा प्रकारे खलपात्रे ही खलपात्रे नसून ती मूलत: चांगलीच आहेत असे दाखवण्याचा त्याचा हेतू आहे.
भरतमुनींनी नाटक, ईहामृग, प्रकरण, अङ्क, व्यायोग, समवकार वगैरे दशरूपकाचे जे दहा प्रकार सांगितले आहेत त्या सर्व प्रकारात भासाची नाटके उपलब्ध होतात.
.
दूतवाक्यम् हे एक अंकी नाटक महाभारतातील श्रीकृष्ण-शिष्टाईवर आधारित आहे. तर कर्णभारम् परशुरामांनी कर्णाला दिलेल्या शापावर आधारित असणारे एक अंकी नाटक आहे. दूतघटोत्कच, नाटक महाभारतातील घटोत्कचाने केलेल्या युद्धावरच आधारित एक अंकी नाटक आहे. तर उरुभंगम् सुद्धा एक अंकी नाटक भीम दुर्योधनाची मांडी फोडतो त्या प्रसंगावर आधारित आहे. मध्यमव्यायोगम् या एक अंकी नाटाकामधे भीम एका ब्राह्मणपुत्राचे संरक्षण करतो त्यावर आधारित आहे.
पंचरात्रम् हे तीन अंकी नाटक आहे. या नाटकामधे जरी दुर्योधन, द्रोण, पांडव ही महाभारतातील पात्रे असली तरी त्यातील कथानकाला महाभारतातील कथेचा आधार नाही. एका यज्ञाच्या निमित्ताने दुर्योधन द्रोणाचार्यांना दानस्वरूपात काही देऊ इच्छितो. त्यावेळी द्रोण त्याला पांडवांना अर्धे राज्य देण्याची विनंती करतात. तेव्हा दुर्योधन सांगतो की अज्ञातवासात असणारे पांडव जर पाच रात्रींमधे आपल्याला सापडले तर मी त्यांना त्यांचे अर्धे राज्य देईन. तेव्हा द्रोणाचार्यांच्या प्रयत्नांनी दुर्योधनाला विराटानगरात अज्ञातवासात असलेले पांडव सापडतात व तो त्यांना अर्धे राज्य देतो असं याचं कथानक आहे..
बालचरित हे सात अंकी नाटक आहे. या नाटकात कृष्णजन्मापासून कंसवधापर्यंतचे कथानक आलेले आहे.
अभिषेक हे सहा अंकी नाटक आहे. या नाटकात रामाचा राज्याभिषेक हा विषय आहे.
अविमारक हे सहा अंकी नाटक आहे. या नाटकात कुन्तिभोज राजाची मुलगी कुरंगी व महाराज सौवीरचा मुलगा अविमारक यांच्या प्रेमकथेचे वर्णन केली आहे.
प्रतिमा नाटकात रामाच्या वनवासापासून रावणवधा पर्यंतच्या घटना वर्णन केल्या आहेत. हे सात अंकी सर्वांगसंपूर्ण नाटक आहे. रामाच्या वनवासापासून रावणवधापर्यंतचे कथानक यात वर्णिले आहे. याट कैकेयीचे उदात्तीकरण केले आहे.
प्रतिज्ञायौगन्धरायण हे नाटक सहा अंकी आहे. यात वत्सराज उदयन व वासवदत्ता यांच्या विवावाहाची कथा रहस्यमय रीत्या वर्णन केली आहे.
स्वप्नवासवदत्त हे सात अंकी नाटक आहे. या नाटकात सुद्धा उदयन-वासवदत्ता यांचे कथानक आहे. प्रतिज्ञायौगन्धरायण नाटकाचा हा उत्तरार्ध आहे.
चारुदत्त हे चार अंकी प्रकरण नाटक आहे. चारुदत्त व वसंतसेना यांच्या प्रेमाची कल्पित लोककथा यात वर्णन केली आहे. असं म्हटलं जातं की हे नाटक पूर्ण करण्याअगोदरच भासाचे निधन झाले. तेव्हा मग शूद्रक नावाच्या नाटाककाराने 'मृच्छकटिक' नावाचे नाटक याच कथानकावर रचले.
भासाच्या नाटकाची वैशिष्ट्ये -
भासाची नाटके प्रभावी आहेत. त्याच्या नाटकात सुंदर लोकोक्तींचा वापर असतो. त्याच्या नाटकात सर्व रस कमीअधिक प्रमाणात असतात. प्रसादगुण, माधुर्य, सरल सुगम भाषा त्याच्या नाटकात पहायला मिळते. भासाच्या नाटकात अनेक पात्रे असतात. पण ती कोणतेही पात्र निरर्थक नसते. तसेच त्याच्या नाटकातील पात्रे समाजातील विभिन्न स्तरातील असतात. तो खलपात्रांचे उदात्तीकरण करतो; अशी त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.
काल व परवा थोडा गृहपाठ जास्त होता. म्हणून आज मी फार थोडा भाग शिकवणार आहे. आजपासून आपण अधून मधून संधींचा विचार करणार आहोत.
संस्कृतभाषेमधे स्वरान्त, व्यजनान्त व विसर्गाने अंत पावणारे असे तीन प्रकारचे शब्द असल्यामुळे संधी सुद्धा तीन प्रकारचे होतात. १) स्वरसंधी २) व्यंजनसंधी ३) विसर्गसंधी
आजपासून आपण स्वरसंधी पहाणार आहोत. स्वरसंधींचे एकूण आठ प्रकार आहेत.
१) सवर्णांचा दीर्घ संधी २) गुणसंधी. ३) वृद्धिसंधी. ४) यण् संधी ५) अयवायाव संधी ६) पूर्वरूप संधी. ७) पररूपसंधी ८) प्रकृतिभाव
१) सवर्णांचा दीर्घ संधी - ज्या स्वरांचे उच्चारस्थान एकच असते, ते परस्परांचे सवर्ण स्वर होतात. उदा. अ, आ या दोन्ही स्वरांचे कंठ हे एकच उच्चारस्थान आहे. त्यामुळे ते एकमेकांचे सर्वर्ण आहेत. त्याप्रमाणेच इ-ई, उ-ऊ, ऋ-ॠ हे एकमेकांचे सर्वर्णस्वर झाले.
पहिल्या पदाच्या अंती ह्रस्व किंवा दीर्घ अ, इ, उ, ऋ हे स्वर व त्याच्या पुढे ह्रस्व किंवा दीर्घ सवर्ण आला तर त्या दोन्ही स्वरांच्या बद्दल त्याच जातीचा दीर्घ स्वर येतो.
अ + अ = आ अ + आ = आ आ + अ = आ आ + आ = आ उदा. तव + आसनम् = त + व् + (अ + आ) + सनम् = त + व् (आ) + सनम् = तवासनम्
इ किंवा ई + इ किंवा ई = ई उदा. पठामि + इदानीम् = पठाम् + (इ + इ) दानीम् = पठाम् + (ई) + दानीम् = पठामीदानीम्
धिक् या अव्ययाला द्वितीया विभक्ती लागते. चर्मन् (नपुंसकलिंगी) = कातडे
अर्थ - परोपकारशून्य मनुष्याचे जीवन व्यर्थ आहे. ज्यांचे कातडे सुद्धा उपयोगी पडते ते पशूच जगोत.
४) निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् । अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा: ॥(नी.श.)
संधिविग्रह - निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तुवन्तु* *लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् । *अद्य एव वा मरणम् अस्तु युगान्तरे वा *न्याय्यात् पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा: ॥
विग्रह - नीतिनिपुणा: निन्दन्तु यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी: समाविशतु वा यथेष्टम् गच्छतु । अद्य एव वा मरणम् अस्तु युगान्तरे वा *धीरा: न्याय्यात् पथ: पदं न प्रविचलन्ति ॥
अर्थ - नीतिनिपुण लोक निंदा करोत वा स्तुती करोत, लक्ष्मी घरात प्रवेश करो अथवा तिच्या इच्छेप्रमाणे खुशाल निघून जावो, मरण आजच येवो किंवा कालांतराने (दुसर्या युगात) येवो न्याय्य मार्गापासून धैर्यवान लोक एक पाऊल सुद्धा ढळत नाहीत.
अर्थ - जात पाताळात जावो, गुणसमूह त्याच्याही खाली जावो. चारित्र्य पर्वताच्या कड्यावरून पडो. वंश अग्नीकडून जाळला जावो. शत्रूप्रमाणे असलेल्या शौर्यावर ताबडतोप वज्र पडो. ज्या एका द्रव्याशिवाय हे सर्व गुण जवळ जवळ कस्पटासारखे होतात ते द्रव्य फक्त आमच्याजवळ असो.
स्वाध्याय -
प्रश्न १ ला खालील रूपे ओळखा - उदा. १) वर्षतु - वृष्-वर्ष् (१ प. प.) आज्ञार्थ द्वि. पु. ए. व. २) काले - काल (अकारान्त पुं.) स. ए. व.
काल आपण सामान्यपणे संस्कृतमधे वापरल्या जाणार्या काळांची व आज्ञार्थ वगैरे अर्थांची माहिती घेतली. आज मी तुम्हांला परस्मैपदी आज्ञार्थाचे प्रत्यय सांगणार आहे.
परस्मैपदी आज्ञार्थ
आनि आव आम प्रथम पुरुष - तम् त द्वितीय पुरुष तु ताम् अन्तु तृतीय पुरुष.
धातूचे अंग बनवण्याची रीत नेहेमीसारखीच असते. आपण नम् = नमस्कार करणे या धातूचा आज्ञार्थी रूपे पाहूया.
नम् + अ = नम (धातूचे अंग)
नमानि नमाव नमाम प्रथम पुरुष नम नमतम् नमत द्वितीय पुरुष नमतु नमताम् क् नमन्तु तृतीय पुरुष
या पाठात ऋकारान्त मातृ, पितृ, भ्रातृ वगैरे शब्द वापरलेले आहेत.
======================================
५२ पाठ (उत्तरे) परस्मैपदी आज्ञार्थ
१) दशरथ: अयोध्याया: राजा । कौसल्या, सुमित्रा कैकेयी च तस्य तिस्र: भार्या: । दशरथ: रामस्य पिता । अत: राम: दाशरथि: इति नाम्ना प्रसिद्ध: । कौसल्या तस्य माता । लक्ष्मण:, भरत: शत्रुघ्न: च तस्य भ्रातर: ।
भाषांतर - दशरथ हा अयोध्येचा राजा होता. कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या त्याच्या तीन पत्नी होत्या. दशरथ हे रामाचे वडील. म्हणून तो दाशरथी अशाही नावाने प्रसिद्ध आहे. कौसल्या ही त्याची आई. लक्ष्मण, भरत व शत्रुध्न हे त्याचे भाऊ आहेत.
भाषांतर - दशरथ श्रीरामांना युवराजपद देऊ इच्छितो. तेव्हा कैकेयी दशरथाला म्हणते, “माझा पुत्र भरत युवराजपद भूषवो. श्रीराम वनामधे जावो. हे वर तुम्ही मला द्या.” यामुळे दशरथ खिन्न होतो. तो (कैकेयीला) म्हणतो, “दुसरा कोणता तरी वर माग. श्रीरामाशिवाय मी जगू शकणार नाही. तेव्हा श्रीरामाने वनात जाऊ नये.” तेव्हा श्रीराम स्वत:च म्हणतो, “बाबा, मी युवराजपद इच्छित नाही. आपल्या आज्ञेचे मी पालन करतो. आजच वनात जातो.”
भाषांतर - तेव्हा श्रीरामाबरोबर सीता व लक्ष्मण वनात जातात. तेव्हा प्रजाजन श्रीरामाला विनंती करतात, “श्रीरामा, वनात जाऊ नकोस”. तेव्हा श्रीराम लोकांना म्हणतात, “हे प्रजाजनहो, वडिलांची आज्ञा पाळणे माझे कर्तव्य आहे. मला युवराजपदाची पर्वा नाही. माझ्या वनात जाण्याने रघुवंशाची कीर्ती पसरो. तुम्ही सर्व घरी जा आणि कैकेयीची निंदा करू नका”.
भाषांतर - क्रुद्ध झालेले श्रीराम वानरांच्या सहाय्याने रावण वगैरेंचा पराभव करतात, लंका जिंकतात व बिभीषणाला म्हणतात, “तूच लंकेचा सांभाळ कर. मी तुझ्या राज्याची इच्छा करत नाही.”
६) तत: अयोध्यां श्रीराम: सीतया लक्ष्मणेन च सह प्रत्यागच्छति । अनन्तरं लोकानां समाधानार्थं विशुद्धाम् अपि सीतां वने विसृजति । भाषांतर - नंतर श्रीराम सीता व लक्ष्मणासह अयोध्येला परत येतात. नंतर लोकांच्या समाधानासाठी विशुद्ध असलेल्या सीतेचाही वनात त्याग करतात.
भाषांतर - अशाप्रकारे त्यागपूर्ण चरित्राने परिपूर्ण, भावांवर प्रेम करणारा, आईला प्रिय असणारा, पितृभक्त, मित्रांना प्रिय असणारा, प्रजेवर प्रेम करणारा, लोकशाहीचा प्रेरक श्रीराम हा लोकांचा आदर्श राजा आहे. 'जसा राजा तशी प्रजा' या (न्यायाने) सर्व प्रजा सुद्धा स्वकर्तव्याचे पालन करून परस्परांना आनंद देत असे. आजही आपण रामराज्य हे आदर्श राज्य होते असे मानतो.
प्रश्न १ - खालील प्रश्नांची संस्कृतमधे उत्तरे द्या. १) श्रीरामस्य के भ्रातर: ? उत्तर - लक्ष्मण:, भरत: शत्रुघ्न: च श्रीरामस्य भ्रातर: ।
२) कैकेयी किं वरं वरयति ?
उत्तर - कैकेयी वरयति, ““मम पुत्र: भरत: युवराजपदं भूषयतु । श्रीराम: च वनं गच्छतु । एतान् वरान् मे प्रयच्छ” इति ।
आत्मनेपदी धातू वापरून खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा. (प्रथमा विभक्ती)
१) दुर्जन पीडा देतो. २) मी नमस्कार करतो. ३) तुम्ही सर्व आनंदित होता. ४) अनुराधा चव घेते. ५) माखडे उड्या मारतात. ६) मधुरा पहाते. ७) मी शंका घेतो. ८) मुले प्रयत्न करतात. ९) मुलगा फिरतो. १०) अर्जुन थरथर काफतो. ११) पाने कंप पावतात. १२) तुम्ही दोघे जांभया देता. १३) परमेश्वर क्षमा करतो. १४) सज्जन दया करतात. १५) मी शिकतो
संस्कृत वाक्यरचना करतांना कर्ता शब्द प्रथमा विभक्तीत योजतात तर कर्म शब्द द्वितीया विभक्तीत योजतात. उदा. 'मी लेख लिहीतो.' याचे भाषांतर 'अहं लेखं लिखामि' असे होईल. कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी प्रथमा विभक्तीत योजला आहे. त्याप्रमाणे क्रियापद प्रथम पुरुषी एकवचनी आहे. आणि लिखामि क्रियापदाचे लेख हे कर्म आहे. लेख हा शब्द पुंलिंगी आहे. त्यामुळे त्याची रूपे देव शब्दाप्रमाणे होतील. एकच लेख असेल तर 'लेखं' असे रूप येईल व अनेक लेख असतील तर 'लेखान्' असेही येईल.
मी अनेक लेख लिहीतो. अहं लेखान् लिखामि ।
त्याप्रमाणे खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करायचे आहे. कोणताही शब्दाची विभक्ती योजतांना त्या शब्दाचे लिंग पण पहावे लागेल व त्याप्रमाणे त्या शाब्दाची प्रथमा अथवा द्वितीया विभक्ती योजावी लागेल. पर्जन्य: पतति । येथे पर्जन्य शब्द पुंलिंगी आहे व त्याची रूपे देव प्रमाणे होतील तर पर्णानि पतन्ति । येथे पर्ण शब्द नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे त्याची रूपे वन प्रमाणे होतील. सदस्यांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
संस्कृतमधे भाषांतर करा.
१) कावळा फळे खातो. २) आम्ही पाणी पितो. ३) ते दोघे चित्रपट पहातात. ४) आई तुला आठवते (आठवण काढते). ५) लोक केर (अवकर) टाकतात. ६) मुलगी सोने इच्छिते. ७) दास पुस्तके नेतात. ८) राजा शत्रूला जिंकतो. ९) तुम्ही दोघे विहीर (कूप) पहाता. १०) हरिणे गवत (तृण) खातात. ११) तुम्ही सर्व ज्ञान मिळवता (अधि + गम्) १२) विद्यार्थी कविता म्हणतात (पठ्) १३) अनेक शिक्षक ज्ञान देतात. १४) लेखक कथा लिहीतो. १५) रुग्ण वैद्याला बोलावतो. १६) आई चित्र दाखवते (दिश्) १७) तुम्ही सर्व देव पूजता. १८) शेतकरी जमीन खणतात. (खन्) १९) गायक गीते गातात. २०) याचक धन मागतात. (याच्)
=================================
उत्तरे प्रथमा विभक्ती कर्ता व क्रियापद आत्मनेपदी धातू
आत्मनेपदी धातू वापरून खालील वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा. (प्रथमा विभक्ती)
१) दुर्जन पीडा देतो. दुर्जन: बाधते (पीडयति)। २) मी नमस्कार करतो. अहं वन्दे । ३) तुम्ही सर्व आनंदित होता. यूयं मोदध्वे । ४) अनुराधा चव घेते. अनुराधा स्वदते । ५) माकडे उड्या मारतात. मर्कटा: कूर्दन्ते । ६) मधुरा पहाते. मधुरा ईक्षते । ७) मी शंका घेतो. अहं शङ्के । ८) मुले प्रयत्न करतात. बालका: यतन्ते । ९) मुलगा फिरतो. बालक: हिण्डते । १०) अर्जुन थरथर कापतो. अर्जुन: वेपते । ११) पाने कंप पावतात. पर्णानि कम्पन्ते । १२) तुम्ही दोघे जांभया देता. युवां जृम्भेथे । १३) परमेश्वर क्षमा करतो. परमेश्वर: क्षमते । १४) सज्जन दया करतात. सज्जना: दयन्ते । १५) मी शिकतो अहं शिक्षे ।